खेळ कुणाला देवाचा कळला भाग ३ ( सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)

दैव जाणिले कुणघ


दैव जाणिले कुणी ( भाग ३)

श्रुतीची डिलीवरी झाल्यावर थोड्याच वेळात दवाखान्यात पोलीस हजर झाले. त्यांनी श्रुतीची सर्व कसून चौकशी केली. श्रुतीने त्यांना सर्व खरी माहिती सांगितली. तिला अजून सोळावे वर्ष चालू होते.
" अठरा वर्ष पूर्ण होण्याआधी लग्न करणे कायदेशीर गुन्हाआहे हे माहिती नव्हते काय? " तिथेच असलेल्या सागरला पोलीसांनी सागरला विचारले. व तिच्या आईला देखील विचारले. " गावातील पोलीसांनी लग्न करताना आडवले होते का? लग्नाच्या वेळी कायदेशीर माहिती घेतली होती का? लग्नाचे रितसर सर्टिफिकेट आहे का? " असेही प्रश्न विचारले. अजून सागरचे आई बाबा व श्रुतीचे वडील गावाहून यायचे होते. पोलीसांनी सागरला व श्रुतीच्या आईला कायदा सांगितला व कायद्याप्रमाणे त्यांनी सागरला अटक केली व श्रुतीची आईला देखील ते घेऊन गेले. सागर व श्रुतीच्या आईला काही समजत नव्हते.

ज्या डॉक्टरांनी श्रुतीची डिलीवरी केली त्यांच्या लक्षात आले की श्रुतीचे वय लहान आहे. तिला डिलीवरी होताना त्रास होत होता. तिचे लग्न लहान वयात झाले आहे हे त्यांना कळले. त्यांनी डिलीवरी नंतर लगेच पोलीसांना माहिती दिली. आता कायद्याने डाॅक्टरांनी देखील ही अशी माहिती पोलीसांना कळवणे बंधनकारक आहे. डाॅ. च्या माहिती प्रमाणे पोलीस दाखल झाले व त्यांनी सागरला अटक केली. सागर, सागरचे आई वडील आणि श्रुतीच्या आईवडीलावर कोर्टात केस दाखल झाली.


इकडे श्रुतीचे रडून रडून हाल झाले होते. बाळाचे वजन कमी भरल्यामुळे बाळ ही पेटीत ठेवलेले होते. सागर व दोन्ही कडचे आईबाबा तिच्या जवळ नव्हते. तिचा भाऊ तिच्यापेक्षा लहान असूनही तिची समजूत घालत होता. तिची काकी तिच्याजवळ होती. सगळे विचीत्र झाले. आता नक्की काय होणार काही कळायला मार्ग नव्हता. विचार करून श्रुतीची तब्येत बिघडत चालली होती. बाळाची तब्येत ठीक झाल्यावर श्रुतीची दवाखान्यातून सुटका झाली. मग लगबगीने ती जाऊन सागरला भेटून आली. आईबाबांना देखील भेटली. आता काय करायचे हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न काका काकू श्रुती श्रुतीची भाऊ व दीर सगळ्यांच्याच समोर उभा होता.


सागर अजूनही कोर्टाच्या ताब्यात होता. श्रुतीची डिलीवरी होऊन तीन महिने होत आले. अजून बाळाचे नाव ठेवण्यात आले नव्हते. श्रुती अजून धक्क्यातून बाहेर पडली नव्हती. शेवटी तिच्या काकांनी तिला वकीलांचे घेऊन जायचे ठरवले. दोघांनी मिळून वकीलांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यायचा ठरवला होता. वकीलांचे म्हणणे होते की कमीतकमी शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करता येतील. कमीतकमी दोन वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपये दंड तरी होतोच. हे ऐकून श्रुती गार पडली. तिची आई वडील आणि सासू सासरे देखील तुरुंगात होते. काकांची परिस्थिती चांगली नव्हती. सगळ्यांना सोडवण्यासाठी तिच्याकडे काहीच नव्हते.

साधारण तीन चार महिन्यांनी केस कोर्टात उभी राहिली. सरकारी वकील त्याचे काम करत होते. ते सागरला गुन्हेगार ठरवून त्याला वीस वर्षांची शिक्षा द्यावी असे जज्जसाहेबांना सांगत होते. सोळा वर्ष पूर्ण व्हायच्या आधी लग्न आणि प्रस्थापित शरीर संबध, त्यामुळे दिवस राहणे व डिलीवरी या आधारावर ते त्यांची बाजू मांडताना होते. " लग्नाचे रितसर सर्टिफिकेट घेतलेले नसणे, व लग्न रजिस्टर झालेले नसणे " हाही मुद्दा ते पुन्हा पुन्हा कोर्टासमोर मांडत होते. आता श्रुतीचे व सागरचे वकील काय व कशी बाजू मांडतात हे बघणे महत्त्वाचे होते.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all