विनयला अधिकमासाचं आमंत्रण आलं होतं सासुरवाडी वरून
" जावईबापू अधिक मासानिमित्त धोंडे जेवणाला येत्या रविवारी या "
" जावईबापू अधिक मासानिमित्त धोंडे जेवणाला येत्या रविवारी या "
लग्नाला जेमतेम दीड वर्ष होत आल होत आणि अधिकमास आला होता त्याचे आई-वडीलही नेमके टूरवर गेले होते अधिकमासाचे नेमकं काय असतं त्याला काहीच माहित नव्हतं म्हणून त्याने स्वतःच्या आईला फोन केला
"आई अगं तिच्या घरून अधिक मासानिमित्त धोंडे जेवणासाठी बोलावलं आहे"
"अच्छा अरे जा की मग अधिक मासानिमित्त जावयाला बोलवतातच त्यात काय एवढं जाऊन ये"
"अग हो पण मला ते काय असतं माहीतच नाही"
त्याच्या आईला मात्र त्याचा आवाज नीट येत नव्हता त्या होत्या तिथून नेटवर्क प्रॉब्लेम होता
"हे बघ बाळा मला काहीही ऐकू येत नाहीये हे बघ प्रत्येक जावयाला अधिक मासात बोलतात तुम्ही जा" असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला
आली का पंचाईत उद्याच रविवार होता आणि उद्याच त्याला बायकोसोबत सासरवाडीला जायचं होतं
शेवटी रविवार उजाडला सकाळीच हलका नाष्टा करून दोघेही त्याच्या बायकोच्या म्हणजेच सीमाच्या घरी निघाले आता विनयला एकच प्रश्न होता
'धोंडे जेवण म्हणजे नेमकं काय???धोंडे खाऊ घालतात की काय' पण आता हे डायरेक्ट विचारणार कसं बायकोला म्हणून तो गप होता
'धोंडे जेवण म्हणजे नेमकं काय???धोंडे खाऊ घालतात की काय' पण आता हे डायरेक्ट विचारणार कसं बायकोला म्हणून तो गप होता
सासुरवाडीत गेल्या गेल्या त्याला सरबत देण्यात आलं विनय मात्र त्या सर्बताला निरखून पाहू लागला यात दगडंं घातली नाहीत ना म्हणजे धोंडे हो , असं त्याला वाटून गेलं पण त्यात बर्फाचे खडेच होते
आता वेळ आली जेवणाची ताटभर जेवण होतं अगदी पंचपकवांनांनी ताट भरल होत पण कुठेही त्याला धोंडी दिसत नव्हती शेवटी त्याला प्रश्न पडला
'अरे धोंडे जेवण व दगड कुठे आहेत'
पण आता डायरेक्ट कसं विचारणार म्हणून तो गप गुमान जेवत होता तेवढ्यात सासूबाईंनी एका आकर्षक प्लेटमध्ये गोल गोल असं काहीतरी आणून ठेवलं दिसायला ते फारच छान दिसत होतं तेवढ्यात सासरे बुवा म्हणले
"जावई बापू धोंडे !!धोंडे तरी घ्या"
'अरे धोंडे जेवण व दगड कुठे आहेत'
पण आता डायरेक्ट कसं विचारणार म्हणून तो गप गुमान जेवत होता तेवढ्यात सासूबाईंनी एका आकर्षक प्लेटमध्ये गोल गोल असं काहीतरी आणून ठेवलं दिसायला ते फारच छान दिसत होतं तेवढ्यात सासरे बुवा म्हणले
"जावई बापू धोंडे !!धोंडे तरी घ्या"
आणि आता हा पूर्ण टेबलवर नजर ठेवत होता नक्की आहेत कुठे
की आता सरळ दगडच मारतात असा विचार तो करू लागला तेवढ्यात सासूबाईंनी त्या प्लेटमध्ये ठेवलेलं एक गोलाकार असं जिन्नस घेऊन त्यांच्या ताटात ठेवला आणि म्हणे "हे घ्या"
की आता सरळ दगडच मारतात असा विचार तो करू लागला तेवढ्यात सासूबाईंनी त्या प्लेटमध्ये ठेवलेलं एक गोलाकार असं जिन्नस घेऊन त्यांच्या ताटात ठेवला आणि म्हणे "हे घ्या"
आता विनयची ट्यूब पेटली 'ह्याला धोंडे म्हणतात का'
"हो !!! अहो आपण करंजी करतो ना अगदी तसंच फक्त मोदकाचा आकार द्यायचा आणि आत गुळ खोबरं किंवा साखर आणि खोबऱ्याचं सारण ह्यालाच म्हणतात धोंडे"
आता विनयला जरा हायसे वाटू लागलं धोंडे जेवण म्हणजे खरंच धोंडे दगड खावे लागतात की काय असं त्याला वाटत होतं पद्धतशीर जेवण आटपली पोट छान भरलं होतं ासूबाई आणि सासर्यांनी पद्धतशीर आहेर केला आता जरा वेळ आराम करून निघायचं होतं सासरेबुवानी बडीशेप दिली हातावर बायको आत सासूबाईन सोबत हितगुज करत बसली होती त्यांच्या गप्पा चांगल्या रंगल्या होत्या
"अर्ध्या तासात निघू आपण" ह्याने बायकोला उद्देशून म्हटले
"हो चालेल आवरलच आहे माझं" बायकोने ही संमती दिली
" जावईबापू काय म्हणता सगळे कुशल मंगल ना? " सासरेबुवांनी विचारले
"हो हो अगदी छान"
"कसा चालू आहे संसार? "
"मस्त हो बाबा.... आणि तसंही मला मांजरीची फार आवड आहे मी लग्नाआधी भरपूर मांजरी पाळल्या आहेत म्हणून बोचकारणाऱ्या मांजरीची सवय आहे मला" म्हणत तो मोठमोठ्याने हसायला लागला बाबाही त्याच्या हसण्यात सामील झाले
तेवढ्यात बायको बाहेर आली
"काय बाबा माझ्याबद्दल काही बोललात का"
"काय बाबा माझ्याबद्दल काही बोललात का"
"अग नाही ग आमची मुलगी किती गुणी आहे ते सांगत होतो"
तेवढ्यात विनय म्हणाला
"आणि मी माझं मांजरी प्रेम सांगत होतो ग बाबांना" म्हणून सासरेबुवा आणि विनय दोघे हसायला लागले
तेवढ्यात विनय म्हणाला
"आणि मी माझं मांजरी प्रेम सांगत होतो ग बाबांना" म्हणून सासरेबुवा आणि विनय दोघे हसायला लागले
पण बायकोने मात्र एक रागीट कटाक्ष विनय वर टाकला आणि म्हणाली
"मी ऐकले बरं का तुम्हा दोघांचं बोलणं"
तिचा तो रागीट कटाक्ष बघून विनय समजून गेला की इथलं धोंडे जेवण जरी छान पार पडल असलं तरी घरी जाऊन मात्र त्याला धोंडेच खायचे आहेत शेवटी मनाची तयारी करून तो उठला आणि बायको सोबत निघाला
तर असा होता विणायचा अधिकमासातला धोंडे जेवणाचा कार्यक्रम तुमचा कसा होता आणि तुम्हाला नेमकं धोंडे जेवण काय हे माहित आहे ना की विनय सारखाच काही गैरसमज आहे कमेंट करून नक्की सांगा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा