Dec 06, 2021
मनोरंजन

देवयानी, विकास आणि किल्ली भाग 4

Read Later
देवयानी, विकास आणि किल्ली भाग 4

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

भाग 4

भाग   3 वरून  पुढे  वाचा ................

 

त्या शनिवारी संध्याकाळच्या फ्लाइट ने विकास नागपूरला गेला. आई ला आणि त्याच्या वहिनीला जरा आश्चर्यच वाटलं कारण की तो येणार असल्याचं त्यानी सांगितलं नव्हतं. साधारण पणे  आदल्या दिवशी तो फोन करून सांगायचा.

बाबा आणि भय्या दोघंही दिसत नाहीयेत. आज इतका उशीर झाला ?

अरे ते दोघंही सकाळीच मुंबईला गेले आहेत. कसली तरी मीटिंग आहे. उद्या सकाळी येतील. पण तू कसा  अचानक आलास ? काही खास आहे का ? आधी बोलला असतास तर हे लोक मुंबईला गेले नसते.

असू दे. उद्या सकाळी तर येणार आहेत ना, मग झालं तर.

अरे पण इतक्या तातडीने आणि न कळवता आलास, काय कारण आहे ते तरी सांग. काही अडचण आहे का ?

नाही ग आई. असंच  कंटाळा आला म्हणून आलो.

बरं चल जेवायला काय करू ते सांग. त्यांची वाहिनी तिथेच उभी होती. ऐकत होती की काय करायचं ते.

तेवढ्यात अश्विनीचा म्हणजे विकासच्या वहिनीचा फोन वाजला. विकासच्या मोठ्या भावाचा म्हणजे भैय्या चा फोन होता.

आम्ही आत्ता विमानात बसलो आहोत. आणि जेवायला घरीच असणार आहोत.

अहो, विकास पण आत्ताच आला आहे.

अरे वा. चांगलच आहे की. चल विमान सुरू होतं आहे. ठेवतो.

सगळे आल्यावर, रात्रीची जेवणं झाल्यावर समोरच्या हॉल मध्ये बैठक भरली.

हं, काय मग विकास, काय म्हणतोस ?

देवयानीने जे फोटो पाठवले होते त्यांचे प्रिंट विकासने काढून आणले होते. ते सर्वांच्या समोर ठेवले.

कोण आहे ही मुलगी ? इतकी सुंदर मुलगी तुला भेटली कुठे ? – बाबा

देवयानी नाव आहे तिचं. आणि मग त्यानी सुरवाती  पासून सगळी कथा सांगितली.

सगळं सिनेमातल्या सारखंच झालं की आणि तू सुद्धा सिनेमात असल्या सारखा एक दीड महिन्याच्या ओळखी वरून सरळ लग्नाच्या पायरी पर्यन्त पोचला ? - आई म्हणाली.

आई, देवयानी खरंच चांगली मुलगी आहे. मला म्हणाली, सगळ्यांची अनुमति घेऊनच पुढे जायचं. तुम्ही एकदा तिला भेटा, मग सगळ्या शंका दूर होतील.

अरे  पण पत्रिका तर जुळायला हवी. ती बघितली आहे का ?

ते तुम्ही बघा. मला त्यातलं काही कळत नाही.

ठीक आहे, तू तिची जन्म तारीख, वेळ आणि जिथे जन्म झाला त्या गावाच नाव मला दे. मी उद्याच गुरुजींकडे जाते. बाकी फोटोवरून तर मुलगी चांगली वाटते आहे. सुंदर तर आहेच. स्वभाव कसा  आहे ते भेटल्यावरच कळेल.

स्वभाव पण छानच आहे. मनमिळावू आहे. बोलण्यात मार्दव आहे. तू काळजी करू नकोस. मी उद्याच तिला फोन करून डिटेल्स मागवून घेतो.

विकास ची वाहिनी म्हणाली की पत्रिका पाहिल्यावर विडियो कॉल करशील का  म्हणजे आम्हाला पण बोलता येईल. ओळख होईल. आईने पण मान डोलावली

दुसऱ्या दिवशी त्यांनी देवयानी ला फोन  केला.

मुंबईला आहेस की बेळगाव ला ?

बेळगाव ला. काय म्हणतोस ? काय म्हणते तुमच्या घरची आघाडी ?

तसं सगळं ओके आहे. फक्त कुंडली पाहायची आहे असं म्हणताहेत. बाकी तुझ्या फोटो पाहिल्यावर  नाकारण्यासारख काहीच नव्हतं.

मला माहीत होतं ते. मी सगळे डिटेल्स तयार ठेवले आहेत. तुला लगेच पाठवते.

तुला कसं माहीत होतं ?

आमच्या घरी काही वेगळं झालेलं नाहीये. तुझा फोटो सगळ्यांना पसंत पडला आहे. पण दोन गोष्टींवर गाडी अडली आहे.

कोणच्या ?

एक तर  इतक्या दूर मुलीला द्यायची का आणि कुंडली जुळते का ? म्हणून कुंडली बघायची आहे. त्यामुळे तू पण तुझे डिटेल्स पाठवून दे.

ओके. मी पण लगेच पाठवतो.

कुंडल्या जुळल्या. गुण फक्त 22 च जुळले, पण गुरुजींनी सांगितलं की no problem. बाकी पत्रिका उत्तम आहे. मुख्य म्हणजे लग्ना  नंतर भाग्योदय आहे.

मग काय ? आई आणि वाहिनी म्हणाल्या की देवयानी ला फोन लाव. तिच्या घरी काय झालाय ते कळू  दे आम्हाला.

विकास सुद्धा अधीर झाला होता. पण तो म्हणाला –

आपल्या कडे सगळ्या गोष्टी भराभर झाल्या पण तिकडे काय परिस्थिती असेल आपल्याला माहीत नाही. जरा थांबू. संध्याकाळी लावतो फोन. किंवा जर सगळं ओके असेल तर. तीच करेल

आई आणि वहिनींना काही पटलं नाही, पण बाबांच म्हणाले की विकास च बरोबर आहे. थांबू आपपण संध्याकाळ पर्यन्त. कधी गुरुजी भेटतात कधी नाही, त्यामुळे थोड थांबूनच जाऊ. बाकी पत्रिका जुळताहेत म्हंटल्यांवर मला तशी काही अडचण दिसत नाहीये. तेंव्हा तुम्ही दोघी जरा सबुरीने घ्या.

संध्याकाळी पांच  वाजता देवयानीचाच फोन आला.

काय झालं.

दोन मिनिटं ती काहीच बोलली नाही. मग म्हणाली अरे आईने आमच्या काका, काकू, मामा, मावशी वगैरे सगळ्यांना बोलावून घेतलं आहे.

कशाला ?

आपल्या लग्ना बद्दल चर्चा करायला. इथे आमच्या मधे अशीच पद्धत आहे. लग्न म्हंटलं की सगळे गोळा होतात.  हॅलो, मी नंतर फोन करते. मावशी आलेलीच आहे आणि आत्ता काका, काकू, आत्या वगैरे मंडळी आलेली दिसताहेत. म्हणजे आता बैठक सुरू होईल. बाय.

विकास जरा खट्टू झाला. बेळगाव ला काय होतं हे जाणून घेणं महत्वाचं होतं. पण आता तिच्या फोन ची वाट पहावी लागणार होती. रात्री जरा उशीराच अकरा

वाजता तिचा फोन आला. विकास ने ताबडतोब उचलला. तिचा आवाज जरा दबलेलाच येत होता.

काय ग काय झालं. तुझा आवाज का असा रडवेला वाटतोय ?

घोळ झाला आहे.

काय घोळ झालाय ?

अरे  मघाशी सांगितलं ना की आमच्या इथे आईने सर्व नातेवाईकांना बोलावून घेतलं. सर्वांचं मत विचारायला.

मग ?

तेच झालं ज्याची मला भीती वाटत होती. सर्वांनी एकच मुद्दा उचलून धरला. की नागपूर इतकं दूर आहे, स्थळाची माहिती कशी मिळेल ? उद्या काही कमी जास्त झालं तर काय करायचं ? मुलगी लहान आहे. तिला तिचं हित कळत नाही. आपणच तिला समजावून सांगायला हवं. इतक्या दूर मुलगी द्यायची म्हणजे जरा टेंशन असणार. आपल्या आजूबाजूला, मुंबई, पुण्याच्या साइडचंच स्थळ बघा. आपल्याला मुलगी जड झाली आहे का ? आणि आईला त्यांचं मत आता पटायला लागलय. मला म्हणाली की पुन्हा एकदा विचार कर. ही सगळी आपली जिव्हाळ्याची माणसं आहेत. त्यांचं म्हणण पण मला बरोबर वाटतंय.

हे भगवान !  अब क्या करे ?

अरे माझ्या मावशीने तर असं म्हंटलं की आपल्याला शहराची सवय आहे. मुंबई,

पुण्याची गोष्ट वेगळी आहे, नागपूर सारख्या गाव खेड्यात आपल्या मुलीचा कसा निभाव लागेल ? नको नको इकडचंच स्थळ बघा.

नागपूर हे खेडं  आहे ?

अरे, या लोकांना मुंबई, पुणे, बंगलोर या पलीकडे काहीच माहीत नाही. ही शहरं सोडून बाकी सगळी खेडी असा पॉप्युलर समज आहे. मग सुरेश ने त्यांना गूगल उघडून नागपूर ची सगळी माहिती वाचून दाखवली. फोटो दाखवले.

मग ?

काही नाही. पालथ्या घड्यावर पाणी

अग पण पुरुष मंडळींना तर माहिती असेल.

आहे ना. पण बोलणार कोण ? कोणालाच नागपूर नको होतं. म्हणून कोणीच बोललं नाही.

विकास आता चवताळला.

ते सर्व जावू दे खड्ड्यात. आपण काय करायचं आता, ते बोल. तुझा काय विचार आहे ?

मला तर काहीच समजत नाहीये. तूच काही तरी मार्ग काढ.

हे बघ, आई बाबांनी आधी हो म्हंटलं होतं ना, मग आता पुन्हा तू त्यांच्याशी उद्या सकाळी बोल आणि पहा प्रयत्न करून पटवून देण्याचा. मी पण घरात सर्वांशी बोलतो आणि बघतो काही मार्ग निघतो का. हे प्रकरण आता रेंगाळणार असं दिसतंय. पण तू रणांगण सोडू नको. लढ. आम्ही आहोतच तुझ्या बरोबर. आई आणि वाहिनी तर तुझ्याशी बोलायला अगदी अधीर झाल्या आहेत.

ठीक आहे. पण तुझ्या घरून तर फूल सपोर्ट आहे ना. नक्की सांग ना म्हणजे मला पण बोलायला बळ  येईल.

मी फोन बंद करतो आणि विडियो लावतो. मग बोला तुम्ही लोक.

पण आत्ता सगळे झोपले असतील ना ?

नाही सगळे इथेच आहेत. तुझ्याच फोनची वाट बघत होतो.

आत्ता  बरीच रात्र झाली आहे. मीच  उद्या ताल माल पाहून सकाळी  कॉल करते.

तिच्याशी बोलायला मिळालं नाही म्हणून संगळ्यांचीच निराशा झाली.

 

सकाळी देवयानीच्या घरी काय बोलणं झालं ते इकडे कळलं नाही. पण देवयानीचा साडे आकाराच्या सुमारास फोन आला.

हॅलो

मी आज सकाळी किल्ला लढवला. आईला आणि बाबांना मी पटवून दिलं की एकदा तरी तुझ्या आई बाबांशी बोला आणि मगच ठरवा. समोरच्यांची बाजू काय आहे हे बघितल्या शिवाय निर्णय घेणं कसं चुकीचं आहे हे मी त्यांच्या गळी उतरवलं. आता दोघांनाही समोरा समोर आणण जरूरी आहे. कसं करूया ?

मला असं वाटतं की तू आधी  माझ्या आई, बाबा आणि वाहिनींशी विडियो लावून बोल. मग तुझं काय मत आहे ते सांग. मग ठरवू.

ओके. असं म्हणून तिने विडियो कॉल लावला. विकासनी ओळख  करून दिल्यावर जवळ जवळ अर्धा तास बोलणं चालू होतं.

कशी वाटली देवयानी ?

दिसायला तर चांगली आहेच, बोलून चालून पण छान आहे. तू एवढा धीट कधी झालास रे ? आई बोलली.

धीट कसला, तुम्हाला सगळं सांगितलं आहे. प्रवाहा बरोबर वाहत गेलो इतकंच. बाकी पायऱ्या तीच चढली. मी फक्त तिच्या बरोबर.

अरे पण इतकी सुंदर मुलगी तुझ्यावर भाळली म्हणजे आश्चर्यच आहे.

अरे भागवान, विकासच्या वडिलांनी कॉमेंट केली. रोमिओ को देखो जूलिएट की नजरसे. अशी म्हणच आहे न.

तरी पण आश्चर्यच आहे. तू नीट चौकशी केलीस ना रे ?

अग आई, तिच्याशी बोलल्यावर तुझं काय मत झालाय ? किती वेळ बोलत होता तुम्ही दोघी जणी, ती अशी तशी वाटते का ?

नाही रे. एकदम सोज्वळ वाटली. पण काय आहे की जन्माचा जोडीदार जरा पारखूनच  घ्यावा असं म्हणते मी.

आईचं म्हणण बरोबरच आहे विकास. आमचा होकार आहेच. पण एकदा त्यांचं घर बघून आल्यावर जरा समाधान होईल. असं कर तू देवयानीशी बोल आणि दोन्ही कुटुंबाची गाठ भेट अरेंज करा. म्हणजे त्यांच्याही मनात असेच विचार आले असतील तर, आणि ते तसे येणं हे साहजिकच आहे, त्यांच पण शंका निरसन होईल.

विकास ला पण ते पटलं. त्यांनी देवयांनीला फोन लावला. तिला काय चर्चा झाली ते सांगितलं. आणि म्हणाला आता तू आई, बाबांशी बोल आणि ठरवा काय ते. आणि मला सांग. देवयांनीला पण ते पटलं. ती म्हणाली-

मी आत्ताच आई बाबांशी बोलते आणि तुला कळवते. ठेवते फोन.

तासभराने देवयानीचा फोन  आला.

बाबा म्हणतात की तुझ्या बाबांशीच बोलतो म्हणून.

ओके. मग आता बाबांना देतो.  

दोघांच अर्धा तास बोलणं झालं.

काय झालं बाबा ? विकासने विचारलं.

दोन्ही कुटुंब पुण्याला भेटणार असं ठरलं. मी सांगितलं की तुम्ही डेट ठरवा. आम्ही येऊ. No problem. ते कळवतो म्हणाले. बाकी माहिती विचारत होते ती दिली. मी पण त्यांना विचारलं.

काय करता  तर ते म्हणाले की ते इन्कम टॅक्स मध्ये आहेत. स्वत:चं बेळगावला घर आहे. धाकटा मुलगा डॉक्टर होतो आहे. शेवटच्या वर्षाला आहे. बरेच नातेवाईक बेळगावलाच आहेत, बाकी मुंबई, पुणे, कोल्हापूरला आहेत. झालं. अजून काय माहिती पाहिजे ? आता भेट झाल्यावरच सविस्तर बोलू.

रात्री देवयानीचा फोन आला, खूप खुशीत होती. म्हणाली

विकास, गड जिंकला मी. बाबा म्हणताहेत की माणसं चांगली दिसताहेत. पुढच्याच आठवड्यात भेटू. बाबा उद्याच जाऊन सुट्टी केंव्हा मिळते ते बघणार आहेत. मग कळवतील. उद्या मी पण मुंबई ला जाणार आहे.

आणि मग त्यानंतर रात्री १२ वाजे पर्यन्त त्यांचं बोलणं चाललं. विकास पण सॉलिड खुष होता. आता सर्व अडसर निघाले होते.

दोन तीन दिवस असेच गेलेत. दोघांच  बोलणं रोजच होत होतं.

चौथ्या दिवशी देवयानी म्हणाली की बाबांची सुट्टी sanction झाली आहे, आणि पुण्याच्या ऐवजी ते लोक नागपूरलाच  येण्याचा प्लॅन करताहेत.

हे तर फारच छान झालं. त्या निमित्तानी नागपूरच्या बद्दल जे गैरसमज आहेत, ते तरी निघून जातील. चांगला चार दिवसांचा प्रोग्राम बनवा, म्हणजे सागळीकडे फिरवता येईल. अग अगोदर कळवशील म्हणजे मला सुट्टी घेऊन जाता येईल. तुला येणं जमणार आहे का ?

प्रयत्न तर करतेच  आहे. पण तुला माहीतच आहे की बॉस खडूस आहे म्हणून. आणि आता तर माझं लग्न ठरतंय म्हंटल्यांवर तर जास्तच  चवताळला आहे.

मग ?

मग काही नाही. सुट्टी नाही दिली तर सरळ निघून येणार. काय करेल ? नोकरी तर सोडलीच आहे. जे होईल ते पाहिल्या जाईल.

ग्रेट. चालू दे. चिंता की कोई बात नही. हम हैं, आपके साथ.

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired