देवा,मला मुलाचीच आई बनव(जोडभाग)

mother in law god preay.

देवा, मला मुलाचीच आई बनव.(जोडभाग)

पूर्व भाग लिंक..इथे वाचू शकता.
https://www.facebook.com/581606972323826/posts/951398632011323/?sfnsn=wiwspwa&extid=Uyo7wsgOaS9iD1mR


आई-बाबांच्या ओढवलेल्या परिस्थीतीमुळे सुखदा च्या मनावर चांगलाच परिणाम झाला होता. तसे जगणे आपल्या नशिबी येऊ नये म्हणून देवा मला मुलाचीच आई बनव असे दिवसातल्या क्षणगणिक प्रार्थना करीत होती. प्रार्थनेची परिणीती अथवा सुदैवान म्हणा तिला पुत्ररत्न प्राप्त झाले देखील.बाळाला साजेसं असं प्रसाद नाव ठेवले आई-बाबांच्या दुर्दैवी अंताचे दुःख काहीअंशी विसरून बाळाच्या संगोपनात सुखदा गुरफटून गेली.

प्रसादचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला बँकेत नोकरी लागली.अर्थार्जनाचे सोय झाली आता लग्न करून संसारास लागावे असे सुखदास वाटू लागले.त्या दृष्टीने त्या नवरा बायकोने प्रयत्नही सुरू केले. 

जवळच्याच नातेवाईकांनी एक स्थळ सुचविले. मुलीचा फोटो दाखवत ते म्हणाले "पैसाअडका मिळणार नाही पण मुलगी सुजाण, महत्त्वाकांक्षी आणि नाते जपणारी आहे. आपल्याच शहरातील आहे.चाळीत दोन खोल्यांच्या घरात आई-वडिलांसोबत राहते.वडील कापड मिल मध्ये कामाला आहेत.एकुलती एक मुलगी आहे."
"एकुलती एक ऐकल्यावर सुखदाने भुवया उंचावून त्वरित प्रश्न केला म्हणजे मुलीला भाऊ नाही?"
"नाही. एकुलते अपत्य आहे."
हे ऐकून मुलीस नकार द्यावा असे सुखदा आणि तिच्या नवऱ्याच्या मनात होते. पण प्रसादला मुलगी आवडली होतीे. मुलाच्या इच्छेपुढे ते दोघे बोलू शकले नाही.
यथासांग लग्नकार्य झाले आणि माप ओलांडून उर्मी सुखदा ची सून झाली.

उर्मी मध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता. प्रत्येक गोष्ट वास्तवाचे भान ठेवून आधुनिक पद्धतीने करण्यात तिचा हातखंडा होता.आत्मनिर्भर व्हावे म्हणून जवळच शिकवणी वर्गात अर्धवेळ नोकरी करण्याचा तिने निर्णय घेतला.प्रसादने तिच्या निर्णयाचे स्वागत केले.पण -सासर्‍यांना बद्दल शंका होतीे.

तिची शंका खरी ठरलीही होती.सुरुवातीला विरोध झाला पण घर सांभाळून अर्धवेळ नोकरी असल्याने ऊर्मीने समजावून सांगितल्यावर मुश्किलीने परवानगी मिळाली. पहिला पगार हाती येताच उर्मीने आईला आणि सासूला पैठणी विकत घेतली.

सुखदा बैठकीतच भाजी निवडत बसलेली होती."आई मी तुमच्यासाठी एक खास भेटवस्तू आणली आहे. डोळे बंद करा बघू."
ऊर्मीने हळूच पैठणी सासूच्या हातावर ठेवली.
"आता बघा" 
हातातील मोरपंखी नाचऱ्या मोराची पैठणी पाहून सुखदा आनंदली."अय्या, मोराची पैठणी !अशी पैठणी घ्यावयाचीच होती.कधी ची इच्छा होती ग पण नाही जमले .तू माझ्या मनातली इच्छा पूर्ण केलीस बघ. म्हणत उर्मीच्या डोक्यावर हात फिरवत तिचे कौतुक केले.

उर्मीने लगेच आईसाठी आणलेली पैठणीही सुखदास दाखविली." हे माझ्या आईसाठी आणली.आवडेल ना हो?  तिला पण माझ्या लग्नातच पैठणी घ्यावीशी वाटत होती. पण लग्न खर्चाचा विचार करून तिने घेतली नाही. ही पैठणी पाहून ती सुद्धा तुमच्यासारखीच हरखून जाईल बघा असं बरंच काही उर्मी उत्साहाने बोलत होती पण ऐकायला सासू कुठे होती?सासू तिच्या भूतकाळात गुंग होती.आईची मुलगी म्हणून केलेले कर्तव्य तिला कुठेतरी आत सुखावत होते पण सासू म्हणून अहं मन विद्रोह करीत होते आणि तो विद्रोह शब्दातून तोंडावाटे शेवटी बाहेर पडलाच.
"काय गरज होती ग दोन पैठण्या घ्यायची?फक्त तुझ्या आईला घेतली असती ना?उगाच वायफळ खर्च कशाला?" मलाच घ्यायला पाहिजे होती असे सुखदाला म्हणायचे होते पण सरळ न बोलता वाकडयातच उदगार निघाले.

क्षणभरापूर्वी पैठणी पाहून आनंदलेल्या सासूचा बदलता स्वर पाहून उर्मी बुचकळ्यात पडली.
"आई असे का म्हणताय ? तुम्ही जशा आहात माझ्यासाठी तशीच ती पण आहे. फक्त नात्यात थोडासा बदल आहे बाकी दोघींप्रति माझे प्रेम सारखेच आहे.पुढच्या पगारात मी दोघ बाबांना पण कपडे घेणार आहे."
काहीएक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत सुखदा नव्हती. निवडलेल्या भाजी चे ताट जागेवरच पडू देऊन पैठणी मात्र उचलून सुखदा खोलीत निघून गेली.

अशा बऱ्याच गोष्टी उर्मी दोघी घरांसाठी सतत करत राहिली. त्यावरून सुखदाच्या मनात नसताना सासू-सुनेत शीतयुद्ध सुरू राहिले.आपण असे का वागतोय? याचे उत्तर स्वतः सुखदाकडे नव्हते.
सासूच्या वागण्याने उर्मी मात्र दुखावली जात होतीे. कारण तिच्या लेखी दोघी कुटुंब सारख्याच जिव्हाळ्याची होती.

 उर्मी स्वतःचे कपडे बॅगमध्ये भरत प्रसादला म्हणाली "आठ-दहा दिवस मी आईकडे राहायला जातेय. चार वाजता आईचे गर्भपिशवीची शस्रक्रिया आहे, आता मी दवाखान्यातच जातेय.परस्पर तीकडूनच जाईल.
तुम्ही येताय ना?
"मी.......अग...मी विसरलोच.शस्त्रक्रिया किती वाजता म्हणालीस?"
प्रसादचा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतोय अस उर्मिला वाटले .
तुम्हाला एक सांगू माझ्या जोडीदाराबद्दल मला कसलीच अपेक्षा नव्हती.मला कोणी देखणा राजकुमार किंवा सर्व बाबतीत स्थिरस्थावर असे स्थळ नको होत होे.तर माझ्या कर्तव्याची जाणीव असणारा ,माझ्या आई-बाबांना ही आपलं मानणारा जोडीदार हवा होता.एवढीच काय ते वाटत होते. 
प्रसादला ऊर्मीचा बोलण्याचा रोख कळला.

तुझं ते माझं आणि माझं ते तुझं असं मानत संसाराची स्वप्न होती,आहे.आता तुम्हाला वाटेलही की हिला माहेरचाच  जास्त पुळका आहे तर तसे नाही तुमची नाळ जशी तुमच्या आई-वडिलांपासून आहे तशीच माझीही आहेच. दोघीं नाते माझ्यासाठी समानच आहेत. माझ्या मनास परकेपणाचा कधी स्पर्शही होत नाही. मग.....
 "हो गं अगदी बरोबर आहे तुझं.तू तुझं सर्व सोडून माझ्या घरात आली.माझ्या आई-बाबांना आपलं मानले. अगदी मनात कुठलाच आडपडदा न ठेवता. हे तर मी पण करू शकतोच कि आणि काही अंशी माझी पण  जबाबदारीच आहे.आणि त्याची जाणीव आहे मला बरं का?मस्तरीन बाई .तुझी थोडी गंम्मत करत होतो.मी आज बँकेत रजा टाकतोय आणि आईंची दवाखान्यातून सुट्टी झाली की इकडेच घेऊन येऊ. म्हणजे दोन्ही सांभाळता येईल तुला.आई बाबांसोबत मी बोलतो."प्रसादच्या बोलण्यावर ऊर्मी अभिमानाने पाहतच राहिली.तिच्या नजरेत नवऱ्याबद्दल असलेला अभिमान सरस उंचीवरच गेला.
आता इथेच माझी शिकवणी घेणार आहे का ? की निघणार आता....हसतच प्रसाद म्हणाला.

दवाखान्यात आपुलकीने विचारपूस,औषधे आणणे, इतर कामासाठी प्रसादची धावपळ पाहून उर्मीचे आई-बाबा धन्य झाले .
उर्मि ला आईची सेवा-काळजी करताना पाहून सुखदास स्वतःच्या आईची आठवण झाली आणि ती उर्मीच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली.

उर्मिस काही कळेनासे झाले."काय झालं आई ? काही चूकले का माझे ?माझी आई आपल्या घरी आहे म्हणून कोणी बोलले का तुम्हास?अशा रडत का आहात?"
            
"नाही ग.तुझं काही चुकले नाही.पंचवीस वर्षापूर्वी मी पण तुझ्यासारखे थोड धैर्य दाखवले असते तर माझ्या जन्मदात्यांनी ही दोनच सुखाचे क्षण लाभले असते ग. पण त्यांचा दुर्दैवी अंत झाला ती हळहळ अजूनही काळीज पोखरते माझं.तुला आई-वडिलांसोबत असं खंबीरपणे उभा पाहून मला माझीच लाज वाटू लागलीय ग.याबाबतीत सगळे मी स्वतःसोसलेले असतानाही माझी सासू जशी वागली तसच तुझ्यासोबत...माझा सासु पणाचा अहंकार म्हण की,वातावरणाचा परिणाम म्हणून अथवा संगतगुण लागला म्हण मी तुझ्यासोबत तीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न नकळत माझ्याकडून होत होता.माफ कर मला."

"माफी नका मागू हो आई?लहान तोंडी मोठा घास घेतेय पण सत्य सांगते तुम्हास.आपण आपल्यासोबत, आजूबाजूला घडणाऱ्या घटनां मधून काहीच बोध न घेता पिढ्यानपिढ्या एकाच वागणुकीचा एकच पायंडा पाडत जातो.अशावेळी आपली सद्द्विवेकबुद्धी वापरून आपण कसा सुयोग्य बदल घडवतो अथवा बिघडवतो ते सर्वस्वी आपल्या हातात असते.
समाजाच्या बोलण्याची मला भीती नाही,कारण मी सासू-सासर्यांना डावलून स्वतः च्या आई-बाबांची जबाबदारी पार पाडत नाहीये.तर दोघात समतोल साधून माझं कर्तव्य करतेय.आणि लोकांचं काय पायदळ चालू देणार नाही आणि घोडयवरही बसू देणार नाहीत.उद्या मी जर आई-बाबांच्या संपत्ती वर हक्क सांगणार असेल तर आज त्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे.आणि हा झाला व्यवहारी जगातले सत्य पण आईबाबाच नातंच वेगळं असत हो आई .कुठल्याच व्यवहाराचा गधं नसलेलं नात.त्यास  वात्सल्य,जिव्हाळाची भाषा कळणार. मग त्यांची सेवा केली ,काळजी घेतली तर बिघडले कुठे.मग ते नवऱ्याचे असो वा बायकोचे आईबाबा असो. मला हे साध्य करण्यासाठी कोणाची साथ असो वा नसो.मी ठामपणे
समर्थ आहे.

"हो ग उर्मी माझी तुला पूर्ण साथ आहे.यापुढे काळजी करू नकोस.खरे तर याबाबती मीच पुढाकार घ्यायला हवा होता."

"अहो आई जग किती झपाट्याने पुढं जातंय?चंद्रावर जाऊन पोहचलय.आणि आपण याच बुरसटलेल्या विचारात घाण्याला बांधलेल्या बैलासारखं तेच तेच वागून गोल फिरून एकाच जागेवर घुटमळतोय.स्वतः हुन यातून मानसिकता बदलून बाहेर पडण्यातच भलं आहे हो.
अन्यायावर आपण पेटून उठणार पण स्वतः ची मानसिकता बदलण्याचे कणभरही कष्ट घेणार नाही.मग परिस्थिती वर हळहळण्याशिवाय हाती काय राहील."

"हो ग आपणच आपल्यात नवीन बदल घडवू शकतो.अगदी शम्बर आणे सत्य बोलतेय तू.हे तुझे विचार मी माझ्या भजनी मंडळातील बायकांनाही सांगेल."

काही दिवसांनी प्रसाद-उर्मिने पालक होण्याचा निर्णय घेतला....आणि आज त्या निर्णयाची खरी चाहूल सर्व घरा-दारास लागली होती.सुखदा तर आजी होणार म्हणून खूप आनंदात होती.
उर्मिने पहिल्या पगारात घेतलेली पैठणी आज सुखदाने हौसेने घालून घरातील त्याच देवासमोर हात जोडून मागणं मागत होती ......"माझ्या सुनेला बाळाची आई बनव."
मुलगाच व्हावा असा आता अट्टाहास नव्हता.मुलगी झाली तरी उर्मि तीला खंबीर बनवणार यात संदेह नव्हताच.
कारण नव्या विचारांच्या पायंडयाचा घरात सूर्योदय झाला होता.आणि पिढ्यानपिढ्या त्यात सुधारणा होणार याची खात्री सुखदास होती.

लेखिका
आपल्याच परिचयाच्या 
चौधऱ्यांंच्या सुनबाई (गायत्री)
लेखाचे सर्व अधिकृत हक्क लेखिके कडे आहेत.share करायचा असेल तर नावानिशी करावा.

 गाठभेट
सस्नेह वाचक,
माझ्या मागील लेखास वाचकांनी भरपूर प्रतिसाद दिला. काही टीकाही झाल्या,(सत्य वास्तव पचवणे कटू असतेच) बऱ्याच वाचकांच्या प्रतिक्रिया खरच प्रशंसनीय होत्या.उभारी देणाऱ्या होत्या.
लेखणीचा हेतू कुठल्याच एका नातेसंबंधांवर टीका करणे नव्हे तर वास्तवदर्शन करून विचारक्रांती हा आहे.आमची लेखणी फक्त निमित्त मात्र आहे.
असेच वास्तववादी,आयुष्य बदलून टाकणारे लेख कथा वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला फॉलो करू शकता. आपल्याला कुठल्या विषयातील असे लेख-कथा वाचायला आवडेल.?कंमेंट करून नक्की कळवा.
पुन्हा भेटू,
छान छान वाचत राहा आनंदी राहा.