ललाटलेख
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.
भाग १०
निशाची रजा सुरू होती त्यामुळे नचिकेत अस्वस्थ होता. शेवटी काकांकडे त्याने वशिला लावला आणि काही कारणाने निशाच्या घरी आला. निशाच्या आईने दार उघडले. आणि “या” म्हणाली. पण दारातूनच त्याने विचारले, “निशा आहे का?”
“अहो आत तरी या.” आई म्हणाली.
पण नचिकेतला निशाला बघायचे होते त्याचा आवाज ऐकून ती बाहेर येते का? पण ती नाही आली. तो आत गेला, आईने त्याला पाणी आणून दिले.
“निशा नाहीये का?” त्याने विचारले.
“हो, तिला काही शंका होत्या त्या विचारायला ती ऑफिसमधेच गेली आहे. सरांनाच विचारते म्हणाली.” आईने सांगितले.
नचिकेत आणखीन अस्वस्थ झाला. “आता ती भेटणार नाही. ती येईपर्यंत आपण थांबू शकणार नाही, आणि आपण ऑफिसला जाईपर्यंत ती नसेल.” मनाशी विचार करतच तो पटकन उठला आणि परत ऑफिसला जायला निघाला.
“अहो चहा तरी घेऊन जा.” आई म्हणाल्या.
“येईन परत केंव्हातरी. आत्ता गडबड आहे.” म्हणून पटकन तिथून निघाला. नेमके रस्त्यावर आज ट्रॅफिक जास्त त्यामुळे मनात असून सुद्धा त्याला गाडी जोरात चालवता येत नव्हती. मनातल्या मनात ट्रॅफिकला शिव्या घालत आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत तो कसातरी ऑफिसमध्ये पोचला. खाली मान घालून तो त्याच्या जागे पाशी गेला. आणि निशाच्या जागेकडे बघितले. त्याला मान खाली घालून बसलेली निशा दिसली आणि तो आनंदाने धावतच तिच्याजवळ आला.
“अग, निशु आत्ताच मी तुझ्या घरी जाऊन आलो. थॅंक गाॅड, तू इथे तरी भेटलीस.” नचिकेत म्हणाला.
“हो, सरांनी सांगितले मला.” निशाचे खाली मान घालून थंड उत्तर ऐकून तो चिडला.
“अशी कशी आहेस ग तू? समोर आलेल्या माणसाशी त्याच्याकडे बघून नीट बोलावसही वाटत नाही तुला?” नचिकेत रागारागाने म्हणाला.
“अरे मी महत्त्वाचे काही बघते आहे.” निशा म्हणाली.
नचिकेत काही न बोलता त्याच्या जागेवर जाऊन बसला. नंतर दोनवेळा ती स्वतःहून बोलायला आली तरी त्याने लक्ष दिले नाही. तिची जायची वेळ झाल्यावर ती निघून गेली. पंधरा दिवसांनी परीक्षा संपल्यावर निशा परत ऑफिसला आली. खरतरं नचिकेत तिचीच खूप आतुरतेने वाट पहात होता, पण त्याने तिच्याशी न बोलायचे नाटक चालूच ठेवले.
“नची, सरांना हे काम अर्जंट करून हवे आहे.” निशा म्हणाली.
“मग तू करून दे.” “आज एकदम नची” नचिकेत एकदम खूश.
“अरे मला जमत नाहीये, म्हणूनच तुला सांगितले ना.” निशा म्हणाली.
नचिकेतने काम बघितले, अर्ध्या तासात पूर्ण करून सरांकडे नेऊन दिले आणि तिथेच बसला. इकडे तो येईपर्यंत निशा त्याची वाट बघत बसली होती. नचिकेतने ते पाहिले होते, मुद्दामच तो परस्पर बाहेर निघून गेला. कटांळून काही वेळाने निशाही घरी गेली. दुसऱ्या दिवशी निशा लवकर ऑफिसला आली आणि तिने मोठ्या अक्षरात “साॅरी” लिहून नचिकेतच्या टेबलावर ठेवले. ऑफिसची वेळ संपून गेली तरी नचिकेत आलाच नाही. तो मुद्दामच आज बाहेर काम करायला गेला होता. इकडे निशाचे मन मात्र खट्टू झाले होते. “आता हा आपल्याशी बोलणारे नाही का?” या विचाराने ती स्वतःवरच चिडली होती.

दुसऱ्या दिवशी नचिकेत आला तेव्हा त्याला त्याच्या टेबलावर त्याला ती चिठ्ठी मिळाली. ते पाहून त्याला हसू आवरले नाही. मग तो निशा ला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, “ मग इतके खडूसपणे वागावेच कशाला? आम्ही आपले मैत्रीसाठी धडपड करायची आणि तुम्ही धड बघून बोलायचे पण नाही.”
निशा पटकन उठून त्याच्या टेबलजवळ गेली आणि कुणाला दिसणार नाही हे बघून कान पकडून म्हणाली, “खरचं साॅरी, आता तरी बोल ना.”
नचिकेत तिच्याकडे बघून हसला आणि दोघे आपापल्या कामात व्यस्त झाले. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर दोघेही थांबले होते. नचिकेतने निशाला प्रपोज केले. निशा म्हणाली, “पण तुला तर फक्त मैत्री करायची आहे ना!” निशा गालात हसत म्हणाली.
“ए यार आता बास ना, प्लीज.” नची.
“नची, मलाही तुझ्याबद्दल वाटायला लागले आहे, पण मला करिअर ही महत्त्वाचे आहे. मला स्वतःच्या पायावर उभे रहायचे आहे. तो पर्यंत आपल्याला थांबावेच लागेल.” निशा म्हणाली.
“स्वीट हार्ट तुझ्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत वाट बघायची तयारी आहे.” नची.
“बास बास, फिल्मी.” निशा हसू लागली.
“इस हसी पे तो फिदा है हम.” असे म्हणत नचीने तिचा हात हातात घेतला, पण नावाने सोडवला आणि म्हणाली “नची, शादी होने तक दुरीयाॅ कायम रहेगा। इंतजार का फल हमेशा मिठा होता है।” नचीने मान झुकवून तिला सलाम केला. आणि म्हणाला, “ तू माझे प्रपोजल माझे प्रेम स्विकारलेस हेच माझ्यासाठी खूप आहे. यापुढे सगळे तू म्हणशील तेंव्हा आणि तू म्हणशील तसे.” निशा गोड हसली. आनंदाच्या भरात दोघेही घड्याळ बघायला मात्र विसरले.

क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा