Dec 06, 2021
मनोरंजन

देवयानी, विकास आणि किल्ली भाग 15

Read Later
देवयानी, विकास आणि किल्ली भाग 15

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

 

 

 

 

 

भाग १५

भाग  १४    वरून  पुढे  वाचा ................

 

बाबांना ताबडतोब ICU मधे   भरती केल्या गेलं. X- RAY, MRI वगैरे तपासण्या साठी लगेच कार्यवाही सुरू झाली. Blood samples घेऊन झाले. देवयानी आणि देवयानीच्या आई वर प्राथमिक उपचार करून झाले. आता बाबांच्या निदानाची वाट होती. देवयानीने विकासला फोन  केला.

हेलो, विकास, देवयानी बोलते आहे.

काय झालं ? तुझा आवाज असा का येतोय ? रडतेयस की काय ?

विकास तू लवकर इथे ये. खूप भयंकर घडलंय.

देवयानी आधी शांत हो. तू काय म्हणतेयस, आणि मी कुठे यायचं, मला काही कळत नाहीये.

अरे आम्ही घरी परतत असतांना ऑटो रिक्शा ला अपघात झालाय. स्पीड ब्रेकर  वरून रिक्शा उलटली. बाबा बाहेर फेकल्या गेले आणि त्यांच्या पायांवरून कार च चाक गेलं. बाबा बेशुद्ध आहेत. त्यांना हॉस्पिटल ला अॅडमिट केलं आहे. तू ताबडतोब  ये इथे. आई पण खूप घाबरली आहे. माझाही गोंधळ उडाला आहे. मी एकटीच आहे रे इथे.

मी लगेच निघतो. पोचायला जेवढा वेळ लागेल तेवढाच.

विकास लगेच बॉस ला सांगून निघाला. तो पण येऊन पोचला. सगळे बाहेर थांबले होते. देवयानीने आत्ता पर्यन्त धीर धरला होता आणि ती आईला समजावत होती पण विकास आल्यावर तिचा धीर सुटला. तिचा पण आवाज रडवेला झाला होता. विकासने तिला धीर दिला.

देवयानी, आई आता मी आलो आहे मी बघतो काय करायचं ते. तुम्ही काळजी करू नका. धीर धरा. डॉक्टर आल्यावरच कळणार आहे किती गंभीर दुखापत आहे ते.

 

थोड्या वेळाने डॉक्टर सांगत आले की डोक्याला मार लागला आहे पण जखम नाहीये, मुका मार आहे. आणि इंटरनल ब्लीडिंग पण दिसत नाहीये. उलट्या होत नाहीयेत तेंव्हा काळजीच कारण नाहीये. पाय फ्रॅक्चर झाला आहे, पायाचं हाड पायाच्या बाहेर आलं आहे त्यामुळे त्वरित ऑपरेशन करावं लागणार आहे. तुम्ही लवकर सर्व formalities पूर्ण करून या. विकास लगेच उठला.

आता लॉबी मधे देवयानी आणि तिची आई या दोघीच उरल्या होत्या.

देवयानी, कसं होईल ग आता.

अग आत्ताच डॉक्टर सांगून गेले न की काळजीचं काही कारण नाहीये म्हणून. डोक्याला लागलेला मार गंभीर असता तर गोष्ट वेगळी होती. पण तसं नाहीये त्यामुळे जरा धिराने घे. आणि विकास आहेच न बरोबर. तो करेल सगळी धाव पळ.

अग पण पाय तुटला आहे आता किती दिवस अंथरुणांत पडून राहावं लागेल कोणास ठाऊक.

त्याची फारशी चिंता करू नकोस आई. आम्ही आहोत न काळजी घ्यायला.

बरं आता मी सुरेशला फोन करून माहिती देते. तो पण ताबडतोब निघेलच इकडे यायला. तो अजून डॉक्टर झाला नसला तरी  त्याला कळेलच नक्की काय परिस्थिती आहे ते.

हो बाई, कर लवकर त्याला फोन.

देवयानीने सुरेश ला फोन केला.

हेलो सुरेश, देवयानी बोलते आहे.

काय झाली का सगळी खरेदी ? कपडे , दागिने सगळं झालं ?

अरे खरेदीचं काय घेऊन बसला आहेस. बाबांना अपघात  झाला आहे आणि त्यांना अॅडमिट केलं आहे. पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि त्यांचं आता लगेच ऑपरेशन होणार आहे. तू लगेच निघून ये.

अरे असं अचानक काय झालं. देवयानी तू मला सविस्तर  सांग काय घडलं ते. मी आत्ता रात्रीची बस आहे का बघतो आणि असेल तर लगेच निघतो.

तू आधी बूकिंग कर मग मी तुला सर्व सांगते. निवांतपणे.

विकास असेलच न तिथे ?

अर्थातच. तोच  सगळी धाव पळ करतो आहे.

बरं ठेवतो आणि बूकिंग झाल्यावर तुला कॉल करतो.

आई सुरेशला कळवले आहे. तो कोणच्या  बस चं बूकिंग मिळतं आहे का ते बघतो आहे. येईलच त्याचा फोन थोड्या वेळात.

थोड्या वेळाने सुरेशचा फोन आला.

देवयानी, बसचं तर काही जमलं नाही. मी विचार करतो आहे की सरळ टॅक्सी करावी म्हणजे  सकाळ पर्यन्त तिथे पोचून जाईन.

अगदी बरोबर. बस मिळाली असती तर बरंच झालं असतं पण आता नाहीये तर सरळ टॅक्सी कर. जास्त विचार करत बसू नकोस. पैसे ट्रान्सफर करू का ?

नाही आहेत माझ्या जवळ. तू टेंशन घेऊ नको. तिथे आल्यावर बघू. तू फक्त एक कर घराचं लोकेशन पाठवून दे. आणि अॅड्रेस पण.

पाठवते.

विकासने फॉरमॅलिटीज पूर्ण केल्यात आणि ५०००० पेमेंट पण केलं. आल्यावर त्यांनी डॉक्टर ला शोधलं आणि सर्व फॉरमॅलिटीज पूर्ण केल्याचं सांगितलं.

हो कळलं आम्हाला. आम्ही ऑपरेशन ची तयारी करायला घेतली आहे. आता तुम्ही स्वस्थ बसा. काळजी करू नका. सर्व ठीक होईल. डॉक्टर म्हणाले.

देवयानीनी विकासला सांगितलं की सुरेश टॅक्सी ने निघतो आहे. सकाळ पर्यन्त पोहोचेल.

अग  इतक्या तातडीने कशाला बोलावून घेतलं त्याला. मी आहेच न.

तू आहेसच रे. पण सुरेश आला तर आईला जरा आधार वाटेल म्हणून बोलावलं. किती झालं तरी तू होणारा जावई आहेस. थोडा संकोच तर वाटेलच ना.

मला असं वाटलं की त्याची आता परीक्षा जवळ आली आहे, आणि मी आहेच इथे म्हणून. अजून काही नाही. पण ठीकच आहे आईंना नक्कीच आधार  वाटेल.

तेच तर. तोच विचार मी केला. कितीही झालं तरी तो MBBS च्या शेवटच्या वर्षाला आहे. त्यामुळे तो आला की जरा बरं वाटेल.

ते आहेच. त्याला आपल्या पेक्षा जास्तच कळेल. बरं, देवयानी, आई बाबांना कळवू का ?

अरे त्यांना कशाला टेंशन देतोस. ते तिकडे नागपूरला. उगाच काळजी करत बसतील.

हो, पण कळवायला नको का ?

कळवायला तर हवच. थांब आईला विचारते.

आई, विकास म्हणतो आहे की  नागपूरला कळवतो म्हणून. ठीक आहे न ?

हो. ठीकच आहे. त्यांना कळवायलाच हवं.

विकासने घरी फोन केला. रात्रीचे नऊ वाजले होते त्यामुळे बाबा घरी आले होते. भैय्या अजून यायचा होता. विकास ने त्यांना परिस्थितीची कल्पना दिली.

म्हणजे आता त्यांचं ऑपरेशन चालू आहे का ?

हो. बहुधा तीन चार तास लागतील असं डॉक्टरांच्या बोलण्या वरून वाटतंय.

ठीक आहे. कुठे उतरले आहेत ? आपल्याच फ्लॅट वर ना ?

हो. आणि उद्या सुरेश पण सकाळी पोचतोय.

हे मात्र चांगलं झालं. घरचाच डॉक्टर असला की काळजी नसते.

आता तर देवयानी आणि तिची आई दोघंही तिथेच असतील ना ?

हो.

एक कर. रात्री त्यांना घरी पाठवून दे. जरा आराम करू दे त्यांना.

हो बाबा  तसंच करतो.

ठीक. अपडेट दे उद्या. ऑपरेशन झाल्यावर काय परिस्थिती आहे ते कळव.

हो.

देवयानीच्या आईला काय बोलणं झालं ते विकासने सांगितलं. आणि म्हणाला की

चला आता इथे थांबून काय करणार आहोत आपण त्यापेक्षा इथल्या कॅंटीन मधे जाऊन जेवून घेऊ. जरा एनर्जी असायला पाहिजे शरीरात. उपास करून काही साध्य होणार नाही. देवयानीच्या आईने जरा आढेवेढे घेतले पण नंतर तयार झाली.

रात्री बाराच्या सुमारास डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की ऑपरेशन व्यवस्थित झालं आहे. आज तर त्यांना ICU मध्येच ठेवू. उद्या सकाळी रूम मधे शिफ्ट करू. तुम्ही admin office  मधे जाऊन रूम वगैरे ठरवून घ्या. म्हणजे ऐन वेळेवर तुमची धाव पळ होणार नाही. काळजी करू नका. सगळं ठीक आहे.

विकास लगेच admin  ऑफिस मधे गेला, त्यांनी विचार केला की देवयानी आणि तिच्या आईने घरी जायला नकार दिला तर त्यांना रूम मधे जरा आराम करता येईल.  आणि सगळी चौकशी करून रूम फिक्स करून  टाकली. त्यांनी सांगितलं की आम्ही आताच रूम चा ताबा घेतो. म्हणजे उद्या काही अडचण होणार नाही.

आल्यावर तो दोघींना रूम मधे घेऊन गेला आणि सांगितलं की थोडा वेळ तुम्ही

आराम करा. मग मी इथे थांबतो तुम्ही घरी जा. आणि सकाळी या. तसंही बाबा ICU मधे आहेत आणि कोणालाही जाण्याची परवानगी नसते. तुम्ही थांबून काय करणार त्यापेक्षा घरी जाऊन थोडी विश्रांती घ्या.

छे छे, हे रूम मधे येऊन आमच्याशी बोलल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाहीये, इथेच थांबू. तुम्ही वाटल्यास घरी जाऊन थोडा आराम करा उद्या तुमची जास्त जरूर असणार आहे.

विकासला यावर  न बोलणंच श्रेयस्कर वाटलं. तो म्हणाला की मी बाहेर ICU च्या बाहेर थांबतो. आणि तो बाहेर पडला.

रात्र शांततेत पार पडली. विकास काचेतून पहाण्याचा प्रयत्न करत होता, पण बाबांचा बेड पलीकडच्या बाजूला असल्यामुळे त्याला काही दिसलं नाही. शेवटी तो खुर्चीवर जाऊन बसला.

पहाटे खुर्चीवर बसल्या बसल्याच त्याचा जरा डोळा लागला होता. तेंव्हाच देवयानी आली आणि त्याला उठवलं.

सुरेश आला आहे. तो घरी पोचला आहे. कोणाला तरी  जावं लागणार आहे. तू असं करतोस का आईला घेऊन जातोस का ? मी थांबते इथे. मीच गेले असते  पण आत्ता चार वाजले आहेत आणि बाहेर अजून अंधार आहे म्हणून म्हणतेय.

विकास देवयानीच्या आईला घेऊन घरी पोचला. सुरेश गेट वरच उभा होता. त्याला पाहिल्यावर आईला पुन्हा उमाळा आला. विकास दोघांनाही घेऊन फ्लॅटवर गेला. त्या दोघांना एकटं सोडून तो चहा आणि नाश्ता बनवायच्या तयारीला लागला.

त्यांना चहा, नाश्ता देऊन त्यानी आंघोळ आटोपली. आणि दवाखान्यात जायला निघाला.

तुम्ही आटपून घ्या, मी आता जाऊन देवयांनीला पाठवून देतो. तुम्ही थोडा आराम करून फ्रेश होऊन सावकाश या. मी आहे तिथे. असं म्हणून निघाला. हॉस्पिटल मधे जाऊन त्याने देवयांनीला घरी पाठवलं. आणि स्वत: ICU च्या बाहेर बसला.

डॉक्टर चा राऊंड अकरा वाजता झाला. डॉक्टर शी बोलल्यावर त्याला कळलं की बाबांना शुद्ध आली आहे आणि दुपार पर्यन्त त्यांना रूम मधे शिफ्ट करतील.

बारा वाजता देवयानी आणि सुरेश आले. त्यांना सगळं अपडेट देऊन तो आणि देवयानी घरी आले.

दुपारी दीड वाजता विकासचे आई आणि बाबा आले. मग संध्याकाळी सहा वाजता विकास त्यांना घेऊन दवाखान्यात घेऊन गेला. थोडा वेळ ते लोक तिथे बसले देवयानीच्या बाबांशी  बोलले आणि घरी परत आले. रात्री देवयानीची आई झोपायला जाणार होती. गोविंदराव घरी येई पर्यन्त विकास चे आई, बाबा  पुण्यालाच राहणार होते.

आठवड्या भरात बाबांची प्रकृती बरीच सुधारली आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला.

एक महिन्यांनी दाखवायला या सगळं ठीक असेल तर Plaster दोन महिन्यांनी काढू, असं डॉक्टरांनी सांगितलं. बाबांना घरी म्हणजे विकासच्याच फ्लॅट वर आणलं.

आता एक वेगळीच अडचण उभी राहिली होती. बाबांचं plaster लग्नाच्या तारखे नंतर तीन दिवसांनी निघणार होतं. त्यानंतर फिजिओ थेरपी ती जवळ जवळ एक ते दीड महिना चालणार होती.

अशा परिस्थितीत लग्न कसं करायचं हा एक मोठाच प्रश्न होता. परत सुरेशची परीक्षा पण त्याच सुमारास होती. तो ही मुद्दा होताच. बरं या सगळ्यांची चर्चा देवयानीच्या बाबांच्या देखत चालली होती. ते काहीच बोलत नव्हते. शेवटी भगवानरावांनी सूचना केली की आपण लग्न पुढे ढकलू. पण हॉल चा अडवांस देऊन झाला होता. Caterer फायनल झाला होता. त्याला पण अडवांस देऊन झाला होता. फक्त पत्रिका छपायच्या शिल्लक होत्या. मग आता काय करायचं हा मोठाच प्रश्न होता. गोविंद राव बिचारे, काहीच बोलत नव्हते. आधीच ऑपरेशन चा बेसुमार खर्च झाला होता आणि आता जर हॉल आणि caterer  चे पैसे त्यांनी दुसऱ्या तारखेत अॅडजस्ट केले तर ठीक नाही तर काय करायचं याच विचारात ते गढून गेले होते.

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired