Login

धुक्यात हरवलेले स्वप्न (भाग दोन)

धुक्यात हरवलेले स्वप्न

जी विमान तो फक्त आकाशातून उडताना बघत होता .त्या विमानातून प्रवास करण्याची संधी आज त्याला मिळाली होती.
राहुल ऑफिसमध्ये सांगतो , सर मी ट्रेनिंग ला जाण्याआधी एक दिवस माझ्या आई बाबांना भेटून येतो.
त्याला एक दिवस गावी जाण्यासाठी सुट्टी मिळते.
"गणेश घरी आल्यानंतर त्यांच्याआईला आणि त्याच्या वडिलांना खूप आनंद होतो दोघेही त्याचे तोंड भरून कौतुक करतात.
आई तुला माहिती आहे का? जी विमान बघून मी लहानाचा मोठा झालो. अग त्याच विमानात बसून मी आता ट्रेनिंगला  जाणार आहे.
"आई बोलते काय सांगतोयस तु विमानात बसणार"!
बापरे!  "तू तर खूप मोठा साहेब झालास" ....
आई हे ट्रेनिंग पूर्ण करून आलो ना की मी तुला आणि बाबांना सुद्धा विमानातून फिरवून आणणार आहे.
बरं बरं चालेल.
चल आई जाऊ का मी आता ,उद्या मला दुपारी चार वाजताची फ्लाईट आहे.
आईचा निरोप घेऊन तो निघतो.
"आई गणेशला बोलते हे बघ गणेश, आपल्या घरावरून ज्यावेळी विमान जाईल ना त्यावेळी मी त्याच्याकडे बघून टाटा करेन तू त्याच विमानात असशील ना".
गणेश हो हो नक्कीच.
दुसऱ्या दिवशी गणेश मोठ्या उत्साहाने तयार होऊन ट्रेनिंगला जाण्यासाठी निघतो . खरंतर ट्रेनिंग पेक्षाही जास्त त्याला विमानामध्ये बसण्याची उत्सुकता असते .विमानात बसल्यानंतर पृथ्वी कशी दिसत असेल याचाच तो जास्त विचार करत असतो.
लहानपणी आकाश पाळण्यातून सारा गाव बघायला पण किती छान वाटायचे. आकाश पाळण्यात बसल्यानंतर जणू काही आपण आकाशालाच स्पर्श केला आहे असे वाटत होते. पण आज तर मी विमानातच बसणार आहे.
आज  पहिल्यांदाच मी  पक्षांसारख आकाशात उडणार आहे . या विचाराने त्याचे मन सुखावले असते. फ्लाईट चार वाजता ची असली तरी त्याला एक वाजेपर्यंतच एअरपोर्ट वरती पोहोचायचे असते. एका मित्राच्या टू व्हीलर वरून गणेश एअरपोर्ट पर्यंत पोहोचतो. तिथे गेल्यानंतर सर्व सामानाची तपासणी झाल्यानंतर एक ते दीड तासानंतर  त्याची फ्लाईट सुटणार असते . मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता भरलेली असते . जमिनीवरून आकाशात अगदी आपल्या हाता एवढे दिसणारे विमान प्रत्यक्षात किती मोठे असते हे गणेशने पहिल्यांदाच पाहिलेले असते. फ्लाईटला सुटण्यासाठी अजून वेळ असतो म्हणून तो आईला फोन करतो.
क्रमशः

🎭 Series Post

View all