Feb 26, 2024
नारीवादी

देवकी गाते अंगाई (भाग छत्तीस)

Read Later
देवकी गाते अंगाई (भाग छत्तीस)


"मिहिका चमकलीच, "मी? मी कसं बोलणार?"
"अंशू तिच्या आईला मिस करते हे फक्त तुला माहिती आहे. ती तुझ्यात तिची आई शोधते हे ही तुला माहिती आहे. त्यामुळे अंशुला आईची गरज आहे हे तू त्याला पटवून देऊ शकतेस, तसंही तू लहान मुलांची डॉक्टर आहेस. प्लिज एकदा प्रयत्न कर ना अंशूसाठी?" सारिका हात जोडत म्हणाल्या.
मिहिका विचारात पडली. तिला काय रिऍक्ट व्हावं तेच कळेना.

"उद्या तो येतोय, मी खूपदा विषय काढून बघितला, खूपदा त्याला म्हणून बघितलं पण तो लग्नासाठी तयारच होत नाही त्याला वाटतं तिने सावत्रपणा केला तर?"
"ते आहेच, पण अंशुचं वय नाही हे सगळे समजायचं, तिला फक्त आई हवी असं वाटतंय.
मी बघेल तिच्यासाठी प्रयत्न करून." मिहिका त्यांचे हात हातात घेत म्हणाली.
"एक बोलू?"
"हो काकू, बोला ना, काय झालं?"मिहिका आश्चर्याने म्हणाली.
"आजच्या दिवस इथे थांबतेस, एक दिवसासाठी अंशूला आईच्या कुशीत झोपल्याचं सुख मिळू देशील? मला माहितीये, मी चुकीचं काहीतरी बोलतेय पण आता थोड्या वेळापूर्वी मी तुमचं दोघींचं बोलणं ऐकलं, नाहीं म्हणजे मी तुझा फोन द्यायला आले होते." त्या सावरत म्हणाल्या.
"बघ ना जरा विचार करून?"
"मी घरी आईला सांगून येते" मिहिका काय बोलावे, कसा नकार द्यावा या विचारातच तिथून निघाली तर खरी पण तिचे मन विचारांभोवतीच फिरत होते.
'आता ही कुठली परीक्षा, एका परीक्षेतून पास होऊन मी या सर्व भावना आवरल्या होत्या. त्या भावना पुन्हा माझ्याशी का खेळत आहेत. माझ्या नशिबी नसलेले आईपण आज पुन्हा कां समोर ठेवू पाहतंय, नियती किती परीक्षा घेणार आहे माझी अजून?'


********

" अहो ऐकलत का? तुम्हाला काय वाटतं आपल्याला माहीबाबत? " कल्पना मिहिकाची वाट बघत आवारात बसून अजयला विचारत होत्या.
"म्हणजे तुला नक्की म्हणायचं काय आहे?"अजय न कळून म्हणाले.
"हेच की मिहिका आणि अंशूला बघून तुम्हाला काय वाटतं?" कल्पना हिरमुसून म्हणाल्या.
"काय वाटतं म्हणजे? मला कळत नाहीये तुला नक्की काय म्हणायचंय?" अजय वैतागले.
"हे बघा, चुकीचं घेऊ नका पण अंशूची मिहिकामध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट बघून मला कुठेतरी वाटतं सारिकाताईंशी बोलावं का?"कल्पना भीतभीत म्हणाल्या.

"अगं ये, काही काय बोलतेस, आपण हा विषय कधीच सोडलाय " अजय घाबरून म्हणाले.
"अहो पण काय आहे, आता बघा निश्चल चांगला मुलगा आहे आणि अंशूची आई नाहीय." कल्पना पटवून द्यायच्या प्रयत्नात होत्या.

"हो पण आपल्याला माहिती आहे का की ती डिवोर्स घेऊन गेली आहे की काही झालंय तिला ते?" अजय अजून वैतागले
" यातलं काही का असेना, पण दोन्ही शक्यतेत अंशुला आई नाहीये हे नक्की ना? "कल्पना अजून ठामपणे म्हणाल्या.
"म्हणजे मग आज ना उद्या ते अंशूसाठी आईचा विचार करतीलच."
"हे बघ कल्पना, पुन्हा वेडेपणा नको. मागच्या त्रासातून ती आता सावरली आहे, आता पुन्हा काहीतरी करून तिला त्रास द्यावा असं मला नाही वाटत." अजय समजावत म्हणाले.
"बरं राहिलं पण मी जेव्हा जेव्हा अंशुला आणि मिहिकाला बघते तेव्हा असं वाटतं की या दोघींचं कुठेतरी जुळतं म्हणजे बघा ना ती आईसाठी वेडी आहे आणि ही मुलांसाठी वेडी आहे. जर दोघी एकत्र आल्या तर?..." कल्पना कल्पना करत म्हणाल्या.
"कल्पना उगाच स्वप्न रंगवू नकोस, स्वप्न तुटली की त्रास होतो."अजय बजावत होते.
"बरं राहिलं, मला सहज डोक्यात आलं म्हणून बोलून द्यावं असं वाटलं कदाचित तुमच्याही डोक्यात असं काही आलं असावं." कल्पनाला मध्येच थांबवत अजय म्हणाले,
"असं काही माझ्या डोक्यात आलं नाही असं नाही. पण हे काहीतरी वेगळं आहे. उगीच त्या त्रासात पुन्हा आपल्या लेकराला ढकलणं मला तरी पटत नाही. तो अमेय बघितला होता ना?"
"पण बघा ना, आता अंशू तिला झोपवायला घेऊन गेली. मान्य आहे की मिहिका यातून सावरली आहे पण तरीही तिच्या मनाला वेदना होत असतील ना, जसं आपल्याला वाटतं की आपली नात आता एवढी राहिली असती तसं तिलाही कुठेतरी वाटत असेल ना की आपली मुलगी असती तर ती ही अशीच असती." कल्पना आगतिकतेने म्हणाल्या.
"हो, पण सत्याला पर्याय नाही आणि वस्तुस्थितीत जगावं,
उगाच स्वप्नांचे डोलारे उभे करून काय त्रास होतो हे आपण चांगलंच अनुभवलं आहे." म्हणत अजय जरा नाराजीतच आत हॉलमध्ये जाऊन बसले
तेव्हाच मिहिका विचार करत करत घरापर्यंत पोहोचली.

तसं या दोघांनाही तिथे काय झालं असेल याचं टेंशन होतंच.

आईला बघून मिहिका थोडी सावरली आणि लगेच म्हणाली.
"आई काकू म्हणत आहेत की आजचा दिवस तिकडे थांबतेस का? "
"अग पण?...कल्पनाला थांबवत,
" ठीक आहे थांब, पण एक लक्षात घे अडकू नकोस कशात, त्रास तुलाच होईल. "मिहिकाच्या आवाजाने बाहेर आलेले अजय तिला समजावत म्हणाले.

मिहिका वापस येईलच याची सारिकाला पुर्ण खात्री होती. ती नक्की येईलच म्हणून त्या तिची वाट बघत होत्या. रात्रीचे अकरा वाजले होते. मिहीकाला वरच झोपायला सांगून त्याही आपल्या बेडरूममध्ये निघून गेल्या
आता त्यांना हे सर्व निश्चलशी बोलल्याशिवाय चैन पडणार नव्हता.

निश्चल आज रात्री निघणार होता आणि सकाळपर्यंत तो पोहोचला असता.
तो आल्यावर काही वेळ तरी अंशूसोबत खेळणार आणि नंतर ऑफिसला जाणार होता. सारिकाला वेध लागले होते निश्चल घरी येण्याचे, त्यांना कसेही करून मिहिकाबाबत त्याच्याशी बोलायचं होतं.


सकाळी अंशू उठली तेव्हा ती मिहिकाच्या कुशीत होती आणि ते बघून तिचा आनंद गगनात मावत नव्हता. तीने तिला घट्ट मिठी मारली. त्याचवेळी मिहिकाला जाग आली.
"किती छान, मला सांगू किती छान वाटलं पहिल्यांदा मी असं उठल्यावर माझ्या टेडीच्या ऐवजी तुला बघितलं बाजूला." अंशू आनंदाने सांगत होती.
"तू एकटी झोपतेस रोज." मिहिकाने न राहवून विचारलं.
"नाही माझा बाबा असतो पण तो खूप आळशी आहे, खूप उशिरा उठतो आणि सकाळीसकाळी दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपून राहतो."

अंशू हसत तिच्या बाबांची गम्मत सांगत होती नेहमीप्रमाणे ऍक्टिन्ग करून.

"बर आता मी काय म्हणते, मी आवरून निघते मला हॉस्पिटलला जायचंय आणि तू पण आवर तुझे बाबा येणार आहे ना?"
"हो मज्जा, पण तू रात्री वापस आल्यावर नक्की ये, आपण खुप सारे खेळणे बघूया आणि खेळूया सुद्धा." अंशूला असं बघून मिहिकाला स्वतःच्या लहानपणीची आठवण आली.
"हो रे माझ्या पिल्ला." म्हणत ती घरी यायला निघाली.

ती निघायला आणि निश्चल पोहोचायला एकच गाठ पडली, अगदी थोड्याने चुकामुक झाली त्यांची. म्हणजे निश्चलला ती दिसली पण मिहिकाला तो नाहीं.

'ही एवढ्या सकाळी माझ्या घरातून कशी काय निघाली? आज पहिलं दर्शन हिचंच झालं वाटतं' म्हणत तो घरात येताच अंशुचा गोंधळ सुरु झाला.
हरी सामान काढायला पार्किंमध्ये गेला. मिहिकाने आत जाताजाताच बाहेर सहज डोकावले.
हरी सामान काढतोय म्हणजे 'आला वाटतं.' म्हणत ती आत निघून गेली. आईच्या हातचा फक्कड चहा पिऊन आपलं आवरून ती हॉस्पिटलला पळाली.
जाताना तिच्या डोक्यात सारिकाच कालचं बोलणं आणि अंशुचं आईसाठी रडणं फिरत होतं आणि या सगळ्या गोष्टी आठवून मिहीकाचं मन खट्टू झालं होतं.


मस्ती झाल्यावर निशू आवरून आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की सोनी अजून कामावर आलेली नाहीये.
त्याने अंशुला विचारलं, "सोनी कुठे गेली रे?"
"तिला कामावरून काढून टाकलं पोलिसांनी पकडून नेलं तिला."
"का? "
"ती मला कुठलंतरी औषध देत होती त्यामुळे मला खूप सारी झोप येत होती." अंशूने सांगताच,
"कायsss..." म्हणत निश्चल जोरात ओरडला. सगळेच शॉक होऊन त्याच्याकडे बघत होते.


क्रमश:


वाचताय ना?

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//