Login

धागे बंधनाचे भाग ८ (अंतिम भाग)

धागे बंधनाचे भाग ८(अंतिम भाग)
" दादा आणि वहिनी मला माफ करा पण मला जरा सांगता का इथ किर्ती चा काय संबंध.?

फॉरेन मध्ये जायचं आहे दादाला. त्यासाठी मदत होणार आहे तुमच्या जिजाजिंची.

खातीर दारी पाहुणचार करणारं तुम्ही. या चित्रात किर्ती कुठं आहे.? तिन का करायचं.?

तसं पण जर खातीर दारी करण्याचा शौक चढला आहे तर स्वतः च्या जीवावर करायचा कार्यक्रम.

वहिनी माझी बायको मुलगा काय उपाशी नाही रहात. की तुमच्या घरी अन्न नाही शिजल तर ते उपाशी राहतील. मी इतकं तर कमावतो की त्यांना चांगलं चुंगल पोटभर खायला घालू शकेन.

असच काहीसं सांगत असता ना तुम्ही सगळ्यांना? बरोबर बोलतं आहे ना वहिनी मी ?" संजय म्हणाला. त्याचा राग त्याच्या ही नकळत स्पष्ट शब्दात व्यक्त झालाच.

" अन्.. अम्.. अस काही नाही.." गुळमुळीत आवाजात कल्पना म्हणाली. घाबरल्या वहिनी.

" अस खोटं कशाला बोलता वहिनी. मी स्वतः च्या कानांनी ऐकलं होतं. त्या दिवशी तुम्ही तुमच्या याच बहिणीला काय सांगत होतात ते ?" 

किर्ती कल्पना वहिनीच्या नजरेला नजर देत विचारते. तिची ती तिखट नजर बघून कल्पना वहिनीची मान खाली झुकली.

" माझं जाउ दे वहिनी पण काल आई रात्री जेवायला तुमच्या कडे होत्या. तर तुम्ही त्यांना साधं जेवायला बोलावलं नाही.

तुम्ही सगळे तर कॅब करून हॉटेल मध्ये गेलात. पण तुम्ही या दोघांना नाही नेलं तुमच्या सोबत. नाही त्यांना जेवायला काही पार्सल आणू का विचारलं ?

चला जेवायला नाही नेलं. पण त्यांच्या साठी वरण भाताचा कुकर पण नाही लावला. मी तर परकी आहे तुमच्या साठी. मी नाही मनावर घेतल तुमच वागणं.

पण हे दोघं तर तुमचे रक्ताचे नातेवाईक आहेत ना दादा. तुम्ही पण त्या दोघांना दुर्लक्षित केलं. हे वागणं कितपत योग्य आहे.?

काल रात्री घरी आल्यावर मी या दोघांच्या साठी पिठल भाकरी बनवली. तेव्हा कुठं हे जेवले. साधा संध्याकाळचा चहा नाष्टा पण नाही विचारला तुम्ही आईना.? ना काल मुलं कराटे क्लासला गेली.!

जाउ दे मला या भानगडीत नाही पडायचं.

दादा वहिनी एक सांगू का तुम्ही एखाद्याला मान देउ शकत नसाल तर किमान त्याचा अपमान तरी करू नका."

किर्ती म्हणाली. नी ती रुम मध्ये जायला निघाली. कीर्तीच्या बोलण्याने त्या दोघांचे चेहरे उतरून गेले होते.

" थांब किर्ती. मला तुला काही तरी सांगायचं आहे. आधी मी तुला विचारायचं ठरवलं होत. पण आता नाही. मला हा निर्णय घेतलाच पाहिजे." किर्तीला थांबवत संजय म्हणाला.

" आई मागच्या आठवड्यात मला न्युझीलंडची ऑफर आली होती. पण मी अजुन काहीचं ठरवल नव्हत. त्या बद्दल.आधी विचार केला नव्हता जाण्याचा. पण कालच प्रकरण बघता विचार पक्का केला आहे. मी न्युझीलंडची ऑफर ॲक्सेप्ट करणारं आहे.

येत्या महिना भरात आम्ही तिघ न्युझीलंड ला जाणार आहे. पाच वर्षा साठी जायच आहे. आई तुझी काही हरकत नाही ना ? मला माझ्या कॅलिबर वर जाण्याची संधी मिळत आहे तर ? " संजय ने आईला विचारले. आणि न्युझीलंडच्या ऑफर बद्दल सगळ्यांना एकत्र सांगीतले.

" माझी काहीच हरकत नाही. सुदैवाने माझे हात पाय मजबुत आहेत. मी माझ आणि यांचं करू शकते. ते येतील पुढच्या आठवड्यात. तेव्हा तुम्ही जाऊन या.

स्वतः च्या कॅलिबर वर जायची संधी मिळत आहे. तर ती का सोडायची.?

मला वाटतं या मध्ये तुझे बाबा देखील तुझ्या पाठीशी खंबीर उभे असतील.

आमचं म्हातारं पण तुमच्या स्वप्नाच्या आड कधीच नाही येणारं." आरती बाई म्हणाल्या.

संजयची प्रगती ऐकून धनंजय खजील झाला होता. त्याने तोंड देखल त्याच्या धाकट्या भावाला अभिनंदन केलं. नी उलट्या पावली घरी निघून गेला.त्याच्या पाठोपाठ कल्पना पण गेली.

पुढचा महिना भर किर्ती आणि संजय यांची खुप धावपळ झाली होती. त्यांचा दोघांचा पासपोर्ट होता. पण अमोघ चा पासपोर्ट बनवायचा होता.
कंपनी तर्फे त्याची राहण्याची सोय झाली होती. त्यामुळे किर्ती आणि संजयला फार काळजी नव्हती.

आठ दिवस झाल्यावर श्रीहरी गिरनार यात्रा करून परत आले. तेंव्हा त्यांना संजय च्या प्रगती बद्धल समजलं. ते खूप खुश झाले होते. त्याचं सोबत त्यांना धनंजय आणि कल्पनाच्या वागण्या बद्धल पण समजलं. त्यांना देखील तसाच राग आला त्यांच्या मुलाचा. सुनेचा.

त्यांनी देखील आरती प्रमाणे संजयला जाण्या साठी सपोर्ट केला. धनंजय ने आई वडीलांच्या कडे लक्ष देणं कमी केलं होतं. पण त्याचं वागणं फार मनावर नाही घेतल दोघांनी.

नाहीतरी धनंजय च्या बाबतीत त्यांनी संजयला कधी कधी डावललं होत. हे त्यांना देखील माहीत होत. आता त्यांना पुन्हा ती चुक करायची नव्हती.

तब्बल चार महिन्यांनी ते तिघ न्युझीलंड ला निघून गेले. आरती आणि श्रीहरी दोघं त्यांना आनंदाने विदा करत होते. तर धनंजय कल्पना यांनी त्या दिवशी मुलांना घेउन चार दिवस फिरायला गेले होते.