Dec 06, 2021
मनोरंजन

देवयानी, विकास आणि किल्ली भाग ११

Read Later
देवयानी, विकास आणि किल्ली भाग ११

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मानिषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

 

 

 

 

 

भाग 11

भाग  10  वरून  पुढे  वाचा ................

 

देवयानीने फोन केला आणि राजू येतो असं म्हणाला. त्या बरोबर ज्या सहज स्वरात बोलणं चाललं होतं, त्याला वेगळं वळण लागलं. मामला जरा गंभीर व्हायला लागला होता. सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा गंभीर भाव आला होता. आता काय होईल याचा सर्वच विचार करत होते. विकास एकदम आडदांड, मजबूत आणि राजू त्या मानाने अगदीच किरकोळ, जर विकास संतापला तर काय करायचं हा प्रश्न सर्वांच्या मनात होता. त्याला त्यावेळी  थांबवणं अवघड होऊन बसणार होतं. पण हा भाव देवयानी बरोबर ताडू शकली. आणि म्हणाली –

 

हॅलो, कोणीही चिंता करू नका, तुम्हाला वाटतंय तसं विकास काहीही करणार नाहीये. तो मार्केटिंग चा  माणूस आहे. I am sure तो गोडीगुलाबीनेच सर्व ठीक करेल. Have some faith in him. I know him very well  देवयानीने असं म्हंटल्यांवर सर्व थोडे रीलॅक्स झालेत.

राजू येइ पर्यन्त सर्वांची जेवणं आटोपली. आणि ते राजूची वाट पहाट बसले. थोड्या वेळाने राजू आला. त्यानी सर्वांना एकत्र बघितलं आणि घाबरला. वळून वापस जायला निघाला. देवयानीने त्याला थांबवलं. म्हणाली-

अरे  राजू तुझीच वाट पहात होतो. ये बस.

राजूने तिच्या कडे एकदा आणि मग सगळ्यांच्या कडे वळून पाहीलं. चेहऱ्यावर संशय दिसत होता. पण  मग विकासच अगदी शांत पणे  friendly आवाजात बोलला –

ये राजू ये, मी विकास. बस. आपण बोलून प्रॉब्लेम सोडवून टाकू. बिनधास्त ये. Don’t be scared

राजू मग येऊन बसला पण संशयाचे भाव चेहऱ्यावर कायम होते.

देवयानीने ओळख करून दिली. राजू, हा विकास. याच्याशीच माझं लग्न ठरलं आहे. आणि विकास हा राजू, सुप्रियाचा मित्र. याला मी खूप आवडते. असं यानीच सांगितलं आहे आणि याला माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. आणि आपलं लग्न ठरलंय हे त्याला मान्य नाहीये. आता विकास तूच बघ.

हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. देवयानी इतक्या स्पष्ट पणे बोलेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. आश्चर्याचा भाव राजूच्या चेहऱ्यावर पण दिसत होता. पण त्याला बरंच वाटलं. त्याचं काम सोपं झालं होतं.

गुड. विकास म्हणाला.

अग तुझ्या सारख्या एवढ्या सुंदर मुलीशी लग्न करायला कोणीही तयार होईल. तेंव्हा अशी इच्छा बाळगण्यात राजूचं काही चुकलं आहे, असं मला वाटत नाही. खरंच वाटत नाही. पण काल  जे काही घडलं ते  चुकच होतं. नाही का ? तुला काय वाटत राजू ? अशा जुलूमाच्या राम रामाने काहीही साध्य होत नाही. तेंव्हा सर्वांच्या हिता साठी देवयानीचा नाद तू सोडावा, असं मला वाटतं.

नाही. काल माझं चुकलंच आणि त्याच्या बद्दल मी देवयानीची माफी मागायला पण तयार आहे. पण मला देवयानी आवडते हे ही तितकंच खरं आहे. – राजू  

Alright, पण आता आमचं लग्न ठरलं आहे आणि ते महिन्या दोन महिन्यात होणार आहे. प्लस आमचं लव्ह मॅरेज आहे. मग आता तू तिचा नाद सोडायला पाहिजे. Now she is engaged with me, so you must forget her. What do you say ?

मी कसा विसरू शकतो तिला. अशक्य आहे ते.

पण मग यावर तोडगा काय ?

तू बाजूला हो. मग सगळंच ठीक होईल.

सगळे जण भयचकित नजरेने राजू कडे आणि विकास कडे आलटून पालटून बघत होते. आता राजू मार खाणार असच सर्वांना वाटलं. पण विकास शांत होता. तो म्हणाला

अरे राजू समजनेकी कोशिश करो यार. सवाल मेरे बाजू हटनेका नहीं हैं, सवाल ये हैं की देवयानी तुम्हें पसंद करती हैं क्या ? तो एक बार उसीसे  पूछ लो. दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा.

देवयानी, सांग, जर विकास बाजूला झाला तर तू माझ्याशी लग्न करशील ना  ? विकासला घाबरु नको. तो तुझ्या भोळे पणाचा फायदा घेतो आहे. मी अश्या  लोकांना चांगलाच ओळखून आहे. राजूने  आता विकास वर  आरोप करायला सुरवात केली.

बाकीच्यांना  पुन्हा वाटलं की आता राजू मार खाणार. पण तसं काही झालं नाही.

बोल देवयानी बोल या पिंजऱ्यातून सुटण्याची शेवटची संधि आहे तुला. राजू पुन्हा म्हणाला.

देवयानी हसली. राजू तुला आमचं लग्न कसं जमलं त्या बद्दल काहीच माहीत नाही म्हणून तू असं बोलतो आहेस.

राजू सर्व शक्ति निशी लढत होता, त्यांनी पुन्हा आपलाच राग आळवायला सुरवात केली.

माहीत काय असायचं त्यात. कुठे ते माहीत नाही पण नक्कीच त्यानी तुला हेरलं असेल, आणि तुझ्या भोळेपणाचा फायदा घेऊन, बऱ्याच भूल थापा देऊन तुला जाळ्यात ओढलं, अजून काय असणार आहे. या टाइप च्या लोकांची ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिस आहे. पक्का मार्केटिंग वाला आहे तो, कसही करून वस्तु गळ्यात मारण्यात वस्ताद असतात हे लोक. तू भोळी आहेस म्हणून त्याच्या जाळ्यात अडकलीस. पण नंतर तुला कळेल की खरं प्रेम म्हणजे काय असत ते. आणि ते राजूच करू शकतो. तेंव्हा आत्ताच सावध हो आणि माझ्या बरोबर चल.

देवयानी पुन्हा हसली आणि म्हणाली

राजू, तू जे assume करतो आहेस, तेच मुळात चुकीचं  आहे. विकासने मला हेरलं नाहीये. आणि त्यानी मला जाळ्यात पण ओढलं नाहीये.

हेच, अगदी हेच म्हणायचं होतं मला. तू असं बोलते आहेस हा तुझा भोळे पणा म्हणू की मूर्ख पणा म्हणू, हे समजत नाहीये. डोळे उघड देवयानी. तुला सगळं स्वच्छ दिसून येईल. राजू आता चिरडीला आला होता.

ऐक राजू, देवयानी पुन्हा नेटाने म्हणाली-

हे बघ, खरी गोष्ट ही आहे की, मीच विकासला हेरलं. मीच त्याला जाळ्यात ओढलं आणि मीच त्याच्या गळ्यात पडले. मलाच विकास आवडला होता, त्यानी तर मला  झिडकारूनच टाकलं होतं. पण मी हार मानली नाही आणि प्रयत्न करत राहिले आणि मला यश मिळालं. मलाच तो प्रथम आवडला होता. त्याला नाही. त्यानी तर माझ्याकडे साधं  वळून सुद्धा पाहीलं नव्हतं. म्हणून मी मघाशी म्हंटलं की तू जे assume करतो आहेस ते चूक आहे. आता तूच सांग अश्या परिस्थितीत म्हणजे जे मिळवण्यासाठी एवढे कष्ट घेतले आहेत मी, ते निव्वळ तू म्हणतोस म्हणून कस सोडून देऊ ? शक्य नाही ते. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मनात  तुझ्या बद्दल कसल्याही भावना नाहीत.

देवयानीचं बोलणं ऐकल्यावर सुप्रियाला पण दचकल्या सारखं झालं. तिला पण हे आत्ताच कळत होतं. ती आ वासून बघतच राहिली. पण लवकरच स्वत:ला सावरत ती म्हणाली की

एवढं ऐकल्यावर तरी आता भानावर ये राजू, आणि देवयानीचा नाद सोड. अरे तुला सुंदर मुलगीच मिळो पत्नी म्हणून, अशी मी प्रार्थना करीन देवा पाशी.

राजू आता चवताळला. म्हणाला

आता माझ्या लक्षात यायला लागलय. विकास श्रीमंत आहे आणि  He must have paid a heavy price to buy you all. देवयानी तू या विकल्या गेलेल्या लोकांच्या trap मधे फसली आहेस हे तुला कसं कळत नाही ? हा सगळा या विकासचा बनाव आहे. फार हुशारीने त्यांनी प्लॅनिंग केलं आहे. लक्षात घे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सावध हो.

हे अपमानास्पद बोलणं ऐकल्यावर सुप्रियाचे दोन्ही मित्र उठले. त्यांच्या आविर्भावा वरून स्पष्टच दिसत होतं की ते राजूला आता सोडणार नाही म्हणून, पण विकास ने त्यांना थांबवलं. विकास अजूनही शांतच होता. सर्वांनाच त्यांच्या शांत पणाचं आश्चर्य वाटत होतं. पण सुप्रियाला आठवलं, देवयानी काय म्हणाली ते. विकास कधीही पॅनीक होत नाही म्हणून. तिला विकासचं कौतुकच वाटलं. खरं तर विकास केव्हाही राजूचा चोळामोळा करू शकत होता पण त्याने तसं काही केलं नाही.

एवढं झाल्यावर आता विकास उठला आणि राजूला म्हणाला.-

हे  बघ राजू, सुप्रीम कोर्टाने म्हणजे देवयानीनी आत्ताच  final verdict दिलं आहे. तिला तुझ्याशी संबंध ठेवायचा नाहीये. तेंव्हा आता तू येथून  निघ. याच्या पुढे देवयानीचं नाव देखील काढायच नाही.

विकास, तू म्हणतोस की सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. पण मला आता एकदा अपील करायचं आहे. आणि ते मी करणारच.

राजू अजूनही हार मानायला तयार नव्हता. त्याला इतकं निर्लज्जा सारखा बोलतांना पाहून सर्वांना वाटलं की आता विकासचा संयम संपला आणि राजू मार खाणार. पण विकास अजूनही शांतच होता. म्हणाला –

ओके जर देवयानी ऐकून घ्यायला तयार असेल तर माझी हरकत नाही. Go ahead

थॅंक यू, अस म्हणून राजू देवयानीला म्हणाला –

देवयानी तू इथे सर्वांच्या प्रभावाखाली आहेस. तू सारा सार विचार विचार करण्याची बुद्धी गमावून बसली आहेस. आपण असं करू बाहेर कुठे तरी कॉफी शॉप मधे जाऊ आणि तिथे  एकांतात बोलू. जिथे ही मंडळी असणार नाहीत.

आता मात्र कमाल झाली. राजू आपला हेका सोडायला अजिबात तयार नव्हता. तो विकासच्या संयमाची जणू काही परीक्षाच घेत होता. विकासला सुद्धा क्षणभर वाटलं की एक थप्पड  पुरेशी आहे, याला चूप बसवायला. पण तो शांत राहिला. त्यानी विचार केला की देवयानीच्या उत्तरानंतर बघू काय करायचं ते. देवयानीनी त्याच्याकडे बघितलं आणि त्यानी मान हलवून संमती दर्शक सिग्नल दिला. मग देवयानीनी बोलायला सुरवात केली.

पुन्हा एकदा कॉफी शॉप ? हे बघ राजू, तुला जे काही बोलायचं होतं ते आठ दिवसांपूर्वी कॉफी शॉप मधे आपण भेटलो होतो तेंव्हा बोलून झालं आहे. आणि त्याच वेळेला मी त्याचं उत्तर पण दिलं आहे. आता पुन्हा रीपीट टेलिकास्ट करण्यात मला अजिबात इंट्रेस्ट नाहीये. आता मी काय सांगते आहे ते ऐक. मला तुझ्याशी मुळीच संबंध ठेवायचा नाही. इतके दिवस तुला सहन केलं ते तू सुप्रियाचा मित्र आहेस म्हणून. पण आता नाही. माझं लग्न झाल्यावर माझ्या घराची वाट धरायची  नाही. जर दिसलास तर विकासला मी रोखू शकणार नाही. तुझ्या तब्येती साठी ते नक्कीच चांगलं असणार नाही. तेंव्हा आता माझं नाव सुद्धा तू विसर. हे शेवटचं तुला निक्षून सांगते आहे. Now leave.

देवयानी

Leave, at once. आता आपला  संबंध कायमचा संपला आहे.

राजूने एकदा सर्वांच्या कडे नजर फिरवली आणि त्याला समजलं की आपण इथून जाण्यातच शहाणपणा आहे. तो चालला गेला.

त्यानंतर थोडा वेळ घडलेल्या प्रसंगावर चर्चा झाली. आणि मग सुप्रियाचे मित्र पण पांगले. सुप्रिया विकास ला म्हणाली की

विकास तू खूपच शांत होतास, तुला असं नाही वाटलं का की राजूला चांगली समज द्यावी म्हणून ?

मला पहायचं होतं की देवयानी कसं हाताळते हे प्रकरण. जर गोष्टी हाताबाहेर जात आहेत असं वाटलं असतं तर कंट्रोल आपल्या हातात घ्यायला मी होतोच की इथे. पण तशी वेळच आली नाही. Dewayaani had handelled it very bravely and nicely.

मग आता काय करायचा विचार आहे ?

काही नाही. Wait and watch. एवढंच करायचं. मी आणि देवयानी जरा बाहेर फिरून येतो फ्रेश वाटेल.

देवयानी आणि विकास बाहेर पडले. पुढच्या चौकात सिग्नल वर थांबले असतांना शेजारी पोलिसांची जीप थांबली. विकास ने वळून पाहिलं तर इंस्पेक्टर शीतोळे.

देवयानी जेंव्हा अडकली होती तेंव्हा हेच शीतोळे आले होते. नंतर सुद्धा विकास त्यांना भेटला होता आणि त्याच्या आणि देवयानीच्या ओळखीची माहिती त्यांना दिली होती आणि धन्यवाद पण दिले की त्यांनी पॉजिटिव रीपोर्ट दिल्या मुळेच  देवयानीशी ओळख वाढली म्हणून. त्या नंतर सुद्धा तो इंस्पेक्टर साहेबांना सहज भेटला होता. आज ते जेंव्हा दिसले तेंव्हा हाय हेलो झालं आणि शीतोळे म्हणाले की सिग्नल पार करून जरा थांबा वहिनींची ओळख करून द्या. असे कसे जाता आहात .

मग चौक पार करून विकास आणि शीतोळे थांबले.

काय साहेब, देवयानीला तुम्ही ओळखताच, नवीन काय सांगणार ?

कसं चाललंय ? लग्नाला बोलवायचं विसरू नका बरं.

नाही नाही, अहो तुम्हाला कसं विसरू ? तुम्हीच आमच्या भेटीचे पहिले साक्षीदार आहात. लग्न डिसेंबर मधे आहे. येईनच मी आमंत्रण द्यायला.

बाकी कसं काय ? सगळं ठीक आहे न ?

अं , थोडा प्रॉब्लेम झाला आहे साहेब, तुम्हाला सांगू की नको असा विचार करतोय.

सांगून टाका मनात ठेऊ नका. वेळ निघून गेल्यावर भारी पडेल.- शीतोळे  

ओके सांगतो पण कुठे सांगू, इथेच ? – विकास

समोर एक छोटं हॉटेल दिसतं आहे तिथेच बसू. चला. शीतोळे म्हणाले.

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired