दिशाभूल ( भाग 1)

Horror

दिशाभूल 

कथा ही कल्पना शक्तीवर अवलंबून असून कुठल्याही नात्याला किंवा व्यक्तीला इजा पोहोचवणे हा लेखिकेचा हेतू नाही, काही पात्र प्रसंगानुरूप रंगवली गेलेली असून जर आपला काही संबंध जुळून आला तर निव्वळ योगायोग समजावा 

धन्यवाद 

करण आणि प्रीती नवविवाहित जोडपं, लग्नाला अजून आठ दिवसही झाले नाहीत तर हे दोघे जवळच असलेल्या प्रीती च्या मामाच्या गावाला जाणार होते 
मामी नि जावयाला जेवायला बोलावले म्हणून 

पण अजून सविता काकू 
करण ची आई 
यांना विचारायचे बाकी होते, 
पण हिम्मत दोघांची देखील होत नव्हती, 

सविता काकू त्यांच्या खोलीत कपड्याची पेटी काढून बसल्या होत्या खुप जुने कपडे दिसत होते ते व कसला तरी वास पण येत होता 

"आई काय करतेस 
व हे कपडे कुणाचे आहेत " 
करण जवळ येत म्हणाला 

"दूर हो पटकन दूर हो 
पुढे येऊ नको 
धोका होईल धोका 
माघे हो .........
......माघे हो " 
सविताकाकू ओरडू लागल्या 

"अग हो आई इतकी काय ओरडतेस होतो च आहे ना " करण शांतपणे म्हणाला 


"पण का आलास तू 
इथे 
लवकर बाहेर हो 
हो म्हणते ना समजत नाही का तुला " 
त्या पुन्हा ओरडत म्हणाल्या 

त्यांच्या अशा ओरडण्याने 

महादेवराव त्यांचे पती व प्रिया देखील धावत त्या रूममध्ये आले, 

आपली आई अशी का ओरडत आहे हे काळण्यापूर्वी च सविताकाकू चक्कर येऊन खाली कोसळल्या 
सर्वांनी त्यांना बाहेर नेले व महादेवरवानी आठवणी हे ती पेटी बंद केली व मग ते बाहेर आले, 


"बाबा आई ला काय झाले होते आता " 
करण बाबाकडे चौकशी करू लागला 


"हे बघ बाळ 
त्याबद्द्ल तू विचारू नये व मी सांगू नये 
फक्त तू आज जे बघायला नको होते ते बघितले त्याचा तिला त्रास झाला " महादेवराव खिन्नपणे म्हणाले 


"अहो बाबा काय बघायला नको होते 
व काय बघितले मी हे तरी कळेल का ???
अहो 
सांगा बाबा 
बोला काहितरी " 
करण स्वतः ला त्रास करून घेत म्हणाला 

प्रीती तर अजूनही त्या धक्क्यातून सावरली नव्हती 
ती फक्त शांत उभाराहून हे सगळं बघत होती 

तेवढ्यात सविताकाकू ला जाग आली व त्या जोर जोरात रडू लागल्या

"आता मी काय करू 
अहो बोला ना .....
आता सगळं विपरीत होणार 
सगळं संपलं आज 
सगळं संपलं 

त्या महादेवरावाकडे बघत म्हणत होत्या 

"काही नाही संपलं 
आपण मार्ग काढू यावर 
तू शांत राहा बर " 
महादेव राव त्यांना समजावत म्हणाले 

"आता काय मार्ग काढणार तुम्ही 
जो मार्ग होता तोच तुम्ही बंद केला 
आता फक्त घडणार ....." 
असे म्हणून त्या पुन्हा रडू लागला 


प्रीती थरथरत कापत होती तिला काहीच कळत नव्हते काय चालू आहे 
तसे कळत तर करण लाही काही नव्हते पण तो तसे दाखवत नव्हता 
त्याने आई ला पाणी देऊन शांत केले व म्हणाला 
"आई मी ठणठणीत उभा आहे तुझ्यासमोर तू जीवाला त्रास करून घेऊ नकोस 
आणि मला काहीही होणार नाही " 
त्याने आई मला जवळ घेत विश्वास दिला 

"ते काही का असेना पण थांब " 
असे म्हणून त्या देवघरात गेल्या व काहीतरी हातात घेऊन आल्या 
पिवळा दोरा लावलेली काळी कापडी वस्तू होती ती 
त्यांनी ती पटकन त्याच्या गळ्यात घातली व म्हणाल्या
"ही वस्तू  जीवतजीव असेपर्यंत स्वतः पासून दूर करू नको
लक्षात ठेव इथून पुढे तू जिथेजिथे जाशील ही वस्तु सोबत हवी तुझ्या "

सविताकाकू विश्वासाने म्हणाल्या 

"हो ग आई मी ठेवेल ही वस्तु सोबत तू शांत हो बर अगोदर 
"
करण आई ला शांत करत म्हणाला 
तेवढ्यात त्याचे लक्ष कोपऱ्यात उभी असलेल्या प्रीती वर गेले ती रागाने करण कडे बघत होती 
तिचे रागाने बघणे करण च्या लक्षात आले व ती का चिडली हेही त्याला कळत होते पण त्याचा नाईलाज होता, तसे पाहिले तर त्याच्याही मनाला पटत नव्हते पण आईसाठी तो सगळं निमूटपणे सहन करत होता 

त्याने किचनमधून पाणी आणले व आई ला दिले 
आता आई बऱ्यापैकी शांत झाली होती, 
"आई बर वाटतंय ना ग "
करण काळजीने म्हणाला 

"मला काय झाले व असे सगळे माझ्या भोवती का जमा झालेत 
चल काम आहेत मला खुप"
सविताकाकू असे म्हणून ताडकन उठून किचनमध्ये गेल्या 
बघणाऱ्याला त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असे त्या वागत होत्या, 
प्रीती तर बघून थक्क च झाली आता ओरडणारी, किचाळणारी आपली सासू दुसऱ्या क्षणाला असे वागतेय, 
सविताकाकू उठून कामाला लागल्या होत्या जसे काही झालेच नाही व याच संधी चा फायदा घेत प्रीती ने खुणेने करण ला काहितरी खुणवले 

"आई ये आई ....
आज मी व प्रीती तिच्या मामाकडे  जेवणासाठी जाणार आहोत 
आमचा स्वयंपाक धरू नको " 
करण काकू ला म्हणाला 

बाहेर जाणार आहोत हे ऐकताच काकू धावत बाहेर आल्या 

"बिल्कुल नाही 
तुम्ही लग्नाला सव्वा महिना होईपर्यंत कुठेच जाणार नाही आहात 
असे हळदीच्या अंगाने बाहेर जाऊ नये 
व आज तर नाहीच आज अमावस्या आहे" 
काकू डोळे फिरवत म्हणाल्या 

"आई हे बघ तुझी श्रद्धा आहे या सर्वांवर तर मी काही बोलणार नाही पण आम्हाला अडवू नको, 
व आम्ही आज तिकडेच मुक्कामी थांबू मग तर झाले " 
करण ठामपणे म्हणाला 

"ते सगळं खरं आहे 
पण मला काहितरी वेगळं जाणवत आहे 
तू नको जाऊ ना बाळ " 
काकू पुन्हा काळजीने म्हणाल्या 

"ठीक आहे नाही जात 
तू जा बघू रूममध्ये व झोप "

असे म्हणून करण ने आई ला रूममध्ये काढून दिले , 
आपल्या आयटी इंजिनिअर नवऱ्याचे असे वागणे बघून प्रीती ला तर धक्का च बसला, 
"मला ना हे लोक माणसे कमी व नाटक कंपनी वाटतात 
एका क्षणाला असे तर दुसऱ्या क्षणाला तसे" 
प्रीती स्वतः शी च पुटपुटली 
रागाने रूममध्ये गेलेल्या बायकोला मनवणार नाही मग तो नवरा कसला , 
करण तिच्या पाठोपाठ रूममध्ये गेला व तिला समजावू लागला, प्रीती काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती, 

"अग आई झोपली की गुपचूप निघून जाऊ आपण तू काळजी करू नको " 
करण च्या या वाक्याने प्रीती सुखावली

सविताकाकू झोपल्यावर
हे जोडपं गाडी काढून घराबाहेर पडलेच 


अमावस्या ची रात्र 
त्यात हळदीचे अंग 
सविताकाकू च्या सूचना .........
व करण ते ते पेटित पाहिलेले काहितरी .......
काय घडेल पुढे 
जातील हे दोघे सुखरूप मामाकडे 
की होईल त्यांना घात 


जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
आवडल्यास लाईक करा 


धन्यवाद

🎭 Series Post

View all