" हे कसलं वागणं आहे तुमचं ?"
" काय नाटक लावली आहेत ?"
" जमणार नव्हत यायला तर आधी सांगायला काय झालं होतं.?"
" तुम्हांला काय माहिती काल किती नाचक्की झाली आमची."
" तुम्हाला काही समजतं का नाही ?'
" हो ना. लोकांना उत्तर देता देता वाट लागली आमची!"
" काय रे धनंजय काय झालं. सकाळी सकाळी का भांडत आहात दोघं ?."
नुकत्याच बेडरूम मधून बाहेर येत आरती बाईनी त्या दोघांना विचारलं.
" अरे हळू आवाजात बोला. किती मोठ्यानं बोलतं आहात. धनु आधी आवज हळु कर. कल्पना हळु जरा. आसपास बघ जरा. आता नीट सांगा.
धनु कल्पना काय झालं आहे तुम्हाला चिडायला ? " सोफ्यावर बसत आरती बाई त्याला शांत आवाजात म्हणाल्या.
धनु कल्पना काय झालं आहे तुम्हाला चिडायला ? " सोफ्यावर बसत आरती बाई त्याला शांत आवाजात म्हणाल्या.
" आई तुमच्याशी काय बोलणार.?"कल्पना म्हणाली.
" आई ते तर संजय ने त्याच्या बायकोला फारच डोक्यावर चढवून ठेवलं आहे. त्याला बोलावं. त्याच्याशी बोलायचं आहे" धनंजय समोरच्या खोलीतून बाहेर येणाऱ्या किर्ती कडे रागाने बघत आरती बाईंना म्हणाले.
" किर्ती संजय कुठं आहे?"
" हे तर झोपले आहेत." ती म्हणली.
खरं तर त्यांना अस सकाळी सकाळी अस रागावलेल घरी आलेलं बघून ते का आले आहेत ! याचा अंदाज तर आला होताच. तिने तिच्या मनाची तयारी देखील केली होती. मनातून तिला थोडा आनंद होत होता. तर एकीकडे थोड हसायला पण येत होत. स्वतःला सावरत ती बेडरूम मध्ये गेली.
संजयची नोकरी हि सध्या फिरतीची नोकरी झाली होती. तो आयटी क्षेत्रात काम करत होता. सध्या तो एका ट्रान्स मिशन केबल च्या प्रॉजेक्ट वर काम करत होता. त्यामुळे त्याला महिन्यातील पंधरा दिवस तरी शहराच्या बाहेर मुंबई ,बँगलोर किंवा भाग्यनगरला जावं लागत होत.पण अमोघच्या साठी किर्ती नोकरी करत नव्हती. अजुन तो लहान होता.
पण म्हणुन ती घरात रिकामी नव्हती बसत. तिला शिवण काम येत होत. ड्रेस शिवून द्यायची. तिच छोटस पार्लर होत. ती मेक अप, मेहेंदी वगेरेच्या ऑर्डर घ्यायची. अमोघ सोबत लहान मुलांच्या शिकवण्या पण घ्यायची.
धनंजय आणि संजय आरती बाईंची मुल. त्यांचे मिस्टर श्रीहरी सध्या त्यांच्या सीनिअर सिटीझन ग्रुप सोबत गिरनार यात्रेला गेले आहे. आरती बाई त्यांच्या गुडघ्याच्या ऑपरेशन मुळे गेल्या नव्हत्या.
त्यांनी त्यांचं बैठ घर या दोन्ही मुलांच्या लग्नाच्या वेळी बांधल होत. वरच्या मजल्यावर त्यांचा मोठा मुलगा धनंजय आणि त्याची बायको कल्पना, त्यांची दोन मुलं राहात होते.तर खालच्या मजल्यावर संजय किर्ती आणि त्यांचा छोटा मुलगा अमोघ राहत होते. आरती आणि श्रीहरी यांची रूम पण खालच्या मजल्यावर होती.
सासरे सासू बाई खालच्या मजल्यावर राहत पण आरती बाईंना कायम कल्पना च कौतुक जास्त वाटायचं. कारणही तसचं होत. धनंजय ची आर्थिक परिस्थिती हि संजय पेक्षा वरची होती. संजय खाऊन पिऊन सुखी होता.या शिवाय कल्पना देखील श्रीमंत घरातील मुलगी होती. ती नोकरी पण करत होती. कल्पना दिसायला देखील किर्ती पेक्षा उजवी होती.
साहजीकच त्यांचा ओढा मोठ्या मुलांकडे जास्त होता. संजय फिरत्या नोकरी वर असत. त्यामुळे त्याच्या कुटुंबा कडे लक्ष देण्यासाठी आणि सोबत म्हणून आरती आणि श्रीहरी दोघं संजय सोबत राहत होते.
कल्पना देखील तिच्या मोठी जाऊ होण्याचा फायदा घेत. कल्पना देखील आरती बाईंच्या मागे पुढे करत असे. जेव्हा केव्हा घरात एखाद फंक्शन पार्टी असायची तेव्हा कल्पना हक्काने आरती बाईन कडे घराची चावी देउन जात.
मग आरती बाई किर्ती कडून गोड बोलावून सांगत. त्या कार्यक्रमाची तयारी किर्तीच्या कडून करून घेत. अगदी घराच्या साफ सफाई पासुन सजावट करण्याच काम असू दे नाही तर सगळ्यांच्या साठी जेवण बनवणं असु दे. सगळं काम हक्काने करून घेत.
किर्तीच्या हाताला चव देखील चांगली होती. सुगरण होती. स्त्रियांचा वीक पॉइंट म्हणजे त्याची मनमुराद स्तुती करणे. त्याचा आरती आणि कल्पना दोघी फायदा घेत. त्यांच्या स्तुतीला भुलून किर्ती देखील ते काम आवडीने राजी खुशीने करत.
कधी कधी तर तिची काम बाजुला ठेवून तर कधी तिची इतर काम ऍडजस्ट करावं लागायचं तिला. पण ती सगळं जमवून आणायची. एकदा तर तिची तब्येत बरी नव्हती तरी देखील तिने वहिनीच काम केलं होतं. पण त्याची जाणिव ना सासूबाईंना होती. ना ही तिच्या जाऊ बाईना.
तिची घुसमट होत होती. तिने एकदा मदतीला यायला जमणार नाही असं देखील सांगितल होत. तर त्या वेळीं सासू बाईनी खुप बडबड केली होती. तिच वागणं संजयला देखील आवडलं नव्हत.तो पण नाराज होता.शेवटी मन मारून ती काम करायला जात.मदतीला जात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा