"आई लवकर बाहेर ये आकाशात बघ विमान उडतय".
गणेश आकाशाकडे बघत बोलतो.
दोघेही उत्सुकतेने आकाशाकडे बघतात.
एवढंसं विमान त्याच्यात माणसं कशी बसत असतील?
आणि ते विमान खाली कसं पडत नाही?
आठ दहा वर्षांचा गणेश आईला प्रश्न विचारत असतो.
खरंतर त्याच्या प्रश्नांची उत्तरे , त्याच्या आईला देखील माहीतच नसतात. कारण हे प्रश्न तिला देखील सतत पडत असतात.
अरे विमान खाली पडलं असतं तर लोक त्याच्यात बसले असते का?
गणेश मला पण विमानामध्ये बसायचं आहे.
विमानातून खाली बघितल्यानंतर जग कसं दिसत असेल.
आई मला एकदा तरी विमानात बसायचं आहे.
विमानात बसण्यासाठी आधी खूप शिक मोठा हो .तुझा बाप तुला विमानात नाही बसवणार...
इथे काटकसर करून घर चालवावं लागतं. तेव्हा कुठे पोटाची भूक भागवता येते.
आई मला तुम्ही विमानात बसवलं नाही तरी चालेल. मी शिकून इतका मोठा होईल की मीच तुम्हा दोघांना विमानातून फिरायला घेऊन जाईन.
आकाशातील विमान बघत बघतच गणेश आणि त्याच्या आईच्या गप्पा चालू असतात . विमान नजरेआड होईपर्यंत गणेश आकाशाकडे टक लावून बघत असतो.
गणेश मनाशी ठरवतो काहीही झालं तरी विमानात बसण्या इतके शिक्षण मी नक्कीच घेणार .
गणेश अभ्यासामध्ये खूप हुशार होता . शाळेमध्ये त्याचा नेहमीच पहिला नंबर येत असत. अकरावी बारावीचे शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी घेतल्यानंतर मात्र , तो पुढील शिक्षणासाठी पुण्याला जातो.
पुण्यामध्ये तो मेकॅनिकल इंजीनियरिंग चे शिक्षण घेतो.
घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे इकडे तिकडे पैसे खर्च न करता. तो मन लावून अभ्यास करत. काहीही झाले तरी आपल्याला कॉलेजमधूनच कॅम्पस इंटरव्यू मधून जॉब लागला पाहिजे. असे त्याला वाटत.
पुण्यातूनच एक कंपनी त्याची हुशारी बघून बारा लाखांचे पॅकेज ऑफर करते.
गणेशला कंपनीने दिलेली ऑफर ऐकल्यानंतर खूप आनंद होतो. तो लगेचच आपल्या आईला फोन करतो व सांगतो आई मला एक लाख पगाराची नोकरी मिळाली. आपण आधी गावाला घर बांधायचं....
"आई हो हो.. पण त्याआधी तू एकदा घरी येऊन जा".
हो आई मी घरी येईन." त्याआधी मला लगेचच ऑफिस जॉईन करण्यासाठी सांगितले आहे. माझे एक महिन्याचे ट्रेनिंग लावले आहे. ते ट्रेनिंग बेंगलुरु येथे असल्यामुळे मला एक ते दीड महिन्यासाठी बेंगलुरूला जावे लागणार आहे.
गणेशला मेल येतो, तुमची बेंगलोरुला जाण्याची तिकीट बुक झाली आहे आणि ते ही विमानाने.
कंपनी गणेशला विमानाने बेंगलुरुला पाठवणार या विचारानेच गणेशला खूप आनंद होतो. गणेशच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात.

क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा