दिशाभूल ( भाग 2)

Nariwadi

दिशाभूल ( भाग 2 ) 

( माघील भागात आपण पाहिले सविताकाकू करण ला व प्रीती ला कुठेच जायचे नाही असे सांगून झोपी गेल्या , 
प्रीती चे मन दुखू नये म्हणून करण आई बाबा ना चोरून प्रीती सोबत जायला निघाला 

आता पुढे .......


करण ने हळूहळू गाडी गेट च्या बाहेर आणली व चालू झाला जोडी चा प्रवास ....

"ओ .....
गॉड 
Thank you so much dear  
मला वाटलं आता आई नाही म्हणाल्या म्हणून आई चा श्रावणबाळ नाही म्हणतो की काय पण तू आलास 
ग्रेट हहहहहहहहहहज....
" प्रीती आनंदाने म्हणत होती 


"पहिल्यांदा आमच्या राणीसाहेबांनी काहितरी माघीतलय व मी देणार नाही असे होईल का ???" 
करण तिला धक्का देत म्हणाला 
तो तिला धक्का देण्यासाठी थोडासा सरकला व त्याचा गाडीवरील ताबा सुटला 

"ये ......
हे काय करतोस 
ब्रेक दाब ना " 
प्रीती ओरडत म्हणाली 

"हो ग
घाबरू नको असे स्टंट मी खुप वेळा करतो 
मी मुद्दाम गाडी ओव्हर कंट्रोल करतो व दुसर्याक्षणी गाडीवर ताबा मिळवतो 
मजा येते मला खुप " 
करण आगाऊपणा करत म्हणाला 

"हो का मजा येते म्हणे 
पण यापुढे तू असे काही करू नकोस समजलं का ???" 
प्रीती त्याचा कान पकडत म्हणाली 

"ये ........
सोड माझा कान पटकन नाहितर माझे गाडीवरील नियंत्रण सुटेल"
करण प्रीती ला समजावत म्हणाला 

आज लग्नानंतर पहिल्यांदा ती दोघे सोबत घराबाहेर पडले होते त्यामुळे नव्या प्रेमाच्या नवलाई ला बहार आली होती,
गाडी पुढे पुढे सरकत होती व ते दोघे गुंतले होते एकमेकात हसत, गप्पा मारत मामा चे घर कधी आले कळलेच नाही, 

मामी नि दोघांचे औक्षण करून घरात घेतले 
करण मामा सोबत गप्पा मारत बसला होता तेवढ्यात प्रीती ची आजी बाहेर आली कोण आले बघण्यासाठी
समोर नवी नवरी बघून आजी ओरडली 
"तू का आलीस ग हळदी च्या अंगावर असे फिरू नये इतके दूर व त्यातही आज अमावस्या " 

असे म्हणून त्या बाहेर येऊन बसल्या 

"मी माझ्या घरच्यांना नाव ठेवत होते पण इथेही तेच काय ओ मामी " 
प्रीती चिडून मामी ला म्हणाली 

"जाऊ द्या ओ प्रीती तुम्ही नका लक्ष देऊ 
त्यांचे वय झालंय त्या रोज अशाच बोलता " 
मामी समजूत काढत म्हणाल्या 

मामी नि छान पुरणाचा स्वयंपाक 
केला 
 जेवायला वाढले, 
करण व मामा जेवायला बसले 
प्रीती व मामी नंतर बसणार होत्या

करण समोर तात ठेवले, त्याने एकदा ताटावरून  नजर फिरवली 
पुरणाची पोळी , वाटीत दूध, एका कोपऱ्यात भजी त्याच्या सोबत पापड , दुसऱ्या कोपऱ्यात आमटी ची वाटी मांडलेली होती 
त्याने पहिला घास घेतला व पापड उचलला तर त्याखाली मीठ व अर्धे कापलेले लिंबू होते, 
ते लिंबू त्याला अचानक लाल दिसू लागले, 
करण बिचकला नजरेचा खेळ आहे की काय म्हणून त्याने पुन्हा एकदा नीट निरखून पाहिले पण ते अजूनही लाल च दिसत होते, 
त्याने दचकत च जेवण केले 
व हात धुतला, 

नंतर प्रीती व मामी नि जेवण केले करण अजूनही त्यांचे ताट च नेहाळत होता 
त्याला त्या लिंबाचा रंग काहीतरी खुणावत होता पण काय ???
याचा त्याला सुगावा लागत नव्हता, 
पण त्यांच्या ताटात त्याला लिंबू चा दिसले नाही, 

सगळ्यांची जेवणं झाली 
गप्पा मारून झाल्या, 
आता निघण्याची तयारी चालू झाली,

प्रीती चे मामा शेती करत असल्यामुळे त्यांनी भाची ला त्यांच्या शेतातील काही फळभाज्या आणून ठेवल्या होत्या, मामी नि त्या पिशवीत भरून दिल्या, त्यात पालक, मेथी, टोमॅटो, व गाजर होते 
करण ने पिशवी गाडीत ठेवण्यासाठी हातात घेतली व त्याचे लक्ष त्या टोमॅटो वर गेले त्याचा तो लाल लाल रंग त्याच्या नजरेवर कोरला गेला 

"पुन्हा लाल रंग 
आता सगळं लालच लाल होणार आहे" 
तो मनाशीच पुटपुटला 

आपला नवरा असे वेड्यासारख काय बडबड आहे हे प्रीती ला देखील कळले नाही 
पण करण पुन्हा हसला व बस लवकर उशीर होईल असे म्हणाला मग तिला बर वाटल, 
मामा मामी चा निरोप घेऊन करण व प्रीती निघाले
गप्पा मारत मारत त्यांचा प्रवास चालू होता, करण प्रीती शी बोलत होता पण ते लिंबू अजूनही त्याच्या डोळ्यासमोरून जातं नव्हते, 
तो पुन्हा पुन्हा त्या विचारात गुंतत होता, 
आता ते गावापासून खुप दूर आले होते, तेवढ्यात प्रीती म्हणाली 
"जरा गाडी जोरात चालवं ना 
दिवस मावळन्या अगोदर घरी पोहोचलो पाहिजे नाहीतर आई पुन्हा गोधळ घालतील 
त्यात आज अमावस्या रात्री जर गेलो तर तुझी आई भूत समजून बाहेर झोपवेल आपल्याला " 
प्रीती मस्करी करत म्हणाली 

"तसे नाही ग 
तिची श्रद्धा आहे या सर्वांवर 
तुला पटत असेल तर ऐक नाहीतर नको ऐकू पण तिची मस्करी करू नको " 
करण थोडे रागवत म्हणाला 

" ओहहहह
गॉड 
आता तू त्यांच्या भूमिकेत घुसू नको बर " 
ती करण ला हसत म्हणाली 

पण करण चे तिच्याकडे लक्ष च नव्हते 

"प्रीती तुला मामी ने जेवणात लिंबू वाढले होते का
ग 
" करण हळूच म्हणाला 

"का रे 
वाढले होते ना
काय झालं " 
प्रीती त्याच्याकडे बघत म्हणाली 

"त्या लिंबाचा रंग कोणता होता ग " तो घाबरत च म्हणाला 

"कोणता म्हणजे 
पिवळा 
असे काय करतो मामी ने काय दुसरे लिंबू संशोधन नाही केले अजून " असे म्हणून ती पुन्हा हसू लागली 


"आता ईला कसे सांगु मला ते लिंबू लाल दिसत होते 
नको सांगायला 
पुन्हा हसेल ती मला 
पण मग माझेच लिंबू लाल का होते 
काय दर्शवत होते ते मला 
काही असेल का संकेत त्या पाठीमाघे 
की जेवणातून घातलं असेल मामी ने मला काही " 
करण असा विचार करू लागला 
तोच दुसऱ्या क्षणी तो भानावर आला 
"काय मूर्खपणा लावला आहे मी 
असा आई प्रमाणे विचार का करू लागलो मी "
तो मनातच म्हणाला 


" ये .... ...
हॅलो 
कुठे हरवलास ???
बर ऐक 
ते आई ने गळ्यात घालायला दिलेलं काहीतरी तोडून फेक बर कसलं दिसत घाण 
प्रत्येक फोटो त येतंय ते 
काढ बर अगोदर " 
ती त्याच्या समोर हात करत म्हणाली 

"घे माझा तरी कुठे विश्वास आहे 
पण आई चे मन ठेवण्यासाठी करतो हे सगळं " 

तो गळ्यातील ती वस्तू काढून तिच्या हातात देत म्हणाला 
तिने ती हातात घेतली व वाऱ्याच्या वेगाने फेकून दिली 

"चल गेलं तुझं सुरक्षा कवच 
काही पण म्हण पण सॉलिड आहे तुझी आई अरे असे काहीपण घालून जर स्वतः चे संरक्षण करा आले असते तर सीमेवरील जवानांना असे च गळ्यात घातले असते 
काहीपण विचार करतात" 
प्रीती  तुच्छतेने म्हणाली 

आता गावाचा कच्च रस्ता संपून थोडा पक्का रस्ता लागला होता, लोक कामावरून घरी निघाले होते दिवस देखील मावळतीकडे झुकला होता 

"अजून किती दूर जायचे आहे रे एखादा शॉर्टकट नाही का? " 
प्रीती करण ला म्हणाली 

"आहे ग पण थोडी झाडी आहे रस्त्याने पण एक तास वाचेल आपला व आपण मेन हायवे ला लागू मग" 
करण गाडी चालवत च म्हणाला 

"हो चालते की मग 
घे त्या रस्त्याने 
पुन्हा घरी जायला उशीर झाला तर आई रागवतील " 
प्रिती तोंड वाकडे करत म्हणाली 


"चल तर मग जाऊयात त्या रस्त्याने " 
असे म्हणून करण ने त्या शॉर्टकट ने गाडी वळवली 


ठरेल का हाच शॉर्टकट् त्यांच्यासाठी काळ
की दाखवेल त्यांना 
योग्य वाट 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा माझ्या 
कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका 
भेटुयात पुढील भागात 
धन्यवाद

🎭 Series Post

View all