Feb 23, 2024
नारीवादी

देवकी गाते अंगाई (भाग तेवीस )

Read Later
देवकी गाते अंगाई (भाग तेवीस )

मिहिकाची अवस्था बघून कल्पनालाही दुःख आवरेनासं झालं, कल्पनाही रडत होत्या. अजयने दोघींनाही जवळ घेतले.

"कल्पना तू मला सावरणारी आणि आज तू ही?"
"माझ्यामुळे ती या दुःखातून जातेय, लग्न हा विषय सोडल्यावर मी..."
"नाही आई, लोकांनी ही परिस्थिती आणलीय गं," म्हणत मिहिकाने कालपासून झालेलं सगळं सविस्त्तर सांगितलं, अगदी आज थोड्यावेळा पूर्वीच्या तिच्या अवस्थेपर्यंत. कल्पना आणि अजय स्तब्ध होऊन ऐकत होते. भावना मनात दाबल्या की हे असं काही होणारंच पण ती वेळेवर भानावर आली नसतो तरं?...हाच विचार करून अजय बावरले.

मिहिकाचं दुःख आज मोकळं होतं होतं, ही घटना घडल्यापासून ते आजपर्यंत जे जे काही घडलं आणि जे जे तिने मनात दाबले ते सगळं ती सांगत होती.
आज सगळे मनातलं काढून टाकणार होती ती, कारण मनातल्या भावनांचा जार पून्हा आजसारखा उद्रेक झाला तरं?...
नाही, नेहमी कोण तिला वाचवायला येणार होतं?
'आज जर ती व्यक्ती आली नसती तरं आज आई बाबा तिला नाही तिच्या प्रेताला...' हा एकच विचार तिला व्यक्त व्हायला मदत करत होता.
अजय दोघींनाही सांभाळत होते, मिहिकाला मोकळं होऊ देत होते कारण त्यांनी ठरवलं होतं, उद्याच्या पहाटेपासून ते एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन जगाशी लढणार होते.
अजयने मिहिकाला शांत केलं, "सत्य स्वीकारावं लागतं बाळा जेवढ्या लवकर स्वीकारू तेवढं चांगल असतं, भावेशने धमकी दिली कारण आपण भितो म्हणून पण हेच आपण सामना केला तरं?
एक अपंगत्व असतं तेव्हा आपण स्वीकारतो तसंच हे स्वीकार बाळा, घडणार घडतंच, त्याचा किती त्रास करून घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं.

देवं एक दार बंद करतो तर दुसरं नक्की उघडतो, तू जन्म देऊ शकली नाहीस तरी तू कितीतरी मुलांचे प्राण वाचवतेस हे का विसरतेस तू?
आई बनू शकत नाहीस पण आई बनणाऱ्यांची बाळं तर तू वाचवतेस, जीव लावून वाचवतेस कारण एक आई होणं काय असतं हे तू जाणतेस, हिचं तुझी शक्ती बनव बाळा..." अजय तिला सांगत होते.

"कृष्ण आणि कर्ण दोघेही उपेक्षित होते. दोघांच्याही आईंनी त्यांचा त्याग केला, दोघेही राजकुमार होते पण एक वाढला गवळ्याकडे आणि एक सारथ्याकडे.
पण या दोघांत फरक काय होता माहिती आहे? कृष्ण सामना करत जगला संकटांना तोंड देत राहिला, जे आहे त्यात आनंद मानत राहिला, जे नाहीय त्याचं दुःख करत नाही पण तेच कर्ण आपल्याकडे नसलेलं का नाहीय यां विवंचनेत आपल्याकडे असलेलं सामर्थ्य विसरून चुकीच्या संगतीत जाऊन अधोगतीस मिळाला.
आता तू ठरव माही, तुला कृष्ण व्हायचंय की कर्ण ते."

मिहिकाने त्यांच्याकडे बघितलं, खरंच तरं होतं त्यांच...
एक आई होऊ शकत नाही व्यतिरिक्त तर तिच्याकडे सगळं होतं, ती आई होऊ शकत नसली तरी कितीतरी मुलांना वाचवून ती बाकीच्यांना आई होण्याचं सुख देऊ शकत होती.

"हो बाबा, खरंच मी कोलमडले म्हणून मला त्रास झाला, मी स्वीकारणार,मी हे अपंगत्व स्वीकारणार, बाकीच्यांना हे अपंगत्व मिळू नये म्हणून. आई म्हणते तसं मी देवकी बनणार, मुलांना जन्म देऊन यशोदेकडे सोपवणारी देवकी,माझी मुलं कुठेही असतील तरी सुखात शांत झोपावीत म्हणून अंगाई गाणारी देवकी. "

तिने दोघांनाही मिठी मारली. तिघांनीही एकमेकांचे अश्रू पुसले आणि तिघेही झोपायला गेले. मिहिका आई आणि बाबांच्या मध्ये दोघांचेही हात घट्ट पकडून झोपली. अजय तिच्या केसातून हात फिरवत होते आणि कल्पना तिला थोपटत होत्या. आज त्यांची मुलगी खऱ्या अर्थाने मोठी झाली होती. जी घटना तिला त्रासदायक होऊ नये म्हणून ते तिला समाजापासून लपवत आले होते ती घटना आज मनावर घाव होऊन बोथड झाली होती. आता त्यांची मुलगी सक्षम होती परिस्थितीशी दोन हात करायला.
सकाळी तिला जरा उशिराच जाग आली कालचा त्रागा आणि त्यानंतर सुखाची झोप कितीतरी दिवसांनी, ते ही आईबाबांच्या कुशीत.
तिने उठताबरोबर मस्त आळस दिला, जणू काही एक बेकार स्वप्न तिने बघितलं असावं असा आणि फ्रेश व्हायला गेली.
अचानक तिला एक आठवलं,
'आत्या, तिचं आणि माझं, आत्याचा काय प्रॉब्लेम होता, तिला मूल नव्हतं आणि ती आमच्याकडे राहायला आली तेव्हा...'
आईला विचारावंच लागेल, हे ठरवून तीने स्वतःच आवरलं मग आई-बाबांना रिफ्रेशमेंट म्हणून हॉस्पिटलमध्ये येणार नसल्याचं कळवलं आणि नॉर्मल नेहमीप्रमाणे बाहेर चहा घेत बसली, आई तिरप्या नजरेने तिला न्याहाळात होती.
"आई आत्याला काय झालं होतं?"
तिच्या प्रश्नाने दोघेही बावरले. ते बघून मिहिका सहज म्हणाली,
"अगं सहज विचारतेय, नेहमी तुम्ही टाळून द्यायचे आज सहज आठवलं."

कल्पनाने अजयकडे बघितलं, अजयने डोळ्यांनीच सांग म्हणून इशारा केला, तसं कल्पना तिच्या समोरच्या चेअरवर बसल्या.
"पण तू त्रास करून घ्यायचा नाहीस."
"अगं हट्ट, आता ब्रहदेव जरी आला ना मला माझ्या कमीपणावर बोलायला तरी ऐकणार नाही मी त्याचं." म्हणत ती दिलखुलास हसली.
"दॅट्स लाईक माय गुड बेबी." म्हणत अजयने तिच्या केसातून हात फेरला.
"तिला एक वेगळा आजार होता,आजाराच नाव नाही आठवत पण तुला कळेल, तिला कधीच पाळी येत नव्हती, म्हणजे आलीच नव्हती."
मिहिकाला आता कळलं की आत्याची आणि तिची गोष्टी वेगळी आहे असं का बोलल्या गेलं होतं.
तिने आईकडे बघितलं,"मग तिचं लग्न? "
"तिचं तर मोठी शोकांतिका होती."अजय चष्मा काढून डोळे पुसत म्हणाले.
कल्पनाने त्यांच्याकडे बघितलं, बहिणीचा विषय निघाला की ते हळवे होतात म्हणून त्यांनीच पुढे बोलायला सुरुवात केली.
"ती अठरा वर्षाची झाली, तिला पाळी येत नव्हती, तुझ्या आजोबांनी तरीही स्थळ शोधणे सुरु केले. तेव्हा कुठे दवाखाने आणि त्यात गावात तर काही सोयचं नसायची. स्त्रियांना काही झालं तर सुईन येऊन औषधं देऊन जाणार. पण आजोबांनी सुईनला बोलावलं नव्हतं गावभर बोभाटा होईल म्हणून.
पांड म्हणायचे अश्या मुलींना गावात आणि देवीकडे सोडायचे. देवदासीसारखं आधीच्या काळी नगरवधू असायच्या तसला गलिच्छ प्रकार.
लग्न झाल्यावर माहेरून तिच्यावर दबाव आणला गेला होता की तिने पाळी येते असच भासवायचं. एक वर्ष सगळं सुरळीत चालू होतं, असे विषय घरात मुलांना माहिती नसतात तसं बाबांना पण ही फसवणूक माहिती नव्हती, आमचं लव्ह मॅरेज, कारण मी शहरातली आणि हे शिकायला शहरात आलेले. आम्ही तिचं लग्न होईपर्यंत थांबलो होतो. तिचं बस्तान बसल्यावर आम्ही लग्न केलं त्यानंतर आमच्याशी सगळी नातीच तोडली गेली.
तब्बल बारा वर्षांनी एक दिवस तुझी आत्या आपल्या दारात आली.
बाबाला बघताच गळ्यात पडून रडली खूप."
"आताही असं वाटतं ती रडतेय मला बिलगून" अजय मध्येच म्हणाले.
मिहिका खूपसारे प्रश्न चेहऱ्यावर ठेवून त्या दोघांकडे बघत होती. कल्पना पुढे सांगायला लागल्या.
"मी तिला सावरले पण त्यानंतर तिने सांगितले ते अतिशय धक्कादायक होते.
तिला पाळी आलीच नव्हती, एक वर्ष तिने नाटक केलं पण वंशाचा दिवा हवाच असतो सगळीकडे. एक वर्षे झालं तरी पाळणा हलेना तर ते गेले भोंदू बाबाकडे,त्यांना कुण्या भोंदू बाबाने सांगितलं की पाळीच्या दिवशी संबंध बनवले तर मूल होईल. आणि मग सत्य उघकीस आलं. तिला मारहाण झाली चटके दिले गेले,तुझ्या आजोबांना बोलवून खरं खोटं केलं गेलं.
आजोबांनी सरळ हात वर केले,'लग्न करून दिलं माझी जबाबदारी संपली सांगून.' मुलगी मेली तरी चालेले पण खोटी इज्जत प्यारी होती त्यांना. तिच्याकडे उपाय नव्हता. ती तिथेच राहिली हातपाय जोडून, घरात नोकर बनून...
मग काय तिच्या नवऱ्याने लग्न केलं दुसरं आणि ही सवतीची मुलं बघायची. नवरा गरज असली की हिच्याकडे यायचा मान सर्व सवतीचा... भोगवस्तु बनून राहिली ती आणि एक दिवस भासऱ्याने तिच्या अब्रूवर हात घातला घरच्यांनी काय फरक पडतो म्हणून प्रकरण दाबलं, नवऱ्यानेही तिची बाजू घेतली नाही, कसं सहन केलं तिने तिचं तिलाच माहिती. एका रात्री हिम्मत करून पळून आली ती, भावावर विश्वास होता तिचा म्हणून शोधत इथे आली आपल्याकडे."
"खरंच किती विचित्र असेल ना तीची परिस्थिती" मिहिकाचं मन हेलावलं.क्रमश:


अजूनही काही दुर्लक्षित गावात अश्या प्रथा आहेत आणि हे घडतं...

मिहिकाचं दुःख विसरण्यासारखं नाही पण त्यावर मात करून पुढे जाण्यासारखं नक्कीच आहे... उत्तरं पुढे उलगडतील, पडलेले प्रश्न सांगितल्यास...समीक्षेत कंजूसी नको पुढला भाग येतोय लगेच...


"
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//