धम्माल पुनर्जन्माची....(भाग2)

आपल्या कथानायिकांचे पूर्वायुष्य,वर्तमानातील जग आणि त्यांच्या इच्छा व पुनर्जन्म या सगळ्यासा??

मागील भागात आपण पाहिलत की यमुनाबाईंच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी या पाचही मैत्रिणींचे म्हणजे यमी,सुमी गोदी ,रंगी अन काशीचे आत्मे परत पृथ्वीतलावर आले.आता त्यांना आठ दिवस इकडे राहायचे होते.या सर्व मैत्रिणी घरी जायला निघतात.आता वाचूया पुढे.... एवढ्यात यमुनाबाई म्हणाल्या,"ये सर्वांनी आपापल्या घरी जायचं ???हि कल्पना काही आवडली नाही मला.तुम्हाला आठवत लग्न झाल्यावर तब्बल वीस वर्षे आपण एकमेकींकडे जाऊ शकलो नव्हतो.त्यावर रंगू म्हणाली,"मी तयार असायचे ग!पण तुम्हाला घरी अडचण नको ,म्हणून कधी आले नाही इतकच.तेव्हा गोदी म्हणजे गोदावरी म्हणाली,खरंय ग,केवळ सजून धजून यजमानांबरोबर लग्नांना जाणे,एवढंच काय ते मेल फिरायचं,त्यात पण भारी बंधन हो!!!काशी हसली,अग तुम्ही तेवढं तरी जग पहात होतात,माझं काय???गरीब आई बापाची देखणी पोर !!म्हणजे कासायाला कापायला दिलेली अश्राप गायच. अवघ्या 10 व्या वर्षी इंग्रजी पहिलीत लग्न झालं.अन मग.....सुमीने काशीला जवळ घेतलं.मग कोणाच्या घरी जायचं आधी???? काशी पुढे झाली,माझ्या जिवाभावाच्या सख्याना जिवंतपणी नाही हो नेता आलं,पण....रंगू बोलली,"काशे रडू नकोस ग!!चला मग काशीबाई श्रीरंगपूरकर उर्फ माधवी बर्वे ...आता आपण जाऊया .चला.सगळ्या निघाल्या श्रीरंगपूरकरांकडे .भव्य टोलेजंग वाडा पाडून आता मस्त अपार्टमेंट बांधलेले होते.सगळे एकत्र पण तरीही स्वतंत्र रहात होते.काशी म्हणाली,किती भव्य अंगण होत वाड्याचं,तुम्हाला सांगते खूप हेवा वाटला होता स्वतःचा एवढं सुरेख घर,साजिरी माणसं पाहून.पन्नास-साठ माणसांचा गोतावळा होता.माझे यजमान,म्हणजे ग????यमी म्हणाली.अग नाव घे काशे आता,सुमी हसली.हो!हो!!असच हसले होते.नवथर वयातली पोर होते.खूप मस्त वाटत होत...छान छान साड्या, दागिने,फुल.आयुष्यात कधी पक्वान्न न खाललेली.इथं सगळी सुख हात जोडून उभी होती .पण..... ‌माझे यजमान म्हणजे काशीनाथराव म्हणून काशी बर का!! ते मात्र दमेकरी, त्यात टी बी झालेला.कोणीतरी ज्योतिष्याने सांगितलं,बाशिंगबळ मजबूत असलेली पत्रिका असलेली मुलगी शोधा. कदाचित जगेलं हा.दुर्दैवाने ती पत्रिका माझी होती ग...आता मात्र सगळ्या सुन्न झाल्या.काय सांगतेस काय काशे??हे बोलली नाहीस कधी??अग कधी सांगणार?आपण जवळपास चाळीशी नंतर भेटलो.तुम्ही संसारात तृप्त होतात,तुमची मुलं मला मावशी म्हणायची.मागे पुढे मग नाही सांगावस वाटलं.सुमन ने काशीला जवळ घेतलं.काशी सहज बोलली,"जन्मदात्या आई बापाने माहित असूनही आपला गरिबीचा संसार पाहून काना डोळा केला गं. तेवढंच एक खात तोंड कमी.काशी च हे सगळं जीवन ऐकून मैत्रिणी आश्चर्यचकित झाल्या.काशीने यातील काहीही कधीच का कळू दिले नाही? ‌मैत्रिणींच्या मनातला प्रश्न अचूक ओळखत काशी म्हणाली,"सुरुवातीला अगदी जीव द्यावासा वाटला हं.अगदी रुक्ष आयुष्य ,वर्षभरात आलेलं वैधव्य.पण मग धाकट्या जाऊबाई आल्या.खूप जीव लावला ग त्यांनी.अगदी बहिणीसारखी माया करत.देवान मात्र हे हि सुख मला जास्त दिवस दिलं नाही.बाळंतपणात जाऊबाई गेल्या.जुळी मुलं मागे सोडून.मग मात्र मी कंबर कसली,माधव आणि केशव दोघांची आई नाही होता आलं तरी मावशी मात्र झाले ग.त्यांनींसुद्धा खूप जीव लावला.तुम्हाला भेटल्यावर मला भरभरून जगू दिलं. पण सुरुवातीचे दिवस आठवतातच. ‌सगळ्याजणी आत आल्या.आता काशीचे नातू आणि नातसुना नांदत होत्या.अगदी सुखात.विशेष म्हणजे काशीचा फोटो होता प्रत्येकाकडे.एकूण सगळं छान दिसतंय नाही?यमुना म्हणाली.एवढ्यात एका खोलीतून रडण्याचा आवाज आला.पाचही जणींनी आत डोकावलं.काशीचा मुलगा माधव तिच्या फोटोपाशी रडत होता,"मावशी,खरतर आईच होतीस तू. तुला आलवनात पाहिलं की अगदी रडू यायचं ग.म्हणून तर आता माझ्या नातीचं दुसरं लग्न लावणार आहे. काशी मावशी तुझ्याकडे पाहून खूपदा एकटेपणाची वेदना डोळ्यात दिसायची.तेव्हा वाटायच की असे कोणासोबत नको.म्हणूनच वैदेही ,माझ्या नातीचं दुसरं लग्न लावलं .हे ऐकूनच सगळ्या खुश झाल्या. ‌तोवर मध्यरात्र झालेली.ये आपण आत्मे असलो तरी आता झोपू या.रंगी म्हणाली.हो ना!सुमी म्हणाली.उद्या आपण या वैदेहीला भेटू आणि शिवाय आपल्याला शाळेत सुद्धा जायचंय.माहित आहे ना,लेडी सुप्रिडेंडन्ट कशा उशीर झाला की रागवायच्या ते. ‌पुढं काय होईल?शाळेत काय धमाल करतील?काय काय नवे पहायला मिळेल.वाचूया पुढील भागात.


🎭 Series Post

View all