Feb 26, 2024
नारीवादी

देवकी गाते अंगाई (भाग एकोणतीस )

Read Later
देवकी गाते अंगाई (भाग एकोणतीस )


निश्चल आत आला ते प्रॅक्टिकली सगळं ठरवूनच.आत येताच त्याने सांगितलं.

" मी बाळ होतपर्यंत तिच्या सगळ्या अटी मान्य करणार आणि काहीही झालं तरी मी डीएनए टेस्ट करणार नाही कारण त्याने ते बाळ आपलं आहे की रजतचं ही शंकाच मला मनात नकोय.

सावी म्हणाली, "पण ते बाळ तुझं नसेल तर?"
"ते बाळ कोणाचेही असुदे, त्यांना ते बाळ नकोय आणि ते बाळ पोटात असल्यापासून मी माझं म्हणतोय आणि असं काही शंका घेवून वाऱ्यावर कसं सोडून देऊ?"
"मी त्याला माझं नाव देणार" या निर्णयावर तो ठाम होता. त्या दोघींनाही ते पटलं होतं. त्याच्या मते या सगळ्यात त्या अजन्म्या छोट्या बाळाची काय चुक?

उल्का यांच्या जीवाला घोर लावून बिनघोर वरती जाऊन बसली होती की झोपली होती कोण जाणे.

आता अशा अवस्थेत पोलिसांकडे जावं तेही शक्य नव्हतं. केस करावी तेही शक्य नव्हतं, सहन करावं गुपचूप तर सतत बदनामीची भीती. त्याचा बिझनेस या पॉईंटवर होता की आता कुठलीही बदनामी त्यांच्या बिझनेसला मागे पाडू शकत होती आणि उल्कासाठी नाही पण तिच्या पोटातल्या बाळासाठी तरी तिला यावेळी कोर्टाची चक्कर मारायला लावणे सगळ्यांना पटणारं नव्हतं, कारण कितीही झालं तरी या सगळ्यात त्या बाळाची काही चूक नव्हती.

खाली हे लोक बोलत बसले होते. निश्चल मनातून खचला होता खूप, तो लगेच सावरू शकेल अशी त्याची अवस्था नव्हती.

सकाळी उठल्यावर उल्का पुन्हा पन्नास पर्सेंट शेअरची मागणी करेल ही खात्री पटली होती तिघांचीही.

रजतला काही बोलून काय फायदा होणार होता. तो तर परका होता पण उल्का, उल्काने तर जवळची असूनही त्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता.
शेवटी निर्णय झाला की निश्चलने तिला कसंही का होईना समजावून दोन महिन्यासाठी तरी मनवावं की बाळ होईपर्यंत तिने शांतता ठेवावी.

सकाळपर्यंत शांत बसून राहिलेला निश्चल सकाळी रूममध्ये गेला. याच रूममध्ये लग्नानंतर पहिल्यांदा येताना त्याच्या मनात मिलनाची किती हुरहूर होती.
एवढे दिवस लिव्ह इन मध्ये राहूनही त्याने कधीच लिमिट क्रॉस केली नव्हती, त्याचा आपल्या विवाह रीतीवर पुर्ण विश्वास होता. आज त्याच रूममध्ये पाऊल टाकताना त्याला किती त्रास होत होता, मनाला प्रचंड वेदना होतं होत्या. तिच्यासोबतच्या आठवणी आणि रजतच्या मिठीत ती.

उल्का झोपलेलीच होती. तिचा चेहरा बघून आज पहिल्यांदा निश्चलला राग येत होता. रोज सकाळी उठताबरोबर तिचा चेहरा बघायची त्याची सवय होती पण आज तोच चेहरा त्याच्यासाठी घातक ठरला होता. ज्या चेहऱ्यावर त्याला रोज फक्त प्रेम आणि प्रेम दिसत होतं त्या चेहऱ्यावरचा मुखवटा आज गळून पडला होता.
आज तो चेहरा फक्त पैसा बघत होता. त्याची नजर तिच्या पोटावर गेली.
'नाही, मला हरून चालणार नाही, मला या बाळासाठी सगळं सहन करावंच लागेल.'

त्याने खिडकीचे पडदे दूर केले. उल्काच्या डोळ्यावर ऊन आली तसे तिने डोळे उघडले.


"अरे वा पतीदेव, आज सकाळी सकाळी एकदम मला उठवायला."
जणू काही झालेच नाही या आविर्भावात ती बोलली.

निश्चलने एकदा चमकून पाहिले, एक आशा मनात जागली, हे सगळं खोटं ठरावं असं त्याला मनापासून वाटत होतं. हा एक प्राँक असावा असं काही कारण तो खूप भावनिक झाला होता.
मोठ्या प्रयासाने तो तिच्याजवळ जाऊन बसला.
"उल्का खरंच तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं?"
उल्का खळाळून हसली,
"अरे काय तीच ती गोष्ट घेऊन बसलाय, सांगितलं ना मला काय हवं होतं आणि तू त्यावर विचार केला असशीलच, फक्त एवढंच होतं की मला हे सगळं बाळ झाल्यानंतर करायचं होतं ते चुकून काल तू बघितल्यामुळे कालच सांगावं लागलं. मी आधीपासून भारतात राहिलेली नाहीये आणि मला या देशात राहायचं ही नाहीये.
मी तिकडेच जाणार आहे फक्त हे मूल झाल्यानंतर पैसा घेऊन जाणार."


निश्चलने तिच्या बोलण्यातला तोच धागा पकडला.
" नक्की मूल झाल्यावर जाणार ना, मग एक करू शकतेस? कधीतरी थोडं जरी तुला माझ्याविषयी काही वाटलं असेल तर एकच कर हे मुल होईपर्यंत सगळं चालू आहे तसं चालू दे, त्यानंतर तुला जे हवं ते द्यायला मी तयार आहे फक्त मला हे मुल हवं. "

"बस एवढंच." म्हणत तिने ते सहज मान्य केलं.

"मुल मला नकोच होतं, हे ओझं मी गेले सात महिने पाहतेय,पेलतेय आणि अजून मला दोन महिने पेलायचं आहे. हे लवकरात लवकर झालं की मी मोकळी. मला कधीच माझी फिगर खराब करायची नव्हती, मला ही प्रेग्नेंसी वगैरे नकोच होतं.
पण तू माझ्याकडे दुसरा पर्याय ठेवला नाहीस जसं त्यावेळी माझ्याकडे तुझ्याशी लग्न करण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता तसेच या वेळी माझ्याकडे या प्रेग्नेंसीशिवाय पर्यायच उरला नव्हता कारण मूल झालं तरच तुला ब्लॅकमेल करता येणार होतं."

निश्चल तिच्याकडे एकटक पाहत होता. "काय बघतोय असा?"
"काही नाही बघतो एक स्त्री किती खालच्या थराला जाऊ शकते आणि कुठल्या थराला जाऊन विचार करू शकते."

उल्का उपरोधिक हसली.


"हेच, हेच चुकतं तुम्हा पुरुषांचं, खूप जास्त जीव लावता. कशाला?
मला फक्त पैसा हवा होता आणि माझ्या मनाचं राज्य. तुझ्यासारखं असं भावनिक आधार वगैरे नको होता मला आणि मी बाकीच्या स्त्रियांसारखी नाही.
मूल झालं की त्या मुलाचं करत बसायचं आणि नंतर त्या बाळाचं सगळं करण्यात आपलं करियर बरबाद करायचं आणि शेवटी ते मूल मोठं झाल्यावर आपल्या बायको सोबत राहणार. आईला काय मिळतं. फक्त काम काम काम, मुलं झाल्यानंतर स्वतःचं काय उरतं?
आता तुझ्या आईला बघ. पहिले स्वतःचं सांभाळलं त्यानंतर आता तुमचं बघते, आता तुझी मुलं बघणार, त्यातच जाणार आयुष्य.
एक स्त्री म्हणून जन्माला आलं तर असंच आयुष्य जाणार आणि मला माझा आयुष्य असं बरबाद करायचं नाहीये."

निश्चल तिच्या बोलण्यामुळे खूप जास्त दुखावला गेला होता. आजचा प्रोग्राम करावा असं काही उरलंच नव्हतं.
"उल्का प्लीज बाळ होईपर्यंत तरी सगळं जसं आहे तसंच राहू दे."
तिनेही होकार दिला "चालेल, पण मला कोणीही उलटा प्रश्न विचारणार नाही, मला जे करायचं ते मी करणार, मला जे हवं ते इथे मिळायला हवं या व्यतिरिक्त माझ्याशी कोणीही भांडणार नाही तरच मी थांबेल. ज्या दिवशी माझ्याशी कुणी वाद घातला त्या दिवशी मी काय करेल सांगता येणार नाहीं, पण मी चालली जाईल हे लक्षात ठेव."

निश्चल बाहेर आला, सावी आणि आईसुद्धा रात्रभर झोपल्या नव्हत्या. खरंतर रात्री कोणीच झोपलं नव्हतं. त्याने रूमबाहेर बाहेर येताच आत काय झालं ते सांगितलं.


सारिकाच्या हेल्थ इशूमुळे आजचा प्रोग्राम कॅन्सल झाल्याचे सगळ्यांना कळवण्यात आले.
सारिका देवाजवळ हात जोडून देवाला विचारत होत्या, "का झालं असं सगळं, का नजर लागली कुणाची त्यांच्या सुखाला?"

सावी निश्चलला धीर देत होती.
"सावी खरंच खूप काही चुकलं का ग माझं? " निश्चल आगतिक होऊन म्हणाला.

"असं नसतं दादा, प्रत्येकाचा दिवस येतो फक्त्त आज आपली वेळ खराब आहे, असं समज आपण एक परीक्षा देतोय ज्यात फेल होणार माहिती आहे पण तरीही एक प्रयत्न करून बघायचं आहे."

"मला खरंच पारख करताच आली नाही का गं माझ्या प्रेमाची?"
"तसं नाहीये दादा, तुझ प्रेम खरं होतं आणि लक्षात घे व्यक्ती वाईट नसते त्या व्यक्तीसोबत घडलेल्या घटना तसं बनवतात."

"आणि लक्षात घे, जेव्हा सगळेच रस्ते बंद होतात तेव्हा एक मार्ग नक्की निघतो त्यातून तारणारा. बास आपण तो मार्ग शोधायचा." सारिका दोघांनाही जवळ घेत म्हणाल्या.

क्रमश:खूप राग येतोय उल्काचा?  पण लवकरच पुढे अजून शॉकिंग काही घडेल.

उल्काचं वागणं आणि निश्चलचं तरीही तिच्यावर प्रेम करणं यातलं गूढ उकलेल लवकरच...

लाईक कॉमेंट मध्ये कंजुषी नको बाबा...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//