धम्माल पुनर्जन्माची ...(भाग 6)

एक समाजसेवक घडताना असणारी वेदनांची व्यथा जाऊन घेऊ आजच्या भागात

नमस्कार वाचकहो ! धम्माल पुनर्जन्माची कथामालिकेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.गेले चार पाच दिवस तांत्रिक अडचण असल्याने सहावा भाग टाकायला उशीर झाला ,त्याबद्दल क्षमस्व.पुढील भाग नियमित रोज पोस्ट होतील.????????????





मागील भागात आपण या पाच मैत्रिणींनी केलेली धम्माल पाहिली.शनिवारवाड्यात केलेली धम्माल आणि गुप्ते आजोबांना भेटून आलेली मजा ....यामुळे सगळ्या जणी नकळत मोकळ्या होत होत्या.मनात दबलेले अनेक दुःखाचे कढ निघून जात होते.आता समाजसेविका म्हणून प्रसिद्ध असलेल्या रंगूच्या आयुष्यातील मैत्रिणींना माहित नसलेला कोपरा उघडला जाणार आहे.पाहूया पुढे...





तर मैत्रिणींनो चला ,पुण्यातीलच कसब्यात सासर,माहेर दोन्ही म्हणून किती हेवा वाटायचा ना माझा.आज पाहू या रंगुने काय पाहिलं,भोगलं,आणि जगलं. सगळ्या कसब्यात पोहचल्या,"फार बदल नाही झालाय ग",सुमी म्हणाली.हो,फक्त पूर्वीची बैठी घरे,जाऊन तीन चार मजली फ्लॅट असलेल्या इमारती झाल्या.तर मी काय सांगत होते,"रंगू बोलू लागली,इंटर झाले आणि मला स्वप्न पडायला लागली,नोकरीची थोडं स्वतंत्र जीवन जगायची.पण कस आहे ना,स्वप्न पाहणारे पंख कापायला अनेक जण टपलेले असतात आणि खेद याचा वाटतो की त्यातले बरेच आपल्या जवळचे असतात.मी नोकरीचे अर्ज भरायला सुरुवात केली.बऱ्याच ठिकाणाहून मला मुलाखतीला बोलावले गेले.एके दिवशी मी घरी आले,घरात दोन गल्ल्या सोडून राहणारी गावडे मंडळी जमली होती.मला काहीच कळेना!!आईने मला मागील दाराने आत घेतले.आई काय हे??हे गावडे कशाला आलेत??आई म्हणाली ,"सांगते ,आधी तू तयार हो,साडी नेस. पण का????तेव्हा आजी बोलली,"दादाचा मित्र जयवंत तुला मागणी घालायला आलाय".काय????मी मोठ्याने ओरडले.आजीने मला गप केले.चहा -पोहे खाऊन मंडळी गेली.मग मात्र मी चिडले.मला न विचारता,न कळवता हा सगळा घाट का घातला??मला सांगितलं का नाहीस??तेव्हा दादा गोड आवाजात म्हणाला,"चिमणे,सांगायचं काय ?जयवंत चांगला कमावतो,शरीराने निरोगी आहे,मंडळी पाहण्यातली आहेत शिवाय....शिवाय काय???शिवाय गावडे मंडळी मला धंद्यात भागीदारी देत आहेत.अच्छा!!!म्हणजे भागीदारीच्या बदल्यात बहीण काय???असे मी म्हणताच बापू चिडले.काहीही बरळू नकोस,जयवंत ला तू आवडतेस!हो का???माझं काय ??मला तो आवडत नसेल तर???मी खूप तमाशा केला.आता सगळे घरचे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मी...पण स्वतःच्या घरच्यांविरुद्ध किती काळ लढणार ..शेवटी मी होकार दिला पण आधी जयवंत ला भेटणार या अटीवर.





काय????कशी ओरडली.हो मग......मला त्याला प्रश्न विचारायचे होते.तसं आम्ही भेटलो.पहिलाच प्रश्न मी विचारला, मला लग्नानंतर नोकरी करू देणार का??उत्तर आले ,हो!!!पुढची सगळी उत्तर मला हवी तशीच आली.त्यानंतर तुमची हि मैत्रीण सौ रंगूबाई जयवंत गावडे बनून दोन गल्ल्या पलीकडे सासरी गेली.सुरुवातीला सगळं छान चाललेलं.लग्नानंतर तीन महिन्यांनी मी नोकरीचा विषय काढला,तेव्हा जयवंत गोड बोलून म्हणाला,"थोडं थांब ना!!!अजून दोन तीन महिने.मी ही फसले.त्यानंतर दिवस राहिले.जुळी मुलं झाली.प्रमोद आणि जाई. आईपण ...बदलवू लागत आपल्याला.मी सुद्धा अडकले.संसार,मुलं, नवरा,पै पाहुणे हे सगळं करण्यात.एक गृहिणी हळूहळू मुरत गेली माझ्यात.त्या आदर्श आईपण,बायको आणि सून,मामी,सगळं करण्याची नशा आली.पण....एक दिवस मात्र मी खाडकन भानावर आले.मला स्पष्ट आठवत...दादा आला होता घरी.आतल्या खोलीत दोघे मित्र गप्पा मारत होते.दादाच्या बायकोची पाचवी खेप होती बाळंतपणाची.त्यावरून चाललेले पुरुषी विनोद..एवढ्यात ते मी ऐकलं ज्याने मी बदलले.वश्या तुला सांगतो तुमची रंगी लहान असल्यापासून मनात भरली माझ्या.अशी बायको पाहिजे हुशार म्हणजे पोर हुशार होतात रे...आता बघ कशी संसार करते गुमान...आता आणखी एक दोन पोर पदरात टाकली की ती मोठी होईपर्यंत चाळीशी येईल मग काय आपलेच ऐकणार ....माझ्या अंगाचा नुसता संताप झाला.मी ठरवले बोलायच नाही कृती करायची.त्यानंतर मला म न पा मध्ये नोकरीची जाहिरात दिसली.अर्ज केला,निवड झाली.जयवंत म्हणाला,"मुलं लहान आहेत".सरळ उत्तर दिलं होतील मोठी आता शाळेत जातात ती.मग म्हणाला,"सासू सासऱ्यांकडे कोण पाहिलं???म्हंटलं तुम्ही आहात की??त्या दिवशी प्रचंड वाद झाले..मी मात्र ठाम राहिले.नोकरीवर रुजू झाले.घरचे असहकार पुकारत होते,माहेरून आई सोडून सगळे मला समजावत होते.

जयवंत रोज वाद घालत असे...शेवटी जे व्हायचं ते झालं.जयवंत च्या गोड बोलण्याला फसून एक पोरगी त्याच्याशी विवाह करून घरात आली..जयवंत सरळ म्हणाला,"नोकरी करून तू दमते, माझी गरज .....मला बोलताना सुद्धा लाज आणि संताप अनावर होतो अजून.



दुसऱ्या दिवशीपासून सगळं बदलून गेले.नवऱ्याने टाकलेली...असा शिक्का बसला.अनेक लाळ घोटे मागे पुढे घोळू लागले.नोकरीवर,आजूबाजूला...जवळ चे सुद्धा ...प्रमोद आणि जाई वर याचा परिणाम नको म्हणून मी त्यांना हॉस्टेल वर ठेवलं आणि .....एक दिवस तो प्रसंग घडला...शेजारचा नाना पोमन, साखर मागायचा निमित्ताने आत घुसला आणि हात धरला...मग मात्र मी सरळ कानाखाली वाजवली त्याच्या...भरपूर आरोप प्रत्यारोप,चारित्र्यावर शिंतोडे...सगळं भोगलं...त्याचवेळी मला भेटल्या विद्या पेंडसे...महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या...त्यांच्याशी बोलून सुरक्षित वाटायला लागलं.समदुखी स्त्रियांना भेटून आधार वाटला.हळूहळू स्त्री आधार केंद्र आकाराला आले.मी नोकरी सांभाळत दुप्पट जोमाने काम करत होते.प्रमोद आणि जाई ला घरी घेऊन आले.माझं काम मुलं समजावून घेत.हळूहळू काम वाढलं,कामाचे परिणाम दिसू लागले आणि ...एक परित्यक्त्या एक समाजसेविका झाली...



आता प्रमोदला सून आलीय,जाईची नातं म्हणजे संजना...एवढ्यात फटाक....असा आवाज आला.ये थांब!!xxxx भेंडी....मुलींना छेडतो काय????दाखवते तुला???एक पोरगी दोन मुलांना मारत होती.ज्या मुलीची छेड काढली ती घाबरली....तिला धीर देत ती दुसरी मुलगी म्हणाली,"भिऊ नकोस!!मी काही गुंड वगैरे नाही...माझं नाव संजना सुर्वे-गावडे...कधी पण मदत लागली हाक मार.तिला कार्ड देऊन संजना घरात शिरली..पाठोपाठ या पाच जणी...





रंगुचा वारसा चालवणारी संजना काय काम करते???पुण्यातल्या कोणत्या ठिकाणी धुमाकूळ घालायला हे पंचक जाणार???वाचत रहा धम्माल पुनर्जन्माची


🎭 Series Post

View all