धम्माल पुनर्जन्माची.....(भाग 14)

आता कथा अंतिम वळणावर आली आहे.प्रिया आणि राहुलच्या गोष्टीची सुरुवात आणि आपल्या गॅंग ची नवी एंट्री पाहूया अंतिम भागात
मागील भागात आपण पाहिले की ,प्रिया आणि राहुलचे जुळवण्यासाठी या पाच मैत्रिणींनी एक योजना बनवली.त्यानुसार आता प्रियाला राहुलचे बाबा व स्नेहल च्या समोर आणायचे होते.हे दोघे तयार झाले तर राहुलची आई प्रियाची परवानगी सहज मिळणार .आता पाहूया पुढे काय?

स्नेहल ने मस्त कोळंबीची आमटी,पापलेट फ्राय असा बेत केला होता.इकडे यमू ज्युनियर प्रियाला म्हणाली,"यांचा स्वयंपाक व्हायला दुपारचे 12 तरी वाजतील.तोपर्यंत आपण पर्वतीवर जाऊ या.प्रिया ज्युनियर हे ऐकून हसायला लागली.आज्जी आता कुमुद आजीच 100 वेळा पर्वती चढून पण झालं असेल.गप ग!!रंगुने यमीकडे संशयाने पाहिले.तेव्हा प्रियाने सांगितलं,"या दोघींची पैंज लागलेली की कोण आधी 100 वेळा चढणे पूर्ण करणार.यमू चिडून म्हणाली,"मीच पुढे होते ग,चांगली पाचने पण.....पाय घसरून पडले आणि....आमच्यात येऊन पोचलीस सगळ्या एकदम म्हणाल्या.चला लवकर.प्रिया तोवर इकडे लक्ष ठेव,सुमीने सूचना दिली.पर्वतीवर सकाळी एवढी माणसांची गर्दी पाहून सुमी,गोदा आणि काशी अवाक झाल्या.रंगू हसली,आपल्या वेळी पर्वती हे दूर गावाबाहेर असलेलं शांत ठिकाण होत.आता इथे लोक वाढलेली पोट आणि ढासळणाऱ्या तब्बेती राखायला येतात.काशी हसली,"आपल्याला पर्वतीवर यायला विचारायचं तर काय काय करावं लगे?तर काय ?इतकाच वेळ थांबा .एवढ्या वाजता जा आणि परत या.घरूनच खायला न्या.गप्पा मारत मारत सगळ्या पायथ्याला उभ्या होत्या.एवढ्यात त्यांना एक छानशी चापून चोपून पाचवारी घातलेली,सरळ नाकाची,तजेलदार अशी म्हातारी दिसली.सुमीने तिच्याकडे बारकाईने पाहिलं आणि ती ओरडणार एवढ्यात रंगुने तिच्या तोंडावर हात ठेवला.कुमुद पर्वती चढताना तिच्या पणतूला सांगत होती तोच शाळेतला पेरूचा किस्सा.आजी अग किती वेळा सांगतेस??कुमुद हसली,अरे मला माझं बालपण परत मिळत.खरं सांगू का यमू खूप धाडसी आणि हुशार होती.
आजी अग तुम्ही नंतर किती छान मैत्रिणी झालात.
हो ना!त्या पाच पैकी यमू आणि रंगू संपर्कात होत्या.
आजी आज तू तुझ्या मैत्रिणीच्या वतीने 100 आकडा पूर्ण करतेस ना!
हो !तिची जिद्द आणि इच्छा अपुरी रहायला नको.
हे ऐकून यमुला रडू आलं.यमे गप.काशीने तिला गप्प केले.
किती बदल झाले पुण्यात.गोदाने पर्वती वरून खाली नजर टाकत म्हंटलं.
नाहीतर काय?इति काशी.
सगळ्याजणी गप्पा मारत फिरत होत्या.यमू तुला आठवत आपण किमान महिन्यात दोन महिन्यात यायचोच?
रंगू ,तू पुण्यात होतीस म्हणून पर्वतीवर फेरी कायम राहिली.
शाळेच्या त्या सहली,त्या मारलेल्या गप्पा सगळे आठवत ग.
ये ठरलं आपण पुनर्जन्म घ्यायचा तो पुण्यातच...सगळ्या एकसुरात ओरडल्या.


एवढ्यात कुमुद वर पोहचली.तिने यमुच्या नावाने एक झाड लावले होते.त्याला पाणी घातले.यमे आता मी सुद्धा येईल लवकरच.एवढं बोलली आणि यमू इकडे रडू लागली.सगळ्यानी तिला गप्प केलं.सुमी ओरडली,वाजले किती?
11 वाजले,काशीने अंदाज घेत उत्तर दिले.
मग चला लवकर,रंगू ओरडली.सगळ्याजणी परत यायला निघाल्या.इकडे ज्युनियर प्रिया अस्वस्थ.अजून राहुल आणि प्रिया आली नव्हती.आजी गॅंग पण दिसत नव्हती.देवा!कधी येणार हि यमू आजी?बालिके आम्ही आलो!!सगळ्या ओरडल्या.
काय हाल हवा?
आई फुल रेडी.आता फक्त दिगुकाका आणि राहुलदादा यायची बाकी.एवढ्यात बेल वाजली.
प्रिया!अग दरवाजा उघड.
सुलभाआजी उघडते ग..राहुल आणि त्याचे बाबा आले.एवढ्यात स्नेहल म्हणाली,"अरे?तुझा मित्र कुठेय?
येतोय मावशी.एवढ्यात प्रिया आली.अबोली कलरचा सलवार सूट,छान मोकळे सोडलेले केस, हलका मेकअप,सुंदर हास्य...सुलभा आणि स्नेहल पहातच राहिल्या.
प्रिया पुढे झाली,तर आई आणि आजी हि प्रिया पाटील म्हणजे डॉ प्रिया बर का?एवढ्यात प्रियाने एक डबा काकूंना दिला.बंगड्याचा रस्सा आहे काकू.असे म्हणत ती सुलभाच्या पाया पडायला खाली वाकली.तेव्हा मागून या पाचही जणींनी आशीर्वाद दिला.दिगुकाका तर जेवणार खुश झाला.
वा!!काय रस्सा झाला प्रिया!तेवढ्यात ज्युनियर बोलली,काका हा रस्सा तुला कायम मिळू शकतो खायला.
पाणी!!!पाणी आण गो!
स्नेहल मात्र विचारात पडली.पण एक आहार सोडला तर प्रिया राहुलला अनुरूप आहे ...मग तुमचा ग्रीन सिग्नल समजू का???ज्युनियरने पुढाकार घेतला.एवढ्यात सुलभा ओटीच सामान घेऊन आली.
दिगुकाका म्हणाले,"आम्ही समजावतो तुझ्या आईला पण कसे???थोडा वेळ लागले.मागून यमू आजी नाही नाही करत होती.रंगू आजी राहुलच्या कानात म्हणाली,"वेळ नाहीय...मग राहुल म्हणाला बाबा!तिचे बाबा स्थळ पहात आहेत.
काय????स्नेहल ओरडली.मग घाई करायला हवी.मी बोलते सुमतीशी.एवढी नक्षत्रासारखी पोर आहे.निवांत रहा...दिगुकाका आणि स्नेहलने काहीतरी ठरवले..

प्रियाला सोडायला राहुल गेला.ज्युनियर प्रिया खोलीत आली.यमू आजी एवढी काय घाई ग???तेव्हा सुमन आजी म्हणाली,"प्रिया बाळ उद्या आठवा दिवस संपणार आहे आम्हाला आता यमदूताला आमच्या इच्छा सांगाव्या लागतील.राहुल व प्रियाचे लग्न पक्के झाले तरच आम्ही तिकडे येऊ न...ये तुमच्यातले कोण येणार???


ते सिक्रेट आहे....हो का???हो मग.आता झोप तू...आता ह्या मैत्रिणींना एक हुरहूर लागली होती..काय उत्तर देतील त्या यमदूताला..बाईचा जन्म नको म्हणतील?की मातृत्वाचे वरदान परत मागतील???पाहूया अंतिम भागात

🎭 Series Post

View all