तिची घुसमट होत होती. तिने एकदा मदतीला यायला जमणार नाही असं देखील सांगितल होत. तर त्या वेळीं सासू बाईनी खुप बडबड केली होती. तिच वागणं संजयला देखील आवडलं नव्हत.तो पण नाराज होता.शेवटी मन मारून ती काम करायला जात.मदतीला जात.
वहिनी तिला मदतीला बोलवत आणि स्वतः मात्र सगळ काम झाल्यावर येत.क्रेडिट घ्यायला.या विषयावर संजय सोबत बोलायचा प्रयत्न केला तर संजय उलट तिलाच ओरडला.
"वहिनी नोकरीला जातात. तर बिझी असतात. तू त्यांना मदत केली तर काय बिघडल. आपलंच कुटूंब आहे. एकमेकांनी एकमेकांना मदत केली पाहिजे."
" अहो पण मदत करण आणि स्वतःला विसरून त्यांची सेवा करण यात फरक आहे."
" मोठ्यांचा आदर केला. त्यांची थोडी मदत केली. तर कुठं बिघडलं.?"
" पण वहिनी मला आधी सांगत नाहीत कधी असा कार्य क्रम असेल तर? मला माझी इतर काम ऍडजस्ट करावी लागतात त्याचं काय?"
" अग आपल्या लोकांच्या साठी आपण नाही ऍडजस्टमेंट करणारं तर दुसर कोण करणार."
" त्यात तुमच्या बायकोचं खोबर होत त्याच काय ! शिवाय वहिनी कधीच स्वतः करत नाहित. सकाळीं घराची चावी देउन जातात. नी आईंना सांगतात. की संध्याकाळी अस काही तरी फंक्शन आहे. तर किर्तीला तेवढं काम करून ठेवायला सांगा. बाकीच मी आल्यावर बघते. पण वहिनी तर आरामात येतात. तो पर्यंत माझं सगळ काम होऊन जातं. त्याचं काय ?"
" नौकरी म्हणलं की काम कमी जास्त होणारच. कधी तरी अचानक वाढतं काम. आता माझच बघ. कधी कधी दोन दिवस टूर वर जातो. पण अचानक एक दोन ठिकाणी जायची ऑर्डर येते. मग मला जावचं लागत. स्टे पण वाढतो. तसचं होत असेल वहिनीच्या सोबत."
" बरं मान्य केलं. अचानक काम वाढतं. यायला उशीर झाला. ट्रॅफिक होत. पण निदान समान तरी सगळं आणून ठेवायचं ना. ते पण नाही आणत. ऐन वेळीं मी कुठं मार्केट मध्ये जाऊन आणणार. मग आई आपल्याच घरातून वस्तू आणायला सांगतात."
" असू दे ग. कामाच्या टेन्शन मध्ये नाही लक्षात राहतं. आणि तु नेलं आपल्या घरातील समान तर कुठं बिघडलं. आपलीच माणसं आहेत. दोन घास खातात. आपल्याला काही कमी नाही पडत. मी आहे ना.! तु कशाला काळजी करते!."
" पण घराचं बजेट बिघडत त्याचं काय?"
" मी असताना तु चिंता करू नको. मी कधीच तुझ घराचं बजेट बिघडू देणार नाही!."
किर्ती संजय च्या बोलण्या मधून समजुन गेली होती. तिचा नवरा मोठ्या भावाच्या आज्ञेत आहे. अगदी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांची जोडी आहे. त्या दिवशी नंतर तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न करणं सोडुन दिलं होतं.
हे असच चालु होत. तिला तिच्या मनाप्रमाणे काहीचं करता येत नव्हत. वहिनी मदतीला म्हणून बोलावून तिच्या कडून सगळं काम करून घेतात हि गोष्ट हळू हळू तिच्या लक्षात आली होती. यात कल्पना वहिनी आणि आरती बाई एकत्र होत. इतर वेळी अंगात कोणतही काम करण्याची ताकद नसलेल्या आरती बाई त्या दिवशी अगदी आनंदाने मदतीला येत. जसं काही त्यांच्या अंगात हत्तीच बळ संचारलं असावं.
काम कमी आणि किर्ती वर लक्ष जास्त. असच चालायचं. ती त्यांच्या वागण्याला कंटाळून गेली होती. तिला हे देखील पक्क ठावूक होत तिचा नवरा तिच्या सोबत उभा राहणार नाही.
आता यावेळी आता देखील तिला अंदाज आला होता. वहिनीच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे. त्या तिला मदतीला अवश्य बोलाव तील. पण यावेळी ती तयार होती. मागच्या अनुभवा मधून शहाणी झाली होती.
मागच्या वेळी कल्पना वहिनीची छोटी मुलगी श्वेता हिचा वाढ दिवस साजरा करायचं ठरवल होत. वहिनींनी सकाळी कामाला जातांना त्यांच्या घराची चावी आरती बाईंकडे दिली.
" आई आज संध्याकाळी श्वेताचा वाढदिवस साजरा करायचा आहे. मी डेकोरेशनच सामान आणून ठेवलं आहे. आज हाल्फ डे घेउन घरी येईन. पण प्लिज जरा किर्तीला सांगा ना मदत करायला यायला.
आज संध्याकाळी छोले भटुरे आणि पुलाव कोशिंबीर करायचं ठरवलं आहे. श्वेताच्या आवडीचे गुलाबजाम बनवायचे आहे. मी छोले भिजवून ठेवले आहेत.
गुलाब जाम साठी प्री मिक्स पॅकेट पण आणून ठेवलं आहे. तर किर्तीला थोडी मदत करायला पाठवा ना. तिला सांगा तू काम करायला सुुरवात कर. दुपार पर्यंत मी येतेच." असं सांगून निघून गेल्या ऑफिस मध्ये.
त्या दिवशी तिला एक पार्लर ची ऑर्डर होती. पण सासू बाईंच्या पुढं तिच काहीही चाललं नव्हत. तिला तिची ऑर्डर लवकरात लवकर पूर्ण करून घरी यावं लागलं. यायला उशिर झाला होता. तर सासू बाई तिच्यावर खूप रागावल्या.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा