खेळ नियतीचा भाग दोन

कथा मालिका About Love.


कथेचे नाव: खेळ नियतीचा

भाग २:

संकेत गाडीवरून कंपनीत जात होता, त्याच्या डोक्यात प्रणव आणि प्रियाचेच विचार होते,प्रणव घरी आल्यानंतर प्रियाच्या डोळ्यात त्याच्याबद्दल नजरेतून जाणवणारे प्रेम स्पष्ट जाणवत होते संकेतल.हेच प्रेम तो त्याच्यासाठी प्रियाच्या डोळ्यात पाहू इच्छित होता,पण तसे कधी झाले नव्हते.विचारांच्या तंद्रीत त्याच्या गाडीचा वेग वाढतच जात होता,त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाला त्याची गाडी धडकली पण संकेतने वेळीच सावध होऊन ब्रेक मारले आणि थोडक्यात निभावले गेले.त्याने पटकन पडलेल्या व्यक्तीला उठवले,तो प्रणव होता.संकेतने त्याची माफी मागितली आणि चल तुला सोडतो असे म्हणत गाडीत बसवलं.

संकेतल प्रियाच्या आणि प्रणवच्या नात्याची पूर्ण कल्पना होती तरीही त्याने मैत्रीत दरी पडू दिली नव्हती,प्रणव बद्दल त्याला कसलीही तक्रार नव्हती.प्रणवच्या मनात मात्र बरेच प्रश्न होते,संकेत ल सगळं बोलून स्पष्ट करायला हवे म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली,संकेत आपण लहानपणपासून एकमेकांचे मित्र आहोत,आपल्यात मला कोणतेही गैरसमज नको आहेत.मला तुझ्याशी बोलायचे आहे.मी... तो पुढे बोलणार इतक्यात संकेतने त्याला थांबवले आणि तो म्हणाला तुझ्या आणि प्रियाच्या नात्याबद्दल मला सगळे काही माहीत आहे,तिनेच सांगितले आहे.प्रणव म्हणाला हे बघ संकेत,आमचे प्रेम होते किंबहुना आजही आहेच ,कारण आमचे नाते फार जुने नव्हते २-३ वर्षांचे होते पण आमची मने खूप छान जुळली होती, आणि त्या सगळ्या गोष्टी विसरायला जरा वेळ तर लागणारचना.प्रिया हळूहळू सगळे काही स्वीकारेल,मलाही वेळ लागतो आहे पण मी स्वीकार केला आहे वास्तवाचा.त्यामुळे जरा वेळ दे सगळ्या गोष्टींना.तशीही माझी बदली झाली आहे आणि मी तुला शब्द देतो,इथून पुढे माझ्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात कसलीही अडचण येणार नाही.तू खूप चांगला माणूस आहेस,पण रागीट आहेस त्यामुळे रागावर नियंत्रण ठेव आणि विश्वास ठेव तुझ्या प्रेमावर.

प्रणवचे इतके सामंजस्याने बोलणे ऐकुन संकेतल स्वतःची लाज वाटू लागली,या दोघांच्या प्रेमाच्या मध्ये येऊन आपण खूप मोठी चूक केली,प्रियाच ज्याच्यावर प्रेम आहे तो माझाच मित्र आहे हे आधीच मला समजले असते तर,पण तिने तर मला सांगितले होते ना, तो प्रणव असो किंवा नसो,तिचे दुसऱ्या कोणावर प्रेम आहे हे तिने सांगूनही तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट मी का केला,आज आम्हा तिघांच्याही आयुष्यात किती त्रास आहे,कोणीच सुखी नाही.त्याच्या मनातले विचार चालूच होते,विचारांच्या तंद्रीत पुन्हा गाडीचा वेग वाढला,त्याला प्रणवणे आवाज दिला तेंव्हा तो भानावर आला आणि प्रणवल म्हणाला तुला हे शहर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे,गाडीचा वेग अजूनही वाढलेला होता,प्रणव त्याला हेच सांगत होता तेवढ्यात त्यांची गाडी समीरच्या ट्रकला जाऊन धडकली आणि दोघेही चालू गाडीतून बाहेर पडले.

अपघात खूपच मोठा होता,दोघांचीही परिस्थिती खूपच कठीण होती,घरचे सगळे लोक धावत आले होते,प्रिया तर बिचारी धड कोणाशी काही बोलू शकत नव्हती,इतकी तिची अवस्था वाईट होती,एकीकडे नवरा होता तर दुसरीकडे प्रियकर.डॉक्टर सातत्याने प्रयत्न करत होते पण काहीच सांगू शकत नाही,असे म्हणत होते.

प्रियाचे आई,बाबा सुद्धा हॉस्पिटल मध्ये आले होते,सगळ्यांना धीर देत होते,ते प्रियाला शोधत होते,प्रिया सगळ्या लोकांपासून लांब एका कोपऱ्यात थिजून बसलेली होती,ते तिच्याकडे गेले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला समजावू लागले पण प्रिया त्यांना पाहून जास्तच चिडली,तुम्ही इथे का आलात बाबा?? माझे वाटोळं झालेलं पाहायला आलात का ?? अजूनही तुमचे समाधान झाले नाही का ?? आज हे जे काही होतंय ना याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात बाबा.प्रणव आणि संकेत बालमित्र होते,त्यांच्यात कधीच कोणतीच गोष्ट लपून राहिली नव्हती,पण मधला काही काळ ते संकेत इथे नसल्यामुळे त्यांची भेट होत नव्हती आणि आता संकेतल सगळे काही समजले होते.त्यामुळे तो ड्रिंक करत होता,लक्ष देऊन काम करू शकत नव्हता आणि आज तर दोघेही मरणाशी झुंज देत आहेत.लग्न झाल्यापासून प्रत्येक रात्र मी रडून काढली आहे बाबा,कोणामुळे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे.काय मिळालं तुम्हाला माज वाटोळं करून,माझ्या मनाविरुद्ध वागून.आज तुम्ही एक नाही तर तीन जीवांच्या आयुष्याशी खेळला आहात.तुम्ही जा इथून बाबा,आता तुम्हाला मी मेले अगदी कायमची.

तिचं बोलणं त्यांच्या जिव्हारी लागत होते पण तीच त्यांची शिक्षा होती,त्यांची मुलगी त्यांना कायमची मुकली होती.ते निघून गेले.

काही वेळाने डॉक्टर बाहेर आले तेंव्हा त्यांनी सांगितले की संकेतच जीव वाचवण्यात आम्ही यशस्वी झालो पण प्रणवल मात्र आम्ही वाचवू शकलो नाही,हे ऐकुन प्रिया मटकन खालीच बसली.

थोड्याच दिवसात संकेत घरी आला,त्याच्या डोक्याला खूप मार लागला होता आणि पाय सुद्धा जखमी झाला होता,तो आल्यावर प्रियाने त्याला पकडुन बेडवर बसवले आणि त्याची काळजी घेऊ लागली.त्याच्या खाण्या पिण्याच्या वेळा,त्याचे औषध पाणी सगळे ती नीट करत होती.तिचं अस प्रेमल वागणं पाहून संकेत चकित झाला होता.पण त्याचे मन मात्र त्याला सतत खात होते,प्रणवच्या जाण्याला आपणच जबाबदार आहोत ही गोष्ट तर त्याला बेचैन करतच होती,पण हे जेंव्हा प्रियाला समजेल तेंव्हा ती काय करेल या विचाराने तो आणखीनच बेचैन होऊन जाई.नेहमी त्याला अपघाताचा प्रसंग आठवत असे.एकदा तो झोपेत असतानाही त्याला त्याच्या अपघाताचे स्वप्न पडले आणि दचकून तो जागा झाला,काय झालं संकेत प्रियाने त्याला विचारले तेंव्हा तो तिच्या कुशीत शिरून रडू लागला,मला माफ कर प्रिया मी तुझा गुन्हेगार आहे,सगळी चूक माझीच आहे मी खुप वाईट आहे,तुला खूप त्रास दिला आहे,तुझे आयुष्य बरबाद केले आहे मी,मी चांगला नवरा तर नव्हतोच पण मित्र म्हणूनही नालायक ठरलो आहे प्रिया.माझ्यामुळे माझ्यामुळे प्रणव आज आपल्यात नाही.

हे त्याच वाक्य ऐकुन प्रिया त्याला म्हणाली,काय काय बोलतात तुम्ही,तो एक अपघात होता.नाही प्रिया नाही,मी त्या दिवशी मी आणि प्रणव जात होतो,गाडीत तुम्हा दोघांच्या विषय होता.माझ्या डोक्यात खूप विचार होते आणि त्याच तंद्रीत गाडीचा वेग कधी वाढला माज मलाच कळलं नाही,प्रणव मला वेग कमी कर हेच सांगत होता तेवढ्यात हा अपघात झाला आणि तो गेला.त्याच्या ऐवजी देवाने मला न्यायला पाहिजे होते प्रिया,चूक माझी होती पण शिक्षा मात्र त्याला मिळाली.

हे ऐकुन प्रिया खूप चिडली. ती बेडवरून उठली आणि म्हणाली,संकेत तुम्ही असे करायला नको होते,तुमचा राग माझ्यावर होता ना,या सगळ्यात प्रणव ची काहीच चूक नव्हती,मग तुम्ही सगळा राग त्याच्यावर का काढलात,मला मारून टाकले असते तर चालले असते पण त्याला शिक्षा का दिलीत.मी आता तुमच्या सोबत नाही राहू शकत.मी जातेय संकेत तुमच्या आयुष्यातून आणि प्रिया घर सोडून निघून गेली.

लेखिका : अपर्णा कुलकर्णी