देवयानी, विकास आणि किल्ली भाग २५

चला विकास ची रीकवरी सुरू झाली. एक एक अडथळा दूर होतो आहे.

      देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

  भाग   २५

भाग  २४ वरून  पुढे  वाचा ................

हं पूर्णिमा सांग आता, काय झालय ते.

पूर्णिमाचा चेहरा पुन्हा कसा नुसा झाला. रडवेल्या आवजातच म्हणाली की

तुम्हाला मी सनातनी म्हणून चिडवत होते पण काल कळलं की तुम्हीच बरोबर वागत होत्या म्हणून. तुमचं न ऐकल्यामुळे माझी फार वाताहत झाली. आणि तिला भावना आवरता आल्या नाहीत. ती रडायलाच लागली.

देवयानी म्हणाली की

सेजल, पूर्णिमा इतकी रडते आहे, यांचा अर्थ जे काही घडलं असेल ते पूर्णिमा च्या पण सहन करण्याच्या बाहेर असलं पाहिजे, म्हणजेच काहीतरी भयंकर घडलेलं दिसतंय.

हो ग, पूर्णिमा म्हणाली, काय सांगू तुम्हाला, सांगताना सुद्धा लाज वाटते आहे.

हे बघ, तसं असेल तर नको सांगू. पण विसरून जा सगळं. आणि look ahead. आपल्यालाच मनस्ताप करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये.

नाही ग, काल जे काही घडलं ते सगळंच इतकं भयंकर होतं की काय सांगू. पूर्णिमाच्या डोळ्यासमोर कालचा प्रसंग तरळला.

पूर्णिमा, राजू म्हणत होता, आज आपल्या कडे एक छोटीशी पार्टी आहे. माझा एक मित्र आणि त्याची पार्टनर येणार आहेत.

कशा बद्दल पार्टी आहे ? बर्थडे ?

पार्टी करायला काय लागतं ? असच करावीशी वाटली म्हणून.

ओके. नो प्रॉब्लेम. पण जर ही पार्टी तू सॅटर्डे ला ठेवली असतीस तर बरं झालं असतं. दुसऱ्या दिवशी काम करतांना झोप येते.

चलता हैं यार. एखाद दिन के लिए चलता हैं.

ओके.

आणि हे बघ, मी तुझ्या साठी एक ड्रेस आणला आहे, खास पार्टी साठी.

अरे वा, बघू.

पूर्णिमानी राजूने आणलेला ड्रेस बघितला. मिनी स्कर्ट ब्लाऊज आणि टू पीस यांच्या मधला अवतार होता तो.

ईss, हा ड्रेस घालू मी घरात ? पिकनिक ला स्विमिंग पूल वर आरामात ड्रिंक्स पितांना ठीक आहे, पण घरात ?

हो. मला काय वाटतं ते सांगू, माझी पार्टनर ब्यूटीफूल तर आहेच, पण ती हॉट आणि सेक्सी पण दिसायला हवी आहे.

My god Raju, this not done. माझं काय प्रदर्शन मांडायला निघाला आहेस का तू ? मी नाही घालणार हा ड्रेस. आणि तुझ्या मित्रा समोर कशाला मी सेक्सी दिसायला हवं ? तुझ्या साठी घालीन मी, पण आत्ता नाही.

पूर्णिमा असं काय करतेस ? आजची थीमच ती आहे.

काय थीम आहे ?

हॉट अँड सेक्सी पार्टनर ची.

Not acceptable. Sorry.

प्लीज.

नो. And that is final.

राजुचा चेहरा पडला. पण पूर्णिमानी त्या कडे लक्षच दिलं नाही. आणि वरतून पार्टी च्या वेळेस ती चक्क साडी नेसून बाहेर आली.

हे काय ? साडी वर पार्टी करणार तू ?

Yes आपण भारतीय आहोत आणि जेंव्हा बाहेरचे लोक येतात तेंव्हा आपण आपल्या पारंपारिक वेषभूषेतच असणं जास्त बरोबर आहे असं मला वाटतं.

राजू काही बोलला नाही पण नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

रात्री राजुचा मित्र आणि त्यांची मैत्रीण आली. त्या दोघांना बघूनच पूर्णिमाला शिसारी आली. दोघांनीही आपल्या अंगावर खूप सारं गोंदवून घेतलं होतं. ज्या भाषेत ती  दोघं आपसात बोलत होते, पूर्णिमाला काही ही समजत नव्हतं. त्यांची भाषाच काय, त्यांचं इंग्लीश सुद्धा समजण्या पलीकडचं होतं. हे लोक राजूचे मित्र केंव्हा झाले असा प्रश्न पूर्णिमाला पडला. तिने तसं राजूला विचारलं देखील.

पूर्णिमा अग त्यांच्या समोर काय विचारते आहेस ?

त्यांना मराठी कळतं का ?

नाही. पण गेस्ट आहेत ते आपले.

ओके

अर्ध्या खाणाखुणा आणि अर्धवट इंग्लीश असा त्यांचा संवाद सुरू झाला. मग ड्रिंक्स सुरू झाले. राजू, येतांनाच बरोबर बऱच काही खायला घेऊन आला होता, बाकी ऑर्डर केलं. पूर्णिमा ड्रिंक्स न घेण्या इतकी सोवळी नव्हती, पण आज का कोण जाणे तिने ड्रिंक्स ला हात पण लावायचा नाही असं ठरवलं. राजू तिला फार आग्रह करत होता. पूर्णिमाला कळत नव्हतं की राजू असा विचित्र का वागतोय ते. ड्रिंक्स च्या बाबतीत इतका आग्रह यापूर्वी त्यानी कधीच केला नव्हता.

ड्रिंक्स, डांस, पुन्हा ड्रिंक्स, जेवण पुन्हा डांस. पण पूर्णिमाचं आज कशातच लक्ष लागत नव्हतं. ते जोडपं काही तिला आवडलं नव्हतं. डांस करतांना तो माणूस तिला आवळण्याचा प्रयत्न करत होता. आणि असं झाल्यावर तिने राजू कडे पाहीलं होतं पण राजू, आपण त्या गावचेच नाही असा वागत होता. तिला आता राजुचा पण राग यायला लागला होता. शेवटी तर राजुच्या मित्रांनी  पूर्णिमाला पकडलंच. तो पूर्णिमाकडे अत्यंत आधाशी नजरेने पहात होता. तिच्या सर्व अंगावरून त्याची नजर फिरत होती. पूर्णिमाला त्याच्या नजरेचा अर्थ समजला. तिला या सर्व प्रकाराची शिसारीच आली. तिने त्याच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न केला पण  त्याच्या बलदंड पकडीतून सुटायला पूर्णिमाला बराच त्रास झाला. आणि हे सर्व राजू पहात  होता आणि हसत होता. तो आणि ती मैत्रीण एकमेकांच्या मिठीत होती आणि एंजॉय करत होती. राजू तिला म्हणाला-

एंजॉय, पूर्णिमा एंजॉय. आजची तसंही एक्स्चेंज पार्टनर पार्टी आहे. So enjoy.

तो काय बोलला त्याचा अर्थ लक्षात यायला पूर्णिमाला थोडा वेळ लागला पण जेंव्हा अर्थ लागला तेंव्हा तिच्या अंगावर नखशिखांत शहारा आला. तिच्या लक्षात आता यायला लागलं होतं की हे काही खरं नाही. या तिघांच्या पुढे आपला निभाव लागणार नाही. एक निर्णय घेऊन तिने फ्लॅट च्या बाहेर जाण्या साठी धाव घेतली पण राजू वाट अडवून उभा होता. पूर्णिमाचा आता संताप अनावर झाला होता. मागचा, पुढचा काहीही विचार न करता तिने राजूच्या कानाखाली एक सणसणीत ठेवून दिली. आणि म्हणाली,

अरे तुझ्यावर काहीही हातचं न राखता प्रेम केलं मी, आणि तू माझा बाजार मांडायला निघालास ? शरम वाटली पाहिजे तुला. बाजूला हो नाही तर मी पोलिसांना बोलविन. आणि हातातल्या मोबाइल वर 911 टाइप केलं. बाजूला हो नाही तर कॉल बटन प्रेस करेन. राजू गालावर थप्पड पडल्यामुळे थोडा दचकला होता, त्याच्या संभ्रमावस्थेचा फायदा घेत पूर्णिमा धावत बाहेर पडली. सुदैवाने लिफ्ट जागेवरच होती. पूर्णिमा धावतच रस्त्यावर आली. आता फक्त एकच विचार होता की cab  घ्यायची आणि सेजल कडे जायचं. तिथे थांबणेही धोक्याच होतं. राजू आणि त्याचा मित्र केव्हाही मागावर येऊ शकले असते. ती झप झप चालत राहिली.

रात्रीचा एक वाजला होता, अश्या वेळेला साडी नेसलेली बाई रस्त्यावर एकटीच जवळ जवळ पळते आहे, हे दृश्य अमेरिकेत सुद्धा दुर्मिळ होतं. शेजारी कार एकदम हळू झाली. पूर्णिमा आता मात्र खरंच घाबरली. आधीचं जे अवसान होतं ते गळून पडलं. ती आता धावायला लागली.

अहो थांबा. थांबा. एका बाईचा आवाज आला. मराठी आवाज ऐकून पूर्णिमा थबकली. कार थांबली आणि त्यातून एक पन्नाशीचा गृहस्थ  आणि एक स्त्री उतरली.

अहो थांबा. एवढ्या रात्री कुठे पळत निघाला आहात ? काही प्रॉब्लेम आहे का ?

पूर्णिमाला धीर आला. निदान मराठी कुटुंब दिसतं आहे. ती थोडी रीलॅक्स झाली.

तुम्हाला कसं कळलं की मी मराठी आहे म्हणून ? पूर्णिमाने विचारलं.

तुमच्या साडी नेसण्या वरून आणि चाली वरून. आम्ही पण मराठीच आहोत.

अहो, घाबरू नका. हे घ्या माझं कार्ड. त्या गृहस्थाने त्याचं कार्ड पूर्णिमाला दिलं. ही माझी बायको. अश्या अपरात्री साडी नेसलेली एकटी मराठी मुलगी धावंतांना पाहिल्यावर आम्ही न थांबता जाणं शक्यच नव्हतं. सांगा आता काय प्रॉब्लेम आहे आणि कुठे जायचं आहे तुम्हाला. मग पूर्णिमाने  काय घडलं ते अगदी थोडक्यात सांगितलं. तेवढ्या वर सुद्धा ती बाई हळहळली

बाई गss,  एवढं सगळं झालं ? पण आता तू काय करणार आहेस ? कुठे जायचं आहे.

माझ्या दोघी मैत्रिणी राहतात त्यांच्याकडे जाईन मग बघेन  काय करायचं ते.

एक सुचवू का ? ती बाई म्हणाली, रात्र बरीच झालेली आहे, आजची रात्र तू आमच्या कडे राहू शकतेस. पूर्णिमाच्या चेहऱ्यावर चल बिचल दिसली म्हणून ती पुढे म्हणाली, आमच्या घरी, सध्या  माझे सासू, सासरे आलेले आहेत, आमची तिघं मुलं पण घरी आहेत, बघ विचार कर. सकाळी तू उठून जा तुझ्या मैत्रिणींकडे. हे बघ घर आलच. तू आत  ये, बघ  आणि तुला नाही पटलं तर हे तुला पोचवून देतील.

घरात शिरल्यावर पूर्णिमाला लगेच जाणवलं की हे फॅमिली होम आहे. मुलं तर झोपली होती पण आजी, आजोबा जागे होते. पूर्णिमा मग रात्री तिथेच थांबली आणि सकाळी ब्रेक फास्ट झाल्यावर cab  करून रूम वर आली. एवढं सांगून झाल्यावर पूर्णिमा थांबली. नुसत्या आठवणीनी सुद्धा तिला धाप लागली. सेजल पुढे झाली आणि तिने पूर्णिमाला जवळ घेतलं. आणि थोपटलं. म्हणाली,

देवाचे आभार मान. चांगली माणसं भेटली तुला. नाही तर काय झालं असतं याचा विचारही करवत नाही. पण don’t worry, आता तू safe आहेस. मग नंतर कोणीच बोललं नाही. सेजल आणि देवयानी काही न बोलता किचन मध्ये गेल्या. जेवणाची व्यवस्था तर करावीच लागणार होती.

पण देवयानीच्या लक्षात आलं की पूर्णिमा धावतच बाहेर पडल्या मुले तिच्या जवळ सामान काहीच नव्हतं.

पूर्णिमा, अग तुझं सामान ? पर्स, पासपोर्ट, लॅपटॉप, कपडे हे  सगळं कुठे आहे ?

ते सगळं रूम वरच राहीलं. आता ते आणावच  लागणार आहे. पण आता मला राजूची भीती वाटते. राजू जर बदला घेण्याच्या मूड मध्ये असेल तर काय करायचं मी ?

सेजल, देवयानी म्हणाली, जर तू आणि राजेश शनिवारी म्हणजे परवा पूर्णिमा बरोबर तिच्या रूम वर जाऊ शकाल का ? तिचं सामान तर आणावं लागणार आहेच ना.

हो खरंय, विचारते मी राजेश ला. मग सेजलने राजेश ला फोन लावला.

राजेश काय करतो आहेस ?

काही नाही. का ग ?

जेवायला येतोस का ?

आत्ता ?

हो.

येतो ना. तू बोलावणार आणि मी नाही कसं म्हणणार ? येतो मी.

देवयानीनी मान डोलावली. पूर्णिमा दरवाजा उभी होती. ती सर्व ऐकत होती. तिचा

आवाज भरून आला, म्हणाली

इतकी कशी ग मी मूर्ख ! तुमच्या सारख्या मैत्रिणींना काय वाट्टेल ते बोलले. सॉरी यार. शेवटी, तुमचाच आधार वाटला म्हणून मी परत इथेच आले. खरंच सॉरी. राजेश येईल का ग आपल्या बरोबर ?

येईल. तू नको काळजी करू. तो आता इथेच येतो आहे. तू तर ऐकलं आहेस ना ?

थोड्या वेळाने राजेश आला. त्याला पूर्णिमाची सगळी कहाणी सांगितली. तो सुद्धा ऐकून हतबुद्ध झाला. तो पूर्णिमा ला म्हणाला

तू एवढं जिवापाड प्रेम केलं त्याच्यावर आणि तो कसं वागला बघ. शेवटी हिरा कळायला पारखीच लागतो. तू काळजी करू नकोस. अग मी एकटाच नाही, अजून दोघा जणांना घेऊन येईन बरोबर. रीलॅक्स.

तो असं म्हणल्यावर तिघी जणींच्या डोक्या वरचं ओझं उतरलं. राजेश निघून गेल्यावर मग देवयानी म्हणाली की मी नागपूर ला फोन लावते आहे. बराच उशीर झाला होता पण फोन लावल्या शिवाय देवयानीला चैन पडणं शक्य नव्हतं.

हॅलो देवयानी, कशी आहेस ?

कशी दिसते आहे मी वहिनी, तुम्हीच सांगा. असं म्हणून देवयानीनी एक झकास स्माइल दिलं.

आली, आली original  देवयानी आली. आता काळजी नाही. विकास जेंव्हा तुझा  असा हसरा चेहरा बघेल ना, तेंव्हा तो लगेच उड्या मारायला सुरवात करेल.  थकवा बिकवा एकदम गूल. तूच त्याचं खरं औषध आहे, देवयानी. बाकी सब झूट.

काय हे वहिनी ! इतकं काही नाहीये. देवयानी असं बोलली खरी, पण तिच्या गालावर चढलेली लाली सर्व काही सांगून गेली.

अरे, काय लाजली आहे देवयानी. हुररे असं म्हणत, ग्रँड परफॉर्मेंस देवयानी, वाह कया बात हैं. देवयानी, अजून एकदा होऊन जाऊ द्या. हे अंकुश बोलला. अंकुश आणि मनीषा मुद्दाम आले होते, देवयानीशी बोलायला.

आता देवयानीला कॅमेऱ्या समोर बसणं कठीण झालं. तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. आणि हळूच थोडी दूर सरकली. तिकडे नागपूरला हास्य कल्लोळ उडाला. अंकुश मनीषाला म्हणाला,

काय मनीषा, अगदी प्रॉपर वेळेला आलो आहे ना आपण.

हो हो, करेक्ट आहे. टाइमिंग एकदम परफेक्ट. देवयानी, अजून एकदा. वन्स मोर.

हा सगळा  संवाद देवयानी ऐकत होती, आणि अजूनच लाजून चूर होत होती. वन्स मोर वर नागपूरला पुन्हा एकदा हसण्याचा गडगडाट झाला. आता देवयानीला पण गप्प बसणं कठीण झालं. आणि तिला पण हसू फुटलं. आणि ती पण खळखळून हसायला लागली. तिचा हसण्याचा आवाज ऐकून अंकुश ओरडला, समोर या, समोर या. देवयानीनी लॅपटॉप सरकवला. आता ती सर्वांना दिसत होती. तिला असं  निर्झरा  सारखं निर्मल हसतांना  बघून सगळ्यांना जो आनंद झाला त्याला तोंड नव्हती.

असा प्रचंड गोंधळ बराच वेळ चालला. मग सगळे शांत झाल्यावर देवयानी म्हणाली की

मला कोणी तरी अपडेट देणार का ? नाही तर तेच राहून जायचं.

करेक्ट आहे. करेक्ट आहे. भैय्या म्हणाला. देवयानी, दोन डोस दिल्या गेले आहेत, आणि आज विकासच्या प्रकृती मध्ये बरीच सुधारणा दिसली आहे असं डॉक्टर म्हणत होते. आज रात्री आणि उद्या रात्रीचा डोस झाल्यावर वेगाने सुधार होईल असं म्हणत होते.

तुम्ही केंव्हा भेटणार त्याला?

नाही ग ते शक्य नाहीये. सध्या तरी डॉक्टर सांगतात तेच खरं. पण डॉक्टरांच्या म्हणण्या नुसार, If he is recovering, then we don’t have to worry. तेंव्हा रीलॅक्स. आजच्या सारखीच आनंदी रहा. आणि हसत रहा. ओके ?

ओके. ठेवते मग आता. बाय.  

 क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all