दिलास तू अंतरीचा ठाव भाग-१

रक्ताच नात नसाताना दिली आत्मविश्वासाची पकड.

मिहीर गरीब घरातला मुलगा होता. आपल्यामागे एक भाऊ विनय आणि बहिण वीणा होती. वडिलांचा अकस्मात मृत्यू झाल्याने घरचे चित्र पालटून गेले होते. आई शिवणकाम करुन तुटपुंज्या संसाराला हातभार लावत होती.
मिहीरला शिक्षणाची भयानक आवड. तो त्याला सापडणारे पेपर, पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करु लागला. पण तितकस आपल्याला अजून वाचता येत नाही. त्याला त्याच्याच मित्र विक्रम कडून सोनी ताई विषयी समजले. जी रात्रशाळे सारखी तास घेवून मुलांना मोफत शिकवत असते.


विक्रम : तुला वाचनाची आवड आहे. तू ताईकडून वाचायला शिकशील.

मिहीर:बर झाल तू मला सांगितल. मी आजच जावून ताईला भेटतो.


सोनी ताईशी भेट घेतल्यावर मिहीर नियमितपणे शिकवणीला येत असतो. तशी अभ्यासाची गोडी वाढत जाते. वाचण्याची तीव्र आवड. रोज घडणा-या घटना वाचण्यासाठी पेपर विकत घ्यायला देखील जवळ पैसे नसायचे.
मिहीरने बुट पाॅलिश करुन का होईना चार पैसे कमावायचे. कमवणा-या पैशातून महिन्यातून एक पुस्तक आणि रोजचे वर्तमान पत्र विकत घ्यायचे.
मिहीर घरात थोरला असल्याने आई प्रमाणे घरची सर्व जबाबदारी त्याच्यावरही पडलेली होती. तो आणखी काम शोधण्याचा प्रयत्न करत होता. मिहीर लहान असल्याने बालकामगार म्हणून कोणी कामावर ठेवून घेण्यास नकार देत होते.


करायचे काय? हा प्रश्न मनाला भेडसावत असताना सोनी ताई एक प्रस्ताव घेवून आमच्या सोबत आली. तिने एक आनंद मेळावा आयोजित केला होता. जिथे स्वत:चे कौशल्य वापरुन आपली कला सादर करायची होती.


मग ती हस्तकला, पाककला, चित्र, काव्य, वक्तृत्व स्वरुपात असावी असे विविध पैलू मांडण्यात आले होते. मिहीरने लगेचच या मेळाव्यात भाग घ्यायचे ठरवले.

आईला घरच्या कामात हातभार लावण्याची संधी चालून आली होती. आईने तर शिवणकामाचे ब्लाॅऊज शिवून देण्याबरोबर टेलरच्या दुकानात बसून शाळांच्या ड्रेस आॅर्डर देखील घेतल्या होत्या गेल्या काही महिन्यापासून. त्यामुळे लहान भावंड घरात असल्यावर त्यांना भूक लागली की खायला करुन देणे हे रोजचेच झाले होते.

आहे त्या पदार्थांची जमवाजमव करत चविष्ट पदार्थ कसा साकरता येईल याकडे मिहीरचे लक्ष असायचे. मुळातच हाताला चव असल्याने कोणत्याही पदार्थ चवदार बनायचा. घरातल तसेच बाहेरच काम आवरुन आई दमून घरी आल्यावर मिहीर आता तर.. संपूर्ण जेवण तयार करुन ठेवत असे.

आईच्या डोळ्यात आसवे दाटून येत असे. ज्या वयात पोरांच खेळण-बागडण्याच वय त्या वयात संसार कसा चालवावा लागतो या अडचणींशी तडजोड करावी लागते.



मिहीरचा दिनक्रम हा ठरलेला असायचा. सकाळी स्टेशन जवळ जावून बुट-पाॅलिश करायची. तोपर्यंत आई घरातल काम आवरुन ब्लाऊज शिवून घ्यायची. दुपारी मिहीर घरी आला की आई टेलरच्या दुकानात जायची.
मिहीर भावंडांना जेवू घालून झोपी लावायचा. संध्याकाळ झाली की जवळच्या गार्डन मध्ये जावून भावंडाना खेळायला लावायचा. आणि जवळच तिथे येणाऱ्या लोकांना बुट-पाॅलिश करुन द्यायचा. कधी गार्डन तर कधी घराजवळ असणाऱ्या चपल्यांच्या दुकानासमोर दुकानाचे मालक मिहीरची परीस्थिती पाहता स्वत:हून दुकानाजवळ बसण्याची परवानगी देत असे.


घरी आल्यावर मिळणा-या पैशातून किंवा आईने खर्चासाठी दिलेल्या पैशातून भाजी विकत घ्यायची आणि घरी जावून ती बनवायची. आई घरी आली की घरातली उरलेली कामे आवरुन ठेवत असे. नंतर सोनी ताईच्या तासाला जात असायचा.


सोनी ताईच्या आनंद मेळाव्यात मिहीर कोणत्या स्पर्धेत भाग घेतो आणि त्याची तयारी कश्या पद्धतीने करतो हे आपण पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all