ध्येय

ध्येय.. कथा एका स्त्रीची.. तिच्या आगळ्या ध्येयाची..


#कथा
#ध्येय
©स्वप्ना..

"काय ग आज आला नाही तुला आजीचा फोन,..बोर होतं करमत नाही ग अनु असं म्हणत,....कुठे हरवली आजी,..?"

मुलगा अनुला चिडवत होता,...त्याचा सूर पकडत नवरोबा म्हणाला,
"तसं तुला बरंच वाटत असेल नाही का,..कारण तुझ्या आईचा फोन आला कि आठ्या पडतात कपाळावर बघितलं आहे आम्ही,.."

तशी लॅपटॉप मधलं डोकं काढून चिडून अनु म्हणाली,.

."अरे आई ऐन घाईच्या वेळी फोन करते,..तिनं आयुष्य फक्त घरातली काम करून काढलं आहे त्यामुळे आमच्या मागची दगदग तिला समजून घेता येत नाही,..आपली ऑफिसला निघायची वेळच ती गाठते आणि मिस्टर डबा वेळेत भरून मिळाला नाहीतर तुमच्या आठ्या मलाही दिसतात ना,.."

तसा नवरा म्हणाला,
"हो पण ती बिचारी एकटी कंटाळते म्हणुनच फोन करते,..तश्या तुम्ही मल्टी स्किल बायका काम करता करता बोलू शकता ना,..तू तर लगे म्हणतेस आईला,आई अग घाई आहे ग काय सारखी फोन करतेस??अनु,..अग मी सुध्दा किती काम काम करायचो आणि आज मला आईशी बोलावं वाटतं पण आई राहिली नाही ना,..अनुचा हात दाबत तो म्हणाला,तिच्या समाधानासाठी तरी बोलत जा,..स्पीकर ऑन करून काम करत करत बोल पण बोल,..एकदा हरवले ना हे आवाज कि नाही ऐकू येत ग काहीही झालं तरी,.."
चल बाय नवरा आणि मुलगा निघून गेले आणि अनु खरंच अस्वस्थ झाली,..आईने ह्या दोन दिवसात फोनच केला नाही आपण परवा जास्तच जोरात ओरडलो का
तिच्यावर,.. पण हि आई पण ना अण्णा गेल्यापासुन सारखी भुणभुण करते इकडेही येत नाही आणि एकटीला करमत नाही,...आपण तरी मुलगी म्हणून काय करू शकतो,..आपला संसार,नोकरी सगळं सोडून तर जाऊ शकत नाही ना,...पण परवा उमा मावशी म्हंटली तेच खरं,.."अग तिला ध्येय राहिलं नाही ग जगण्याला,..दोन दिवस मी गेले होते तर तुझ्यासाठी अट्टहासाने लावलेल्या झोपाळ्यावर बसते आणि म्हणते माझी अनुने खुप आठवणींचे हिंदोळे दिले ग ह्या झोक्यावर खेळून,...नाहिली कि केस मोकळे सोडून अशी छान झोके घ्यायची,.. एकीकडे केस वाऱ्यावर उडायचे आणि एकिकडे गाणे ओठावर यायचे,..
"लेकी उनाडल्या कश्या,..
आई बापाच्या राज्यात..
जातील सासरी निघुन
झोके आठवणींचे ठेऊन.."
तुझ्या लग्नानंतर आई अण्णांमुळे जरा रमलेली होती ग,..पण आता आण्णा गेले आणि पोकळीच निर्माण झाली,...तिच्या जगण्याला ध्येयच राहिल नाही,..म्हणून तुला सारखी फोन करत असते,.."उमा मावशीचं हे बोलणं आठवून अनुला वाटलं आता आईला ह्या वयात कोणतं ध्येय देणार आपण,..नामस्मरण,पुजा पाठ यात तशीही ती फार रमत नाही,..काहितरी शोधायला हवं तिच्या साठी,...तिने गुगल ओपन केलं आणि परत वाटलं आधी फोन तर करू कुठे हरवली दोन दिवसात,..?
तिने आईला फोन लावला,..हॅलो आई,..तिकडून आवाज काहीसा बोबडा आला,.."हॅलो तोन बोलते,..आई नाही माझी आजी ए इथे..अनु भांबावली फोन आईलाच लागला ना तिने चेक केला पण तेवढ्यात आईचा आवाज आला,..हम्म बोल ग अनु,..अनु जरा आश्चर्य चकित होऊन म्हणाली,"आई अग कोण आलंय ग..?"आई हसत म्हणाली,"मला रमवण्यासाठी परत अनु अली आहे ग माझी,..आता तुला काही जास्त फोन करणं होणार नाही ग बाई,..तेवढ्यात आईकडे कोणीतरी आलं,...बहुतेक त्या बाळाला नेणार,...कारण आई टाटा टाटा म्हणत होती,...आणि मग अनुला म्हणाली,...हम्म बोल आता...अनु म्हणाली,..अग काय?कोणाशी बोलत होतीस,..?अनु अग तू गेल्यावर अण्णा होते म्हणून वेळ जात होता पण आता अण्णा गेले,..तुझा झोपाळा बघून तुझीच जास्त आठवण यायची,.. एक दिवस समोरून एक बाई लेकरू रडत होतं तरी फारफार ओढत नेत होती,..विचारलं तिला का लेकराला ओढत नेतेस,..?तर म्हणाली,"काकु अहो ऑफिसची वेळ झाली हि उशिरा उठली आता माझ्या आईच घरं लांब तिच्याकडे हिला सोडून मला जायचं आणि आज आवश्यक मिटिंग वेळेत गेले नाहीतर नोकरी जाईल माझी,..बस त्याक्षणी काहितरी डोक्यात आलं,..आणि आग्रह करून ती चिमुरडी ठेवली घरी,..तुझ्या झोपळ्यात रमली,..काल दिवस कसा गेला कळलं नाही आज तर आनंदाने आली चिऊ आताच तिची आई घेऊन गेली,...छोटस पाळणाघरच झालं आता माझं,..तुझा झोका मला ध्येय देऊन गेलाय,..आणि त्या बाईची हि आताच बदली झाली आहे शहरात आता पाच वर्षे चिऊ तुम्हीच सांभाळा असं म्हंटल्या त्या,..आज मी ताटभर स्वयंपाक केला ग,..तुला खाऊ घालत होते तसाच गरम वरण भात आणि तो हि झोपाळ्यावर गाणं हि तेच बरं अनु,..
"लेकी उनाडल्या कश्या..
बोलता बोलता आईला रडू आलं,... अनुनेही डोळे पुसले,...
वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,... शुद्धलेखन चुका माफी असावी,..असेच blogs वाचण्यासाठी swapna blogs ह्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा,..धन्यवाद
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद.