धम्माल पुनर्जन्माची अंतिम भाग (पूर्वार्ध)

आपल्या पंचकन्यांचा प्रवास आता गोड शेवटाकडे कसा जातोय नक्की वाचा


वाचकहो नमस्कार! सर्वात आधी तुमची माफी मागतो .कथामालिका सलग वाचली गेली तर त्यात मजा असते.परंतु कोव्हिड च संकट अगदी घरात घुसल, त्यातून सावरत नाही तोवर जवळची जिवलग वयक्ती गेली.या सगळ्याचा परिणाम आपोआप लिखाणावर झाला.त्यामुळं धम्माल पुनर्जन्माची या कथामालिकेचा अंतिम भाग लिहायला प्रचंड उशीर झाला.त्याबद्दल सर्वांची दिलगिरी वयक्त करतो.

तर मागील भागात आपण पाहिलं की प्रिया आणि राहुलचे लग्न ठरवायला आता राहुलचे वडील व त्याच्या आईची जिवलग मैत्रीण सुद्धा मदत करणार होत्या.इकडे आपल्या पंचकन्याना दिलेली मुदत संपत आली होती.शेवटच्या दिवशी त्यांना यमदूताला सगळे सांगावे लागणार होते.आता पाहू या पुढे!!!

राहुल आणि दिगु पोटभर जेवून घरी आले.आल्या आल्या आईने विचारलं,"झालं का खाऊन ??आणि काय खाल्लं सांगू नको!!तुझे बाबा आणि तू स्नेहल कडे काय खाता माहित आहे मला.हे ऐकूनच दिगंबर ला ठसका लागला.हं !पाणी घ्या,मी काही रागावले नाहीय,फक्त तुम्ही कधीतरी सांगाल असं वाटलं होतं.असो.आता मी झोपायला जातेय.एवढ्यात फोन वाजला..बोल स्नेहल,गधडे तुमचं सीक्रेट मला माहितीय आधीच.काय?????कस????
तुला आठवत,यमू आजी जाण्याआधी मी रहायला आले होते,तेव्हा तिनेच सांगितलं.
हुश्श!!मला किती टेन्शन आलेलं.आणि ऐक आता हे असं लपवायची गरज नाही बरं!!
मग स्नेहलने धीर करून प्रियाबद्दल सांगितलं.
ठीक आहे ,उद्या बोलावं.
इकडे हे दोघे तणावात.चला झोपा आता.

दुसऱ्या दिवशी स्नेहल डॉ.प्रियाला घेऊन राहुलच्या घरी आली.साधी,सरळ आणि आत्मविश्वासू प्रिया राहुलच्या आईला आवडली.त्यांनी प्रियाच्या वडिलांशि बोलायला लगेच फोन लावला.पुढच्या महिनाभरात लग्न करू!कारण प्रियाची वाहिनी इंग्लडला जाणार आहे.हो का?मग काय आपले नायक ,नायिका आनंदातच ना!!हे सगळं पाहून यमू,गोदा,रंगू,काशी आणि सुमीने मनापासून आशीर्वाद दिला आणि त्या ज्युनियर प्रियाला भेटायला निघाल्या.


प्रिया छान अभ्यासात गुंग होती,एवढ्यात या आज्जी गॅंगने तिथे प्रकट होऊन आवाज केला.
घाबरले ना मी!
यमू आजीने प्रियाला लाडाने जवळ घेतले.प्रिया आता आम्हाला दुसरे शरीर धारण करावे लागणार आहे.तर आम्ही तुला काही काम सांगतोय ,ती तू करायची आहेत.
तुम्ही फक्त सांगा ग!!
सुमी म्हणाली,पेन घे!आमचे सगळ्यांचे पत्ते लिहून घे.
अग पण कशाला??फोन करते की?प्रियाने जीभ चावली.
काशी हसली,हे बघ प्रिया,तू हे पत्र गंगाधर शास्त्री म्हणून लिहायच.
पुढे रंगू बोलू लागली,पत्रात फक्त एवढेच लिहायचे की,तुमच्या घरात पुढील वर्षभरात जर मुलगी जन्माला आली तर,...तिला भरपूर शिकू द्या.
तिला हुजूरपागेत शिकवा
आणि तिच्या उजव्या खांद्यावर जन्मखुन असेल.
अरे पण हे पत्र त्यांना खरे वाटेल का?
तेव्हा गोदा हसून म्हणाली,वाटेल.कारण या पूर्वी गंगाधर शास्त्री बनून आम्हीच पत्र लिहायचो एकमेकांच्या घरी.
काय सॉलिड आहात ग!!
ये पण मला सांगा ना!!तुम्ही आपापल्या घरीच जन्म घेणार ना???
तेव्हा यमू फिल्मी आवाजात म्हणाली,जानी ओ तो सिर्फ यमराज को पता होगा।
काय यार??पण प्रिया बाळ तू मात्र आम्हाला खूप मदत केलीस.आमच्या खूप इच्छा पूर्ण केल्यास.आता हे शेवटचं काम करशील ना..
सर्व आज्याना जवळ घेत प्रिया रडत रडत हो म्हणाली,पण वेळ संपल्याने आजी गॅंग च शरीर आता तिला दिसू शकत नव्हते...

कुठे कुठे आणि कसा जन्म घेतील आपल्या पंचकन्या पाहूया अंतिम भागाच्या उत्तरार्धात

🎭 Series Post

View all