आदरणीय दिलीप भिडेसर : अनुभवशील व झुंजार लेखक

ईरा : शब्दांचे सोनेरी पर्व
आदरणीय दिलीच भिडेसर : अनुभवशील व झुंजार लेखक


ईरा व्यासपिठाने केवळ नवलेखकांना आकर्षित केले नाही तर जाणकार व अनुभवशील लेखकांनाही लेखणास बळ दिले आहे.अनेक क्षेत्रातील व्यक्ती येथे दिलखुलासपणे व्यक्त होतात.सन्मानीय वागणूक , वाचकांचा भरघोस पाठिंबा लेखकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे येथे लेखक मनमुराद लिहतात.असेच आपल्या ईरा कुटुंबातील आदरणीय लेखक भिडेसर हे आम्हा सर्वासाठी प्रेरणादायक व्यक्तीमत्व आहे.

एक दर्जेदार इंजिनियर असलेमुळे त्यांच्या प्रत्येक कामात शिस्त आहे.सुरवातीला त्यांना शिक्षक होण्याची इच्छा होती पण त्यांच्या हुशारीने इंजिनियमध्ये जावे लागले.या क्षेत्रातही त्यांनी मनाप्रमाणे काम करुन आपल्या किमात समाधान मिळवले.इंजिनियमध्ये असतानासुद्धा त्यांना व्यवसाय करण्याची इच्छा होती.शेवटी त्यांनी व्यवसायामध्ये पदार्पण केले व त्यात यशही मिळवले.नंतर त्यांना कुटुंबाचा आधारही यामध्ये मिळाला.

इंजिनियर , व्ववसाय याला त्यांनी लेखनासारख्या छंंदाची जोड दिली.आपल्या कामातील आलेले अनुभव व समाजाचे बदलेले चित्र याची सांगड घालून त्यांनी लेखनास सुरवात केली.यातूनच निकीताजे चिटनिस ही कादंबरी उदयास आली येथूनच त्यांच्या लेखनास गती मिळाली.नंतर ईरासारखे व्यासपीठ मिळाले आणि भिडेसरांनी लेखणीला प्रोत्साहीत केले. सवत माझी लाडकी , अभयारण्यातील थरारक सहल ,अव्यक्त प्रेमाची कथा , शाळेचा होमवर्क एक आठवण , काळोख आणि विदिशा , वैशाखाची खिचडी , बायको माहेरी जाते तेंव्हा , शालिनीचं काय चुकल , आशा उत्तमात्तम व दर्जेदार कथामुळे त्यांची लेखणी किती प्रगल्भ आहे याची प्रचिती आली .त्यांची " तिन झुंजार सुना " ही नारीवादी कथा स्पर्धेत विजयी झाली.शेतक-यांच्या जीवनातील सुक्ष्म अवलोकन करुन लिहलेल्या या कथेला वाचकांनी भरपूर प्रतिसाद दिला.सहजसुंदर भाषाशैली , समयसुचकता , संवादाची छान मिलाफ , प्रसंगाचे यथोचित वर्णन , मनाला भिडणारे विषय , निर्भिडता यामुळे भिडेसरांचे लिखाण थेट हृदयाला भिडते.

स्पष्ट स्वभाव , शिस्त आणि बाणेदारपणा , संयम , वक्तशीरपणा , प्रसिद्धीचा हव्यास नसलेले , सतत कामात गुंतलेले आपल्या लेखनाने सा-यांना प्रभावित करणारे भिडेसर ईरा कुटुंबाचे आधारवड आहेत.त्यांचे लेखन व अनुभव नवलेखकांना निश्चितपणे अनुकरणप्रिय आहे.भविष्यकाळात त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक लेखक घडावेत , त्यांचे लेखक असेच गतीमान व्हावे , त्यांना उत्तम आरोग्य व सुख लाभावे ही सदिच्छा व मनोकामना ...!!

©®नामदेवपाटील