Mar 01, 2024
वैचारिक

देव आणि बरेच काही (भाग १)

Read Later
देव आणि बरेच काही (भाग १)


देव आणि बरेच काही...
काही गोष्टी आपण आपल्याला बाळकडू पाजताना जश्या सांगितल्या गेल्या तश्याच आपण स्वीकार केल्या...त्यातील एक म्हणजे "देव किंवा ईश्वर"" ही संकल्पना!
आपल्या हिंदू धर्मात देव, देवी,ऋषी,संत महात्मा, गण राक्षस..अश्या अनेक संकल्पना आहेत..ज्या आम्ही सगळेच न चुकता स्वीकार करून घेतल्या आहेत...
पण मी जसे जसे मोठे होत गेले, माझे विचार थोडे वेगळे होत गेले...आज ही मी देव मानते,पण माझी संकल्पना थोडी जगावेगळी आहे..आधी मी हे माझ्या काही जिवाभावाचा मैत्रिणींना च फक्त सांगितले..पण त्यांनी आग्रह केला की खरंच ही कल्पना/संकल्पना पण फारच सुंदर आणि वेळेला साजेशी आहे तर तू सविस्तर ह्यावे लिखाण कर..आणि त्या सगळ्यांचे मी आभार मानते की त्या सगळ्यांच्या प्रेरणेने मी हे लिहायला प्रवृत्त झाले.
देव माझी कल्पना
आजकाल जश्या वेग वेगळे महाविद्यालय असतात...तसे देव ही कोणी व्यक्ती विशेष नसून एक डिग्री असावी असे मला वाटते..त्याचे कारण म्हणजे बघा ह्या सगळ्या देवांचे एक एक विशिष्ट खाते आहे उदाहरणार्थ लक्ष्मी म्हणजे finance खाते..सरस्वती म्हणजे विद्या अभ्यास खाते...असे प्रत्येक देवास एक विशिष्ट खाते..
ह्याचा अर्थ हा की "देव" ही त्या विशिष्ट खात्याची सर्वोच्च पदवी असावी..जसे की phd.
म्हणूनच गणपती किंवा शंकर हे सगळे वेग वेगळ्या ठिकाणी वेग वेगळ्या आकार प्रकारचे दिसतात,कारण ती माणसेच वेगवेगळी होती ज्यांना "गणपती" किंवा "शंकर" अशी डिग्री मिळालेली होती..
हो पण ही डिग्री मिळवणे फार अवघड होते..आणि त्या करता काही विशेष गुण हवे असायचे..त्या डिग्री करता प्रयत्न अनेक लोकं करायचे पण त्यातल्या सर्वोच्च परीक्षेत नापास झालेले महर्षी म्हणवले गेले...त्यांच्या जन्मजात प्रमाणे मग ते ब्रह्मर्षी,राजर्षी असे म्हणवले गेले...विशेष म्हणजे,कर तुमच्यात योग्यता आहे तर कोणीही देव होऊ शकत होता..उदाहरणार्थ कृष्ण..कारण हिंदुधर्म पूर्ण पणे माणसांच्या गुणविशेषला आदर करून त्या व्यक्तीचा सन्मान करणारा असा धर्म आहे..नीट डोळसपणे बघितले तर बऱ्याच गोष्टींचे आपण सरळ रेखीव अर्थ घेतले आहेत त्यामुळे बरेच गैरसमज निर्माण झाले आहे..मी माझ्या कडून शक्य असतील तेवढ्या दूर करायच्या प्रयत्न करेन...

(क्रमशः)

©सौ. अनला बापट

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anala Bapat

Homemaker

Writer

//