ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग १२
ईशाचा सी. एस. च्या पहिल्या सेमिस्टरचा एक विषय राहिला. ती खूप नर्व्हस झाली. त्यातही बाबा तिला काहीच बोलले नाहीत. एकवेळ बाबा बोलून मोकळे झाले असते तर बरे झाले असते. पण त्यांच्या काहीच न बोलण्याने ती आणखीन अस्वस्थ झाली. शेवटी बाबांसमोर बसून ती रडली. बाबा तिला म्हणाले, “हे बघ, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आता तू जास्त नेटाने अभ्यास करशील. आणि पुढच्या वेळी विषय सुटेलच. त्यात तू सी.एस. सारखा अवघड कोर्स घेतला आहेस. आता रडू नकोस. तुझ्या ताईकडे बघ, किती जिद्दीने तिने सी. ए. पूर्ण केले. तिला डोळ्यासमोर ठेव.” निशा बाबांकडे बघत राहिली. बाबांकडून इतके कौतुक तिला अपेक्षित नव्हते.
सी. ए. चा रिझल्ट लागल्यानंतर निशाने तीन चार कंपनीत नोकरीसाठी अर्ज केले होते. एका चांगल्या कंपनीत तिचे सिलेक्शन झाले. तिने ऑफिसमध्ये सरांना सारे सांगितले आणि कंपनीत जाॅईन होण्यासाठी परवानगी मागितली. सरांनी तिचे अभिनंदन केले. इकडे नचिकेत मात्र उदास झाला, म्हणाला “रोज मला तुला बघितल्या शिवाय माझा दिवस उगवत नाही, तूच ऑफिसला येणार नसशील तर माझे कसे होणार?”
“नची, मला तरी कुठे करमणार आहे तुझ्या शिवाय, पण करायला हवे ना? माझी महत्वाकांक्षा आहे ती. तुला माहिती आहे.” निशा म्हणाली.
“हं, आता काय, “विरह तुझा मी साहू कसा” नचीने गायला सुरवात केली आणि निशा हसायला लागली. दर शनिवारी, रविवारी भेटण्याचे वचन घेऊन त्याने निशाला सोडले. दर शनिवारी दोघे ठरलेल्या ठिकाणी दोघे भेटत होते. एक काॅफी अर्धा तास गप्पा चालू असे होते. तो अर्धातास त्यांना आठवडाभरासाठी टाॅनिक असे. सहा सात महिन्यांनी नचिकेतने ही नोकरी बदलली. निशाच्या ऑफिसपासून त्याचे ऑफिस जवळ होते. आता दोघांची रोजच भेट होऊ लागली. निशा एक वर्षांनी पर्मनंट झाली. तिचा पगार वाढला. ती घरी पैसे द्यायला तयार होती, पण आईबाबांनी ठाम विरोध केला. त्याऐवजी तुझ्या लग्नासाठी “ते पैसे साठवून ठेव” अशी सक्त ताकीद दिली. बाबा म्हणाले, “आता तुझे सी. ए. होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तुझी नोकरी सुद्धा पर्मनंट झाली आहे. आता आम्ही तुझ्यासाठी मुलगा बघायला सुरुवात करतो. जुळून येईपर्यंत वर्ष सहज जाईल.” “बाबा, माझी अजून एक इच्छा आहे, तुम्ही नाही म्हणू नका. गेली खूप वर्षे मी आईला नुसते मंगळसूत्र घालताना बघते आहे आणि तिला चेन घालायला आवडते हेही मला माहिती आहे. पुढच्या महिन्यात मी तिच्यासाठी चेन करणार आहे. प्लीज नाही म्हणू नका.” निशा म्हणाली.
“ठीक आहे.” म्हणताना बाबांच्या चेहरा खुलला होता.
“आणखी एक. अजून सहा महिने थांबू या. तेवढीच माझी सेव्हिंग होईल.” निशा म्हणाली पण तिच्या मनात होते नची पर्मनंट झाला तर घरी बोलायला बरे होईल.
आई बाबांशी झालेले बोलणे निशाने नचीला सांगितले. “आपण ठरवतो एक आणि दैव दुसरेच घडवत असते.” नची निशाला म्हणाला.
“म्हणजे” निशा म्हणाली
“आईने माझे लग्न ठरवले आहे. मला न विचारता.” नची.
“काय? मग आता?” निशा एकदम शाॅक झाली.
“आता काय, मला करावे लागेल तिने ठरवलेल्या मुलीशी लग्न.” नची एकदम मजेशीर मूडमध्ये चेह-यावरचे हसू लपवत म्हणाला. निशाच्या डोळ्यात पाणी आले.
“मग मला कशाला गुंतवलेस तुझ्यात? आईला सांगता येत नाही तुला?” निशा म्हणाली.
“अग ती नाही ऐकत कोणाचे, तिचेच चालते आमच्या घरी.” नची आणखी मजा घेत होता. आता मात्र निशा चिडली.
“यू चिटर, फसवलेस तू मला.” निशा रडत होती आणि नची हसत होता. शेवटी म्हणाला, “ए वेडाबाई, अग तुला मजा केलेली पण कळत नाही.” आणि नचीने निशाला मिठीत घेतले. तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला शांत केले.
नची आणि निशाचे प्रेम दिवस पुढे पुढे जातील तसे खुलत होते, बहरत होते. पण हे निशाच्या बाबांना हे कळले असेल याची कल्पना दोघांना नव्हती. पण निशाचे बाबाही निशा स्वतःहून कधी सांगते याची वाट पहात होते. खरतरं जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांना खूप राग आला होता. पण त्यांनी निशाच्या आईला सांगितल्यावर तिने त्यांचा राग शांत केला. म्हणाली,”आता काळ बदलला आहे. आणि तो कोण आहे कसा आहे ते तरी पाहू? ती पण शिकलेली आहे. तिने काहीतरी बघितले असेलच की.”
“हो. पण तो तिच्या एवढा तरी शिकलेला हवा. तिच्यापेक्षा जास्त कमावणारा हवा.’निशाचे बाबा म्हणाले.
“ असे का पण. ती जास्त मिळवत असेल तर बिघडते कुठे?” निशाच्या आईच्या मनात आले पण वाद नको म्हणून ती नेहमीप्रमाणे गप्प बसली.
“एवढ्यासाठी माझा पहिल्यापासून मुलांशी बोलायला विरोध होता. मुलांशी मैत्री केली की हे असे होते. मुलगा बरा असला तर ठीक नाहीतर!” बाबांची स्वतःशीच बडबड चालू होती. पण ते जरा थोडे ठीक झाले. पण तो नचिकेत आहे कळल्यावर ते अगदी खूशच झाले.
नचिकेत पर्मनंट झाला, त्याने निशाला घेऊन बाहेर जेवायला जायचे ठरवले. पण निशाला सरप्राईज द्यायचे म्हणून तिला काहीही न सांगता तो सरळ तिच्या घरी हजर झाला.

क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा