दिशा भाग 13

Sharayu Speaks With Her Shalini Aai


दिशा:- भाग 13

"शरयू ऐका अर्थाने खूप छान झाले ना?" प्रीती आपल्याच विचारात बोलली.
"हमम" इतकेच शरयू उत्तरली.

दोघींनी जेवण आटोपले आणि परत कामाला लागल्या. आदित्य जो मिटींगला बाहेर गेला तो ऑफिस सुटायची वेळ आली तरी आला नव्हता.
आज जोमाने काम करून शरयू आनंदात होती.

"प्रीती, तुझे झाले असेल तर निघायचे का?"
"जस्ट पाच मिनिटे हां शरयू झालेच माझे" म्हणत तिने मेल सेंड केला आणि लॉग आऊट केले.
दोघीही पर्स खांद्यावर अडकवून बाहेर पडतच होत्या तेवढ्यात समोरून आदित्य येताना दिसला जो शरयू कडे बघत होता.
"आदित्य अरे किती वेळ काम करणार? जास्त काम करून काय प्रमोशन मिळवत आहेस का? " प्रीती ने मुद्दाम विचारले.

अग् असंच... म्हणजे काही विशेष नाही" त्याला खरं तर उत्तर सुचत नव्हतं.
प्रीती नुसतीच बघत उभी राहिली.

"प्रीती, सॉरी तू आज लंच ला विचारले पण मी नाही येऊ शकलो" आदित्य बोलला.
"अरे सॉरी मला नको शरयू ला बोल, तिने तुला इन्व्हाईट केले होते"
तसे आनंदाने त्याचे डोळे चकाकले आणि तिच्याकडे पाहिले.

शरयू शांतपणे हे बघत होती, तिला आदित्य आधीपासून माहीत होता जो कामात हुशार, शांत आणि कोणाच्या अध्यात मध्यात न पडणारा असा होता. सकाळी तो फोन वर प्रीती समजून ज्या प्रकारे विचारपूस करत होता त्याचे हे असे वागणे तिची काळजी घेणे तिला वेगळे वाटत होते.

"सॉरी शरयू"
"इट्स ओके, पुन्हा कधीतरी "म्हणत ती जायला वळली.

"शरयू जर तुला हरकत नसेल तर डिनर ला जायचे का?" थोडे भीतच त्याने विचारले.

त्याने आपली इतकी मदत केली आहे तिला माहीत होते त्यामुळे तिला पटकन नाही म्हणता येत नव्हते तिने प्रीती कडे बघितले.

प्रीती गालातल्या गालात हसतच होती, "हो चालेल की जाऊयात" बोलली तसे शरयू ने डोळे मोठे केले तिला वाटले होते की प्रीती नाही म्हणेल पण झाले उलटे...

"आदित्य ऐक ना,मला थकल्यासारखे वाटत आहे"

तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत तो म्हणाला "काय झालंय? अजून बरं नाही वाटत का? ताप आलाय का तुला?"

मान डोलावून ती हो म्हणाली..

" मग तू पहिल्यांदा डॉक्टर कडे जा... आपण नंतर कधी जाऊ, तुझी तब्बेत महत्वाची आहे" तो म्हणाला आणि हसला तसे त्याला बाय म्हणत शरयू प्रीतीच्या हाताला धरून पुढे चालायला लागली.

"का ग त्याला टाळले?"
"नाही आहे माझ्यात ताकद आत्ता तरी.."
"शरयू, मग खरचंनीट घरी जा,आणि पोचलीस की कॉल कर" प्रीती म्हणाली.

"ए हॅलो... तू पण घरी येते आहेत माझ्यासोबत! कॉल कर काय कॉल कर" शरयू मैत्रिणीवर थोडी दादागिरी दाखवत म्हणाली तसे प्रीती म्हणाली "काल होते ना मी तुझ्या बरोबर..आता आज. जाते घरी!"

"तसा प्रीती ने तिचा हात ओढला आणि टॅक्सी का आवाज दिला..
तिची ही स्टाईल पाहून प्रीती हसली.
"काय झाले हसायला?"
"काही नाही ! पुण्यात कॉल केला का दिवसभरात?"

शरयू ला एकदम आठवले आणि कॅब मध्ये बसत तिने शालिनी आईला फोन केला.

तिचा नंबर बघताच शालिनी आईच्या ओठावर हसू उमटले" बोल बेटा..""

"आई, तुझ्याशी बोलायचे होते"

"बोल ना बाळा"

"तू काय ठरवले आहेस?"
"कशाबद्दल?"
"माझ्यासोबत मुंबईला येण्याबद्दल!"

त्या थोड्या गंभीर होत म्हणाल्या "शरयू बेटा, नको तो हट्ट करू नकोस. माझं आयुष्य हे इथेच आहे याचं घरात, मी नाही येऊ शकत तुझ्याबरोबर. "

"हे शक्य नाही आई आता...तू तिथे राहू शकत नाहीस.."

"बेटा..शशी आंटी गेल्यावर आता मीच हे सगळे सांभाळते...इथली जवाबदारी आहे माझ्यावर...! माझ्या भरवश्यावर ह्या इथल्या मुली आहेत त्यांना मी वाऱ्यावर नाही सोडू शकत" थोडं ठामपणे त्या बोलल्या तसे शरयू हिरमुसली आणि काहीच बोलली नाही.

"शरयू" त्यांनी तिला हाक दिली.

"तू हट्टी आहेस तर मी तुझीच मुलगी हे विसरू नकोस. तुला पंधरा दिवसाचा वेळ मी देते आहे,विचार करायला नाही आहे हा वेळ...तुझे सामान बांधायला. नाही आलीस तर मी सामान बांधून तिथे येते" शरयू ठाम स्वरात बोलली तसे त्या चपापल्या.

काही वेळ शांततेत गेला..काहीतरी बोलायचे म्हणून बोलल्या" शरयू हे बघ, आता तुझे लग्न होणार आहे तू दुसऱ्याच्या घरी जाशील मग मी काय करू तिथे येऊन? तू सुखी रहावे इतकेच माझे म्हणणे आहे. तू तुझ्या घरी आणि मी इथे, माझे घर असेच म्हणावे लागेल कारण आयुष्य इथेच गेलय"

"लग्नाचा विषय संपलाय! तुझी मुलगी जिवंत असताना तू तिथे राहिलेली मला चालणार नाही. मी आपल्या दोघींचीही काळजी घेईल आणि माझ्या ईथल्या आईला काहीच अडचण नाहीय तुझ्या येण्याने"

"लग्नाचा विषय संपलाय म्हणजे?" त्या थोड्या घाबरल्या.

"काही नाही ..तू आलीस की मी बोलेल तुझ्याशी. तुझे सामान बांधून ठेव बरोबर पंधराव्या दिवशी मी तिथे येणार तुला न्यायला "

"माझ्या मुळे लग्नाचा विषय संपला का..? " त्यांनी थोडे धास्तावत विचारलें...

"आई, विश्वास ठेव.. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात सगळे चांगलेच होते आहे..." असे म्हणून शरयू ने फोन ठेवला.

बाजूला बसलेली प्रीती सगळं ऐकत होती, तिने हलेकच शरयू च्या हातावर हात ठेवत तो दाबला. एव्हाना त्या दोघीही घरासमोर आल्या होत्या.

टॅक्सी चे बिल पे करत त्या घरात शिरल्या तर आत्या आणि जोशी आई दोघी आवरून बसल्या होत्या.

"हे काय.. कुठे चालल्या तुम्ही दोघी?" प्रीती आल्या आल्या मोठ्याने म्हणाली.

"आम्ही दोघी नाही तर आपण चौघीजणी "

"आपण? कुठे आणि का?" शरयू ने विचारले.

"त्याचे काय आहे ना..माझ्या भाचीचे काल ब्रेक अप झाले आहे आणि त्या निमत्ताने मी आज पार्टी देत आहे.." आत्या ने मस्त पैकी हसत सांगितले.

"आत्या..काहीही काय?" शरयू चा आवाज थोडा नरम आला.

"खरचं...माझ्या भाचीच्या आयुष्यातून तो खोटारडा माणूस गेला म्हणून आत्यानंदाने मी आज पार्टी देत आहे.."

"अग आत्या..अजून जोशी बाबा जाऊन एक आठवडा पण नाही झाला आहे आणि आपण पार्टी करायची का..?"

"हे बघ..आपण अत्यंत मुक्त विचार पद्धतीने वागणारी माणसे आहोत..माझा भाऊ जिथे असेल त्यालाही हे आवडेल की त्याची माणसे आनंदात आहेत...ना त्याने दुःख करायला शिकवले ना की दुःखी राहायला शिकवले...गेली 4 वर्षे तो आजारी होता .तो असताना एकदा तरी त्याने आपल्याला रडू दिले का..? मग तो नसताना पण रडायचे नाही आहे." आत्या ठामपणे म्हणाली.

तिच्या या बोलण्याने सगळ्यांचाच नाईलाज झाला. आत्या सगळ्यांना घेऊन बाहेर पडली. ते सगळे जुहू ला शिवसागर रेस्टॉरंटला आले. इथून समोर दिसणाऱ्या समुद्राचा नजारा शरयू ल आवडायचा... बीच वर दिसणारी गर्दी तिला पाहत बसायला आवडायचे.

आज सुद्धा ती सी व्यू ची खुर्ची घेऊन बसली आणि समोर पाहात बसली. आत्या ने मेनू कार्ड घेतले आणि तेवढ्यात प्रीती समोर पहात जोरात म्हणाली, "आदित्य..तू इथे?"

क्रमशः

©®अमित मेढेकर


🎭 Series Post

View all