सध्या कोव्हिड ड्युटी वर असल्याने धम्माल पुनर्जन्माची कथेचे भाग टाकायला थोडा वेळ लागत आहे.त्याबद्दल क्षमस्व.
मागील भागात आपण पाहिले की प्रिया आणि राहुलच्या रूपाने सुमी आणि यमुच्या कुटुंबांना एकत्र यायची संधी निर्माण झाली.परंतु काही अडथळे सुद्धा होतेच.हे अडथळे आपली मैत्रिणींची गॅंग कसे दूर करते आणि पुढे काय होतंय ते पाहूया,प्रत्येक भागात या मैत्रिणींच्या पुनर्जन्माची बीजे रोवली आहेत ,अंतिम भागात सगळे उलगडेल.
ज्युनियर प्रिया आणि आजी गॅंग ने केलेला प्लॅन राहुलने लगेच प्रियाला सांगितला.प्रियाने आनंदाने उडी मारली.इकडे प्रिया ज्युनियर घरी आली.आईने विचारले कसा झाला अभ्यास,खूप छान.राहुल दादा गणितात जिनियस आहे.हे ऐकून प्रियाच्या आईने प्रियाकडे संशयाने पाहिले. खाल्ली माती!!एवढं सज्जन उत्तर ऐकून हिला संशय आला वाटत.प्रिया पटकन खोलीत फ्रेश व्हायला निघून गेली.तेव्हा आजी गॅंग हजर होतीच.यमू हसत म्हणाली,प्रिया जरा सराव कर.उद्या तू जे सांगणार ते खरं वाटायला हवं सगळ्यांना काय?हो ग आज्जो.चल आता मी दमले आहे.थोडा आराम करते.उद्या आईला काय आणि कसे सांगायचे याची उजळणी करत प्रिया झोपी गेली.
यमुचे सुखी ,भरले घर पाहून सर्व मैत्रिणींना खूप आनंद झाला.यमे तुला खरच सोन्यासारखं घर मिळालं.तेव्हा यमू सांगू लागली.सख्यानो,देव आहे .तुम्हाला माझं बाळ पण माहित आहेच.वडील घरात सर्वात लहान,आई माझी सालस आणि गरीब.सगळा कारभार काकू आणि एक वडिलांची विधवा मोठी बहीण पहायचा. आईला काडीची सत्ता नव्हती घरात.तुला सांगते,मी भांडून सगळं घ्यायचे.खूप मार खाल्ला.पण मला जे हवे ते पाहिजेच.एकदा शाळेत बाईंनी सहलीची वर्गणी मागितली.पाच रुपये,आत्या सरळ म्हणाली,हि थेर नाही चालणार हो.मी सुद्धा हट्टाला पेटले.तीन दिवस जेवले नाही.शेवटी वडिलांनी त्यांचे ऑफिस मध्ये चहा प्यायचे पैसे मला दिले.खूप रडले दोघेही.इंटर पर्यंत शिकले आणि काकीने तिच्या नात्यात हे स्थळ आणले.काकीचे नातेवाईक म्हणून सरळ नकार दिला.शिवाय मुलगा आपल्याच कॉलेज मध्ये विज्ञान शाखेत.काका सुद्धा हट्ट धरून बसले.शेवटी मुलाला भेटले.भरपूर गप्पा मारल्या.माझ्या मनातल्या शंका सांगितल्या.तेव्हा ते हसायला लागले.हळूच म्हणाले,स्थळ काकूने स्वतः आणले नाही बरं. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला.आणि मी सौभाग्यवती यमुनाबाई झाले.संसार खूप सुखाचा झाला.सगळ्यात महत्वाचे म्हणजे,"माझ्या आई बाबांना सुद्धा यांनी भरपूर सुख दिले.असे म्हणत यमू रडू लागली. सगळ्यांनी एकमेकींना मिठीत घेतले......
दुसऱ्या दिवशी प्रिया पहाटे उठली.आई !आई!!काय ग?कशाला ओरडते?मग मात्र प्रिया लाडात आली,"रात्री यमू आजी आलेली स्वप्नात.तेवढ्यात सुलभा आजीने ऐकलं.अग बाई,हो का?काय म्हणाल्या ग आई?त्यांना काही खावं प्याव वाटतंय का??काही इच्छा अपूर्ण राहिली का?हो !!हो !!आजी किती ते प्रश्न?तिची एक इच्छा राहिलीय,राहुल दादा च्या पप्पाना,दिगु काकाला मासे खाऊ घाल म्हणाली.ते ऐकून स्नेहल हसली,एवढंच ना.उद्या बेत करते.तू राहुल आणि दिगु भाऊजीना सांग.सांगताना सुमतीला कळू देऊ नको बाई.आई,राहुलदादाला फोन करते.फोन ठेवल्यावर प्रिया म्हणाली,दादाचा एक मित्र सुद्धा येतोय उद्या.
हसत हसत प्रिया आत गेली.इकडे यमू हसत सुटली.सुलभी मूलखाची भोळी आणि भावनिक.प्रिया रागावली,का ग माझ्या आजीला बोलतेस.गप ग आजीची लाडकी.एवढ्यात स्नेहाने आवाज दिला,प्रिया मासे आणायला चालले ग.इकडे गोदा आणि काशी सुद्धा खुश झाल्या.तुला सांगते यमे,शाळेत असताना आपण गुपचूप खायचो ,रंगू आणि सुमी च्या घरी.हो ना त्यामूळ मी मार खाल्ला होता.माझी आजी केवढी रागावली.त्या पोरींना बाटवू नको.कसलं ग,आम्हाला आवडायचं.आता आज आत्मा आहे म्हणून नाहीतर.......चला ग तोपर्यंत आपण पर्वतीवर जाऊन येऊ.आता आपल्याकडे फक्त तीन दिवस उरलेत.या तीन दिवसात या प्रिया आणि राहुल ला मार्गी लावून आपल्याला कुठे जन्म घ्यायचे ते सुद्धा सांगावे लागणार ना....आता प्रत्येकीच्या मनात हळू हळू पुढच्या जन्माची आस उमलत होती....
यमे तुला आठवते?आपण इंग्रजी तिसरीत असताना आपली पर्वतीवर सहल गेली होती?काशी हसत म्हणाली.हो!!हो!!हसा तुम्ही.ती कुमुदिनी देसाई वर्गप्रतिनिधी होती.चोंबडी.मी आपली सरळ तिला विचारलं की पेरू घ्यायला जाऊ का?तर म्हणते कशी ,आपण इकडे पेरू हादडायला आलो का?स्वतः मात्र मैत्रिणींना घेऊन पेरू खाल्ला.रंगू म्हणाली,"तेच महागात पडलं ना !!मग तू तिच्या साडीच्या पदराची गाठ दुसऱ्या मुलीच्या पदराला बांधली आणि...गोदा म्हणाली,दोघी तोंडावर पडल्या.सगळ्या खो खो हसू लागल्या.ये पण कुमुदिनी नंतर मोठी डॉ झाली झाली.माझी बाळंतपण तिच्याच कडे झाली.तिचा पणतू आणि त्याची बायको सुद्धा प्रसूतीतज्ञ आहेत.गप्पा मारता मारता पर्वती आली..
काय होईल प्रिया आणि राहुलचे??पर्वतीवर काय धम्माल होणार??पुनर्जन्माची इच्छा कशी पूर्ण होईल वाचत रहा येणाऱ्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा