देवीची ओटी

देवीची ओटी


गुडघ्याच्या असहय दुखण्यामुळे, देवळात जाऊन देवीची ओटी भरणे तिला शक्य नव्हते.

आजपर्यत तिने नवरात्रीत, देवीची साडी चोळीने ओटी भरण्याच्या तिच्या मृत सासूबाईंच्या इच्छेत खंड पडू दिला नव्हता.

आजही तिने त्यांची इच्छा पूर्ण केली होती. फक्त देवळातल्या देवीच्या जागी, तिची घरची सून म्हणजे सासूबाईंची नातसून होती.