Dec 06, 2021
मनोरंजन

देवयानी, विकास आणि किल्ली भाग १२

Read Later
देवयानी, विकास आणि किल्ली भाग १२

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मानिषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

 

 

 

 

 

भाग 12

भाग  11  वरून  पुढे  वाचा ................

 

इंस्पेक्टर शीतोळे, विकास आणि देवयानी तिघंही हॉटेल मधे एका कोपर्‍यांतल्या टेबल वर बसले.

हं सांगा विकास साहेब, काय प्रॉब्लेम आहे.

मग विकासने त्यांना आठ दिवसांपूर्वी देवयानीचा राजू सोबत कॉफी शॉप मधे झालेला संवाद सांगीतला . आणि नंतर आदल्या रात्री घडलेला प्रसंग सुद्धा सविस्तर सांगीतला. त्यानंतर आज दुपारी काय बात चित राजू बरोबर झाली ते सुद्धा सांगितलं. सगळं सांगून झाल्यावर मग विकास म्हणाला

काय आहे साहेब, आम्हाला police complaint करायची इच्छा नाहीये. कारण एक तर देवयानीची बदनामी होईल आणि दुसरं म्हणजे त्या मुलाला शिक्षा झाली तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्याला बरबाद करण्यात आम्हाला काडीचा इंट्रेस्ट नाहीये. किती  झालं तरी तो सुप्रियाचा मित्र आहे. आम्हाला फक्त आमचा संसार निर्विघ्न सुरू व्हावा एवढीच इच्छा आहे. आता तुम्हीच सांगा काय करावं ते.

तो मुलगा, तुम्ही म्हणता, सगळं ऐकून घेतल्यावर चालला गेला, पण त्या

नी हे अॅक्सेप्ट केलं आहे का ? भविष्यात तो देवयानीला त्रास देणार नाही यांची खात्री आहे का ?

माहीत नाही साहेब.

तुम्ही काही मारपीट केली का  त्याला ?

आज नाही. पण तुम्हाला सांगितलं की काल रात्री देवयानीला सोडवण्यासाठी त्या दोघा मित्रांनी त्याला दोन ठेवून दिल्या म्हणून.

मुलगा कसा आहे ?

साहेब, धारवाडचा आहे, इंजीनियर आहे. चांगल्या पगाराची नोकरी आहे. सगळं चांगलं आहे पण या बाबतीत वेड्या सारखा वागला.

आपण एक काम करू. देवयानी तुम्ही आजच्या तारखेत एक निवेदन द्या. त्यात काय घटना घडली ते, म्हणजे आता तुम्ही जे काही सांगितलं ते सर्व तारीख वार  लिहा. ते पत्र आम्ही फाइल ला लावतो. तुम्ही म्हणता म्हणून त्यावरून आत्ताच काही अॅक्शन घेत नाही. जर त्या मुलाने काही त्रास दिला नाही तर ते पत्र आमच्या फाइलीला लागून राहील. पण जर जरूर पडली तर त्याचा उपयोग होईल. उद्या पोलिस स्टेशन ला या. आणि मग वाट बघू. तुम्ही मात्र मला अपडेट देत रहा.

ओके. उद्या किती वाजता येऊ ?

दुपारी बारा नंतर फोन करा मग मी सांगेन केंव्हा यायचं ते. पण सगळं व्यवस्थित लिहून आणा म्हणजे झालं.

ठीक आहे साहेब.

चिंता करू नका. आम्ही आहोत तुमच्या मदतीसाठी. काहीही झालं तरी कायदा हातात घेऊ नका. चलो. चलते हैं.

देवयानी आणि विकास मग थोडे इकडे तिकडे रेंगाळले आणि मग विकासच्या फ्लॅट वर गेले. शीतोळ्यांच्या आश्वासना मुळे दोघांनाही जरा हायसं वाटलं होतं. डोक्यावरचा ताण निघून गेला होता. पण नेहमी सारखा लाइट मूड काही येत नव्हता. जेवण झाल्यावर विकासने देवयांनीला तिच्या फ्लॅट वर सोडलं. तो पण थोडा वेळ बसला. इंस्पेक्टर शीतोळे भेटले असं सांगून काय बोलणं झालं ते सुप्रियाला सांगितलं  आणि घरी परतला. परतताना सांगितलं की रात्री कोणालाही दार उघडू नका. थोडा जरी संशय आला तर लगेच फोन करा. मी दहाच मिनिटांत पोचेन. सुप्रिया आणि देवयानीनी मान हलवली. मग विकास निघाला. तो लिफ्ट मधे शिरतच  होता की शीतोळयांचा  फोन आला.

हॅलो, काय म्हणता साहेब,

तुमच्याकडे राजूचा फोटो आहे का ?

माझ्या जवळ नाहीये. मी आज प्रथमच भेटलो त्याला पण सुप्रिया कडे कदाचित असेल.

बघा आणि असेल तर मला लगेच पाठवा.

पाठवतो साहेब. पण असं अचानक ?

अहो आम्हाला फोटोवरून बऱ्याच गोष्टी कळतात म्हणून. बाकी काही नाही.

विकास वळला देवयानी दारातच  उभी होती. तिला सांगितलं की राजूचा फोटो पाहिजे आहे तो मला पाठव.

राजूचा फोटो कशाला, सुप्रियाने विचारलं.

माहीत नाही. इंस्पेक्टर साहेबांना पाहिजे म्हणाले.

सुप्रियाने विकासला फोटो पाठवला. आणि त्यानी तो शीतोळयांना फॉरवर्ड केला.

सुप्रिया, लक्ष्मी आणि देवयानी, आत्ता मी जे काही सांगितलं ते फक्त तुमच्यातच ठेवा. राजू पर्यन्त हे पोहोचायला नको. फोटो बद्दल सुद्धा कोणालाच सांगू नका. आणि मग तो finally निघाला.

दुसऱ्या दिवशी विकास ने दुपारी एक वाजता शीतोळयांना फोन केला. ते पुण्याच्या बाहेर होते, ते म्हणाले की ते वापस आले की फोन करतील.

शीतोळयांचा  फोन संध्याकाळी साडे सहा वाजता आला. विकासला जरा बरंच वाटलं. त्याला आणि देवयानीला सुट्टी घ्यायची  जरूर पडली नव्हती, सात वाजे पर्यंत ते पोलिस स्टेशन ला  पोचले. देवयानीनी सर्व वर्णन लिहूनच ठेवलं होतं. ते दिलं. शीतोळयांनी वाचल्यावर मान हलवली. ओके आहे असं म्हणाले. मग शिपायाला बोलावून राजूच्या फोटोची प्रिंट काढायला सांगितली. आणि फ़ोटो देवयानीच्या अर्जाला शेवटी चिकटवला.  देवयानीचा आणि विकास चा पण फोटो मागीतला आणि ते पण  चिकटवले. प्रत्येक फोटोच्या खाली त्यांची नावं लिहिली. आणि फाइल मधे लावायला सांगितलं.

ठीक आहे शीतोळे म्हणाले-

आता तुम्ही जा आणि काही विपरीत घडलं तर लगेच रीपोर्ट करा. त्यावेळी ही फाइल अॅक्टिव होईल. तुम्ही काळजी करू नका आणि कुठलीही वेडी  वाकडी स्टेप घेऊ नका. सांभाळून रहा. तुम्हाला डिवचण्याचे प्रयत्न होऊ शकतात. पण तुम्ही शांत रहा. आणि लगेच आम्हाला सांगा. या तुम्ही आता.

देवयानी आणि विकास बाहेर पडले तेंव्हा रात्रीचे साडे आठ वाजले होते.

काय करायचं ? घरी जायचं ? -विकास.

घरी जाऊन पुन्हा बाहेर पडायचं का जेवायला ? का घरीच मागवायचं ?

सुप्रियाचा फोन आला.

काय ग काय झालं ? दिलं का निवेदन ?

हो दिलं. साहेब म्हणाले की आत्ता काहीच अॅक्शन घेणार  नाहीये पण पुढे पुन्हा त्रास झाला तर बघू.

ठीकच आहे. मग आता काय जेवून येणार का ? इथे सर्व तयार आहे.

अग विकास पण आहे न बरोबर. त्याचं काय ?

त्यालाही घेऊन ये. No problem.

देवयानी विकासशी बोलली आणि सुप्रियाला हो येते म्हणून सांगितलं. आणि ते दोघं देवयानीच्या फ्लॅट वर पोचले.

सुप्रिया स्वयंपाकात एकदम expert होती. तिच्या  हातच जेवण विकासला नेहमीच आवडायचं. जेवण झाल्यावर थोड्या गप्पा टाकून विकास आपल्या घरी गेला.

 

दोन आठवडे शांततेत गेले. देवयानीला आणि सगळ्यांनाच वाटलं की राजूनी आता मनातून देवयानीचा विषय काढून टाकला आहे. त्यामुळे सगळे निश्चिंत होते. पण त्यांचा हा निष्कर्ष चुकीचा होता हे त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना कळलं. त्या दिवशी संध्याकाळी पांच वाजता देवयानीला मेसेज आला की जर ती लग्नाला तयार झाली नाही, तर तो आत्महत्या करेल आणि तिच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल. मग तू आणि पोलिस काय ते बघून घ्या. देवयानी दचकली. मेसेज राजू च्या मोबाइल वरून आला होता. देवयानी अतिशय बिझी होती. तिला विकासला फोन करणं शक्यच नव्हतं. साडे सात  वाजता काम संपल्यावर तिने विकासला फोन केला आणि सांगितलं की ती डायरेक्ट त्यांच्या फ्लॅट वर येते आहे. सुप्रियाला पण कळवून  टाकलं की राजूचा असा असा मेसेज आला आहे आणि ती विकास कडे जाते आहे. जेवण त्याच्या बरोबरच घेईन.

फ्लॅटवर ती पोचली तेंव्हा विकास यायचा होता. ती चहा करून त्याची वाट पहात बसली. १०-१५ मिनिटांत विकास पण आला. चहा पिता पिता देवयानीने त्याला तो मेसेज दाखवला.

मला असं वाटलं होतं की राजूने तुझा नाद सोडला. पण हे भलतंच वळण लागतेय, प्रकरण गंभीर होत चाललं आहे असं दिसतंय. शीतोळयांना कळवायचं का ?

विकास, शीतोळे साहेब म्हणाल होते की काहीही development झाली, तर त्यांना  लगेच कळवा. म्हणजे ही घटना त्यांना कळवायला हवी. तूच आत्ता म्हणालास ना की मॅटर सिरियस आहे म्हणून.

तू म्हणते ते बरोबर आहे पण आत्ता रात्रीचे आठ वाजले आहेत. त्यांना त्रास देणे योग्य दिसेल का ?

आणि आज रात्रीच राजूने आत्महत्या केली आणि त्यांनी लिहून ठेवलेली माझ्या नावाची चिठ्ठी पोलिसांना सापडली तर काय करायचं ? सांगायचं त्यांना की कालच   आम्हाला हा मेसेज आला होता पण आम्ही काहीच न करता झोपून गेलो, असं सांगायचं ?

देवयानी, अग तू कुठल्या कुठे पोचलीस ? असं काहीही होणार नाही.

मला खूप भीती वाटते आहे रे . मला शिक्षा झाली तर ? काय माझ्या आयुष्यात लिहून ठेवलं आहे, हे कळतच नाहीये. आपली ताटा तूट तर होणार नाही ना अशी सारखी भीती वाटते आहे. पहा न आपल्या लग्नात किती विघ्न येताहेत.

देवयानीचा सुर आता रडवेला झाला होता. तिला हे सगळं झेपत नव्हतं. ती अस्वस्थ पणे टेबला वर सांडलेल्या पाण्या मधे रेघोट्या ओढत होती. विकासच्या मते हा सगळा राजूचा स्टंट होता. यात काही दम नाही, असं त्याला वाटत होतं. त्याला देवयानीकडे पण बघवत नव्हतं. तिचा चेहरा चिंतेने काळवंडून गेला होता.

अग तुला घाबरवण्यासाठी राजू असं करतोय. आत्महत्या करणारी माणसे कधी अशी  warning देतात का ?

पण देवयानीला त्याचं म्हणण पटत नव्हतं. ती आता रडायलाच लागली. शिक्षेच्या भीतीने तिचं धैर्य आता जवळ जवळ संपल. होतं. विकासने तिला धीर दिला म्हणाला –

ओके. लावतो आत्ताच शीतोळयांना फोन. तू रडणं थांबव. मी तुझ्या बरोबर असतांना तुला काळजी करायचं काहीच कारण नाही.

अरे पण मला शिक्षा झाली तर मी एकटीच असणार आहे. मग मी काय करू.? मला, तुला सोडून कुठेही जायचं नाहीये आणि तिने विकासचा हात घट्ट धरला. एखादा  लहान मुलगा घाबरल्यावर वडीलांचा हात जसा घट्ट धरून ठेवतो, तसच काहीसं विकासला जाणवलं. मग मात्र मुळीच वेळ न घालवता त्यानी शीतोळयांना फोन लावला. देवयानी म्हणाली की स्पीकर वर टाक.

हॅलो, साहेब मी विकास बोलतो आहे. जरा चुकीच्याच वेळी फोन केला पण तुम्हाला सांगणं जरुरीचं वाटलं म्हणून कॉल केला.

काय झालं? त्याने पुन्हा काही हरकत केली का ?

हो साहेब, त्यांनी देवयांनीला मेसेज केला आहे की ती जर लग्नाला तयार झाली नाही तर तो आत्महत्या करेल आणि देवयानीच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल म्हणून.

हूं, आता हे देवयानीला घाबरवून सोडण्यासाठी त्याची ही नवीन चाल दिसते आहे. कसही करून देवयानीनी त्याला हो म्हणावं या साठी हे उद्योग तो करतो आहे असं दिसतंय. हा माणूस आता चवताळला आहे. पण ठीक आहे तुम्ही तो मेसेज मला फॉरवर्ड करायला सांगा देवयानीला. मी बघतो काय करायचं ते.

हे ऐकल्यावर देवयानी थोडी शांत झाली. रडायची थांबली पण मळभ होतच.

साहेब करतील ना रे सगळं ठीक ?

अग हो तू आता काळजी करूच नकोस. सांगितलं ना त्यांनी, की ते बघतील म्हणून. ते आता यात लक्ष घालताहेत, आणि त्यांना तुझी काळजी आहेच. सांगतीलच  ते, काय केलं त्यांनी ते. मग बघू.  

हूं. कसही  करून हा ससेमिरा सुटला पाहिजे बस. आयुष्य सुरळीत व्हायला पाहिजे.

तथास्तु. विकास ने आशीर्वाद दिला.

 

 

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired