फासे - भाग - 16
लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
धनश्री च्या लग्नाचा दिवस येतो.. सकाळी जाताना धनश्री विद्या ला मिठी मारून खूप रडते..विद्या ला पण खूप रडायला येत..नवरी बाई चला आता निघूया...तिथे पोचायची वेळ झाली... असं मामा बोलल्यावर ती जायला निघते..पण पुन्हा पुन्हा विद्या ला बिलगून रडत असते..मग थोड्या वेळाने सगळे लग्नाला जायला निघतात..
लग्नाचा मुहूर्त बारा वाजताचा असतो..सकाळी विधी चालू होतात..मामा - मामी कन्यादान करणार असतात..आदित्य आणि धनश्री दोघे ही खूप सुंदर दिसत असतात..सकाळी नवग्रह वैगेरे होत, लग्नाचा मुहूर्त जवळ येत असतो....साडे - अकरा च्या दरम्यान जगदीश लग्नाला येतो..त्याची बायको पण असते त्याच्या बरोबर.
विद्या त्याला येताना बघते. आणि जाऊन भेटते..तो बोलतो मी धनश्री ला भेटून येतो..विद्या बोलते जगदीश एक विनंती आहे..सध्या एकटेच जा भेटायला.... तीला मी अजून सांगितलं नाही आहे कि तुम्ही दुसरं लग्न केलंत ते...जगदीश बोलतो अग तीला सांगायचंस ना..कधीतरी कळणार चं ना तीला हे...विद्या बोलते लग्न जवळ आलं होत त्यामुळे मला तीला सांगणं योग्य वाटल नाही...हो बरं बरं मी एकटाच जातो भेटायला असं बोलून जगदीश विद्या ला भेटायला जातो.
विद्या त्याला येताना बघते. आणि जाऊन भेटते..तो बोलतो मी धनश्री ला भेटून येतो..विद्या बोलते जगदीश एक विनंती आहे..सध्या एकटेच जा भेटायला.... तीला मी अजून सांगितलं नाही आहे कि तुम्ही दुसरं लग्न केलंत ते...जगदीश बोलतो अग तीला सांगायचंस ना..कधीतरी कळणार चं ना तीला हे...विद्या बोलते लग्न जवळ आलं होत त्यामुळे मला तीला सांगणं योग्य वाटल नाही...हो बरं बरं मी एकटाच जातो भेटायला असं बोलून जगदीश विद्या ला भेटायला जातो.
धनश्री चा रूम मध्ये मेकअप चाललेला असतो..जगदीश दारातूनच धनश्री हाक मारतो, धनश्री पाठी बघते..आणि पप्पा तुम्ही असं बोलते...आणि पटकन जाऊन जगदीश च्या पाया पडते..जगदीश पण सुखी राहा...असा आशीर्वाद देतो..त्याच्या डोळ्यात पाणी येत...धनश्री बोलते पप्पा मी छान आहे..आदित्य पण चांगला मुलगा आहे..तुम्ही काळजी करू नका..
धनश्री बोलते पप्पा मी तुमची आदित्य बरोबर लग्न झालं कि ओळख करून देते हा...हो चालेल बोलून डोळ्यातलं पाणी पुसत जगदीश बाहेर पडतो...त्याला खूप आतून भरून येत असतं...तो तिथून निघून त्याच्या बायको च्या बाजूला जाऊन बसतो...बायको पण विचारते काय झालं तो काही नाही बोलून गप्प बसतो...
बारा वाजता लग्न लागत. विद्या चा भाऊ, आई - वडील, सर्व जातीने सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत होते...लग्न व्यवस्तीत होत.. जेवणाच्या पंगती लावल्या जातात. विद्या च जगदीश कडे लक्ष असतं, तीला समजत जगदीश अपसेट आहे ते..... तीन, चार पंगती होऊन गेल्या तरी जगदीश जेवायला जातं नाही हे बघून ती त्यांच्या जवळ जाऊन बोलते तुम्ही दोघे जेवून घ्या...त्याची बायको हो बोलते..आणि मग दोघे जेवायला जातात..
तो पर्यंत नवरा - नवरी तयार होऊन रिसेपशन ला येतात. .जगदीश विद्या ला शोधत असतो, तिच्या भावाला तो जाऊन विचारतो विद्या कुठे आहे मला निघायचं आहे मी धनश्री आणि विद्या ला भेटून निघतो..जगदीश निघायची घाई करत असतो..
तिचा दादा त्याला विद्या जिथे असते तिथे घेऊन जातो..विद्या त्याला बोलते चला स्टेज वर जाऊन नवीन जोडप्याला भेटून येताय ना तो बोलतो हो त्या साठीच तर तुला शोधत होतो...दोघे ही स्टेज वर जातात..आदित्य ला विद्या बोलते हे धनश्री चे पप्पा...आदित्य आणि धनश्री त्यांच्या पाया पडतात..जगदीश सुखाने संसार करा असा आशीर्वाद देतो..
जगदीश धनश्री ला बाजूला घेऊन सांगतो, चल मी निघतोय, सुखी राहा..कधी आठवण तर मला फोन कर...धनश्री पण त्याला मिठी मारून रडते..तसं तो डोळयांतलं पाणी लपवत पटकन जायला निघतो..आदित्य ला पण निघताना बोलतो माझ्या लेकीला संभाळून घ्या..
थोड्या वेळाने धनश्री च्या पाठवणी ची वेळ होते. धनश्री मामा - मामी सर्वांना आई ची काळजी घ्या हा हे सांगून रडत असते...विद्या तीला बोलते तू काळजी करू नकोस गं मी राहीन एकटी...नवरा - नवरी निघतात...धनश्री ची सासू बोलते अहो ताई तुम्ही काळजी करू नका..ती आता आमची लेक झाली आहे....गाडी निघते...
धनश्री नवीन घरी पोचते...नवरा - नवरी चा गृह - प्रवेश होतो...धनश्री च नाव आदित्य त्याच्या आवडीने ( आरोही ) असं ठेवतो...दुस्र्या दिवशी पूजा असते..विद्या, दादा - वाहिनी सगळे पूजेला जातात., धनश्री खुश असते बघून विद्या ला बरं वाटत...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - धनश्री च सासर आणि तिचा संसार....)
लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
( राहणार - देवरुख - रत्नागिरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा