देवयानी, विकास आणि किल्ली भाग ९

देवासीयांनी आणि विकासच्या लग्नात एकामागोमाग अडथळ्यांची कुलूपं .

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मानिषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 भाग 9

भाग  8 वरून  पुढे  वाचा ................

साखरपुडा तर आटोपला. विकासच आणि देवयानी चं पण रुटीन सुरू झालं.

नोटिस पीरियड संपल्यावर देवयानी पुण्याला आली आणि नवीन नोकरी जॉइन केली. लग्न होई पर्यन्त सुप्रिया कडेच राहणार होती. सुप्रियाची अजून एक शांती लक्ष्मी   नावाची रूम मेट होती. ती पण बेळगावचीच होती. आणि देवयानी तिला थोडी फार ओळखत होती. देवयानी इंटरव्ह्युला आली होती तेंव्हा ती नेमकी बेळगावला गेली होती. ती असती तर देवयानी अडकली नसती आणि विकासची आणि देवयानीची गांठ पडलीच नसती. तिची पण काही हरकत नव्हती. सहा आठ महिन्यांचा तर प्रश्न आहे अस ती म्हणाली.

आता काय, दोघेही पुण्यातच, मग काय जेंव्हा दोघांच्या वेळा मिळायच्या तेंव्हा  भेट व्हायचीच. विकासने आता देवयानीला बरोबर घेऊन घर सजवायला सुरवात केली. तिच्या आवडीचे पडदे, स्वयंपाकघर तिच्या आवडी आणि गरजे प्रमाणे करून घेतलं. शेजाऱ्यांशी तिची ओळखी करून दिली. त्यांनाही देवयानी आवडली. ड्रॉइंग रूम पण सजली. मग एक दिवस रविवारी सर्व शेजार्‍यांना संध्याकाळी जेवायला बोलावलं. देवयानीनी सगळा स्वयंपाक स्वत: केला. सर्व शेजार्‍यांनी तोंड भरून तिची तारीफ केली. दिवस कसे छान जात होते.

सुप्रिया आणि लक्ष्मी जवळ जवळ पांच वर्ष पुण्यात होत्या.. त्यांचं त्यामुळे मित्र मंडळ बरंच मोठं होतं.आता त्या मंडळीत देवयांनी पण सामील झाली. तिच्या सौंदर्याची सगळ्यांनाच भुरळ पडली होती. देवयानीनी सगळ्यांशी जितक्यास तितके असेच संबंध ठेवले होते. एरवी बाहेरच भेटणारे, पण आता सुप्रियाच्या मित्रांच्या घरी चकरा वाढल्या होत्या. देवयांनी जेंव्हा मोकळा वेळ मिळेल तेंव्हा तेंव्हा विकासच्या फ्लॅट वर जायची. विकास असो व नसो. घर आणखी कसं सजवता येईल आणि कुठलं सामान आवश्यक आहे या बद्दल शेजारच्या काकूंना बोलावून त्यांच्याशी चर्चा करायची. आता त्या सोसायटी मधल्या जवळ जवळ सगळ्याच बायका तिला ओळखायला लागल्या होत्या. आणि सर्वांना तिचा निगर्वी स्वभाव फारच आवडला होता.

देवयांनीला कळत होतं की सुप्रियाच्या मित्रांना  तिच्याशी ओळख वाढवायची आहे, त्यामुळे ती जरा दूरच  राहण्याचा प्रयत्न करत होती बाकीचे मित्र समजूतदार होते, ते ही देवयानीकडे आकर्षित झाले होते पण मर्यादा राखून होते. पण सुप्रियाचा एक मित्र राजू, तो धारवाडचा होता. देवयानी पायी पागल झाला होता. इतक्या वेळा चकरा मारून देवयांनी केवळ एक दोनदा भेटली होती आणि जूजूबी  बोलून लगेच फ्लॅट वर निघून गेली होती. राजू बराच नाराज झाला होता. सुप्रियाने आणि बाकीच्या मित्रांनी पण त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. देवयानी भेटावी म्हणून तो रात्री उशिरा घरी यायला लागला. एक दोनदा असं झाल्यावर देवयानीनी आणि सुप्रियाने त्याला स्पष्टच सांगितलं की आता यापुढे तू घरी यायचं नाही. देवयानीचं लग्न ठरलेलं आहे आणि तू आता तिचा नाद सोड.

एक दिवस संध्याकाळी हा राजू, देवयानीच्या ऑफिस च्या बाहेर तिची वाट बघत उभा होता. देवयानी बाहेर पडली तेंव्हा संध्याकाळचे साडे सात  वाजले होते. बाहेर पडल्या पडल्याच राजू ने तिला हाक मारली. देवयानीनी स्कूटी थांबवली आणि वळून पाहिले की कोण हाक मारताय म्हणून. राजुला बघितल्यावर तिची मुद्रा जरा त्रासिक झाली.

हाय देवयानी

हाय राजू, इथे कसा काय ?

तुझीच वाट पहाट थांबलो होतो.

कशाला ?

थोड तुझ्याशी बोलायचं होतं.

बोल.

आपण कोपऱ्यावरच्या कॉफी शॉप मधे जावूया का ?

अरे इथेच बोल ना. मला जरा घाई आहे.

प्लीज, जरा महत्वाचं आहे.

ओके. पण लवकर सांग. मला आधीच उशीर झाला आहे.

कॉफी शॉप मधे गेल्यावर देवयानी म्हणाली की

हं बोल आता.

अग  कॉफी तर येऊ दे पिता पिता बोलू.

NO. ताबडतोब बोल नाहीतर मी निघते. मला उशीर झाला आहे.

तुला त्या विकासलाच भेटायची घाई झाली आहे ना ? माहीत आहे मला. पण देवयानी, मला तुझ्या विषयी  खूप वाटत. मी प्रेम करतो तुझ्यावर. माझ्याशी लग्न कर मी तुला खूप सुखात ठेवीन. तुला नोकरी करायची पण जरूर पडणार नाही . अग सात पिढ्या बसून खातील इतकी श्रीमंती आहे आमच्या घरात. त्या विकासला काय एवढा गूळ लागला आहे की त्याच्या साठी तू वेडी झाली आहेस. सोड त्याला. आणि माझ्याकडे ये.

राजू, झालं तुझं बोलून, आता मी काय सांगते ते ऐक. माझा विकास बरोबर साखरपुडा पण झाला आहे आणि हे तुला पण माहीत आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि हे लग्न होणारच. आता संपत्ति बद्दल बोलायचं तर मला पैशाचा मोह नाही. तुझ्या विषयी माझ्या मनात कुठलीही भावना नाही. तेंव्हा तू आता माझा नाद सोड. हे मी तुला शेवटचं निक्षून सांगते आहे. बाय.

अग कॉफी ? ती तरी पिऊन जा.

तूच पी. आणि देवयानी उठून गेली. ती सरळ विकासच्या फ्लॅट वर गेली.

विकास घरी  आला होता आणि कॉफी करत होता. देवयांनीला पाहिल्यावर त्यांनी कॉफी वाढवली. टेबलावर कॉफी ठेवून तो काही म्हणणार तेवढ्यात त्याचं देवयानीच्या चेहऱ्याकडे लक्ष्य गेलं.

काय ग काय झालं ? चेहरा असा का उतरला आहे ? नेहमी चमचमता  चेहरा आज का बरे काळवंडला ? आई रागावली का ?

विकास चेष्टा नको. माझा मुळीच मूड नाहीये.

मग विकास ने सुर लावला सुर कसला ? बेसुर आवाजात गायला.

नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला.

ए गप्प बस,

का ग ?

इतक्या सुंदर गाण्याचा आपल्या बेसुर आवाजाने पूर्ण चोळामोळा केलास. ए बाबा तू कृपा करून  गाऊ नकोस. रजा मुराद च्या सारखा आवाज असणाऱ्याने गायचं नसतं. त्या दमदार आवाजाचा उपयोग दुसरी कडे कर. पण गाऊ नकोस.

That reminds me, हा रजा मुराद कोण आहे ते आज पर्यन्त सांगितलंच नाहीस. कोण आहे हा ?

तू सिनेमे बघत नाहीस ?.

नाही, तिकीट काढून तीन तास एकाच ठिकाणी बसून राहणे हे मला जमणारच  नाही. मला ती शिक्षा वाटते.  पण त्याचा इथे काय संबंध आहे ?

रजा मुराद हा अॅक्टर आहे आणि त्याच्या दमदार आवाजा बद्दल फेमस आहे.

अच्छा म्हणून मला माहीत नाही . बरं पण ते जाऊ दे. तू एवढी मलूल का आहेस ते सांग  ना.

खूप गोंधळ झाला आहे.

अग पण मग काय झालं ते तरी सांगशील का ? मला कळू  तरी दे.

मग देवयानिनी घडलेला प्रसंग सांगितला. म्हणाली-

आपलं लग्न ठरलं आहे हे इतक्या वेळा सांगूनही हा माणूस माझा पिच्छा सोडायला तयार नाही. काय करावं ते समजत नाहीये.

समजायचं काय असतं त्यात. अग तू  इतकी सुंदर आहेस की कोणीही तुझ्याकडे आकर्षित होईल. तूच म्हणाली होतीस ना की बॉस तुझ्या भोवती पिंगा घालतो म्हणून.

अरे हो पण नोकरी बदलली आणि तो चॅप्टर संपला. याचं तसं नाहीये. राजू आणि आपण दोघेही इथेच राहणार आहोत. मग कसं करणार ?

प्रयत्न करूनही काही साध्य होत नाही हे कळल्यावर तो नाद सोडून देईल. रीलॅक्स. आणि हा अनुभव तुला काही पहिल्यांदा आला नसेल. यापूर्वीही अनेक लोक तुझ्या भोवती  फिरले असतील. अग फुलांच्या भोवती भुंगे  रुंजी घालतातच. मनावर घेऊ नकोस. पोरगी पटली तर उत्तमच, या पद्धतीने सगळे वागतात.

विकास तू खूपच लाईटली घेतो आहेस. पण मला या गोष्टींचा खूप त्रास होतो. ज्याने रुंजी घालायची तो काही भावच देत नाही. त्याच्या गावीही नसतं. अलगद फूल हातात येऊन पडलंय ना म्हणून इतकी बेफिकिरी. देवयानी अतिशय फणकाऱ्याने बोलली. मला आता तुझ्याशी बोलायचंच नाही. मी जाते घरी. बाय

मी तुझ्याशी बेफिकिरीने वागतो ? ही तर breaking news आहे. तुच  मिनटा मिनटा ला रूसत असतेस. मला मुळीच धूप घालत नाहीस. सारख्या धमक्या देत असतेस. जाते मी बाय, फोन कापून टाकतेस, विडिओ कॉल करत नाहीस, हे सगळं काय आहे ? माझी बेफिकिरी ?

मग असच असतं. तूच म्हणाला होतास ना की वाटेल तितके काटे  बोचव म्हणून, विसरलास का ?

काटयांची बोच तर मी घेतोच आहे पण मध कुठे आहे ? तो तर वाट्याला येतच नाहीये.

तपश्चर्या. मिस्टर, तपश्चर्या

हे काय नवीनच ?

तपश्चर्या करावी लागते. ह्याचं उदाहरण मी नाही, विश्वामित्रानेच घालून दिलं आहे. त्याने तपश्चर्या केली म्हणूनच त्याला मेनका मिळाली.

त्याने तपश्चर्या केली म्हणून त्याला मेनका मिळाली ? काय म्हणतेस काय ? another breaking news मला माहीत नव्हतं.

कळलं ना आता, मग फॉलो करा.

देवयानी मॅडम, विश्वामित्रांनी मेनके  साठी तप नव्हतं केलं. मेनका त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी आली होती. इंद्राने  तिला पाठवलं होतं. तिच्या मिशन मधे ती यशस्वी झाली, आणि विश्वामित्रांची तपश्चर्या भंग झाली.

काही असो, विशमित्राने तप केलं म्हणूनच त्याला मेनका मिळाली. नाही तर तिला कशाला इंद्राने पाठवलं असतं ?

अजब आहे, मॅडम तुमचं लॉजिक, अजब आहे.

मग मी IT वाली आहे. आमचं कायमच लॉजिक वरच काम चालतं.

असल्या लॉजिक ने काम करता तुम्ही लोक ? हे भगवान ! इनसे तो भगवान भी बचा नहीं सकता.

अजूनही विचार कर, राजू तयार आहे किंबहुना तो अगदी आतुर झाला आहे. तुला चॉइस आहे लॉग आउट होण्याचा. सोचो.

अग माझी अवस्था पाहिल्यावर तो नक्कीच पळून जाईल. सोचो.

हे ऐकल्यावर, देवयानिनी सोफ्यावरचं कुशन उचललं आणि त्याच्या मागे धावली. मग काय ! विकासची बल्ले बल्ले. जवळ जवळ अर्धा तास त्यांचा घर भर धुमाकूळ चालला होता आणि मग दोघेही थकून सोफ्यावर एकमेकांच्या मिठीत विसावले.

उशीर झाला होता म्हणून त्यांनी घरीच जेवण मागवलं आणि मग विकास तिला सोडायला तिच्या बरोबर तिच्या घरांपर्यंत गेला. तिथेही फ्लॅट च्या खाली पार्किंग मधे अर्धा तास बोलण झालं.

सुप्रियाचा फोन आला देवयांनीला

कुठे आहेस देवयानी ?

अग मी इथेच आहे पार्किंग मधे.

पार्किंग मधे काय करते आहेस. ? विकास आहे का बरोबर.

हो.

अग मग त्याला वर घेऊन ये ना. खाली का ?

नाही तो जायलाच निघाला आहे. आणि विकास कडे वळून म्हणाली बाय विकास. मग विकास नाईलाजाने परतला. आणि देवयानी वर फ्लॅट मधे गेली.

तरी देवयानीला जातांना पाहून विकास ने एक गाण्याची ओळ  फेकलीच म्हणजे अक्षरक्ष: फेकलीच, ना सुर ना ताल. गाण्याचा आपमानच होता तो. पण भावना पोचल्या.

वाटेवर काटे वेचीत चाललो ....

देवयानी वळली, एक मस्त स्माइल दिलं आणि चालू पडली.

विकास घायाळ. त्याला वाटलं देवयांनी परतून येईल पण तसं काही झालं नाही. मग विकासने बाइक चालू केली आणि निघाला.

घर पोचतो न पोचतो तोच देवयांनीचा विडियो कॉल आला. मग काय तास भर कसा गेला ते दोघांनाही कळलच नाही.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all