Feb 23, 2024
नारीवादी

देवकी गाते अंगाई (भाग सतरा )

Read Later
देवकी गाते अंगाई (भाग सतरा )


बाजुला कोणी राहतं आणि त्यांनी सांगितल्यामुळे प्ले स्कूलमध्ये झालेली ऍडमिशन हे सगळे कळल्यावर निश्चिलला आनंद तर झालाच होता. मुलीची छान व्यवस्था होतेय बघुन तो खूप सुखावला होता. तसंही आईविना मुलगी वाढवायची म्हणजे एक टेन्शनच होतं त्याला. आईवर पण तो किती भार टाकणार होता. आई बिचारी त्याचे बाबा गेल्यापासून सगळं सावरत होती. तसं पाहिलं तर आता आईचे म्हणजे सारिकाचे आराम करायचे दिवस होते आणि आज तिने सांगितलेलं सीनियर सिटीजन मुद्दा, तिने तिथे केलेली ऍडमिशन, त्याला खूप छान पटलं. 'त्यातल्या त्यात बाजूला तिच्याच वयाची बाई असल्यामुळे त्या दोघींचे छान पटतंय म्हणजे आईला पण कुठेतरी मैत्रीण मिळाली, मन हलकं करायला.
किती काय साठवून ठेवलं असेल आईने मनात.'

अंशू खेळून खेळून दमली होती, आज तिने गोष्टपण सांगायला लावली नाही. बेडवर आल्यावर लगेच झोपली ती आज,ते ही गाढ.
अंशू झोपली बघून त्याने तिच्या मिठीत तिचा गुबूलू म्हणजे तिचा टेडी दिला आणि तो उठून खिडकीजवळ आला. खिडकीतून दुर पाहत असताना त्याला चांदण्या दिसल्या आणि पून्हा उल्का आठवली.

त्याने पलटून अंशूकडे बघितलं, 'किती ठरवतो या उल्काला विसरायचं पण आठवतेचं. मी तर तिच्या खिजगिणतीतही नाही, असं कसं प्रेम असेल तिचं? एवढी मोठी अटॅचमेंट कुठे कमी पडली. मी तर म्हणेल तू माझं पहिलं प्रेमच नाही. खरंच प्रेम असं पहिलं आणि दुसरं असतं का? एक आई आपल्या मुलीसोबत अशी वागू शकते का? मी किती ठरवतोय मूव्ह ऑन करायचं आहे सगळं विसरून पुढे जायचं पण नाही विसरू शकत.'

विचारांच काहूर खूप दाटलं, थकून त्याने डोळे मिटले आणि तोच दचकला. ज्या उल्काच्या विचारात त्याने डोळे मिटले पण त्याला ती न दिसता?...
मिहिका?sss...
डोळे मिटल्यानंतर त्याला उल्काचा चेहरा न दिसता मिहिकाचा चेहरा का दिसला. तो स्वतःच भयानक दचकला. 'आजपर्यंत दोन वर्ष जो चेहरा फक्त मला मध्येमध्ये आठवत होता तो आज माझ्या नजरेसमोर ते ही उल्काच्या जागेवर. काय होतं हे, कोण आहे ही मिहिका, अशी अचानक का आठवते मला, काय संबंध तिचा माझा?'


त्याला आठवलं एक्सीडेंटच्या ठिकाणी सगळे लोकं तिला त्याची बायको समजले होते आणि तो एक्सप्लेनेशन देणार तर तिने त्याला चूप बसायला सांगितलं होतं, का?
'कदाचित लोकांना समजावून सांगत बसण्यापेक्षा लोक जे समजत आहेत ते समजू देऊन तिला माझी सुटका करायची असेल तर? होऊ शकतं. कधी कधी अर्धवट बोललेलं सत्य पण कामाचं असतं म्हणून असेल कदाचित. पण त्या हॉस्पिटलमध्ये ती बाई आम्हाला नवरा-बायको का समजत होती म्हणजे फक्त ओळख पण नसलेली व्यक्ती आणि अशी ओळख का करत होते लोक.' त्याच्या डोक्याचा भुगा होत होता. अशनी आईला किती मिस करत असेल पासून ते उल्काच्या आठवणीपर्यंत आणि आता मिहिकापर्यंत विचार कसे पोहोचले त्याचं त्यालाच कळतं नव्हतं.
मनाचं असच असतं ना, कधी तळ्यात, कधी मळ्यात.
'मी त्या गर्दीत अडकल्यावर तिने सर्व आपोआप सांभाळून घेतलं एखाद्या बायकोप्रमाणे म्हणून लोक तिला माझी बायको समजले असावे पण तिने तो गैरसमज का दूर गेला नसावा? मला मिहिकाचा पत्ता काढावाच लागेल, पण नुसते नाव माहिती असताना मी तिचा पत्ता कुठून काढणार? जाऊदे सगळं सोड. यापुढे ड्रायव्हरशिवाय गाडी घ्यायची नाही, कानाला खडा.
त्यादिवशी पार्किंगमध्ये त्या स्कुटीला धक्का मारून तिची नंबर प्लेट चपकवली आणि दुसऱ्या दिवशी काय तर एका माणसाला धक्का मारला. त्यापेक्षा उद्यापासून ड्रायव्हर, तसही इंडियामध्ये आणि फॉरेनमध्ये गाडी चालवण्यात खूप फरक पडतो सवय तुटली इथली.'

थोडं पाणी पिऊन तो झोपायला आला.इथे आल्यावर दोन दिवस झोप लागली नाही म्हणून रात्री तो बाहेर बसायचा अंगणात. सारिकाला दिसला आणि रात्री साडेतीन वाजता त्यांनी त्याला घरात यायला सांगितलं तेव्हापासून बंद झालं ते.

उल्काची आठवण नको म्हणून तो जुन्या घरात नव्हता गेला राहायला. बाबांनी घर बांधलं आणि गेले म्हणून ते लोक यां बंगल्यात आलेच नव्हते.
सावीच्या नवऱ्याने मित्राच्या ओळखीतली फॅमिली आहे म्हणून गळ घातलेली त्यामुळे सविचा बंगला दिला भाड्याने आणि हा रिकामाच होता.
आता जेव्हा इंडिया मध्ये यायचं तेव्हा त्याला ते घर नको होतं म्हणून तो इकडे आलेला, पण उल्काचं पोस्टर अजूनही सोबत होतंच.
आता आल्यापासून इथे बाजुला लोक राहतात ऐकून बरं वाटलं त्याला.
कारण हल्ली जगाशी त्याला संपर्क नकोच वाटायचा.'काही म्हणा, आज तिच्यामुळे वाचलो, नाहीतर त्या गर्दीत कुठे पटवत बसलो असतो, वर ती पोलिसांची लफडी वरून सोबत रोहन पण नव्हता आणि मिटिंग ती तर गेलीच असती हातातून.'
रोहन नाहीतर चिन्मय दोघांपैकी कोणी असतं तर लगेच मॅनेज केलं असतं त्यांनी. चिन्मय बिचारा एवढ्या दिवसानंतर काल कुठेतरी थोडा रिलॅक्स झाला होता आणि रोहन उद्यापासून जॉईन करायला येणार होता.
पुन्हा एकदा तेच दिवस चालू होणार होते फक्त उल्काशिवाय. जिला सावली समजून चालतंय होता ती नसणार ही खंत त्याला बोचत होती.

असं म्हणतात की जे घडलं ते सोडून द्यावं आणि पुढे जे आहे ते बघत चालावं. सगळे मान्य पण अंशूसाठी जीव दुखत होता त्याचा, तुटत होता तो आत कुठेतरी. या वयात तिला आईची गरज होती, आजी असली सांभाळायला तरी आईचं काम आईचं करू शकते. तो अशनीजवळ आला, त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिने झोपेतच तिचा टेडी आवळला "लव यू बाबा." झोपेतच पुटपुटली.

"लव यु शोना" म्हणत त्याने तिच्या गालावर ओठ टेकले आणि तिच्या बाजूला आडवा झाला.

भूतकाळ का पिच्छा सोडत नाही माझा म्हणत पून्हा तो उल्काच्या आठवणीने बेचैन झाला. चार वर्ष सोबत राहिल्यावर कोणीतरी असंच सहज कसं सोडून जातं सगळं. एवढं सोप्प असतं सगळं.


काय होतं या उल्काचं रहस्य?

******

मिहीका बरोबर पावणेतीनला हॉस्पिटलला पोहोचली. तिने लगेच सगळ्यांची भेट घेतली,ट्रॅव्हलमध्ये आपलं सामान भरलं आणि ट्रॅव्हलर्स मध्ये जाऊन बसली.
खिडकीजवळची जागा म्हणजे तिची आवडती गोष्ट. तिच्या बाजूला कुणीच नव्हतं. अवनी चढली तेव्हा मिहिकाने तिला बाजूला बसायला म्हटले.
"नको, राशीजवळ बसते म्हणत ती मागे गेली. मिहिकाला म्हणावं वाटलं की तू बस मि जाते मागे, कारण मागे खूप धक्के बसतात पण?...
अवनीचं नुकतच लग्न झालं होतं आणि ती तीन महिन्याची प्रेग्नेंट होती. मिहिकाला तिने हे स्वतःहून नव्हतं सांगितलेलं.
कदाचित अवनीला तिच्यासमोर यायला ऑड वाटत असेल हा विचार करून ती चूप बसली.
अवनी मागे बसायला गेली तेव्हा कुणीतरी तिला समोर बसायला म्हटले आता अवनी अगदी मिहिकाच्या मागेच होती.
मिहिकाच्या बाजूची जागा खाली होती.
अवनी या टूरवर येणार नव्हती, घरच्यांचा नकार होता म्हणून पण मिहिकानेच तिला तयार केलं होतं.

प्रवास सुरू झाला काही वेळाने अवनीला तिच्या नवऱ्याचा फोन आला असावा ती फोनवर बोलत होती. मिहिकाला ऐकू येत होतं.
अवनी वैतागून म्हणत होती "हो सगळ्या सूचना पाठ झाल्या आहेत, काळजी घ्यायची, पहिली वेळ आहे म्हणून मोठे सांगतात ते ऐकायचं मी दूरच बसलेय तिच्या."
न राहवून फोन संपल्यावर उठून मिहिका तिला म्हणालीच, "अगं प्रेग्नन्सी म्हणजे काही बिमारी नाहीय, काळजी घावी पण अतिरेक नको. "
अवनीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि नेहमीच्या सवयीमुळे 
मिहिकाने दुर्लक्ष केलं. बाकी सगळे हळूहळू पेंगत होते बाकी सगळे जुनिअर असल्यामुळे तिला दबकून होते आणि कदाचित अवनी प्रेग्नन्ट असल्यामुळे दूर.


मिहिकाही डोळे मिटून मागे टेकली, डोळे मिटलेले होते पण तिच्या आत एक वादळ उठलं होतं, भावेश नावाचं वादळ.क्रमश:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//