दिशाभूल ( भाग 3)

Bhaypat

दिशाभूल ( भाग 3 ) 

( माघील भागात आपण पाहिले करण व प्रीती त्या शॉर्टकट मार्गाने निघाले  होते )

आता पुढे .......

मस्त हसत खेळत नवीन जोडप्याचा प्रवास चालू झाला होता, 

प्रीती ने तिच्या बाजूची काच खाली केली व ती गाडीतून हात बाहेर काढून हवा किती जोरात लागतेय हे पुन्हा पुन्हा करण ला सांगत होती, 
"किती छान वाटतेय ना रे 
मस्त हिरवीगार झाडी 
व त्यात आपण दोघे 
अस वाटतय गाडी बाजूला लावून मस्त पाई चालत जावे 
फक्त आपण दोघे तू आणि मी " 
ती त्याचा हाताला हात लावत म्हणाली 

" अरे हळू 
तू दुरून बोल बर एक तर दोन्ही बाजूने ही गर्द झाडी मी अश्या रस्त्यावर पहिल्यादा गाडी चालवत आहे व तू मध्ये मध्ये डिस्टर्ब नको करू " 

करण वैतागून म्हणाला 
आता प्रीती खुप हसू लागली 
" असे रे काय करतो 
किती घाबरतोस तू 

ती हसत हसत म्हणाली 

" हो का मग तू चालव गाडी मी तुला असेच परेशान करतो मग बघू " 
करण थोडा रागाने म्हणाला 

"ये सॉरी ना पिल्लू नाही करत परेशान  " 
प्रीती लाडाने म्हणाली

रस्त्याच्या दुतर्फा असलेली गर्द झाडी, 
पडलेला अंधार 
मधेच येणारा रातकीड्यांचा आवाज त्यांची शांतता भंग करत होता, 
हळूहळू गाडी पुढे सरकत होती 
तशी करण च्या मनात भीती वाढत होती 
इतका सुमसाम रस्ता व त्यावर आम्ही दोघे च काही झाले तर 
मी वाचवू शकेल का प्रीती व स्वतः ला, 
आता प्रीती देखील घाबरू लागली 
नसते आले तर बरे झाले असते असे तिला मनात वाटू लागले, 
दूरवर काहीच दिसत नव्हते 
फक्त अंधार व झाडी होती, 
दोघेही आता घामागूम झाले, 
करण गाडी चा वेग हवा तितका वाढवत होता पण रस्ता काही संपत नव्हता, 
त्याला वाटले होते की हा रस्ता संपून लवकर हायवे ला लागता येईल पण हा रस्ता काही संपण्याचे नाव घेत नव्हता, 

"करण रस्ता चुकलो तर नाही ना रे " 
प्रीती कापऱ्या आवाजात म्हणाली 


"नाही ग काही काय बोलतेस 
येईल आता हायवे " 
करण मन घट्ट करत म्हणाला 


पण कधी येईल प्रीती ला तर शांत बसवले पण माझ्या मनाला कसे बसवू 
समोर व पाठीमाघे कुणीच दिसेना, 
कदाचित इकडे कुणी येत नसावे 
आता माघे ही जाऊ शकत नाही खुप दूर पडेल व पुढे काय???
हा रस्ता कधी संपेल??
की कधीच संपणार नाही ?
करण खुप घाबरला होता, 

तेवढ्यात त्याला समोरून एक व्यक्ती जाताना दिसली, 
त्या व्यक्ती ला बघताच करण च्या जीवात जीव आला 
ती व्यक्ती रस्ता ओलांडण्यापूर्वी करण ला त्या व्यक्ती जवळ पोहोचायचे होते, 
म्हणून करण ने गाडी चा वेग वाढवला 
पण गाडी फक्त जागेवर फिरत होती 
कितीही वेग वाढवला तरी गाडी पुढे जात नव्हती, 
करण ला कळेना काय होतंय 

"करण काय झालंय तू गाडी जागेवर का पळवत आहेस 
घे ना फास्ट तो माणूस जाईल पुन्हा मग कोण मदत करेल 

प्रीती ओरडत म्हणाली 

"प्रीती करतोय मी प्रयत्न पण होत नाहीये 
गाडी पुढे च जात नाहीये 
माहीत नाही काय होतंय " 
करण रडावलेला चेहरा करत म्हणाला 

" एक काम कर आपण खाली उतरून जाऊ त्या व्यक्तीकडे 
चल " 
प्रीती थोडी हिंमत दाखवत म्हणाली 

"नको ग रिस्क आहे तो कोण आहे माहीत नाही व झाडा वरून तर रस्ता जंगलाचा वाटत आहे 
काही झाले मग 
नको मी करतो प्रयत्न " 
असे म्हणून तो प्रयत्न करू लागला पण त्याच्या कुठल्याही प्रयत्न ला यश येत नव्हते, 
आता काय करावे ते करण लाही कळेना ती व्यक्ती आता दूर जात होती 
त्यांच्यामध्ये खुप अंतर वाढत होते शेवटी सगळे मार्ग थकल्यावर 
करण पाई जाण्यासाठी तयार झाला,

" चल जाऊयात " 
असे म्हणत त्याने प्रीती ला खाली उतरून तिचा हात पकडला 

"हे बघ प्रीती काही झाले तरी माझा हात सोडायचा नाही समजलं " 
करण प्रीती ला समजावत म्हणाला 

"हो चालेल 
पण तू घाबरू नको ना 
तू घाबरला की मलाही भीती वाटते " 
प्रीती करण चा हात घट्ट पकडत म्हणाली 

त्यांनी एकमेकांचे हात हातात घेतले 
करण ने गाडी कडे पाहिले 
व एक मोठा स्वास घेतला 
ती व्यक्ती आता आणखी दूर गेली होती, 
करण व प्रीती निघाले त्या व्यक्ती पाठीमाघे, 
ते माघे व ती व्यक्ती पुढे 
त्यांनी वेग वाढवला की ती व्यक्ती देखील वेग वाढवायची व त्यांनी मंद केला की मंद 

आता कसला तरी वासही येत होता त्या वासाच्या सोबतीला आवाजही होता पण कशाचा ते अजूनही कळत नव्हते, 

करण व प्रीती जिवाच्या आकांताने आवाज देत होते त्या व्यक्तीला पण ती अजूनही ऐकत नव्हती 
खुप वेळ झाला तरी असेच चालू होते, 

शेवटी ती व्यक्ती दिसेनाशी झाली 
क्षणात गायप झालेल्या त्या व्यक्ती ला बघून करण व प्रीती खुप घाबरले 
त्यांना ती शेवटची आशा होती आता तीही मावळली होती, 
त्यांनी माघे वळून पाहिले तर 
आता गाडी ही दिसत नव्हती 

समोर व माघे आता कुठेच आशेचा किरण दिसत नव्हता, 

तेवढ्यात कसला तरी कर्कश आवाज आला, 
बहुतेक किंचाळी होती कुणाची तरी 
ती दोघे इकडे तिकडे पाहू लागली पण कुठेच कुणी दिसत नव्हते प्रीती खुप घाबरली व पटकन करण चा पाय पकडून खाली बसली 

"त्या व्यक्तीला काही झाले असेल का रे ?" 
रडत करण ला म्हणाली 

"मलाही तसेच वाटतेय "करण सहमती दर्शवत म्हणाला 

"जर त्याला काही झाले असेल तर आपणही या रस्त्यावर सुरक्षित नाही आहोत " 
प्रीती रडत म्हणाली 

" नाही ग तो नसेल " 
करण प्रीती ला समजावण्यासाठी म्हणाला 

"हो नसेल तो 
पण कुणीतरी असेलच ना " 
प्रीती पुन्हा शंका घेत म्हणाली 

" नाही ग नसेल तसे " 
करण पुन्हा म्हणाला 
तेवढ्यात करण च्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला 
खांद्यावर पडलेला हात बघून करण खुप घाबरला 

कोण असेल करण च्या खांद्यावर हात ठेवणारी व्यक्ती ???
ती किंचाळी कुणाची असेल ???
जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
व कथा कशी वाटली नक्की कळवा, लाईक व शेअर करायला विसरू नका

🎭 Series Post

View all