देवयानी विकास आणि किल्ली.
पात्र परिचय
विकास नायक
देवयानी नायिका
सुप्रिया देवयानीची मैत्रीण
लक्ष्मी सुप्रियाची रूम पार्टनर.
राजू सुप्रियाचा मित्र
शीतोळे पोलिस इंस्पेक्टर
भय्या विकासचा मोठा भाऊ.
अश्विनी विकासची वाहिनी, भैय्याची बायको
भगवानराव विकासचे बाबा
यमुना बाई विकासची आई
गोविंदराव देवयानीचे बाबा
कावेरी बाई देवयानीची आई.
मावशी आणि काका देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर
मनीषा विकासची बहिण
अंकुश मनीषाचा नवरा.
सुरेश देवयानीचा भाऊ.
विश्राम देवयानीचा चुलत भाऊ.
विनोद विकास चा चुलत भाऊ
प्रिया विकासची चुलत बहीण.
सेजल देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
पूर्णिमा देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
भाग १८
भाग १७ वरून पुढे वाचा ................
रात्री बारा वाजता सेजल आली. देवयानी जागीच होती. विकासशी बोलणं झालं होतं. तो ही काही मत प्रदर्शन करू शकला नाही. काळजी घे एवढंच बोलला. ती विचार करत होती, विकास तरी इतक्या दुरून काय suggestion देणार होता ? इथली परिस्थिती नेमकी काय आहे ते देवयानीलाच कळत नव्हतं तर ती विकासला काय सांगणार आणि विकास तरी काय सुचवणार. परिस्थितीला देवयानीलाच तोंड द्यायचं होतं. ती आपल्याच विचारात गढून गेली होती.
काय ग अशी काय बसलीस ? कसला विचार करते आहेस ? सेजल नी विचारले.
काही नाही ग असच. विकासला फोन केला होता म्हणून. आणि हे काय ? पूर्णिमा कुठे आहे ? तू एकटीच आलीस ?
पूर्णिमा गेली राजू बरोबर. येईल ती उद्या सकाळी no worries.
राजू बरोबर गेली ? म्हणजे ?
काय देवयानी ! आता ती राजू बरोबर रात्र घालवणार म्हणजे काय, ते तुला सांगावं लागणार का ? कशी ग तू ? अजून इतिहासात जगतेस का ?
नाही सेजल, पण खरंच अश्या विचारांना मी पचवू शकेन असं वाटत नाही. मला तर हे सगळं भयंकर वाटतंय.
हे बघ, आपण परदेशात आहोत. भरपूर पगाराची नोकरी आहे. स्वतंत्र आहोत. तिकडे भारतात आपले आई वडील मुलं बघतात पण आपल्या तोडीचं त्यांना कोणीच मिळत नाही. पुन्हा समाज, जात, शैक्षणिक आणि आर्थिक लेवल, सगळंच बघितल्या जातं. त्यांच्यात वर्षं कशी निघून जातात ते कळतच नाही. खूप उशीर होतो. लग्नाला. आमचं वय आज ३० आहे. कधी लग्न होणार आणि कधी एंजॉय करणार आम्ही ? बरं इथे आपल्याला आपल्याशी एकनिष्ठ असेल असा मुलगा मिळण्याची मारामार मग अश्या स्थितीत आपण काय करायचं ? आनंदापासून वंचित कशा करता राहायचं ?
सेजल, तुझ्या कडे पाहून तुझे विचार असे असतील याची मुळीच कल्पना येत
नाही. धन्य आहेस तू. देवयानीने हात जोडले.
मी कुठे म्हंटलं की हे माझे विचार आहेत म्हणून. आत्ता आपण पूर्णिमा बद्दल बोलत होतो. हे तिचेच विचार आहेत. आणि त्या प्रमाणेच ती वागते.
तुझे पण boy friends आहेत ?
नाही. पूर्णिमाचे विचार मला थोडे थोडे पटतात पण तिच्या सारखं वागायचं धाडस माझ्यात नाहीये. त्यामुळे मी फक्त तिच्या आनंदात मी सहभागी होत असते. माझ्या घरचे म्हणताहेत की भारतात परत ये, म्हणजे मुलं बघण्याला वेग येईल. पण देवयानी, इथल्या लाइफ स्टाइल ची आता इतकी सवय झाली आहे की परत जाण्याचा विचार पण करवत नाही. तुझी गोष्ट एकदम वेगळी आहे. तुझं लग्न ठरलं आहे आणि तुला इथे राहायची इच्छा पण नाहीये. माझं तसं नाहीये. मला इथेच राहण्याची इच्छा आहे. त्यामुळे आमच्या सारख्या मुलींचा हा प्रॉब्लेम आहेच. इथे राहायचं असतं पण इथली लाइफ स्टाइल adopt करता येत नाही. आणि इंडियात जायचं नसतं. मग काय करणार तरी काय ?
अग पण इथेच राहण्याचा विचार पक्का केलेला, अशी कितीतरी मुलं असतील की. तू सांग तुझ्या घरच्यांना की असाच मुलगा बघा म्हणून. नाही तर तू भारतात परत जा. Otherwise तुझं लग्न होणार कसं ?
इथे सुद्धा देवयानी, तुझी गोष्ट वेगळी आहे.
आता आणखी काय वेगळं सांगणार आहेस तू ?
अग बघ ना, इथे जी मुलं असतात त्यांना खूप पगार असतो. मग एक तर ते भारतात जाऊन साधी सोज्वळ आणि दिसायला गोरी, आणि सुंदर मुलगी पाहतात. आता तू, देखणी आहेस, पण माझं काय ? मी हुशार आहे पण दिसण्याच्या बाबतीत आपली अॅवरेज मुलगी आहे. प्लस माझं पॅकेज इतकं सॉलिड आहे की ते पण अडचणीचं ठरतंय. मी जरी तयार असले तरी नाका पेक्षा मोती जड, असं कोणालाच नको असतं. हुशार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी, तारीफ करायला ठीक असते पण बायको म्हणून कोणालाच नको असते.
असा विचार का करतेस तू सेजल ? be positive.
हे माझे विचार नाहीयेत, हे गेली तीन चार वर्षांत मला आलेले अनुभव बोलताहेत.
गेल्या काही वर्षातले आलेले अनुभव आठवून सेजल चा चेहरा काळवंडला. सुर जरा रडवेला झाला. देवयांनीला खूप वाईट वाटलं. आपण हा विषय काढायला नको होता असं वाटून ती जरा गप्पच बसली. थोडा वेळ तसाच गेला. पण मग देवयानीलाच राहवेना. तिने शेवटी विचारलंच
मग आता ? हा तिढा सोडवणार कसा तू ?
बघू. जसं ठाकूरजी च्या मनात असेल तसं होईल.
हे ठाकूरजी कोण ? तुझे वडील ? की काका ?
सेजल ला हसू आवरेना. ती हसतच सुटली.
अग सांग ना.
ठाकूरजी म्हणजे श्रीकृष्ण भगवान.
अरे देवा ! हे मला माहीत नव्हतं.
एक मात्र बरं झालं. सेजलला हसू आल्यामुळे वातावरण पुन्हा पहिल्यासारखं झालं. जी निराशेची छटा सेजल च्या चेहऱ्यावर आली होती ती निघून गेली.
दुसऱ्या दिवशी रविवार होता. सुट्टीचा दिवस. सगळेच उशिरा उठले. रविवारची बरीच आठवड्या भराची कामं होती त्यामुळे सकाळचा वेळ पाहता पाहता निघून गेला. मग संध्याकाळी बाहेर जाऊन जेवण.
पूर्णिमा सकाळी अकरा वाजता उगवली. आणि बेडरूम मधे जाऊन जे पसरली ते संध्याकाळीच उठली.
देवयानी म्हणाली सुद्धा
काय ग सेजल, किती झोपली आहे ही. बरं वाटत नाहीये का पूर्णिमाला ?
अग रात्रीचं जागरण झालं असेल. रात्रभर धुडगूस घालते ही पोरगी. दर वेळी आली की अशीच झोपते.
देवयानीनी कपाळाला हात लावला. म्हणाली लक्षण काही ठीक दिसत नाही पूर्णिमेच
अग तू लक्ष देऊ नकोस. तुला नाही झेपणार.
खरं आहे. आणि अवघड पण.
रात्री विकासचाच फोन आला.
काय देवयानी, काय खबर ?
मग देवयानीनी सेजल काय बोलली ते आणि पूर्णिमा कशी रात्रभर राजूकडे होती ते सांगितलं.
देवयानी, तू अगदी narrow escape घेतला आहेस बघ. जर माझ्या आधी राजूची आणि तुझी भेट झाली असती तर त्यानी कसल्या कसल्या भुलथापा देऊन तुला आपलसं केलं असतं. तू खूप भोळी आहेस, चटकन त्याच्या कह्यात गेली असतीस, आणि नंतर त्यानी तुझा असाच चोळा मोळा केला असता, आणि कार्यभाग साधल्यावर तुला खड्या सारखं बाजूला फेकलं असतं.
हो रे विकास. त्याच्या आधी तू भेटलास ही त्या परमेश्वराचीच कृपा. नाही तर काय झालं असतं माझं देव जाणे.
हो. देवांनीच त्या दिवशी तुला खोलीत कोंडून ठेवलं असं म्हणायचं.
हो आणि नेमका तुलाच फोन लागला. मी तर randomly नंबर लावला होता.
ठीकच आहे. उशिरा का होईना आपल्याला त्याचं खरं स्वरूप कळलं हे छान झालं. आता तू त्यांच्या वाऱ्याला पण उभी राहू नकोस.
एवढं सगळं कळल्यावर ? शक्यच नाही.
चल, मला ऑफिस ला जायला उशीर होतो आहे ठेवतो मी आता. बाय.
दुसऱ्या दिवसांपासून सर्वांचंच रुटीन सुरू झालं. साधारण अजून एक महिना उलटला फेब्रुवारी सुरू झाला. अजून reliever येण्याचं काहीच चिन्ह दिसत नव्हतं. देवयानी खूपच हिरमुसली झाली होती. विकास तिला फोन वरून धीर देत होता. पण आता तो ही वैतागला होता.
एक दिवस दुपारीच सुप्रियाचा फोन आला.
विकास, आज संध्याकाळी जेवायला यायचं आहे.
काय खास आहे ?
खासच आहे.
सांगशील का जरा.
तू ये तर खरं, मग कळेलच.
ठीक आहे साडे आठ पर्यन्त चालेल ?
चालेल.
कुठे यायचं ? आणि कोण कोण येणार आहेत ?
आमच्या घरी. आणि तू, मी आणि लक्ष्मी बस आपण तिघंच.
ओके.
विकास वेळेवर पोचला.
काय ग काय खास आहे ? आता तरी सांग. उगाच माझी उत्सुकता ताणू नकोस.
अरे जरा बस तरी. सांगते सर्व.
अरे celebration आहे.
कशा बद्दल ? पुन्हा promotion मिळालं ? congrats.
नाही नाही, लक्ष्मी चं लग्न ठरलं आहे ती कोईमतूर ला जात आहे परवा.
ए, काही तरीच काय सांगते आहेस ? नाही रे विकास लग्न ठरलं नाहीये, मुलगा येणार आहे पहायला. ही आपली सुपरफास्ट एक्सप्रेस सोडते आहे.
विकास हिच्या आई, बाबांनी पाहून पसंत करून ठेवला आहे. आता फक्त लक्ष्मी पसंत पडली की झालं. फोटोवरून पसंती तर झालीच आहे. मग आता काय शिंग राहिली आहेत ? लक्ष्मी सारख्या सुंदर टिपिकल मद्रासी मुलीला कोण नाकारणार?
अग पण मला तो पटायला हवा न ?
तुला तो पटलाच आहे, उगाच नाही तास तास भर त्याचा फोटो बघत असते.
मग सुप्रियाने विकासला फोटो दाखवला. मुलगा खरंच स्मार्ट होता. विकास ने अंगठा आणि तर्जनी जुळवून छान अशी खूण केली.
रात्री त्यानीच देवयांनीला फोन केला. देवयानी त्यावेळी नुकतीच उठली होती आणि चहाच पित होती. इतक्यात विकासचा फोन आला. तिला जरा आश्चर्यच वाटलं.
सकाळी, सकाळी ?
मग विकासने सुप्रियाच्या घरी काय घडलं ते सांगितलं आणि म्हणाला की
देवयानी, लक्ष्मीला पाहायला मुलगा येणार, माझा काय संबंध ? मला कशाला जेवायला बोलावलं ? मला तर काहीच लिंक लागत नाहीये.
मलाही समजत नाहीये. तसा तुझा आणि सुप्रियाचा सुद्धा कुठे फार संबंध आहे ? लक्ष्मी तर दूरची गोष्ट आहे.
Exactly तेच म्हणतो मी. I am confused.
माहीत नाही. आज रात्री सुप्रियाला फोन करेन तेंव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आणि मग तुला अपडेट देते.
ओके.
रात्री देवयानीनी फोन केला तेंव्हा सुप्रियाने उडवा उडवी ची उत्तरं दिली. देवयानीचं काही समाधान झालं नाही. तिने मग विकासला सांगितलं पण त्याचेही समाधान झालं नाही. शेवटी कोड्यांचं उत्तर मिळालच नाही. मग त्यांनी तो विषय सोडून दिला.
पंधरा दिवस गेले आणि एक दिवस सुप्रियाचा फोन आला.
तुला सांगितलं होतं ना लक्ष्मी कोईमतूर ला जाणार आहे म्हणून.
हो मग ? ठरलं का ?
हो ठरलं. कालच तिचा फोन आला होता.
अरे वा छान. माझ्याकडून तिला अभिनंदन दे.
आज आपण डिनर ला जाऊया का ?
अरे! आता काय ? कशाबद्दल ?
एकटं एकटं वाटतंय, खूप कंटाळा आला आहे. ज्यांच्या बरोबर डिनर ला जावं असं तुझ्या शिवाय कोणीच नाहीये. चल ना. तेवढाच टाइम पास. प्लीज प्लीज प्लीज.
ओके. पोचतो मी आठ, साडे आठ पर्यन्त.
चल, see you.
क्रमश:.......
मो :9284623729
माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा.
https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा