" अहो रश्मीच घर शहराच्या दुसऱ्या टोकाला आहे. जाऊन यायला तितका वेळ लागणारच ना ! पण मला समजत नाही आहे. वहिनीनी माझ्या भरवश्या वर का कोणताही प्रोग्रॅम ठेवायचा.?
आता देखील ते बाहेर गेले आहेत. घरी बनवलं नाही म्हणजे त्यांना घेऊन हॉटेल मध्ये गेले असतील. तर मग त्यांनी तुम्हाला का नाही सोबत नेलं. किंवा तिथच हॉटेल मध्ये यायला का नाही सांगितल.?"
किर्तीच्या या प्रश्नावर दोघांच्या कडे उत्तर नव्हत. तेंव्हा तिने पहिल्यांदा त्या दिवशी श्वेताच्या वाढ दिवसाच्या दिवशी काय घडलं ते सांगितल. तेव्हा त्यांनाही त्या दोघांचा राग आला.
अस कस काय ते बोलू शकतात. लहान मुलाचं खाणं कस काय काढतात.?
किर्ती तर त्यांना आपलं समजुन मदत करत होती. नात जपण्याचा प्रयत्न करीत होती. पण त्यांनी तर तिच्या वागण्याचा भलताच अर्थ लावला होता. तिचा अपमान एक नवरा म्हणून त्याच्या जिव्हारी लागला होता.
रात्री उशीरा ते सगळे परत आले. पण संजय किर्तीला मिठीत घेऊन शांत करत होता. आरती बाई रूम मध्ये बसल्या होत्या. त्यांना त्यांच्या सुन मुलाचा राग येत होता. कालच्या प्रकरणं मुळे आज सकाळीं पती पत्नी भांडायला आले होते.
किर्ती ने संजय ला बोलावून आणले. तर दादा त्याच्या वर चिडले.
" संजय हे सगळं काय आहे. किर्ती तुला तरी तुझ वागणं शोभत का?" धनंजय त्या दोघांच्या वर राग व्यक्त करत होते.
" काय झालं दादा ?. सकाळीं सकाळी का चिडला आहेस." संजय ने धनंजय ला विचारलं.
" काय झालं म्हणून काय विचारतो.? काल तूझ्या बायको मुळे नाचक्की झाली आमची.! किती मोठं नुकसान झालं माहीत आहे.?" धनंजय ने जाब विचारला.
" काय झालं.?" संजय ने शांत आवाजात विचारलं.
" काय झालं म्हणून काय विचारता भाऊजी. काल प्रतीक्षा दीदी आणि अक्षद जीजाजी घरी जेवायला येणार होते. तर त्यांना खुश करायच होत.
माणसाचं मन जिंकण्याचा एका मठ म्हणजे सुग्रास भोजन. म्हणून त्यांना घरी जेवायला बोलावलं होतं. म्हणलं किर्ती च्या हाताला चव आहे.
तर त्यांना असं छान छान खिलवून खूष करू. पण नाही तुमच्या बायकोला ते पटतच नाही ना ?" कल्पना वहिनी म्हणाल्या.
" वहिनी मला नाही समजलं. त्यांना घरी जेवायला बोलावलं. हे इतपत ठिक आहे. पण हे खिलवून खुश का करायचं? यात कीर्तीचा काय संबंध ? मुळात त्यांना खाऊ पिऊ घालुन खुश का करायचं आहे ?" संजय ने गोंधळून विचारले.
" अहो भाऊजी जिजाजी आता यू के मध्ये स्थायिक झाले आहेत. तर त्यांच्या मदतीने यांना तिकडे जाण्याचा काही चान्स मिळेल. या साठी त्यांची खातीर दारी करायची होती.
काल इतका चांगला योग जुळून आला होता. पण किर्तीला त्याचं काही नाही पडल. तिला तर तिची ती फडतूस मैत्रिणी कडे कार्यक्रमाला जाणं महत्वाचं होत ना ?" कल्पना वहिनी किर्ती कडे चिडून बघत बोलल्या.
" वहिनी बहिण आणि जिजाजी तुमचे. पाहुणे तुमचे. त्यांची खातीर करायची गरज तुम्हाला. यात किर्ती चा संबध कुठं आला. तिने का सगळं करायचं. तुमचे गेस्ट तिने का सांभाळायचे ? " संजय ने प्रश्नार्थक नजरेने बघत विचारले.
" का म्हणजे. माझी प्रगती झाली तर के त्रास होतो का तुला ? घरच्या लोकांनी नाही मदत करायची मग कोणी करायची.? संजय तुला माहीत आहे का काल किती मोठं नुकसान झालं आहे.
ऐन वेळीं त्यांना घरी नका येऊ सांगताना किती लाजिरवाण वाटलं ते? ते तर लोकं अर्धया वाटेत पोचले पण होते. आणि घरी काहीचं तयारी नव्हती. कल्पना पण नोकरी करून येते.
तिला नोकरी करून दमुन थकून आल्यावर जमणार आहे का सगळं करायला. मग त्यांना सांगितल घरी नका येऊं. त्यांना जेवायला बाहेर न्याव लागलं. थ्री स्टार हॉटेल च बिल किती होत माहीत आहे का तुला ?" धनंजय दादा चिड चिडत म्हणाले.
" भाऊजी काल किर्ती ने मदत केली असती तर आज ते पैसे वाचले असते. शिवाय यांच्या परदेशात जाण्याचा मार्ग पण बनला असता. पण किर्तीला तर सगळं मोडण्याची सवय आहे ना." नाक मुरडून बघत कल्पना म्हणली. पण तिचं लक्ष फक्तं किर्ती कडेच होत.
" दादा आणि वहिनी मला माफ करा पण मला जरा सांगता का इथ किर्ती चा काय संबंध.?
फॉरेन मध्ये जायचं आहे दादाला. त्यासाठी मदत होणार आहे तुमच्या जिजाजींची.
खातीर दारी पाहुणचार करणारं तुम्ही. या चित्रात किर्ती कुठं आहे.? "
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा