दिल दिया दर्द लीया ..३

क्या हासिल होगा हमें ?.. मैं पा लूँगी तेजा को पर हमेशा कोसती रहूँगी खुद को के किसी का प्यार किसी की मोहब्बत छीन ली है मैंने ... मैं चैन से जी सकूँगी ना मर सकूँगी ... इससे अच्छा है मैं रास्ते से हट जाऊँ ..."


मघाशी घडलेला प्रसंग सिम्मोच्या नजरे समोरुन हलेना.. क्षितिजावर कलंडलेला सूर्य क्षणांत दिसेनासा झाला .. गडद काळोखानं आकाश व्यापलं .. अचानक वीजा कडकडायला लागल्या पाऊस तुफान कोसळणार असं वाटायला लागलं .. आणि आपल्या मनाचा मागोवा तर घेत नाहीये हा पाऊस या विचारानं सिमरन बावरली... आपण अनवधानाने चुकीचं पाऊल उचलतोय का ..?दोन मिनिटं स्तब्ध उभी राहीली ती ... हा अविचार आहे..असं कुणाच्या ही नकळत तेज ला भेटणं अविचारच ... आज पर्यंत रानो किंवा गुड्डो असायचीच बरोबर एकटं कधीच भेटलो नाही त्याला .घरच्यांचा विश्वासघात होईल आपल्या वागण्यानं ... थांबलं पाहीजे .. परत फिरलं पाहीजे ... या एकाच विचारानं मागे वळली ती .. एवढ्यात अंगावर विजेचा लोळ आला ... घाबरुन तीनं स्वतःचे डोळेच मिटून घेतले ... थरथरणारं शरीर ,आणि बर्फा सारखा बेफाम सुटलेला गार वारा ... पाऊल पुढे ही टाकता येईना ..मागे ही परतता येईना .. आणि तेवढ्यातच मागून कुणीतरी बाहुंचा,विळखा तिच्या भोवती घातला . "क्यों आई इतने तुफान में ... ? चल घर छोडके आता हूँ तुझे."
तीनं झटकला तेज चा हात ... आणि एकटीच पुढे निघाली ... सगाई ची बात होतीय तरी हा काही बोलायला तयार नाही .. आणि नको ते धाडस करायला लावतोय ... कुणाला कळलं तर केवढा गहजब होईल... माझा हात सगळ्यांच्या देखत मागायची हिंमत दाखवेल हा ...? या फीर चिठ्ठीयाँ ही भेजता रहेगा ....
अभितक इजहार भी नहीं इकरार भी नहीं ... कैसे भरोसा करुँ इसपर...?"
"मुझे जाने दे तेजा .इसतरह बातें करने से कुछ हासिल नहीं होगा ..."
"क्यों नहीं होगा ..?" "देख तो मेरी तरफ "
गुस्सा ही करती रहेगी क्या ...?"
तीला थांबवत त्यानं तीचा चेहेरा हनुवटीला धरुन वर उचलला ..." सिम्मो मुझे वक्त चाहीए थोडासा ... मैं मजबूर हूँ ..."झूठ सब झूठ हिंमत नहीं है तुझ में किसी के खिलाफ जाने की..."
"वीरजी ने शब्बो का रिश्ता ठुकराया था तुम बदला ले रहे हो उसी का ..."
"पागल हो क्या? क्या सोच रही हो तुम .?.माना के रीश्ते ठीक नहीं हमारे पर ,इतना भी गिरा हुआ नहीं ,के बदला समझकर तुझे फुसलाता रहूँ ..."
"सुन तो .. बाद में पछताएगी ..."
" पछताएगी मेरी जूती ..!"
"कितना वक्त और चाहीए ..?"
"वहाँ सगाई की बातें चल रहीं है ,मुझे बताया तक नहीं.."
"यकीन कर मुझपर ..कोई सुन ही नहीं रहा मेरी ..."
तो असं म्हणाला मात्र त्याचा हात झिडकारला सिम्मोनं .. "जब तक तुझे यकीन आता रहेगा मुझ से बात मत कर.. फैसला जो भी हो सबके सामने लेना चाहता है तो ठीक वरना मुझ से मिलना छोड दे ..."
बधीर झालेला तेज काहीच न बोलता सिमरनची अदृश्य होणारी आकृती शांतपणे पहात बसला ... पावसानं आज कहरच करायचा ठरवलाय ... समोरचं सगळंच धूसर दिसायला लागलं .


या दोघी विचारांत एवढ्या गढून गेल्या होत्या की सिम्मोनं आपलं बोलणं ऐकलंय हे लक्षांतच आलं नाही त्यांच्या ...
सिम्मो अगदी शांतपणे दादी जवळ गेली तिनं दादीचा मऊ मुलायम साई सारखा हात हातात घेतला .. क्षणभर काहीतरी निश्चय केला आणि दादीच्या अश्रू भरल्या डोळ्याला डोळे भिडवले ...
"देख दादी ,मैं तेजा से मोहब्बत करती हूँ इसका मतलब ये तो ना है की सबकी मर्जी के खिलाफ कुछ फैसला लेना है हमें ... आज तक तेजा ने ये बात खुल के तो कहीं नहीं है मुझ से .. पर उसपर पुरा यकीन है मुझे ... चाहता है मुझे पर वक्त माँग रहा है.कैसे दे दूँ वक्त ?.. यहाँ दो दिनों में रानो और उसकी सगाई की बात पक्की हो गयी तो मैं रोक सकूँगी ना वो....
रानो मेरी सबसे अच्छी सहेली है ,बचपन से आज तक साथ खेले ,अपनी खुशियाँ,अपने दर्द बाँटे हैं हमने .. अब वो तेजा को चाहती है उसका गुनाह क्या है...?"
तेजा की गलती है के ऊसने कभी रानो को सच्चाई बतायी नहीं ... तीचा गैरसमज होत गेला तेंव्हाच यानं तीला खरं सांगायला हवं होतं दादी .... क्यों चुप रहा .. इसका खामियाजा हम सबको भुगतना पडेगा देख लेना दादी तुम... मैं दोनो के बिच में आनेवाली नहीं हूँ.. मैंने फैसला कर लिया है .. तेजा से सब सच कहूँगी वो अपनाले रानो को ... कोई खुश नहीं हो पाएगा दादी ... ना मैं,ना तेजा ,ना रानो या आप सब जो हमारी खातिर जान लेने को या देने को तैयार हो जाओगे ... क्या हासिल होगा हमें ?.. मैं पा लूँगी तेजा को पर हमेशा कोसती रहूँगी खुद को के किसी का प्यार किसी की मोहब्बत छीन ली है मैंने ... मैं चैन से जी सकूँगी ना मर सकूँगी ... इससे अच्छा है मैं रास्ते से हट जाऊँ ..."
"कौन होती हो ये फैसला ले ने वाली अकेली तुम ...?"
तेजा असा अचानक समोर येऊन उभा राहील असं वाटलं नाही कुणालाच ... सिम्मोच्या केंसावरून मोती घरंगळत होते .. पानी की ओंसल बूँदे बेतहाशा चमक रही थी .. नुकताच बदललेला हळद माखलेल्या रंगाचा गडद केशरी सलवार कमीज तीच्या नाजूक चणींवर खुलून दिसत होता .अनिमिषतेनं तीच्या कडे पहाणारा तेजा पुढे आला .. "सब बातें सुन ली है मैंने ... मेरी मजबुरी ये थी कि सिम्मो क्या चाहती है ये आजमाने में मैंने बहोत वक्त गवाँया ... पहले से ही ये यकीन होता तो ना मैं इतनी देर करता न बात यहाँ तक पहुंचती ... पर रानो को अब सच बताना जरुरी है ... के मैं सिम्मो को चाहता हूँ .. तुझसे शादी करना ना इन्साफी होगी .. जो सच है वही सही ..पर अब ये कहना सब के सामने मैंने तय किया है ...
" बस्स एकबार कह दे ,ये चूडीयाँ जो मैंने तेरे वास्ते ली थी पहनना चाहेगी सिम्मो मेरे हाथों से ...?सँभाल के रख्खी थी जो तेरे ही वास्ते .. या मैं....?"
सिम्मो नं आपल्या नाजूक गोऱ्यापान कल्यांय्या त्याच्या समोर धरल्या ... तीच्या हरीणी सारख्या चंचल घायाळ करणाऱ्या नजरेत खट्याळपणे पहात तेजा म्हणाला ."दादी तेरी बाकी हिरनियाँ ले जावाँ मैं ब्याह के ... लुगाई है मेरी होणेवाली ,पहना दूँ इसे ये चूडीयाँ ...?"
" खोते दे पुत्तर ! पहणा दे .. नजर तो उतार लूँ ...वाहे गुरु ! रब राखाँ दोनों की जोडी सलामत रहे ! किसी और को पूछणें की जरुरत ना है.. जब रब ने ही जोडी बना दी है तुम दोणों की..
"दिल तो तुझी को दिया है अब दर्द भी सह लेंगें बस्स..तू हाँ कह दे.."
तीचा नाजूक रेशमी हात हातांत घेतांना तेजा
म्हणाला.."ले जाऐंगें ले जाऐंगे तेरी सोन मछरीया ले जाऐंगे....." ??

समाप्त...
©लीना राजीव.


🎭 Series Post

View all