देवी..

एक हृदयस्पर्शी कथा...
देवी...

आज मीराच्या गरोदरपणाची बातमी ऐकून घरात सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता....


आपल्या घराण्याचा कुलदीपक येणार म्हणून मीराची सासु पार्वती तर भलतीच खूष होती...


मीरा गरीब घरातील मुलगी मात्र चांगली शिकलेली व दिसायलाही सुंदर त्यामुळे तिला चांगले श्रीमंत सासर मिळाले होते.... ..मीराचा नवरा मोहन एकुलता एक... शेती वाडी भरपुर होती.... तीची एकच अडचण होती ती म्हणजे... तीचे सासरचे विचार भलतेच रूढी परंपरावादी.....मुलगा आणि मुली मध्ये फरक करणारे.....त्यामुळे पार्वतीने मीराला ठासून संगितले होते... मुलगाच झाला पाहीजे!... .... ..


आई वडिलांच्या संस्कारांमुळे मीराचा नवरा मोहन देखिल त्याच मताचा.....त्यामुळे मीरा कधी कधी विचार करी... की, आपल्याला जर मुलगी झाली तर?......


दिवस जात राहिले..... पार्वतीने आपल्या सुनेसाठी.... डोहाळे....किंव्हा गरोदरपणातील इतर कार्यक्रम सगळ सगळं केले..... मुलगा होऊ दे म्हणून आपल्या कुलदेवताचे...उपास तापासही केले.... मुलगाच व्हायला पाहीजे म्हणून एक दिवस पार्वती मीराला घेऊन कुलदैवतेला नवस करायला घेऊन गेली......


देवीचे मंदिर मोठ होत... मंदिरात बरीचशी गर्दी होती... लहान मोठ्या घंटाचा नाद कानी पडत होता..... बाजुला एक दोन बाया केस मोकळे सोडुन अंगात देवी आली म्हणून घुमत होत्या.... व बडबड करत होत्या.... पार्वती देवीला मुलगाच होऊ दे म्हणुन म्हणून नवस बोलली... मीराने देखिल मनोभावे देवीची पूजा केली.....


आज मीराला प्रसूतीकळा यायला लागल्या मुळे तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले.... दवाखान्यात मोहन व मीराचे सासू - सासरे...तिघंही काळजीत होते..... पार्वती तर आपल्या कुलदेवताचा मनातल्या मनात मुलगाच होऊ दे म्हणुन धावा करत होती.......


मीराची प्रसूती अगदी व्यवस्थित झाली... बाळ बाळंतीन एकदम सुखरूप.... मात्र मीराला मुलगी झाली होती.... मीराला काही फरक फडत नव्हता पण घरच्यांना?......


मुलगी झाली ही बातमी समजताच पार्वतीची तळपायाची आग मस्तकात गेली.... ती तडक दवाखान्या बाहेर पाडली... तिच्या बरोबर मीराचे सासरे देखिल...... त्यांनी मुलीचे तोंड देखिल पाहण्याचे सौजन्य दाखवले नाही...... बायको आहे म्हणून मोहन थांबला होता.....बाकी मनातल्या मनात तो देखिल फार नाराज झाला होता...... तसं मुलगी झाली यांत मीराचा काहीच दोष नव्हता... मात्र हे रुढिवादी मीराच्या घरच्यांना समजावेल कोण?...


मीराला मुलगी झाल्यापासून पार्वतीच मीरा सोबत वर्तन पार बदलले....मीराला आधी ती निरुपारॉय वाटायची.... पण... आता ललिता पवार वाटायला लागली होती.....कारण ती मीरा आणि तिच्या मुलीला देखिल वाकड्या नजरेने पाही.... सासरचा त्रास वाढतच होता... मीरा बिचारी गरीब गाय ती काय विरोध करेल याला?..... तसं तिच्या मनात खूपच वाटायचं की, सासुबाईना प्रतीउत्तर देऊ... मात्र ते शक्य नव्हते.. कारण पार्वती नेहमीच तिला घरा बाहेर काढून मोहनचे दुसर लग्न लावायची धमकी देत असे.... त्यामुळे मीराचा नाईलाज होता......सासूचा हा सगळा त्रास सहन करत दोन वर्षे लोटली..... आता मीरा पुन्हा गरोदर राहिली....


मीराच्या दुसऱ्यांदा गरोदर राहण्याच्या बातमीमुळे घरात आनंद आणि चिंता अस दोन्ही प्रकारचे वातावरण होते.... आनंद या साठी की, आता तरी मुलगा होईल..... आणि चिंता...म्हणजे... परत मुलगी झाली तर?...... आता तर पार्वतीने स्पष्ट आदेश काढला ..की,.. आता जर मुलगी झाली तर मोहनचे दुसर लग्न करायचे..... याला सासऱ्याचा देखील पाठिंबा मिळाला......


सासु .-सासऱ्याच्या या निर्णयामुळे मीरा घाबरली..... आपल्याला परत मुलगी झाली तर?......आपले आणि मुलीचे कस होणार?....आणि आता येणारा निष्पाप जीव?.....या विचारणे मीरा फार बैचेन होती...अश्यातच एक दिवस पार्वती पुन्हा मीराला घेऊन कुलदैवतेला मुलाचा नवस करण्यासाठी घेऊन गेली....


मंदिरात पोहोचल्यावर तीच गर्दी ....तेच दृश्य..... तोच घंटानाद....... पार्वतीने देवीला साडी चोळी अर्पण करून मुलासाठी नवस बोलला.... मीरा तिच्या बाजुलाच उभी होती.... ती देखिल डोळे बंद करून... हात जोडून देवी कडे प्रार्थना करत होती...... इतक्यात.... तीचे अंग कापायला लागले....... सुरवातीला हळू हळू ....नंतर मात्र जोर जोरात ती हालायला लागली..... पार्वती समजली सूनबाईच्या अंगात देवी आली आहे..... मीरा आता जोरजोरात घुमायला लागली...... आता तर तिने आपले केस देखिल मोकळे केले............



पार्वती!.... आज पर्यत मी तुला सगळे दिल..... मुलगा दिला... पैसा आडका दिला.......तुला कधी एक साध आजारपणही दिल नाही..... कारण तु माझी मनोभावे भक्ती करतेस...... सगळे माझ्याच कृपेने घडत असताना मुलगी झाली म्हणुन तु आपल्या सुनेचा छळ करतेस?...... अग पार्वती!... नारी म्हणजे शक्तीच प्रतीक... नारी म्हणजे लक्ष्मी.... आणि तु तिचा तिरस्कार करतेस...... ए पार्वती!.... तु माझी भक्ती करतेस ..... अग! मी देखिल एक स्त्रीच आहे ना ?..... मग?.... एक लक्षात ठेव यापुढे जर तु सुनेला त्रास दिलास तर.... माझी वक्रद्रुष्टी तूझ्यावर पडेल... आणि त्याचे परिणाम भयंकर होतील... हे जाणून घे!....
हो!.... आई!!...मीरा समोर हात जोडून पार्वती म्हणाली.......ठीक आहे.... माझ्या आशीर्वादाने तूझ भल होईल!.... मीराच्या अंगातील देवी पार्वतीला म्हणाली.....


मीराची कापरी.... काहीशी.... कमी झाली.... तरी तीच अंग थरथरत होत ....मीरा... हळू हळू खाली बसली खाली बसली.....आणि थरथरत... .. बेशुद्ध पाडली....


थंड पाणी चेहऱ्यावर पडल्याने मीरा शुद्धीवर आली... मी कुठे आहे?.....अग सूनबाई आपण मंदिराच्या पायरीवर आहोत..... आपण देवीचे दर्शन घ्यायला आलो होतो.... तेंव्हा तूझ्या अंगात देवी आली होती.... त्या नंतर तु बेशुद्ध झालीस.... दोनतीन बायांच्या मदतीने.... तुला मी येथे बाजुला पायरीवर घेऊन आले.... आता बाटलीतले पाणी तूझ्या तोंडावर मारले तेंव्हा...तु शुद्धीवर आलीस!... तो पर्यंत तु माझ्या मांडीवरच झोपली होतीस!........
किती वेळ?.... मला काहीच आठवत नाही!... मीराने तीचे केस सावरत विचारले.... अग !...झाला असेल तरी.. अर्धाक तास........पर्वतीच्या आवाजात आता बराच नरमपणा होता हे मीराला स्पष्ट जाणवले......


मीरा रात्री झोपताना विचार करत होती ....आज देवळात आपण ओव्हर एक्टिंग तर नाही केली ना?......... नाही! नाही!!.....सिच्युएशन ची डिमांड होती ती!..... अर्धा तास बेशुद्ध होऊन झोपले नसते तर सासुबाईना संशय आला असता!.....पण सासुबाईना ए पार्वती!.... अशी हाक मारायला मात्र मजा आली हा!.....असा विचार करत करत ती मनातल्या मनात मीरा खुदकन हसली......


त्या दिवसा पासुन मीराच्या सासुचे पुन्हा निरुपारॉय मधे रूपांतर झाले... .....कालांतराने मीराची दुसरी प्रसूती झाली..... मीराच्या सुदैवानं मुलगा झाला... मुलगा झाल्यामुळे घरात आनंदी आनंद पसरला.....


मीरा आता निश्चिंत होती... कारण मुलगा झाला होता.... तसं परत मुलगी झाली असती तरी तिला फारशी काळजी नसती कारण.... देवी होतीच तिच्या मदतीला ..... ..

(कथा मोबाईल वर टाईप केल्याने बऱ्याच चुका आहेत त्या बद्दल माफी असावी)

लेखन: चंद्रकांत घाटाळ