Feb 26, 2024
नारीवादी

देवकी गाते अंगाई (भाग बत्तीस )

Read Later
देवकी गाते अंगाई (भाग बत्तीस )

सकाळी निश्चल गेला म्हणून सारिका उदास होत्या तर आज आपली मुलगी येतेय म्हणून कल्पना खुश.

खरंतर आज त्यांना क्लबला जायचं नव्हतं पण अजय नुकतेच आजारातून बरे झाले होते आणि सारिका उदास, त्यामुळे त्या क्लबला जायला तयार झाल्या. आपली मुलगी आठ दिवसांनी घरी येतेय म्हणून त्या खूप एक्साइट होत्या.

क्लबमध्ये जेमतेम पोहोचले असतानाच त्यांना मिहिकाचा फोन आला की ती इथे पोहोचली आहे आणि अर्ध्या तासात घरी येतेय.
आता मिहिका येतेय म्हटल्यावर अजय-कल्पना वापस यायला निघाले. यांच्याशिवाय एकटं तिथे काय करायचं म्हणून सारिकापण यांच्यासोबत वापस यायला निघाल्या.

सारिका घरी आल्या तेव्हा त्यांनी बघितलं की मेन डोअर लॉक होतं. त्यांना दारं बंद करून राहायला आवडतं नव्हतं त्यामुळे त्या आणि हरी कधीच मेन दारं दिवसा बंद करत नव्हते. त्यांनी डुप्लिकेट चावीने दार उघडलं. घरी कुणीच नव्हतं. त्यांना आठवलं की हरी सामान आणायला बाहेर जाणार होता. पण सोनी आणि अंशू. निश्चलच्या बेडरूममधून मोठ्या आवाजात गाणे ऐकू येत होते.
त्या आवाज न करता आत आल्या. अंशू सोफ्यावर झोपली होती.

'ही इथे झोपलीय तरं सोनी कुठे आहे?' हा विचार करत सारिका वर आल्या. निश्चलच्या रूममध्ये टीव्हीवर ब्लू फिल्म सुरु होती आणि बेडवर सोनीसोबत एक मुलगा नको त्या अवस्थेत होते.

"हे काय चाललंय? म्हणत टीव्ही बंद करत त्या ओरडल्या. तसं दोघेही बावरून उठत बाजूला झाले.
"हे असले धंदे करता घरात कुणी नसताना, थांबा मी पोलिसांनाच बोलावते." म्हणत त्या खाली यायला निघाल्या तसं त्या मुलाने सारिकाला पकडलं.
"ये म्हातारे उगाच जोर काढू नकोस. अंगावरचे दागिने काढ आणि गुपचूप आम्हाला बाहेर जावू दे नाहीतर तुझी काही खैर नाही."

सारिकाने जोरात त्याच्या हाताला हिसका दिला आणि जोरजोरात किंचाळायला लागल्या.

"वाचवा, वाचवा. चोर चोर..." त्यांना माहिती होतं अजय-कल्पना अजून आत गेले नसतील कारण ते गेटवर रमेशशी बोलत थांबले होते. त्या एकट्याच अंशूला सरप्राईज द्यावे म्हणून समोर आल्या होत्या घाईत. कदाचित अंशू जागी होईल त्यांच्या आवाजाने तरं ती धावत जाऊन बाकीच्यांना बोलावेल म्हणून सारिका ओरडत होत्या.

अजय-कल्पना दारापर्यंत पोहोचले होते त्यामुळे त्यांना आवाज गेला नाहीं, रमेशही त्यांच्यासोबतच होता पण त्याचवेळी मिहिका आत येऊन गाडी पार्क करत होती. तिच्या कानावर तो आवाज आला आणि ती लॉक काढून दारातून आत जाणाऱ्या आईबाबांना आवाज देऊन लगेच तिकडे धावली.

रमेश, अजय, कल्पना सगळेच आले. सोनी आणि तो मुलगा बावरून उभे होते. रमेश आणि मिहिकाने मिळून दोघांनाही बाथरूममध्ये कोंडले. सारिका घाबरल्या होत्या, कल्पना त्यांना धीर देत होत्या.
अजयने पोलीस बोलावले होते आणि त्याचवेळी मिहिकाचं लक्ष समोर सोफ्यावर झोपलेल्या मुलीकडे गेलं.

'एवढा गोंधळ होऊनही ही मुलगी उठत का नाहीये.' म्हणून मिहिका तिच्याकडे धावली. वरवर बघता तिला काहीतरी गुंगी यायला दिलं असावं असं वाटतं होतं.

मिहिकाने चेक केलं, "बाबा यां मुलीला झोपेचं औषध दिलं गेलंय कदाचित." सारिकाच्या पायाखालची जमीनच सरकली जणू. निश्चल बाहेरगावी होता, त्याला सगळं सांगणे म्हणजे पण,

"आता काय करायचं?" त्यांनी न राहवून विचारलं.

"अहो सारिकाताई नका काळजी करू, बालरोगतज्ञ आहे ती, ती करेल आपल्या अंशूला ठीक." कल्पना विश्वासाने म्हणाल्या.

मिहिकाने बाहेर जाऊन गाडीवरची तिची बॅग आणली आणि अंशुवर उपचार सुरु केले.
थोड्याच वेळात पोलीस पोहोचले. त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
सोनीला पाहताच त्यातला एक म्हणाला "माफी मागूनही वृत्ती सुधारली नाय वाटतं. "

मिहिकाला हे काही कळलं नाहीं पण ती त्या दोघांसमोर गेली. "काय दिलाय त्या बाळाला आणि किती दिवसांपासून देतेय त्या कोवळ्या जीवाला आणि अजून काय काय केलंस?"
"काहीच नाहीं ताई, खरंच मला माफ करा हो. पून्हा कधीच असं नाही करणार हो." सोनी हात जोडत होती.
"हिच्या भोळ्या चेहऱ्यावर नका जावू मॅडम, याआधीच्या एका मालकाकडे ही घरचे बाहेर गेले की बाळाला अफू देवून भीक मागून पैसे कमवायची.
हिच्यावर केस झाली, दोन वर्षे सजा भोगून आलीय ही."तो पोलीस सांगत होता.
सारिकाला धक्काच बसला.
"तुम्ही मोठे लोक विचारपूस न करता कामवाल्या बाया ठेवताच कशा कळेना." पोलीस सारिकाकडे बघत म्हणाले 
सारिकाने लगेच एजन्टला फोन केला आणि ओरडल्या.
"कुठे, कुठली बाई पाठवता आहात कळतं की नाहीं तुम्हाला? "
"अहो नाहीं हो मॅडम, ते सरांना लगेच आया हवी होती, माझ्याकडे नव्हती, कुणी स्वतःहून तुमच्या घरी आली कळलं तर साहेबांशी संबंध वाचवायला मीच पाठवल्याच सांगितलं." पलीकडून एजन्ट बोलला.
सारिका त्याच्यावर ओरडून फोन बंद करत डोकं पकडून बसल्या.

मिहिका सोनीला जाब विचारत होती.
"मी आले आणि पहिल्याच दिवशी यांचा माझ्यावर विश्वास बसला, दुसऱ्या दिवसापासून मी तिला थोडं झोपेचं औषधं दिलं तिच्या जाममध्ये मिक्स करून, असं प्रमाण वाढवत गेले, कधी दुधात कधी कशात आणि नाहीच काही तरं मी सोबत आणलेल्या चॉकलेटमधून. ती मस्त झोपून राहायची आणि माझा तिच्यामागे पळायचा त्रास वाचत होता, मला तिला जास्त बघावं लागतं नव्हतं, रोज दुपारी हरिभाऊ घरी असायचे म्हणून आम्ही फोनवर बोलायचो, मॅडम असताना मेसेजवर. आज घरी कुणीच नव्हतं म्हणून मी त्याला..." सोनी खाली मान घालून सांगत होती.
"पण तुला झोपेचं औषधं मिळालं कुठे."
"हा रवी, हा फार्मसीमध्ये कामाला आहे, हा आणून द्यायचा." सोनीने त्या मुलाकडे बघत सांगितलं.
अजय पोलिसांसोबत बाकी प्रोसेस करायला गेले.

हरी पोलिसांना बघत काळजीनेच धावत घरात आला.
घरात सगळेच बघून त्याच्या जीवात जीव आला.
हरी त्यांचा जुना नोकर, गावाकडे फॅमिली ठेवून यांच्याकडे घरकाम करणारा. एकदा पावसात त्याचं घर वाहून गेलं आणि तो एकटा उरला मागे, तेव्हापासून तो आगलावेच्या घरातील सदस्यच बनून गेला.

"काही सिरिअस नाहीये ना गं?" कल्पनाने काळजीने विचारलं.
"नाही, पण तरीही आपण आज तिला ऍडमीट करून तिचं सगळं चेकअप करून घेऊ."मिहिका सारिकाकडे बघत म्हणाली.
"तुम्ही म्हणताय तर करा, पण माझ्या अंशूला वाचवा." म्हणत सारिका रडायला लागल्या.
मिहिका सारिकाजवळ आली आणि त्यांचा हात हातात घेत म्हणाली, "काळजी करू नका काकू, काही होणार नाहीं तुमच्या अंशूला."

त्यांनी विश्वासाने तिच्याकडे बघितलं.

खरंतर मिहिका खूप थकून आली होती, घरी येताच फ्रेश होऊन मस्त झोपावं या विचारात पण आता अंशूला बघून तिच्या मनात कालवाकालव होत होती.
ही मुलगी तिने एकचदा बघितली होती पण तिला बघितल्यापासून मिहिकाला रोज रात्री स्वप्नात ती दिसायची.
एक पिंक कलरचा फ्रॉक घालून परिसारखी दिसणारी अंशू तिला दुरून आई म्हणून आवाज द्यायची, मिहिका तिच्या मागे पळत जायची तिला पकडायला आणि जाग यायची.

मिहिकाने कितीतरी मुली बघितल्या होत्या पण तिचं मन याच मुलीत गुंतला होतं, वारंवार मनाला बजाहूनही तिला स्वप्नात ती दिसत होती आणि आज तिच समोर होती, योगायोगाने.

"निशू नाहीये इथे त्याला हे कळलं तर तो सगळं सोडून धावत येईल इकडे, आईविना वाढवतोय तो ही पोर, त्याचा जीव आहे ती." सारिका डोळे पुसत म्हणाल्या.

"नको, मग तुम्ही त्यांना नकाच सांगू, आरामात सांगा सगळं ठीक झाल्यावर. काही होणार नाहीं. माझ्यावर विश्वास ठेवा. मी कॅब बोलावते आपण जावू लगेच" म्हणत तीने गाडी बोलवायला फोन काढला.

"आपल्याकडे गाडी आहे, हरी नेईल आपल्याला." सारिकाने म्हणताच 
हरीने गाडी काढली, समोर कल्पना, मधल्या सीटवर मिहिका आणि सारिका अंशूला घेवून बसल्या.


मिहिका अंशुच डोकं आपल्या मांडीवर ठेवून होती जणू काही तिचंच लेकरू ती दवाखाण्यात घेवून जातेय, कल्पना समोरच्या आरश्यात तिचा चेहरा निरखत होत्या.

सारिका स्वतःला दोषी समजून रडत होत्या.


क्रमश:
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//