Feb 24, 2024
वैचारिक

Destiny.. भाग 1

Read Later
Destiny.. भाग 1


"साहिल, समीर तुम्ही दोघेही नेहमी असेच करतात.... तुम्हाला मला चिडवल्या शिवाय चैन पडत नाही.... जाऊदेत बाबा मी आता तुमच्याशी कधीच बोलणार नाही...." स्मिता कुरकुर करत बाहेर निघुन गेली.     " का रे सारखे तिच्या मागे लागतात, बिचारीला नेहमी टार्गेट करतात तुम्ही दोघे.... ती कधी मनावर घेत नाही म्हणून एवढा त्रास नाही द्यायचा.... एकच मैत्रीण आहे तुमची....." साहिलची आई दोघांना ओरडत बोलली.     " काकी तुला नाही माहित ती किती त्रास देते आम्हाला.... तिला तरी कोणी मित्र आहे का अमच्याशिवय....शाळेपासून आमच्या बरोबर राहून टॉम बॉय झाली ती..."समीर साहिल ला टाळी देत बोलला.
      " खरच आहे रे बाबा तुमचे.... या मुलीत तर मुलीगी म्हणून एकही गुण नाही.... कसे होणार हीचे काय माहित.... तिच्या आईला पण हीच काळजी लागून राहिली आहे आहे...." आई बोलली.       " आई तिचे सोड तू आम्हाला जेवायला देणार आहेस की नाही ते सांग.... भूक लागली आहे खूप...."साहिल बोलल्यावर काकी उठून किचनमध्ये निघुन गेल्या.      " काकी अग आईंने ही भाजी पाठवली आहे... आणि हो तूच खा बर का...? बाकी भटक्या कुत्र्यांना अजिबात देवू नकोस ..." स्मिता हातात बाऊल घेऊन आली.


      
      " ये हडळ कुत्रे कोणाला म्हणते ग.... "समीर बोलला.


      " हो ना कुत्रे बोलली तर बोलली,  ते पण भटके कुत्रे बोलते आहेस.....??
आणि तू सांगण्याची गरज नाही आम्ही काय खायचे आणि काय नाही.... काकिने भाजी खास आमच्यासाठी पाठवली...."साहिल तिच्या हातातील बाऊल घेत बोलला.     " ये सम्या.. साहील्या जास्त डोक्यात नाही जायचे बर का..? नाहीतर बघ माझी सटकली ना तर मी असाच जमिनीत गाडेल....." स्मिता दात ओठ खात त्या दोघांच्या अंगावर येत बोलली.


      " ये हडळ गप जा इथून... तुझ्या या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही...."समीर स्निताचा हात मागे पिळत बोलला.


     " सम्या सोड माकडा... दुखतंय ना...? नालायक मुलींशी असे वागतात का..?
म्हणूनच तुला कोणी गर्लफ्रेंड नाही बघ.... "स्मिता कळवळून ओरडली.


 
      " तुझ्या सारखी हडळ आमच्या नशिबात आहे म्हणून मुली आमच्याकडे बघत नाही....
अजून जोरात ओढ समीर सारखी बोलत असते आपल्याला गर्लफ्रेंड वरून..."साहिल दुजोरा देत बोलला.
      "साहिल, समीर चला जेवायला.... भूक लागली होती ना तुम्हाला...."आईने आवाज दिला तसे दोघे स्मिताला सोडून पळत डायनिंग टेबल जवळ गेले.


      Aahhhhhhh आई काय मस्त वास येतोय... मला तर वासाने अजूनच भूक लागायला लागली आहे....
चल रे समीर लवकर सुरू कर.... नाहीतर मी सगळे संपवून टाकेल...."साहिल प्लेट वाढून घेत बोलला.. समीरही त्याला जॉइंट झाला.


     "बबली बाळ चल तू पण बस यांच्या बरोबर.... मी गरम गरम पोळ्या करून वाढते तुम्हाला..."आई बोलून आत गेली.       " ये सम्या ऐकले नाही का..? चल ती प्लेट दे इकडे... काकी माझ्यासाठी गरम पोळ्या करते आहे...."स्मिता.     " किती तो गोड गैरसमज आहे.... आई फक्त एक फॉर्मालिटी म्हणून तुला बोलली.... आणि तू हावरट लगेच बसली पण... तुझ्या घरातले वैतागले तुला म्हणून देतात हाकलून सारखे तुला इथे.... "साहिल.       "सहिल्या जास्त बडबडू नकोस... गप गुमाने जेव नाहीतर काकीला सांगेन तू काल कॉलेजला काय कांड केले ते...."स्मिता साहिल समोरची प्लेट ओढून खायला सुरू झाली.      "अरे यार ही आफत होतीच का तिथे.... आता काय हिची हाजी हाजी करावी लागेल..."साहिल मनात बोलून शांतपणे स्मिता कडे बघत बसला.     " भुक्कड आहेस एक नंबरची... साधे बघत नाही आम्ही आहोत इथे...."समीर बोलल्यावर स्मिस्ताने ने त्यांच्याकडे हसून पाहिले.... पण लगेच प्लेट मध्ये ठेवून त्यांनाही खाण्याचा इशारा केला....
खा रे तुम्ही पण खा.... असे माझ्याकडे बघत बसलात तर मला पचनार नाही खाल्लेले..      " तिघांची परत मजा मस्ती करत जेवण झाले.... काकी जेवण मस्त झाले.... पण आता घरी माझ्या वाटचा स्वैपाक बाकी असेल, आईचा ओरडा खावा लागेल मला...."स्मिता बोलतच होती तर तिची आई दारातून आत येताना दिसली....        " बबली मी तिथे तुझी वाट पाहते आहे आणि तू मस्त खात बसली.... रोज रोज किती त्रास देणार त्या ममता ला, काही बोलत नाही म्हणून दिवसेंदिवस तू जास्त करत आहेस......" सुनिता स्मिताची आई.     " सुनिता अग त्रास काय त्यात... साहिल येत नाही का तुझ्याकडे सारखा... त्याला काय तू उपाशी ठेवते का...?.इथे जेवले काय आणि तिथे जेवले काय एकच तर आहे.... आणि माझ्या लेकीला काही बोलायचे नाही..."साहिलची आई ममता बोलली.      "ममता तुमच्या लाडानेज जास्त बिघडत चालली आहे ती.... मी बोलायला गेले की मलाच गप करतात तुम्ही लोक...."स्मीताची आई चेअर वर बसत बोलली.     " राहूदे काकी... काहीच दिवस अजून... एकदाची आमची फायनल चे   पेपर झाले ना की हिचे लग्न करून देवू आपण.... म्हणजे बघ कसे सुखात राहता येईल आपल्याला...." साहिल बोलला.     "साहील्या. थोबाड बंद कर तुझे... मी काही एवढ्यात लग्न वैगरे करणार नाही.... तुमच्या दोघांची तर अजिबात सुटका नाही माझ्या पासून...."स्मिता सहीलच्या पाठीत धपाटा घालत बोलली.


    " आई आई ग लागते ना म्हशे... तुझा हात आहे की दगड, आमच्या हाडांचा विचार करत जा...?
बघावे तेव्हा मारतच असते.... काकी खरच लवकरच हाकलून लाव हिला आपल्या घरातून...."साहिल कळवळत बोलला.       "चला आता निघा तिघेही अभ्यासाला.... तुमची पहिली सेमीस्टर जवळ आली आहे, टाईम पास करून वेळ नका घालवू.... या वेळी प्लेसमेंट होणार आहे तर सगळ्यांना चांगले मार्क्स पाहिजे...." साहिलची आई बोलली तसे सगळे आपल्या अभ्यासाला पळाले.      " ममता नको टेन्शन घेऊ... आपली मुलं हुशार आहेत... बघ ना तिघांनी मार्क्सच्या जोरावर इंजिनिरिंगला एडमिशन मिळवले.... आणि आता फायनल ला आहेत...
नेहमी टॉप करतात आपली मुल...."स्मिताची आई बोलली.       " अगदी खर बोलतेय बघ तू.... समीर चे आई वडील असते तर त्यांनाही किती आनंद झाला असता आज मुलांना बघून.... लहान असताना पासून त्यांची मैत्री अगदी आहे तशीच आहे बघ...
मस्ती करतात, भांडतात पण त्यांच्यातली मैत्री प्रेम यावर काही फरक पडत नाही...." साहिलची आई बोलली.      "हो आपले मुलं अगदी आपल्यासारखेच आहेत.... आपली तिघींनी मैत्री अशीच होती आणि अजूनही आहे, ते आपल्याच पावलावर पाय ठेवून चालत आहे..."स्निताची आई.      " मी तर तुझ्या स्मिताला माझी सून म्हणून याच घरात ठेवून घेण्याचा विचार करते आहे म्हणजे लेक लांब जाणारच आपल्यापासून...."साहिलची आई..      " हो म्हणजे आपले उरलेले आयुष्य यांची भांडण सोडवण्यात जाईल.... "स्मिता ची आई बोलल्यावर दोघीही हसू लागल्या.


      " ये समीर मला हे प्रोजेक्ट साठी पॉइंट काढून दे ना... मला याचे जाम टेन्शन आले आहे... तो सर फारच डोक्यात जातो नुसता...  यात तुमचे बर आहे तुम्हाला काहीच फरक पडत नाही कितीही बोलले तरी... यात यातून कधी एकदा सुटणार असे झाले मला..."स्मिता.


       " ते पाटील सर तुझ्या फारच मागेपुढे करत असतात, त्यांना तुझ्यात इंटरेस्ट दिसतोय... म्हणून सगळा क्लास सोडून तुझ्याकडे लक्ष असते त्यांचे...."साहिल.      "गप ये माकडा... काहीही बडबडू नकोस... त्याचे तोंड तरी पाहिले का..? आला मोठा माझ्या मागे लागणार... माझ्यासाठी कोणीतरी खास हिरो येणार आहे...माझ्या स्वप्नांतला राज कुमार, असा सफेद ओडी कार घेऊन...मला न्यायला येणार, तुम्ही दोघे डोळे फाडून बघत बसणार फक्त त्याला......" स्मिता स्वप्नात गेल्यासारखी बोलली.


      " जशी ही मोठी हेरॉईन आहे... हिला सलमान खान घ्यायला येणार...
हिच्या नादी लागून काही फायदा नाही.... आपण आपले काम करू त्या पेक्षा....." दोघेही आपल्या अभ्यासाला लागले.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//