दगाबाज दिल भाग 1

Dagaabaj



भाग 1

नियतीने काय ठरवले....कोणाला ही माहीत नाही

कधी काळी ज्याच्यावर खूप जीवापाड प्रेम केले तो नजरेसमोर असतांना नवऱ्यावर जीव हळूहळू जडत असतांना मन त्या जुन्या प्रेमाकडे झेप घेत जाते, नवऱ्याला त्याच्या हक्काचे प्रेम तर द्यावे वाटते पण ती त्या जुन्या प्रेमाकडे अजून ही ओढ घेत असते.. अशी काही द्विधा तिच्या समोर उभी राहिली की दोघांना ही ती प्रेम देऊ शकत नाही..स्वतः ही प्रेम मिळवू शकत नाही...नवरा जर समजदार असेल तर ठीक आहे जर नवरा समजदार नसेल तर काय व्हावे तिचे....

असे प्रेम कोणाला ही न लाभो...की त्यावर जीवापाड प्रेम व्होवो....आणि जिचा भूतकाळ माहीत असून ही तिच्या भूतकाळासोबत त्याला ही सतत रहावे न लागो...एक अशीच विलक्षण प्रेम कहाणी...कोणाचे राहील प्रेम अपूर्ण..कोणाला मिळेल साथ तिची...ह्यात दैव काय खेळ खेळेल कोणालाच माहीत नाही..


कहाणी सुरू होत आहे अजब दैवाची......

सोनवणे वास्तू मध्ये शांतता पसरली होती.. आज साहेब सगळ्या घराचे निरीक्षण करत होते. तर घरातील सदस्यांना फ़ैलावर घेतले होते..

त्यांचा आवाज मोठा होता. त्यांना आज सत्य काय ते जाणून घ्यायचे होते. तसेच ती चोरी कोणी केली हे समजायला हवेच होते. परंतु ती चोरी कोणी केली हे समजायला काहीच मार्ग नव्हता.

गेले चार दिवस घरातून कोणाच्या ना कोणाच्या मूल्यवान वस्तू नाही पण सुट्टे पैसे चोरी जात होते, कोणी काही बोलत नव्हते कारण त्यांच्यासाठी ती रक्कम शुल्लक होती. पण कोणीच काही बोलत नाही, चर्चा करत नाही हे पाहून आज ही चोरी झाली होती. ही चोरी करणारे नक्कीच घरातले जुने जाणते नोकर नसतील हे साहेबांनी ताडले होते.. त्यांना हे पैसे गेले ह्याचे दुःख नव्हते ,वाईट वाटत नव्हते व कोण खरंच अडचणीत असेल आणि त्याची अडचण आपल्याला माहीत नसेल, तर ती ह्या मार्गाने समोर येईल ही अपेक्षा होती...मोठे मनाचे व्यक्ती अश्या प्रकारे विचार करतात हे त्यांच्या मुनीम शर्मा यांना माहीत होते
आमचे साहेब जे करतील त्यात काही तरी ,कोणाचे तरी हित नक्कीच असणार हे त्यांना माहीत होते..

??

आज सायंकाळी कॉलेजच्या तलावात कोणी तरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, आणि आज सगळे तिकडेच गर्दी करून जमा झाले होते. कोणी जीव देण्याचा प्रयत्न केला असेल आणि का केला असेल ह्याबाबत सगळी कडे चर्चांना उधाण आले होते.

मेडिकल कॉलेज हे शहरातील एक नामांकित कॉलेज होते.

ह्या कॉलेजचे मोठे ट्रस्टी सुदाम पांडुरंग सोनवणे हे होते. सुदाम ग्रुप्स अँड कंपनीचे सर्वेसर्वा ,आणि brights paints च्या दोन मोठया कंपनीचे मालक ,त्यांचे मेडिकल कॉलेज आणि इतर बऱ्याच संस्था ही होत्या..त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा तर होताच सोबत ते शहरातील जुन्या राजा महाराज्यांच्या घराण्यातील एक वंश होते. स्वभावाने मोठे दिलदार व्यक्तिमत्त्व होते. मोठे बंगले, गाड्या, नौकर चाकर, त्यांचे घर किती तरी एकर मध्ये बांधले होते.. त्यांना मेडिकल कॉलेज आणि त्यातून मिळणार पैसा फक्त त्यांच्या शहरातील गोर गरीब, मागासलेले लोक आणि गावाकडून उपचाराकरीता येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लावण्याचा सद हेतू होता. त्या विशेष बाब म्हणजे आत्महत्या चा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्यांचे प्राण वाचावे आणि त्याचा इलाज होऊन त्याला पूर्णस्थापित करून आर्थिक मदत करण्याचा हेतूने त्यांनी हे कॉलेज उभारले होते ,पण त्याला मिळत असलेला प्रतिसाद बघता त्याची व्याप्ती वाढावी लागली. आता तर ह्या कॉलेजमध्ये गरिबांचे मुले ही सहज शिकून डॉक्टर कसे होतील ह्या कडे त्यांचे लक्ष होते..

पण काल जो आत्महत्याचा प्रकार त्या मेडिकल कॉलेजमध्ये घडला त्यामुळे ते हादरून गेले, त्यांना असे काही होईल हे अपेक्षित नव्हते, त्यांना विचार करण्याचा ही वेळ नव्हता,परंतु सगळ्यात आधी त्या मुलीच्या तातडीने उपचार करण्यासाठी त्यांनी त्यांच्या व्यस्त कामातून वेळ कडून स्वतः तिला सुव्यवस्थित उपचार मिळतील याकडे जातीने लक्ष दिले. त्यांच्या कॉलेजमध्ये हे व्हावे, झालेच कसे ,का आणि कोण जबाबदार आहे याचे विचार चक्र त्यांच्या डोक्यात सुरू झाले.. आणि सगळीकडे कॉलेजच्या नावाला बट्टा तो वेगळाच मुद्दा.. असा दोष आपल्या कॉलेजच्या नावाला लागावा हे त्यांना मुळीच मान्य नव्हते.

ह्या आत्म हत्येच्या प्रयत्नाला एक वेगळे वळण लागण्या आधी त्या मुलीला वाचवायला हवे,तिची काळजी घ्यायला हवी ,तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पण शहराबाहेर दाखल करायला हवे. ती वाचली पाहिजे, ती वाचलीच पाहिजे.
तिच्या घरच्यांना कळवा, ही पोलीस केस आहे तर पोलिसांना ही कळवा. त्या मुलीची सगळी चौकशी करा. असे आदेश सुदाम सोनवणे यांनी दिले.

आदेश मिळताच सगळी यंत्रणा कामाला लागली, मुलीला घेऊन पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिला स्पेशल रूम मध्ये ठेवण्यात आले,तिची काळजी घ्यायला एक खास नर्स ठेवली, तिच्या घरच्यांना कळण्यास सांगितले.

इकडे हॉस्पिटल स्टाफला तिची कसलीच माहिती नव्हती म्हणून ते तिच्या घरच्यांना कळवू शकले नाहीत. सुदाम सोनवणे यांचा कॉल आल्यावर त्यांनी विचारणा केली मुलगी कशी आहे ,धोक्याच्या बाहेर आहे का ? ,तिला शुद्ध आली का ??. काही बोलू शकते का ?? आणि बरीच विचारणा ही केली ,शेवटी म्हणाले आईवडिलांचा तुमच्या कडे फोन नसल्याने तुम्ही फोन करू शकला नसणार तरी माझ्या कॉलेजमध्ये चौकशी करून ,मुलीबाबत माहिती घेऊन एक व्यक्ती मी पाठवत आहे तिच्या घरी. तोच त्यांना इकडे घेऊन येईल. तर ते घाबरलेले असतील. त्यांना असे काही होईल हे अपेक्षित नसणार. पण तरी त्यांची मानसिकता तुम्हाला सांभाळून घ्यायची आहे. हे आदेश सुदाम सोनवणे यांनी त्या
हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरला दिले, मुख्य डॉक्टर आणि सुदाम हे मित्र असल्याने सगळे डॉक्टर त्यांनी दिलेले आदेश पाळत होते..

डॉक्टरांनी सुदाम सोनवणे यांचा विनंतीचा मान राखून त्या मुलीची केस तातडीने हातात घेतली,आणि तिच्या वर उपचार सुरू केले..सगळे शर्तीचे प्रयत्न सुरू केले, तिच्या नाका तोंडात पाणी गेले होते, तिला अजून ही शुद्ध नव्हती आली.


पण पुन्हा ती चूक करणार नाही याची तिने कबुली दिली

संजीवनी आणि परेश सोबत कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते...

तो तिच्या सोबत ह्या मेडिकल side ला तिच्यावर असणाऱ्या प्रेमा खातर आला होता, घरचे त्याला NDA ला जा ह्यासाठी प्रयत्न करत होते.. पण संजीवनीसाठी तो ह्या कॉलेजमध्ये आला...

दोघे प्रेमात होते,दोघांचा एकमेकांना बघितल्याशिवाय दिवस जात नसत...तिला तो म्हणजे ह्या जीवनातील खरा प्रेम करणारा आणि समजून घेणारा वाटत होता..

दोघांच्याही घरचे ह्या प्रेमाला विरोध करत होते, तिला ही घरच्यांनी समजून सांगितले ,तो आपल्या जातीतला नाही,तर तू त्याच्या प्रेमात पडू नकोस ,वेळीच बाहेर ये ह्या धुंदीतून, तुझ्यासाठी कोणी मोठ्या घरचा मुलगा पाहू ,पण तू ह्याचा नाद करू नकोस.. त्याचे प्रेम हे प्रेम वाटत नाही, तो तुला वापरून घेईल आणि तुला सोडून देईल ,त्याच्या घरचे मोठे राजकारणी आहेत ,त्यांना ही हे प्रेम मंजूर नाही ,आणि ना तू त्यांच्या सुनेच्या रुपात तुला बघतील....

संजीवनीचा दादा तर म्हणत होता,"तू जर ऐकत नसशील तर तू ह्या घरात राहू नकोस ,तू तुझी वेगळी सोय कर ,जा कुठे जिथे तो तुला थारा देत असेल तिथे, जा तिकडे तुझे तोंड घेऊन..तू मेली समज आमच्यासाठी."

संजीवनी ऐकणाऱ्यातली नव्हती, कोणी काही बोलो तिला कसलाच फरक पडणार नव्हता, तिला हेच माहीत होते तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो, आणि त्याने लग्न केले की सगळे कसे आपोआप सरळ होतील ,आणि त्याला ही डोक्यावर घेतील, जावई आहेच तसा. अभिमान वाटावा असा, मी ही म्हणूनच तर भाळले. कुठे ही कोणी त्याला नाव न ठेवण्यासारखा..

संजीवनी आणि आईमध्ये मागे ह्याच गोष्टी वरून काही बोलणे ही झाले होते,आई म्हणत होती,"संजू मला काय वाटते तू सद्या तरी फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे ,आपण किती मेहनत करून ह्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवले बेटा, तू म्हणतेस ना की तुला गरीबांची सेवा करायची आहे, मग तूच जर तुझ्या ध्येयापासून भटकलीस तर कसे होईल. खूप कमी मुली असतात ज्यांना अशी संधी मिळते, आणि तुला मिळाली तर तू विसरून जाता कामा नये ग माझे राणी. "

संजू..आईचा हात हातात घेत ,तिला विश्वासात घेत, म्हणाली होती, "तुझा माझ्यावर जरा ही विश्वास राहिला नाही का ग आई ,आधी तू अशी नव्हतीस .मान्य आहे मला माझे ध्येय आहे. आजीच्या नावाने हॉस्पिटल काढायचे आहे, तिथे गोर गरिबांना मोफत उपचार ही द्यायचे आहेत.. सगळ्या सोयी नाही निदान प्राथमिक गरजा असतील असे, आणि गावाकडे ही छोटा दवाखाना सुरू करायचा आहे, बाबा आपले एक शेत खास त्यासाठी देणार आहेत, हे सगळे मान्य पण शेवटी मला ही सोबत सोबत माझे स्वप्न आहे, तुझ्या स्वप्नासोबत माझ्या स्वप्नात माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारा माझा नवरा असावा, त्याने ही कळकळीने ह्या कार्यात माझी साथ द्यावी असे स्वप्न. मग ह्या स्वप्नात मला फक्त परेश च असताना दिसतो. म्हणून मी ठरवलंय त्यांच्यासोबतच मी लग्न करणार आहे."


आई वडील आणि तिच्या घरचे खूप गरीब होते ,आणि त्यांना आपल्यापेक्षा ऐपतीने मोठे स्थळ मुळात दुसऱ्या जातीचे आवडणार नव्हते..

इकडे परेशच्या घरी तो सगळ्यात लाडका,बंड होता, बिघडलेला होता ,हवे ते पाहिजेच ,त्यासाठी तो काही ही करणारा होता. नाही ऐकायची सवय त्याला नव्हती.

त्याची वेगळीच मिजाज...सगळे त्याला खूप जीव लावत ,तर लहान असल्याने तो म्हणेन ते त्याला मिळत. आईचा खूप लाडका, दोन भावामध्ये वयाचे खूप अंतर असल्याने भावाचा ही खूप जीव होता...दोघांच्या स्वभावमध्ये खूप तफावत होती..

परेश पेक्षा मोठा भाऊ तो खूप सुज्ञ आणि समजदार, राजकारणात असून ही त्याच्या घाण राजकारणी खेळापासून दूर...डावपेच, बायकांना खालच्या दर्जाची वागणूक देणे, फसवणे, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणे ह्या पासून खूप अलिप्त होता..समाजातील सगळे लोक आणि राजकारणातील काही मंडळी त्याच्या ह्या स्वभावाचे कायर,त्याच्या ह्या स्वभावावर कार्यकर्ते ही खूप फिदा होते. आई वडिलांचा प्रिय...


मोठा भाऊ तोच असतो जो छोट्याच्या सगळ्या चुकांवर पांघरूण घालतो, त्याला न आवडलेल्या वस्तू तो घेतो, आणि समज कधी त्याची कोणती वस्तू आवडलीच तर त्याची वस्तू छोट्या भावाला मन मोठे करून द्यायला ही कमी करत नाही...एकदा बाबांनी मोठ्या साठी आणि त्याचे कामाचे स्वरूप बघून त्याला मर्सिडिज घेऊन दिली ,तेव्हा छोटा नाराज होता, दोन दिवस जेवला नाही की त्याच्या गाडी कडे फिरून ही पाहिले नाही...त्याच्या आनंदात सहभागी झाला नाही...


हे रागावणे पाहून मोठ्या बाबाने त्याला रेसर bike घेऊन दिली,वाटले होते की त्याचा राग शांत होईल...पण तसे नाही झाले...परेश ने ती बाईक ही पाहिली नाही...सगळ्यांनी त्याच्या रागाकडे दुर्लक्ष केले...


मग मोठा दादा आला ,त्याची समजूत काढली त्याला हवे तितके दिवस मर्सिडीज देऊन टाकली पण त्या नंतर मात्र तुला तुझी बाईक घ्यावी लागेल...ह्या अटीवर...

हे मोठ्या भावाचे अति लाड बघून आई ,काकू, काका ,बाबा, आजी ,आजोबा सगळेच नाराज झाले होते ,ज्याचे अती लाड एक दिवस काय रूप दाखवतील हे सगळ्यांना समजत होते ,छोट्या परेशची चिंता वाटू लागली होती...

मोठा भाऊ कोण आहे...जाणून घ्यायचे असेलच

तर पुढच्या भागाची आतुरता

संघ.... मुंबई
प्रकार... कथामालिका
लेखिका... अनुराधा आंधळे पालवे



क्रमशः.....

🎭 Series Post

View all