धम्माल पुनर्जन्माची...(भाग 4)

दोन मैत्रिणीचा आणखी एका अर्थाने संगम कसा होतोय पाहू या कथेच्या या भागात

मागील भागात पाचही मैत्रिणींनी शाळेची सैर केली,त्यानिमित्त त्या वेळी असलेल्या शाळेची शिस्त बंधन आणि आताची शाळा पाहून त्यांना आनंद झाला.काही ठिकाणी आपल्याला हे मिळालं नाही हे सुद्धा जाणवलं.ह्या वेगवेगळ्या प्रसंगातून या मैत्रिणींना एकमेकींच्या जीवनातील अनेक न कळलेली दुःख ,वेदना पुन्हा वाटून घेता येत होत्या.आता गोदा च्या जीवनात असे काय घडले?त्यामुळ तिला वेगळं जीवन जगावे लागलं. नक्की काय झालं होतं?





आता गोदाच्या घरी जायचं नक्की झालं.तेवढ्यात सुमनला आठवलं,"ये,थांबा ग !!आता काय हीच मध्येच???सगळ्या सुमनकडे पाहू लागल्या.ती पुढे म्हणाली,"तो यमदूत काय म्हणाला होता??तुम्हाला वाटलं तर समोरची वयक्ती तुम्हाला पाहू शकते.हो!!! पण आता नको!!आता आपल्याला गोदाच्या घरी जायचंय ना! सुमन म्हणाली,"हो,जाऊच पण ....आता या यमी च्या प्रियाला भेटायचं का????ये मस्तच,यमू म्हणाली.पण तिने ओळखायला हवं यमे!!आपण आता तरुण आहोत!!???????????? बघू तर.पहिल्यांदा यमू ने मनात इच्छा धरली आणि......हुजूरपागेच्या बसथांब्यावर मस्त केसांचा खोपा घातलेली,सुंदर नऊवारी नेसलेली यमू प्रकट झाली.तिला पाहून प्रियाच्या मैत्रिणी किंचाळल्या,वॉव किती मस्त,हि कोणत्या मालिकेत असेल ग???केस बघ ना ,खरे असतील का????छे !!खोटा विग असेल.झालं....केस हा यमू चा लहानपणापासून विक पॉईंट.ती लगेचच त्या पोरींसमोर गेली आणि म्हणाली,खरे आहेत हो!!!तुमच्यासारखे लांडे केस नव्हते बाई आमच्या वेळी...बस...तो डायलॉग प्रियाला क्लीक झाला.तिने नीट निरखून पाहिलं आणि..पण कस शक्य आहे???छे!!!एवढ्यात बाकीच्या मैत्रिणी गेल्या.मग यमू ने हाक मारली फदे!!!!आयला म्हणजे हीच माझी यमू आज्जी .प्रिया पहातच राहिली.मग सगळ्याजणी प्रकट झाल्या.प्रियाने सगळ्यांना ओळखलं.त्यांनी सर्व हकीकत सांगितली.प्रिया म्हणाली,"ते ठीक आहे पण या अवतारात जर तुम्ही अशा प्रकट झाला तर अवघडय.मग???चला.प्रियाने म्हंटल्यावर त्या अदृश्यपणे घरी गेल्या.प्रियाने मस्त तिच्या ताईचे जिन्स टॉप असे कपडे दिले.आता तुम्ही ताईसारख्या दिसताय.काशी एवढी खुश झाली.मस्तच ग!!यमू आजीकडे पहात प्रिया हसली,"काय आज्जी तू किती ओरड्याचीस ग या कापड्यावरून ताईला".काय?????सगळ्या ओरडल्या.अग यमू म्हणजे स्टाईल क्वीन होती आमची.असो!प्रिया बाळ आता आम्ही गोदा आजीच्या घरी जातोय अदृश्य होऊन.उद्या भेटू शनिवारवाड्याजवळ....







गोदावरीबाई जोशींचा वाडा म्हणजे पुण्यातील तालुक्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या प्रसिद्ध देवस्थानाजवळ असलेला.सगळ्याजणी मस्त एन्जॉय करत चाललेल्या. आता गोदा सांगू लागली,तुम्हाला आठवत??माधवी उर्फ काशी च लग्न झालं तेव्हा दोन पण केले मी,एक स्वतः नोकरी करण्याचा आणि दुसरा माझं कमल हे नाव न बदलण्याचा.पण...आयुष्य कधी गिरकी घेईल सांगता येत नाही.सुमे तुला आठवत मॅट्रिक चा निकाल लागला,कॉलेज चे फॉर्म भरले आणि मला गावी जावं लागलं.हो!!आठवतंय तर.गावी गेल्यावर माझं आयुष्यच बदलून गेले.माझे बाबा सरकारी नोकरीत अतिशय इमानदार,आम्ही चार बहिणी व तीन भाऊ.मी ज्येष्ठ ,बाबांची लाडकी.तर..गावी जायचे ठरले.काहीतरी उत्सव होता म्हणे.दरवर्षी बाबा एकटेच जात.यावर्षी सगळे गेलो.काका,काकू,आणि मोठा गोतावळा जमलेला.हसण खिदळण,आठवणी आणि गप्पा यांना उत आलेला नुसता.दुसऱ्या दिवशी उत्सव पहायला निघालो.छोटा भाऊ बाबांच्या कडेवर होता.बैलाची शर्यत पहायला आम्ही उभे होतो.अचानक.....धावा !!!पळा!!!वाचवा स्वतःला असा गलका सुरु झाला.एक मस्तवाल बैल बेकाबू झाला.काही कळायच्या आत तो बैल आमच्या दिशेने झेपावला...... रक्त ,किंचाळ्या आणि ....अश्रू.बाबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले .मला चक्कर आली.शुद्धीवर आले तेव्हा जगच बदलून गेले माझे.आईची माया जशी पाहिजे तसा बापाचा डोंगराएवढा आधार पण हवाच ग.बाबा गेले...आई अशिक्षित.लवकरच व्यवहाराने रंग दाखवले.ज्या काका,आत्याना बाबांनी घडवलं त्यांनी जबाबदारी झटकली.आई आता सात भावंड घेऊन मामाच्या आधाराने राहू लागली.







एक दिवस हि जोश्यांची सोयरीक आली..मुलगा घरात थोरला,भिक्षुकी करत होता.मागे पाठची भावंड...जबाबदाऱ्या.पण आईने समजावलं,म्हणाली,कमल आता बाबा नाहीत ग...आईचा तो चेहरा कधीच विसरले नाही.आणि तुमची कमल सगळी स्वप्न मागे ठेवून सौ गोदावरीबाई गंगाधर जोशी झाली...जोशीबुवा तसे प्रेमळ होते ग....पण सासूबाई खूप करड्या ,खाष्ट म्हणा हवं तर....पहाटे तीन वाजता उठून पुरणाचा नैवेद्य करावा लगे.अनेक कुळाचार, व्रत,येणारे यजमान आणि सतत तो धूप,दीप आणि पूजा....मी लवकरच हुजूरपागेतून मॅट्रिक झाले हे सुद्धा विसरन गेले ...मग मुलं झाली.जबाबदाऱ्या वाढल्या.अशी वीस वर्षे वाऱ्यासारखी उडाली.आणि एक दिवस जोशीबुवा पक्षाघाताने अंथरुणाला खिळले....कोलमडले  मी.पण उभी राहिले परत.खानावळ चालवली,सासूबाई ,यजमान यांना सांभाळत राहिले,मुलांना घडवत राहिले.अचानक एक दिवस रंगुचा फोटो पाहिला वर्तमानपत्रात....हो!!रंगू म्हणाली.नंतर तुझं पत्र आलं.असा पुन्हा संपर्क झाला.पण हे सगळं नाही सांगितलं तू....अग मैत्रिणी पत्रातून तरी भेटतात हा आनंदाचा ठेवा होता.मग त्यात संसाराचं रड गाणं कशाला???म्हणून नाही सांगितलं.बोलता बोलता सगळ्या वाड्याजवल आल्या सुद्धा...







वाड्याच्या प्रवेशद्वारावर गोदावरी सदन असे नाव होते.आत गेल्या...गोदावरीच्या दोन्ही मुलांची कुटुंब सुखी होती.एका खोलीतून शिकवण्याचा आवाज येत होता...सगळ्या तिकडे डोकावल्या.अग हि प्रांजल, माझी नातसुन, पी एच डी आहे.हुशार पोरगी.गरीबघरची. सालस आणि मन मिळवू.हीच लग्न झालं आणि मी ठणकावले मुलाला,"माझ्या सुना जे करू शकल्या नाही,ते हिला करू दे".घरच करलेच ती पण आवडीचं काम सुद्धा करू दे तिला.अश्राप पोर गळ्यात पडून रडली ग माझ्या.आता क्लासेस घेते या शिवाय पी एच डी गाईड म्हणून काम करते....असे त्या बोलत असतानाच प्रांजल वळली.त्याबरोबर सुमन ओरडली प्रांजल वसेगावकर?????हो!!माहेरचं नाव आहे तीच.सुमन ने गोदा ला जोरात मिठी मारली.थँक्स कमल उर्फ गोदे माझ्या प्रिय विद्यार्थिनीला जपल्याबद्दल,फुलवल्याबद्दल.......



कोण आहे प्रांजल????सुमन आणि प्रांजलची गोष्ट काय??शनिवार वाड्यावर काय मजा येणार????वाचत रहा धम्माल पुनर्जन्माची


🎭 Series Post

View all