धम्माल पुनर्जन्माची....(भाग 12)

राहुल आणि प्रियाचे जुळवण्याच्या प्रयत्नात या पंचकन्या काय काय धमाल करतात वाचू या

मागील भागात सारसबागेत धम्माल करत असताना या मैत्रिणींना आलेले अनुभव आपण पाहिले,प्रिया आणि राहुलला भरपूर आशीर्वाद आणि अनुभवाचे सल्ले देत ,पुढे काय?राहुलच्या आईची परवानगी कशी मिळवायची यावर सुद्धा या सगळ्या जणी मिळून उपाय करणार होत्या,त्यासाठी त्यांना दुसरी प्रिया म्हणजे यमुनेच्या पणतीची मदत लागणार होती,नक्की काय करून या राहुलच्या आईची परवानगी मिळवणार पाहू या ....





यमुनाने प्रियाचे नाव घेताच राहुल ओरडला,आजी नाही हा!!त्या इटुकल्या प्रियाची मदत मला अजिबात नकोय,एकतर तिला सारखा संशय येत असतो,कितीवेळा वाचलोय मी,आता तिची मदत मी मागणार नाही...इकडे राहुलची प्रिया मात्र हसू लागली.तेव्हा यमुना म्हणाली,"अरे हि दोघे भावंड म्हणजे,तुझ माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना .दोघांत 12 वर्षांच अंतर आहे,राहुल खूप काळजी घेतो तिची.प्रिया हसली,"आजी माझं नाव हेच राहुलसाठी पहिले कारण होते .प्रिया हे नाव ऐकूनच तो 180 अंशात वळाला होता.ते काहीही असो ,प्रियाची मदत...यमुना आता रागावली.राहुल तू गप्प बस,आम्ही करतो सगळे बरोबर.प्रिया,याच्याकडून नंबर घेऊन फोन कर घरी.प्रियाने घरी फोन केला,हॅलो ,प्रिया आहे का??फोन प्रियाच्या आईने उचलला,अनेक प्रश्न विचारल्यावर शेवटी प्रियकडे दिला.इकडून राहुल बोलायला लागला,तिकडे दादया खरं सांग?कोण आहे ती मुलगी?मघाशी आईबरोबर कोण बोललं?हा नंबर कोणाचा आहे?काय भानगड केली?आता राहुल चिडला,"इटुकले किती बोलतेस ग,ऐक आज संध्याकाळी माझ्या घरी यायचंय तुला असा यमू आजीचा निरोप आहे.काय?????प्रिया किंचाळलीच.एवढ्यात हळूच ओरडू लागली,काय यार??यमू आजी तुला का भेटली??शट...प्रियाजी ती माझी सुद्धा आजी आहे की नाही?तेव्हा मुकाट्याने संध्याकाळी घरी ये.



आयला, या दादयाला सांगायला काय जात?संध्याकाळी घरी ये.आता इकडे मातोश्रीना काय सांगू?एकतर 10 वी म्हणून मला फक्त श्वास घेऊ देते ,बाकी सगळा वेळ अभ्यास...अभ्यास...yess.. आई!!ये आई!!प्रिया कशाला ओरडते?आई रात्री मी राहुल दादा कडे थांबणार आहे,माझ्या गणिताच्या काही शंका विचारते त्याला.अग बाई,हो का,मग जाताना सुमती वन्स साठी डबा पण नेते का?नाही!!असे ओठावर आलेले प्रियाने गिळले.दिवसभर तिच्या डोक्यात भुंगा होता.काय काम असेल?यमू आजी या दादिटल्याला का भेटली??संध्याकाळी प्रिया दारात हजर.राहुलच्या आईने तिला आत घेतले.किती दिवसांनी आलीस ग.दमलीस का?थांब हं पन्ह देते.तेवढ्यात मागून राहुल हसला,"आई दोन पिझ्झे आणि कोक चे कॅन कोण पिणार मग???राहुल गप रे पोर किती दिवसांनी आलीय.राहुलला चिडवत प्रिया आत आली.पन्ह वगैरे झालं,आईचा डबा दिला.आता मी अभ्यासाला बसते दादा बरोबर.असे म्हणत प्रिया वर आली.दादा आता खरं बोल हा,आणि त्या पाच आज्ज्या कुठेत?यमू आजी,रंगू आजी,एवढ्यात राहुलने तिच्या तोंडावर हात ठेवला.काशी आजी म्हणाली,"अग ओरडू नकोस".ते काही नाही,तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात ना!!मग याच काय मधेच??सुमन बोलली,"प्रिया आता तुला याच नावाची वहिनी आणायची आहे म्हणून,काय??थांब ,आत्याला सांगते.तेव्हा यमू आजी रागावली,प्रिया गप,तुला इथं आम्ही मदत करायला बोलावले आहे.करते,पण..माझ्या काही अटी आहेत.अट नंबर एक इथून पुढे याने माझ्याशी आदराने बोलावं.अट नंबर दोन मी म्हणेल तेव्हा पार्टी पायजे,अट नंबर तीन आणि सर्वात महत्वाची मुलगी आधी मला आवडली पाहिजे.आजी हिला हाकल घरी,हि काही मदत करणार नाहीय.चिडू नको दादू,मला आधीच सगळं माहित आहे.डॉ प्रिया पाटील करेक्ट???दादू तू विसरला माझ्या अनेक मैत्रिणींचे भाऊ बहीण .....अरे!!पण आता मी काय मदत करू?तेव्हा गोदा म्हणाली,"तुझ्या भाषेत सांगते,तूप भात आणि मटण भाकर एका ताटात बसायला हवी.अच्छा!!आलं लक्षात,त्यासाठी आधी दिगु मामाची विकेट काढली पायजे.यमे तुझी पणती शोभते हं पाठीत धपाटा घालत सुमी म्हणाली.





प्रियाने लगेच योजना आखली,सगळ्या जणी खुश झाल्या.रंगू म्हणाली,"यमीची वारसदार शोभतेस ग पोरी.सगळ्या हसू लागल्या.राहुल तू बिनधास्त रहा,परवानगी मिळणार..पण प्लॅन काय मला सुद्धा सांगा की?ये दादू तुम आम खावं ना ओ.... गुठळ्या क्यु गिनते हो..काशी खो खो हसत म्हणाली,यमे हे पण पिढीजात काय ग??हे हे गप बसा.आधी प्लॅन ऐका. उद्या प्रिया तिच्या आईला असे सांगेल की तिच्या स्वप्नात यमू आजी आली.स्नेहा  तेवढ दिगुला मासे खायला बोलावं हो!!स्नेहा लगेच तयार होणार.त्याच दिवशी दिगु आणि प्रियाची भेट घडवायची आणि नंतर स्नेहाच्या  मनात प्रिया बसली की अर्धे काम झालेच.ते कसे?सुमी म्हणाली.अग या दोघी सख्ख्या मैत्रिणी नंतर नातेवाईक झाल्या.तेव्हा स्नेहा  तयार झाली की काम झालंच.दिगु तयार असणारच अशी खवय्या सून मिळते म्हणल्यावर.तर उद्या हे सगळं प्रिया तिच्या आईला सांगेल आणि मग परवा रविवारी या नाटकाचा फायनल अंक.ये पण उद्या आपण पर्वतीवर जाऊ ना!!सगळ्या एकसुरात म्हणाल्या.यमू मात्र रागावली.असे का??यमू आजी पर्वतीवर जायला का तयार नाही?प्रिया तिच्या आईला समजावेल का?आणखी काय धमाल होणार??वाचत रहा.

धम्माल पुनर्जन्माची



वाचकांच्या प्रेम व प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.तुमचे प्रेमच आणखी लिहायची प्रेरणा देत राहते

प्रशांत कुंजीर


🎭 Series Post

View all