खेळ नियतीचा भाग एक

कथा मालिका प्रेम विषयकथेचे नाव: खेळ नियतीचा.


भाग १.


प्रियाची आज मधुचंद्राची रात्र होती.खूप घाबरली होती ती,तिच्या वडिलांनी तिच्या मनाविरुद्ध त्यांना आवडलेल्या मुलासोबत तिचे लग्न लावून दिले होते आणि आज आपल्या शरीरावर सामाजिक मान्यता असणारा बलात्कार होणार याची तिला खात्री होती.


फारतर पंधरा दिवसांपूर्वी ती प्रणवला भेटायला केवढ्या उत्साहात बाहेर पडली होती,दोघेही एकमेकांवर अपार प्रेम करत होते.प्रिया शेवटच्या वर्षात होती,तर प्रणव एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता,प्रणव तिला सीनिअर होता,२-३ वर्षांचे नाते होते त्यांचे आणि आज त्यांच्या नात्याने छान वळण घेतले होते.ते दोघे एका निवांत जागी नेहमीप्रमाणे भेटले होते, आणि त्याच वेळी दोघांना एकमेकांच्या मिठीत प्रियाच्या बाबांनी पाहिले.


प्रियाचे बाबा हे नाशिक मधील प्रतिष्ठित व्यापारी होते,शिवाय त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती आणि मोठ्या लोकांत उठबस असे.आपली मुलगी असे चाळे करते हे पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.त्यांनी सगळे घर डोक्यावर घेतले,मी माझ्या मुलीला मोकळीक दिली,विश्वास ठेवला हीच माझी चूक झाली,आणि तू तुझे लक्ष कुठे असते मालती ( प्रियची आई )मी तुमच्यासाठी दिवस रात्र एक करून कामं करतो,काय हवे नको ते बघतो आणि तुम्ही तुमच्या मुलीकडे जराही लक्ष देत नाही.


तेवढ्यात प्रिया घरी आली,तिच्या बाबांनी तिच्या सणसणीत कानाखाली मारली,दोन क्षण डोळ्याखाली अंधारी आली तिच्या,काय झालं आणि कशामुळे बाबांनी मारले हे काही तिला कळेना,कॉलेजच्या नावाखाली हे धंदे करायला जातेस तू,लाज नाही वाटत भर रस्त्यावर कोणाच्या तरी गळ्यात गळे टाकून निवांत बसायला.कोण होता तो,कधीपासून चालू आहे हे सगळं ??


आता प्रियाला समजले बाबांनी का मारले ते.प्रिया खूप धीट मुलगी होती,प्रेम करणं हा काही गुन्हा नाही त्यासाठी बाबांना सगळ स्पष्ट बोलण्याची तिची तयारी होती.बाबा त्याचं नाव प्रणव आहे,माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे तो,आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि माझी परीक्षा संपल्यावर मी हे सांगणार च होते तुम्हाला.तो कंपनीत नोकरी करतो,मला त्याच्याशीच लग्न करायचे आहे.


हे ऐकुन तिच्या बाबांचा पारा आणखीनच चढला,पुन्हा त्यांनी तिच्यावर हात उगारला पण तो हात तिने पकडला आणि म्हणाली बाबा तुम्ही माझे जन्मदाते आहात,पण माझे नशीब लिहण्याची अधिकार मी तुम्हाला देणार नाही,लग्न माझे आहे आणि ते कोणाशी करायचे हा निर्णय सर्वस्वी माझाच असेल.


तिचे बाबा काही बोलणार इतक्यात नोकराने सांगितले तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहे,तेवढ्यात ते गृहस्थ आत आले,त्यांच्या सोबत एक रुबाबदार देखणा तरुण सुद्धा होते,सगळ्यांनी काहीच झाले नसल्याच आव आणत त्यांचे स्वागत केले,ते प्रियाच्या बाबांचे व्यापारातील भागीदार होते,त्यांनी त्यांच्या सोबत आलेल्या मुलाची ओळख करून दिली हा माझा मुलगा,संकेत.आताच आला आहे परदेशातून शिक्षण घेऊन,आता माझा व्यापार सांभाळत आहे.प्रियाच्या बाबांनी ही प्रीयाची ओळख करून दिली.ही माझी मुलगी,शेवटच्या वर्षाला आहे,अजून शिकतेय.संकेतने तिच्याकडे पाहिले,पहिल्याच नजरेत संकेतला प्रिया खूपच आवडली.


काही दिवसांनी संकेतच्या बाबांनी तसे प्रियाच्या बाबांना सांगितले,लगेच दोघांनी मिळून लग्न ठरवले सुद्धा,प्रियाला हे कळताच तिने संकेतल भेटून तिच्या प्रियकाताबद्दल सगळे काही सांगितले,हे ऐकुन संकेत स्वतःहून लग्नाला नकार देईल असे तिला वाटले होते,पण संकेत तिला म्हणाला मी लहानणापासूनच अगदी लाडात वाढलो आहे,ज्या गोष्टीकडे बोट दाखवले ती प्रत्येक गोष्ट बाबांनी मला दिली आहे आणि हा तर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे,तिथे मी हारणे कसे पसंत करेन प्रिया.पण मी एखादी वस्तू किंवा गोष्ट नाही मन,भावना विचार असणारी स्वतंत्र अस्तित्वाची जिवंत माणूस आहे संकेत.हे बघ प्रिया असेल तुझ कोणावर तरी प्रेम,पण हे काही क्षणांच ठरू शकते किंवा संपूनही जाऊ शकते आणि नाहीच संपले तरी माझ्या सहवासात तू सगळे काही विसरून जाशील मी तुला विसरायला लावेन.तू मला पहिल्याच नजरेत खूप आवडली आहेस आणि तुला आता माझे व्हावेच लागेल यात शंका नाही.


हे त्याचे बोलणे ऐकुन प्रियाच्या पाया खालची जमीन सटकली,तिने प्रनवला फोन करून सगळे सांगितले,नेमके त्याच वेळी कंपनीने त्याला पंधरा दिवसांच्या ट्रेनिंग साठी नाशिक बाहेर पाठवले होते आणि ते सोडून येणे केवळ अशक्य होते.काहीही करून बाबांना समजवायला त्याने सांगितले.पण ते किती अवघड होते हे फक्त प्रियालाच माहित होते.


शेवटी नाईलाजाने प्रियाला संकेत सोबत लग्न करावे लागले.पंधरा दिवसांपूर्वी जर कोणी तिला सांगितले असते तुझे नशीब तुझ्याशी इतका विचित्र खेळ खेळणार आहे तर तिचा विश्वास बसला नसता.


पण आज ते प्रत्यक्षात घडले होते.गेल्या काही दिवसांतील घटना आठवून प्रियाचे डोळे पाणावले होते,तेवढ्यात दार वाजले आणि प्रियाला धडकी भरली,हृदयाचे ठोके वाढले,दारात संकेत उभा होता, तो जसजसा पुढे येत होता तसे तसे तिच्या हाताच्या मुठी वळत होत्या,तिने तिचा पदर दोन्ही हातानी घट्ट पकडला होता.


तो तिच्या जवळ आला आणि तिच्या कमरेत हात घालून प्रियाला आपल्या जवळ ओढून घेतले त्याने,तिच्या हातांची नखे छातीला लागली त्याच्या,हे काय प्रिया मी तुला जवळ घेतोय आणि तू मात्र,नाही तुम्ही अचानक मला ओढून घेतले त्यामुळे चुकून लागले मी मुद्दाम नाही केले.हा ठीक आहे,माझेच चुकले मी तुझ्यासारख्या नाजूक मुलीला असे ओढायला नको होते,तू आता बायको आहेस माझी संकेत म्हणाला. आता त्याची नजर तिच्या ओठांवर स्थिर झाली होती आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकण्यास पुढे पुढे सरकत होते,प्रियाच्या डोळ्यातून मात्र आसवे बाहेर पडत होती.त्याचे लक्ष गेले तिच्या डोळ्यांकडे आणि खूप चिडला प्रियावर.


प्रिया हे काय,का रडतेस तू,आपले लग्न झाले आहे,मी सुद्धा खूप मोठा बिझनेस करतो,पैसा,संपत्ती,जमीन जुमला,नोकर चाकर सगळे काही आहे माझ्याकडे आणि तरीही तू अजून तुझ्या प्रियकराचा विचार करून रडत आहेस.मला यातले काहीही नको होते संकेत,मला माझ्या मनासारखा जोडीदार हवा होता माझा प्रियकर पाहिजे होता मला.प्रिया,असे जोरात ओरडून संकेतने तिच्यावर हात उगारला पण तो तिथे च थांबला,मार ना मला कर माझ्यावर जबरदस्ती, पण एक लक्षात ठेवा तुम्ही जोर जबरदस्ती करून माझ्या शरीरावर हक्क गाजवला कदाचित पण माझ्या मनावर कधीच नाही.प्रियाचे हे बोलणे ऐकून संकेत अजुनच चिडला,त्याने तिच्या मानेखली हात घालून पुन्हा तिला ओढले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवू लागला,प्रियानेही आपले डोळे घट्ट मिटून घेतले पण संकेत त्या पुढे जाऊ शकला नाही,त्याने रागाने तिला ढकलून दिले आणि रूम बाहेर निघून गेला,प्रिया रात्रभर रडत राहिली.


प्रिया आणि संकेत जगासमोर नवरा बायको होते,पण रूममध्ये मात्र अनोळखी असल्यासारखे वागत असत, प्रिया सोफ्यावर झोपायची तर संकेत बेडवर,संकेत खूप अस्वस्थ असे त्याचे कामात लक्ष लागत नव्हते,त्याचे प्रेम होते प्रीयावर खूप प्रेम होते पण ती मात्र अजूनही प्रणव वर प्रेम करत होती.आता संकेतल झोप येत नव्हती,रात्र रात्र प्रियाच्या निरागस चेहऱ्याकडे बघत रहात असे तो.


घरात सगळे जेवणाची तयारी करत होते,बरेच पदार्थ बनवले जात होते,प्रिया सुद्धा सकाळपासून किचन मध्ये राबत होती,आज संकेतच लहानपणीच मित्र जेवायला येणार होता,म्हणून हे सगळे सुरू होते.घरातील प्रत्येक माणूस त्यांच्या मैत्रीबद्दल बोलत होता,शाळेत असल्यापासून दिघे छान मित्र होते आणि आज इतक्या वर्षांनी ते भेटले होते,संकेत परदेशात गेल्यामुळे पुन्हा त्यांची भेटच झाली नव्हती.प्रिया अजूनही किचन मध्येच काम करत होती, तेवढ्यात संकेत त्याच्या मित्राला घेऊन आला,सगळे छान गप्पा मारत बसले होते,जेवणाची तयारी झाली होती,सगळे टेबल वर बसले आणि संकेतच मित्र म्हणाला अरे तुझ्या बायकोशी माझी ओळख तरी करून दे कुठे आहे आमची वहिनी,मग त्याने प्रियाला आवाज दिला,ती बाहेर आली आणि त्याच्या मित्राने तिच्याकडे पाहिले,संकेत म्हणाला हा माझा बालमित्र प्रणव.तिनेही त्याच्याकडे पाहिले आणि तिला धक्काच बसला.हा तोच प्रणव होता,ज्याच्यावर ती प्रेम करत होती.दोघेही एकमेकांकडे पहात राहिले.संकेतने दोघांनाही पाहिले आणि त्यांचे चेहरे पाहून आता त्याच्या लक्षात आले की तो हाच प्रणव ज्याच्यावर ही प्रेम करत होती.कसेबसे जेवण आटपून प्रणव निघून गेला आणि प्रिया रूममधे आली.तिच्या मागे संकेत सुद्धा आला,तो म्हणाला मी बाहेर सगळ्यांसमोर काही बोललो नाही,पण माझा बालमित्रच तुझा प्रियकर आहे हे लक्षात आले आहे माझ्या.हाच तो प्रणव ज्याच्यावर मी प्रेम करते,प्रिया म्हणाली.संकेत खूप चिडला आणि दार आपटत बाहेर निघून गेला.


त्या रात्री संकेत खूप ड्रिंक करून आला,प्रिया खिडकीबाहेर बघत बसली होती, रोज प्रणावला भेटणारी प्रिया आज अशी तिच्या सासरी अचानक तिच्या प्रियकराला भेटली होती.संकेत आत आला,तशी ती झोपायला जाऊ लागली पण संकेतने इतकी जास्त घेतली होती की त्याचे तोल जाऊ लागले होते,बराच उशीर झाला होता,त्यामुळे घरातील बाकी मंडळी झोपलेली होती,संकेत प्रीयकडे आला आणि म्हणाला मला माहित आहे तुझे अजूनही माझ्यावर प्रेम नाही.तू ज्याच्यावर प्रेम करतेस तो माझाच जिवलग मित्र आहे, तुला पाहिजे ना तो,संकेत नशेत बोलत होता,त्याची अशी बडबड सुरूच होती,प्रिया त्याला झोपायला सांगत होती पण तो मात्र बडबडत होता,अचानक त्याने प्रियाला जवळ घेतले आणि म्हणाला मला सोडून प्रणवकडे निघून जाणार आहेस ना तू?? 


पूर्ण रात्र अशीच निघून गेली होती.प्रिया खूप खचून गेली होती,नियतीने असा विचित्र खेळ का खेळला असेल याचे उत्तर तिला सापडत नव्हते,त्यात प्रणवच संकेतच मित्र असावा याचे तिला आश्चर्य वाटले होते आणि त्यामुळे झालेली संकेतची अवस्थाही तिला पाहवत नव्हती.


लेखिका : अपर्णा कुलकर्णी