दिल दिया दर्द लीया..१

देखणे पणाचं मूर्तीमंत रुप सिम्मो ..पाणीदार डोळे खट्याळ पणाचा सगळा भाव एकवटायचे ,सरळ सुंदर चाफेकळी नाक त्यांतली हीऱ्या ची लौंग ,तीची प्रभाही सिम्मो पुढे झाकोळावी ......अप्सरेला लाजवेल असं अनुपम सौंदर्य ..


"दिलबरे कहाँ जा रही है छोरीयाँ ..."
"अम्मा ,मेला देखणे ."
" ए,रुक छोरी ,ऐसी जाएगी क्या ?"
"चुनरी तो ओढले."
"दादी ,जाणे दे अब,अच्छा भला तो है सलवार कमीज.." कुछ तो ओढ लें ऐसे ही जाए गी क्या ?"
"पागल हो गयी क्या ये ले चुनरी ओढ ले.."
"ना बाबा,ये न ओढूँ में .."
"इधर तो आ जरा देखूँ तो मेरी सोणी कुडी कैसी लगदी .." "हाय ,रब्बा ! नजर तो उतार लूँ जरा .चाँद सी लागे मेरी गुडीया रानी "कोइ राज कुँवर भगाके ले जाएगा तुझे .."खाटे वर बसल्या बसल्या सिमरन च्या दादीनं बोटं कानावरनं मोडली .देखणे पणाचं मूर्तीमंत रुप सिम्मो ..पाणीदार डोळे खट्याळ पणाचा सगळा भाव एकवटायचे ,सरळ सुंदर चाफेकळी नाक त्यांतली हीऱ्या ची लौंग ,तीची प्रभाही सिम्मो पुढे झाकोळावी ......अप्सरेला लाजवेल असं अनुपम सौंदर्य ... "ए छोरी, अकेली जाएगी क्या ? कौण है साथ मैं..?"
"नाही दादी एकटीच जाणार आहे ..."मी काय लहान आहे का आत्ता ..?सुखविंदर वीरजी येणार होते पण काम आहे त्यांचं मी आणि गुड्डो जातोय .." "पागल मत बण , मुसिबत तो है ये जवानी ..कोई उठा लेके जाएगा तणे .."
"हो बरा नेईल उचलून कोणी ..किसी के हाथ ना आऊँगी मैं ,फीक्र न कर दादी सही सलामत आ जाऊँगी ."
"खोते,दिलबरे,रब थोडीसी अक्ल देदे इसे ,कुडीयों नुअ अकेला छोडते देखा है कभी ..?"
"अम्मा,कुछ ना होवेगा ,गुड्डो है न साथ में "
सिम्मो नं पटकन् जाऊन दादीच्या गालाचं चुंबन घेतलं जाऊ देत नं गं आता असं काहीसं नजरेनं सांगितलं ... सिम्मोच्या गोजिर्या गालावरुन हात फीरवत दादी खळखळून हसली ..
गुड्डो तर उतावळ्या सारखी नाचत होती ,.कधी एकदा तो मेला बघते अशी अवस्था झालेली .सिम्मोचा हात धरून ओढतच तीनं बाहेर काढलं सिम्मोला ..."तू वेडी आहेस सिम्मो सगळ्यांना उगीचच समजावत बसतेस ..सगळ्यांच्या परवानग्या काढायला कुकुल बाळ आहेस का आता ,तुझे तू निर्णय केंव्हा घेणार आहेस ..?" "चल वेळ होतोय ,तेज वीरजी वाट पहातोय बाहेर .."
सिम्मो नं चप्पल कशी बशी पायांत चढवली ..".अग तुझे झुमके काय सुंदर आहेत सिम्मो ..हाय में मर जावाँ !तुझं असलं रुप पाहून कोणीही फीदा होईल तुझ्यावर .."
"अब चूप रह गुड्डो !मी काही घेऊन देणार नाहीये तुला कीतीही मीठी बातें केलीस अगदी शहद मध्ये डुबवलंस मला तरी ..."
या दोघीं बाहेर यायला आणि तेजप्रताप गुड्डोचा चुलत भाऊ गाडीचं दार उघडायला एकच गाठ पडली ..त्याच्या शेजारची सीट ...सिम्मो मुद्दाम मागे जाऊन बसली ...तीच्या अशा वागण्यानं थोडा नाराज झाला तेज ..".गुड्डो मी ड्रायव्हर नाहीये तुमचा .."
"इतनी तो इज्जत दे दो "त्यानं असं म्हटल्यावर सिम्मो नाईलाजानं पुढं येऊन बसली ..."अभी तक सुलह नहीं हुई क्या ..?"बडे अजीब हो दोनों ..."
तेज नकळत ओढला जात होता सिम्मो कडे ...कधीतरीच येणं व्हायचं या गावांत पण का कुणास ठाऊक सिम्मो विषयी वाटणारं काहीतरी प्रेमच असावं का की नुसतीच दोस्ती हे कळत नव्हतं तेज ला ... जितकं टाळायला पहायचा पुन्हा तीच्या सौंदर्यानं मंत्रमुग्ध व्हायचा ..लहान पणां पासून पहात होता सीम्मो ला पण तीचं बेफाम तारुण्य स्वस्थ बसू देत नव्हतं त्याला ..तेज ही अतिशय देखणा ,रुबाबदार ,राजबिंडा च दिसायला ..मेहनतीनं कमावलेलं पिळदार शरीर ,गौर वर्ण ,पौरुषत्वाच्या साक्षी मिशा भरदार कोणतीही सुकुमार ललना भाळेल असं व्यक्तीमत्व ...पण ही सिमरन जराही भाव देत नव्हती ..सारखी गुश्श्यातच ...बोलायचा प्रयत्न केला की चवताळलेल्या वाघिणी सारखी अंगावर यायची ..बरं कारण ही नव्हतं तसं काही ...उगीचच आपलं ...
तासा भरातच रंगीबेरंगी स्टाँल्स नी सजलेले रस्ते ,उत्साहानं भारलेलं वातावरण जाणवायला लागलं ...सिमरन घुम्या सारखी बसून होती ...शेवटी कंटाळून "तुम्ही काय करणार आहात दोघी जणी ...?"मी गाडी पार्क करुन येतो ...तुम्ही फीराल ना एकट्या ..की सोबत हवीय माझी ...?"वीरजी कीसे पूँछ रहे हैं आप ?मुझे तो जरुरत ना है और कीसी को पूँछना चाहेंगे ...तो पुछीये ..."
सिम्मो नं उतरता उतरताच गुड्डो कडे रागानं पाहीलं .. "मला नाही गरज कुणाची ,आपण दोघीच फीरु गं ..." असं म्हटलं आणि झपाझप पुढे जायला लागली ... तीचा हात मागूनच पकडत तेज नं तीला जवळ ओढली .."क्या हुआ है तुझे ..?"बात क्यों नहीं करती ?"
" सब देख रहे हैं छोड मेरा हात .
" क्या कर रहे हो वीरजी ..?"
गुड्डो नं तेज ला ओढत बाजूला केलं ..सिम्मोची दुखरी कलाई तीनं दोन तीन वेळा मुडपली ...रागानं तेज कडं पाहीलं आणि काहीही न बोलता चालत राहीली ..सगळा मूड घालवला यानं ,दुष्ट कुठला ,मनांतल्या मनांत चिडचिड होत होती तीची ....
थोडं इकडे तिकडे फीरुन बांगड्यांच्या स्टाँलवर आल्या त्या ..."कीतनी प्यारी प्यारी
चूडीयाँ हैं !" लाखेच्या बांगड्या डोळे दीपवत होत्या ...उन्हाचे कवडसे तेजो वलयांचे आभास निर्माण करत होते...गुड्डो एवढी भारावली होती ,बांगड्या बघण्यात गर्क होती ...स्टाँल जरा एका बाजूलाच होता ....सिम्मो उगीचच सगळ्या बांगड्या वरखाली करून पहात होती ..मनांत भरत नव्हतं काहीच .."ये पहनले,तेरे वास्ते लाया हूँ !"एकदम दचकून सिम्मो मागे झाली ...तेज च्या हातांत नाजूक लाखेची कला कुसर केलेल्या बांगड्या होत्या पहाता क्षणी मोह पडावा इतक्या सुंदर होत्या त्या .."..मैं पहनावूँ.?" गुड्डो धावत आली "कीसे पहना रहे हैं चुडीयाँ ?"मतलब जानते है ईसका ?"
"पहनानी है चूडीयाँ और क्या मतलब हो सकता है !तेरे वास्ते भी लाया हूँ !"
"बुद्धू हो बिल्कुल ,अपनी होनेवाली लुगाई को पहनाते हैं चूडीयाँ !"
" मुझे नही पहननी इसके हाथो चूडीयाँ " सिमरन रागात तिथून जाणार एवढ्यांत तेजनं तीला जबरदस्तीनं जरा बाजूला नेलं ..."क्यों नहीं पहननी ."तीचे दोन्ही हात घट्ट धरलेले त्याने ...त्याचा धपपणारा उर ,आणि उष्ण श्वास जीवघेणा वाटायला लागला सिम्मो ला...तिचा गोरापान चेहेरा रागानं लालसर झालेला ती आणखीनच सुंदर दिसत होती तीच्या थरथरणार्या ओठांचं चुंबन घेण्याची अनिवार ईच्छा होत होती तेज ला ..तीच्या डोळ्याला डोळे भिडवून "मैं पूँछ रहा हूँ कुछ "
"मुझे चाहती नहीं है तू ?"
"मालूम नही" "बडे बदतमीज हो ,छोडो मुझे ."तीला आणखीन घट्ट धरुन ठेवत" सच बोल ,चाहती नहीं है मुझे ...?"
"छोडो मुझे ,जानवर कहीं के ,ती सुटायचा प्रयत्न करायला लागली तसा आणखीन मीठी घट्ट करत त्यांनं तीचे दोन्ही हात,मागे बांधले आणि तीला आणखी जवळ ओढलं ,मैं चिल्ला ऊँगी,पिटोगे तुम " "ये भी मंजूर " "पर आज जवाब लेके रहूँगा "
"थाने भिजवाऊँगी ."तीच्या डोळ्यात खोलवर पहात तेज म्हणाला तेरे वास्ते जहन्नुम में भी जाऊँगा .त्याचं इतकं जवळ येणं विरघळायला लावत होतं सिम्मो ला आपलं उसनं अवसान गोळा करुन तीनं जोरात तेज ला मागे ढकललं "तो जा जहण्णुम में "
तेज चा तोल गेला तो मागे जरा सा ढकलला गेला ...सिम्मो चं जीवघेणं हसणं तेज ला आव्हान द्यायला लागलं ...तीला तशीच उचलून घ्यावी आणि चुंबनांनी बेजार करावी अशी अनावर ईच्छा तेजला व्हायला लागली ...पण आजूबाजूचं भान ठेवायला हवं म्हणून त्यानं तीला जाऊ दिली ..

अहंकार दुखावला गेलेला तेज रागारागानं पुढे गेला ....सिमरन थरथर कापत होती हे असलं काही होईल याची कल्पनाच नव्हती तीला ..नात्यातले बदलत जाणारे संदर्भ कुठे घेऊन जाणार आहेत आपल्याया याचा विचार करतच ती गुड्डोला शोधायला लागली ...पुढे काही पहावं काही करावंच वाटेना ...गुड्डोला अंदाज आलाच जरा ...तेज नं इमृती आणि पकौडे असलं खायला आणलं ...सिम्मो समोर धरत" खाले भूख लगी होगी.."म्हटलं तसं सिम्मो च्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले ..एक पकौडा घेऊन कसा बसा खाण्याचा प्रयत्न केला तीने पण तो घशा खाली उतरेना...तीचे थरथरणारे हात पाहील्यावर तेज चरकला आपल्या हातून भलतंच घडलंय का काही ,कीती घाबरलीय ही
काय करावं कसं हे प्रकरण हाताळावं पुरता गोंधळला तो .." सिम्मो,क्या हुआ ..?वीरजी आपने कुछ शरारत की है ..?सच बोलिए .."
"जाने दे ,गुड्डो .."जाऊ या घरी मूड नाही कशाचाच .."
"इधर तो देख झूमका कहा़ है तेरा ...?" "भाभी का था नं ..?तो अब कौण जिम्मेदारी लेगा !हाय मेरे रब्बा ये क्या गजब हुआ ?"चल ढूँढते है ..गुड्डो झूमका पहायला जरा पुढे गेली ..
सिम्मोचे डोळे आणखीन भरून यायला लागले रडू आवरेनाच तीला ...तीचा रडका चेहेरा पाहून तेज तीला मागच्या मागे च खेचली " मेरे पास है तेरा झूमका ."तुणे मेरे सवाल का जवाब नही दिया. हाँ या ना ..?"
अगतिकपणे सिम्मो नं तेज च्या नजरेत नजर मिसळली ...अश्रूंमुळे तीचा केविलवाणा झालेला चेहेरा तेज ला पाहवेना ..."ये ले तेरा झूमका ..."असं म्हणून तो गर्कन वळला ..मी गाडी घेऊन येतोय ईथेच थांब म्हणाला .
या वेळी गुड्डो पुढे बसली ...सिमरन अजूनही हुंदके देतच होती ..आरसा ठीक करता करताच तेजनं मागे पाहीलं नाकातल्या लौंगेचा लशकारा घायाळ करत होता तेजला तीच्या कडे न पहाणंही जमेना ....सिम्मो चं रडून रडून लाल झालेलं नाक ,गुलाबाच्या पाकळ्या ओठांवर कुणीतरी चुरडल्या असाव्यात असलं बेफाम सौंदर्य ...कुणाला मिळेल ही कुणाच्या दिलाची रानी होईल ही ,.रब जाने म्हणत त्यानं स्टार्टर मारला ...जरा वेळ गेल्यावर गुड्डो या अबोल्या ला कंटाळली ..."णी मैं यार मणाणानी चाहे लोग बोलेया बोले ,मैं बाज न आणानी चाहे जहर तो उसमें घोलें ."
हे गाणं सुरु केलं आणि "गुड्डो चूप बैठ "
"अरे झूमका भी आप चुराऔ,दिल भी आप ही चुराओ और हम रपट भी न लिखवाऐं ?.."
तेज नं तीला दटावलं तस" ठीक है वीरजी पर आपने जरुर कुछ बदतमीजी की है आपको खामियाना भुगतना पडेगा...क्यों सिमरन ..?"आप जा रहे है नं कल ?"
"हाँ कीसी को जरुरत ना है मेरी .मैं हूँ नहीं हूँ फर्क पडता है कीसी को ...?"
सिम्मो मुद्दाम बाहेर पहात होती ..तेज चं हे बोलणं इतकं लागलं तीला की पुन्हा डोळ्यातून ओघळणारे अश्रू तीने आवरले नाहीत ..ईतकं सगळं होऊनही हा अनभिज्ञअसल्या सारखा वागतोय ...मुद्दाम मला चिडवायची कोणतीही संधी सोडत नाहीये ...दुष्ट आहे एकदम ...

संपूर्ण प्रवासभर कोणीच बोललं नाही काहीच कुणाशी ...तेज मात्र मधूनच आरसा वळवून सिम्मो काय करतीय पहायचा ...ती शांतपणे खिडकीतून बाहेर पहात होती विचारांची आवर्तन इतकी उठत होती कि काळजीनं कोमेजलेला तीचा चेहेरा मलूल झाला होता ....
तेज ओढला जातोय आपल्याकडे हे सिम्मो ला जाणवत होतं पण शेजारी रहाणारी रानो सारखी "मैं तेज की लुगाई ...वहीं मुझे बिहा के ले जाएगा म्हणायची ..."लहानपणी ची चिडवा चिडवी पण मोठे पणीही रानो तेच खरं मानून चालली होती ... घरातल्या चाचा चाची ,वीरजी सगळ्यांनी ठरवलंय आपली शादी तेज शी करायची, यातनं बाहेरच येत नव्हती ....
येता जाता त्याचे फोटो दाखवणं ,त्याच्या विरुद्ध कुणीही काहीही बोललेल खपायचं नाही तीला...सिम्मो त्यामुळे थोडी बाजूला होत गेली ...तेज ला काय वाटतंय रानो बद्दल हे कळावं तरी पण चार दिवसां पूर्वीचा प्रसंग आठवला आणि सिम्मो नं तेज शी नातं तोडायचंच ठरवलं ...आठ दिवस झाले असतील तेज गावात आलेला आल्या आल्याच गुड्डो बरोबर चिठ्ठी आली पैगाम ए मोहब्बत ...भेटायला ये ...म्हणून ...
रंगबावरल्या क्षणांची आतुरतेनं वाट पहाणारी सिम्मो ,फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता त्यावर फुलकारी केलेली ओढणी ,हातांत ढेर सार्या चूडीयाँ..काजळाची एकच रेघ ओढली मुळातच पाणीदार असलेले डोळे आणखीन मोठे खुबसुरत दिसायला लागले ...बाहेर हलक्या पावसांच्या सरी यायला लागलेल्या वातावरण बेधुंद झालेलं ती नशा उतरुच नये असं सिम्मोला झालेलं ....
तेजला भेटायचं या ओढीनं अधीर झालेली सिम्मो .. काहीही सुचेना झालेलं "आज इजहारे मोहब्बत कर बैठे ,बेखुदी में ये कमाल कर बैंठे रे ,खरंच असं झालं असेल ..?तेज चं या विचारातच ती होती ."पण दैवाला मान्य नव्हतं ते .गुड्डो जी सुसाट पळत आली ...इतनी बैचेनी इतनी बेकरारी असं चिडवेल आल्या आल्या अशी सिम्मोची कल्पना ...पण गुड्डोचा घाबरलेला चेहेरा वेगळंच काही सांगत होता ... "सिम्मो गजब हो गया शायद वीरजी और रानो की सगाई की बातें चल रहीं है !" तुम लोग इजहार ही करते रहोगे ...वो रानो उडा ले जाएगी तेज वीर जी को !"
सिम्मो थंडच पडली एकदम "हाय मेरे रब्बा ,ये अनहोनी कैसी ...? " मैं वीरजी को पुरानी हवेली के पास भेजती हूँ ... तू दहा मिनीटांनी निघ इथून ... काही तरी केलंच पाहीजे कदाचित या दोन दिवसांतच सगाई ची बात निघाली तर ...?"
गुड्डो चं ऐकावं की जे होतंय तेच होऊ देत ... कसं थांबवणार आहोत सगळं ...?एक निश्चित विचार करुन ओढणी नाका पर्यंत घूँघट सारखी ओढून घेतली सिमरन ने .. आणि तमा न बाळगता कशाचीही ... उंचच उंच वाढलेल्या खेतांतून वाट बेभान पणे तुडवायला लागली ..एरवी हीरवीगार मखमली गवतांची पाती मोहून टाकायची सिम्मोला पण आज काळजीनं ,दुःखातिरेकाने काही सुचेना ...मधूनच भन्नाट सुटणारा वारा चालणं असह्य करत होता ... तोल जात होते .बांधांवरची माती ठीसुळ झालेली पाय वेडेवाकडे पडत होते .. जुती जरी असली तरी पायात रुतणारा प्रत्येक खडा काळजात कळ आणत होता ..
अंधारून यायला लागलेलं ... सुनहरी आणि गुलाबी रंगाची छटा बदलुन काळोखाची एकच कीनार क्षितिजावर दिसत होती ...दोन सावल्या लांबूनच पडक्या हवेलीशी दिसल्या .. घाबरुन सिम्मो एका झाडा मागे लपली ...
क्रमशः ...
©लीना राजीव.🎭 Series Post

View all