Login

धुक्यात हरवलेले स्वप्न ( भाग तीन)

धुक्यात हरवलेले स्वप्न...

हॅलो आई.....
हा बोल गणेश पोचलास का?
इथे विमानतळावर पोहोचलोय पण अजून विमान सुटायला एक दीड तास बाकी आहे म्हणून तुला फोन केला.
अग आई आपल्याला आकाशात जे विमान आपल्या तळहाता एवढ्या दिसते ना ते विमान प्रत्यक्षात खूप मोठे आहे.
आई खूप मोठे म्हणजे आपल्या गावात जी एसटी येते एवढे मोठे असेल का?
"अग आपल्या दहा एसटी त्याच्यात बसतील एवढं मोठं."
बापरे ! काय सांगतोस.
अगं ...आपल्याला आपल्या गावातून ते विमान खूप छोटं दिसतं पण प्रत्यक्षात ते विमान खूप मोठा आहे.
आता मी तुला आणि बाबांना एकदा तरी विमानामध्ये घेऊन फिरायला जाणार.
हो ... आता तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील.
" माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी".
तुझ्या आशीर्वादानेच तर आज इथपर्यंत पोहोचलोय .
आता आपलं सगळं चांगलं होईल.
बाबांना आता एक चांगला बिल्डर बघायला सांग म्हणजे गावात मोठं घर बांधून घेऊ.
अरे हो रे बाळा फक्त तू काय ते तुझं ट्रेनिंग आहे ते पूर्ण करून लवकर माघारी ये बघ.
हो आई चल मग ठेवू का आता फोन आणि विमानाचे फोटो मी सुमन च्या मोबाईलवर पाठवतोे बघ.
हो हो...
पोहोचला की फोन कर.
हो हो नक्की ठेवतो.
थोड्याच वेळात...
एक छोटी गाडी येते व त्याचे जे विमान आहे त्या विमानापर्यंत त्यांला घेऊन जाते. त्यानंतर तो विमानामध्ये आनंदाने विंडो सीटच्या बाजूला जाऊन बसतो.
सीटबेल्ट लावायला सांगितल्यानंतर स्वतःचा सीट बेल्ट तो लावून घेतो आणि विमान उडण्याची वाट बघतो.
थोड्याच वेळात विमान टेकऑफ होणार आहे. असा आवाज आल्यानंतर तू उत्सुकतेने खिडकीतून बाहेर बघतो. विमान हळूहळू उडू लागते. आता आपल्याला खाली पृथ्वी कशी आहे हे दिसणार असे करून तो खिडकीतून खाली बघत असतो तेवढ्यात ते विमान पुन्हा खाली उतरत असताना त्याला दिसते विमानातील माणसे आरडाओरडा करू लागतात काही सेकंदात विमानाचा स्फोट होतो.
सगळीकडे धावपळ चालू होते. टीव्ही वरती बातम्या चालू होतात बेंगलुरुला जाणारे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे आकाशात न उडता जमिनीवरच कोसळले.
इकडे गणेशची आई आकाशात विमान उडताना बघते.  गणेश पण विमानात बसला असेल असा ती विचार करते.
गणेश चा मित्र धावतच घरी येतो आणि त्याच्या आईला सांगतो मावशी आपला गणेश ज्या विमानातून गेला ते विमान कोसळले.
बेंगलुरु ला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला.
आई मोठ्याने टाहो फोडते नाही माझ्या मुलाचे स्वप्न असे धुक्यात विरघळून जाऊ शकत नाहीत.....
समाप्त


🎭 Series Post

View all