धम्माल पुनर्जन्माची....(भाग 7)

आपल्या पंचकन्याची तुळशीबागेतली सफर अनुभवू या ...सोबत आणखी काही भावनांचे गुंते समजून घेऊ

मागील भागात आपण रंगूबाई जयवंत गावडे एक परितक्त्या ते समाजसेविका हा बदल कसा घडला ते पाहिले. रंगुचा पणती संजना चा परिचय या मैत्रिणींना एका धम्माल प्रसंगाने झाला.जाई सारख्या भित्री भागूबाई आजीची हि शूर नात काय आहे ???पाहू या ..





संजना आत शिरली ती तणतण करतच.आयला भेंडी****भ****सा****संजनाची बडबड ऐकून जाई बाहेर आली,"संजू,अगं जिभेला काही हाड बीड आहे का नाही".शिव्या काय देतेस शोभत का???संजू ओरडली,"म्हण म्हण तुझं पेटंट वाक्य म्हण पोरीच्या जातीला शोभत का??आज्जे मला एक कळत नाही रंगू आजीचा एकही गुण तू किंवा माझ्या आईने का नाही घेतला??काय घाबरता ग?आई सुद्धा कशी आहे.बाबांना सतत घाबरते.मी बघ विराज ला लग्ना आधीच सांगितलेले.संजे गप ग.धपाटे केलेत खातेस का?बस का भाई!!दे लवकर.देव!!काय या पोरीची भाषा.तू बस वर गॅलरीत आलेच.असे म्हणून जाई गेली.या पंचकन्या समोर प्रकट झाल्या.काशी ने मिठीच मारली संजू ला.ये!!ये!!असे  ओरडणार तेवढ्यात...रंगू आज्जे!!!अगं ओरडू नकोस!!ते जाईच फुल वर पळत येईल.तेवढ्यात सुमन ने कडकड बोट मोडली,"पोरी शिक्षिका असताना मला जे वाटायचं ते तू करून दाखवलं. अन्याय सहन करायचा नसतो.





संजू मात्र धक्क्यात होती अजून...मग गोदा ने पुढे होऊन सगळं सांगितलं.आज्जे मजाच ग....आता विऱ्या... जीभ चावत म्हणजे...हो हो समजलं काशी म्हणाली.माझ्या सारखं मागे लागलाय.काय तर म्हणे बाळ पायजे,काय घाई आहे ???बरं पण आज्जे माझं बाळ म्हणून येशील का??किंवा पाचपैकी कोणीपण चाललं मला...तसं यमू हसली,"संजू मग मीच लावेल बाई नंबर.माझी आली खूप घाबरत जगली.मला फार वाटायचं आईने बोलावं भांडाव...मला तू पसंत बरं आई म्हणून.एवढ्यात जिन्याचा आवाज आला.जाई वर आली,"संजे जरा तुळशी बागेत जाऊन एक दोन वस्तू आणयच्यात, मी आले असते पण गुडघे दुखतात.संजू नाही म्हणणार एवढ्यात यांनी हो म्हण खुणावले.संजू हो म्हणाली.काय???काय म्हणालीस????संजू पहिल्या वाक्यात तुळशीबागेत जायला हो म्हणते???आज्जे लवकर हा नाहीतर....बर बाई ....संजू बाहेर येताच सगळ्या प्रकट झाल्या.तुळशीबाग...सगळ्या आनंदाने उड्या मारू लागल्या



काशी तर मनाने केव्हाच तुळशीबागेत पोहचली.ये तुम्हाला आठवत आपण हुजूरपागेच्या पहिल्या वर्षी बुवा कावरेंच आईस्क्रिम खायला गेलेलो.रामाच्या मंदिरात किती शांत वाटायचं,आजूबाजूला मिळणारी पितळेची भांडी ,थंडगार उसाचा रस,मंडईत येणारी ताजी ताजी फुल आणि भाज्या वा !!तेवढ्यात संजू ने चुटकी वाजवली,"अगं ये इथंच गप्पा मारणार का??चला.तेवढ्यात यमू म्हणाली,"असं??ये नाही हं, मला बाई वयवस्थित तयार व्हावं लागेल.एवढच ना?? कोपऱ्यावर मैत्रिणीच पार्लर आहे.यमू ओरडली चल लवकर.इकडे बाकी चौघीनी डोक्यावर हात मारला.यमू आत शिरली. तास झाला...दोन तास झाले.तशा सगळ्या भडकल्या, रंगू आजी म्हणाली,"संजे अगं काय गरज होती तिला आणायची इथं??साधं शेजारी हळदी कुंकू घ्यायला जायचं तरी हिला तयारीला दोन तास लागत.कॉलेजला असताना तर आम्ही अर्ध भटकायचो तेव्हा ही पोहचायची. सुमन हसत म्हणाली,"अगं एकदा तर एका मैत्रिणीच्या साखरपुड्याला आम्ही तो संपल्यावर पोहोचलो बोल?संजू बोलली,"काय यार???आधी बोलायचं ना??एवढ्यात आतून एक युवती बाहेर आली,चला ग!!संजू म्हणाली,"कोण तू???तिने गॉगल काढला..आयला शिट्टीच वाजवावी वाटते रे आज्जो!!संजूची कंमेन्ट ऐकून सगळ्या हसू लागल्या,नको ग बाई!यावरून एकदा खूप भांडण केलीत आम्ही..



असे म्हणतात संजू ने डोळे विस्फारले,ये सांग ना आजी काय किस्सा होता...मग रंगू सांगू लागली ,"काही नाही ग ,चैत्र गौरीच हळदी कुंकू यमी च्या घरी म्हणजे माहेरी होणार होत...तर आम्ही चौघी तुळशीबागेत खरेदीला जायचं ठरलं.बाईसाहेब अगदी तयार होऊनच आलेल्या,पाचवारी पातळ,त्यावेळी फॅशन मध्ये असणारे लांब बाह्याचे पोलके, आणि बरंच काय काय..तर आम्ही सगळ्या एकत्र पायी निघालो,तेवढ्यात एका धटिंगणाने यमी कडे पाहून शिट्टी मारली,मग सटकल ना डोकं,असा धुतला त्याला चौघींनी... आज्जे सॉलिड होतात ग तुम्ही..गप्पा मारत ह्या तुळशीबागेत पोहचल्या.काशी म्हणाली,"संजू अगं बरोबर आणलं ना??राम मंदिर कुठेय???आणि या इथे मैदान होत..पलीकडे कासार बसायचे.खण लुगडी विकणारे कुठे बसायचे ग???आज्जो अगं मंदिर आहे इथेच चला..दाखवते.बोळीत शिरल्यावर गुदमरायला झालं यांना.. एकदाच्या मंदिरात पोहचल्या.गोदा म्हणाली,"इथला शांतपणा मात्र आहे तसाच आहे ग...खरंच कितीवेळा आपण इथे शांत बसायचो.एवढ्यात सुमी बोलली,ये त्या मारुती एनवे च दुकान इथेच होत ना???हो!हो!गरीब बिचारा,अगदी सालस ..संजू या गप्पा ऐकत होती.





काशी म्हणाली,"तुला आठवत त्या अब्दुल कडे फॅशनेबल बांगड्या मिळायच्या, मला बांगड्यांची खूप हौस ग...पण आई पैसे इतके मोजे देई की त्यात साध्या बांगड्या येत,पण तुम्ही मैत्रिणी अगदी स्वतःचे खाऊचे पैसे पण माझ्यासाठी वाचवायचात ग....सुमी म्हणाली,"काशे आपलं सगळं एकत्रच असायचं ना...आता यमी ला पाचवारी घेता यावी म्हणून पैसे हरवले असं घरी सांगून तू मार खाललेला..गोदा तर रडायला लागली,"तुम्हाला आठवत का?माझ्या लग्नात मला पितळी भांडी हवी होती निदान पाच तरी...या तिघीनी तेव्हा एक पार्ट टाईम काम करून मला भेट दिलेली.किती आठवणी ग ....तेवढ्यात यमू म्हणाली,ये पण तेव्हा तो कला कंद ,बुवा कावरेची आईस्क्रिम ,पेरू आणि उसाचा रस सगळं खावे वाटे..पण संजे प्रत्येक वेळी एकच काहीतरी परवडत असे.





आज्जो पण आज धम्माल करा ग...आपुन है ना। सगळ्या जणी उठल्या श्रीरामाचे दर्शन घेतले...बाहेर पडल्या तर अंगावर येणारी गर्दी .पहिल्यांदा घाबरल्या पण नंतर मस्त मजा केली..वेगवेगळ्या प्रकारच्या चपला,कपडे,आभूषणे,पर्सेस काय घेऊ नि काय नको??तेवढ्यात सुमी यमुच्या कानात म्हणाली,"ये बाई आपण अजून पुन्हा जन्मलो नाही,काही घेऊ नकोस.ये पण छान वाटतंय,या पोरी अश्या मुक्त बागडत आहेत.चला आता मस्त जेवणावर ताव मारू संजू ओरडली.तेव्हा काशी म्हणते कशी,खानावळीत नको ग,कोणी बघेल,पोरी बाळी कशा इथे???एकदा आठवत ना,रंगी च्या हट्टाला बळी पडून आपण गेलतो तर तिकडे यमुच्या दादाने पाहिलं,यमू रागाने लाल होत म्हणाली,हो आणि घरी येऊन आईला सांगितलं तुला सांगते संजू सहा महिने तुळशीबागेत पाऊल ठेवू दिले नाही आईने. तेव्हा संजू हसली,"थंड व्हा,मुलींनो आता असे काही होणार नाही.मस्त दाक्षिणात्य डोसा इडली खाऊ या,सुमी हसत म्हणाली,नाहीतर दिनकर घेऊन आला की मेले ते पोहे आणि उपमा...तशा सगळ्या हॉटेलात गेल्या,मस्त हसत खिदळत जेवल्या. संजूने जाईचे काम केले..सगळ्या आईस्क्रिम खायला आल्या.





संजू बोलू लागली,रंगू आज्जी तुझं आधार केंद्र आता खूप मोठं झालं, मी अनेकदा तिथे जाऊन काम करते,तुझी आठवण अजूनही आहे बर  तिथे...बर आता मी पळते, पण ते पुनर्जन्माच ठरलं तर मला लक्षात ठेवा..बाय आज्जो.संजू गेल्यावर या पाचही जणी परत एकदा रामाच्या मंदिरात आल्या.शांत बसल्या.किती सुंदर ना...बघ ना भोवतालचे पुणे बदलले पण इथली शांतता आणि सात्विकपण अजून तसेच आहे आणि निरंतर असेच रहावे.





आज इथेच थांबू या का???हो शांतपणा अनुभवू या इथला आणि मग उद्या तुम्हाला सुमन दिनकर पाटील च्या घरी यायचंय ...





आतापर्यंत प्रत्येकीची जीवन कहाणी आपण वाचतोय यातच त्यांच्या पुनर्जन्माची बीज आहेत.पुढे काय होईल वाचत रहा...





प्रतिसादाबद्दल आभार




🎭 Series Post

View all