नशिबाचा खेळ - ( भाग - 6 ) ( अंतिम भाग )

Destiny

      

           अमर च्या मेंदूला खूप मार लागलेला असतो. अमर सिरीयस असतो, सीमा डॉक्टर असल्यामुळे ती मोठ्या डॉक्टरांना पण बोलवून ट्रीटमेंट देते, पण ऑपेरेशन चालू असताना अमर कोमात जातो. आणि कंडिशन अजूनच क्रिटिकल होते. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतात पण काहीच उपयोग होत नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी अमर ची प्राणज्योत मालवते. सीमा च्या घरचे, सीमा सगळेच खूप शॉक मध्ये जातात.

           सीमा च्या बहिणी, आई - वडील तर रडून रडून डॉक्टर ला बोलत असतात कि आमच्या देवाला वाचवा. आमच्या सगळ्यांचा देव आहे तो, सीमा  सारखी बेशुद्ध होत असते. घरी प्रेत आणण्यात येत, आशय पण खूप रडत असतो,.... बाबा उठा ना... असं सारखं अमर ला बिलगून रडत असतो. अमर चा आशय वर खूप जीव असतो, तो सीमा ला म्हणतं असे आपण आशय ला पण तुझ्यासारखं डॉक्टर चं करूयात असं.

         हळू हळू दिवस जातं असतात. सीमा ने तिचा दवाखाना बंद चं ठेवलेला असतो, एवढे दिवस, तीला - अमर बरोबर घालवलेले दिवस आठवत असतात. घरात तीला सारखं तो आहेच इथे असं जाणवत असे, त्याचं कपाट त्याचे कपडे बघून तीला सारखं रडायला येत असे. एक बहीण सोबत म्हणून  बारा दिवस राहायला आली होती. पण तिची पण नोकरी सीमा च्या इथून लांब पडत असल्यामुळे ती पण गेली. आता सीमा ला घरं खायला उठत असे. पण आशय कडे बघून ती तिचा सारखा येणारा हुंदका आवरत असे.

      सीमा सारखी मनातल्या मनात बोलत असे कि -  मी स्वप्नात पण घरच्या गरीब परिस्थिती मुळे माझं स्वप्न पूर्ण करू शकत नव्हती ते माझं डॉक्टर होण्याच स्वप्न अमर ने पूर्ण केलं, माझ्या माहेरची परिस्थिती जी कधीच वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयी मुळे सुधारली नसती, ती अमर ने तीन महिन्यात सुधारली, माझ्या पाच ही बहिणींना चांगलं शिकवलं, त्यांचं सगळं चांगलं झाल. अमर खरोखर चं आमच्या सर्वांच्या आयुष्यात देवाने पाठवलेला चं देवदूत होता आमच्यासाठी.

         एक महिन्याने सीमा दवाखान्या मध्ये जायला पुन्हा सुरवात करते. आणि हळू हळू ह्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. कालांतराने सीमा आपल्या एके का बहिणींची लग्न करून देते, एकचं तीन नंबर ची बहीण लव्ह म्यॅरिज करते, पण तिने पण सांगितल्यावर त्या मुलाची घरची परिस्थिती चांगलीच होती म्हणून सीमा त्यांचं पण लग्न करून देते. पाच ही बहिणींची लग्न होतात. मग आई - वडील एकटेच घरी उरतात, म्हणून मग सीमा त्यांना उतरवयात आपला आधार होईल म्हणून मग कायमची आपल्याच घरी राहायला घेऊन येते.

       आशय अभ्यासात खूप हुशार असतो, सीमा ने कायम चं त्याला माणसांना कसं जपाव, गर्व नसावा परिस्थिती चा, गरिबांबद्दल माया असावी असचं शिकवलेलं असत. सीमा ने त्याला सांगितलेलं असत कि कसं त्याच्या बाबांनी तिच्या घरच्यांना मदत केली. त्याच्या मावशींना पण शिकवलं, आशय पण अगदी संस्कारी मुलगा असतो.

      आशय एम बी बी एस ला असतो तेव्हा, सीमा त्याला बोलतो आशय मला तू डॉक्टर झाल्यावर तुझ्या बाबांच्या नावाने एक गोर - गरिबांसाठी सगळ्या सुख- सोयी असलेलं हॉस्पिटल काढायचं आहे, आशय पण बोलतो आई छान  कल्पना आहे, आपण अमर हॉस्पिटल ह्या नावाने आपल् हॉस्पिटल काढू.

          आशय कालांतराने डॉक्टर होतो. सीमा अमर च्या नावाने हॉस्पिटल काढते. ( अमर हॉस्पिटल ) असं नाव देण्यात येत. आशय पण अगदी त्याच्या बाबांन सारखाच सु - स्वभावी असतो. हॉस्पिटल च्या उदघाट्न च्या दिवशी सीमा चे सारखे डोळे भरून येत असतात. तीला अमर ची खूप आठवण  येत असते. आज अमर ही प्रगती बघायला हवा होता असं तीला सारखं वाटत होत.

       दोन वर्षांनी आशय चं लग्न होत,  त्याची बायको पण डॉक्टर चं असते, हॉस्पिटल छान चालत असत. सगळंच अगदी सुखकर होत. तीन वर्षांनी आशय ला दोन जुळी मुलं होतात. ( मुलगा - मुलगी ).  (  रिद्धी - राघव  ) अशी मुलांची नाव ठेवण्यात येतात.

      मग सीमा ठरवते कि आता मी निवृत्त होते, आशय ला सांगते तू आणि सुनबाई मिळून हॉस्पिटल सांभाळा मी आता माझ्या नातवंडाबरोबर वेळ घालवते. ( सीमा उरलेलं आयुष्य रिद्धी - राघव च्या बाललीला पाहण्यात व्यतीत करते.


( लेखिका -  सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

( कथा आवडल्यास जरूर लाईक आणि कमेंट करा.)

      

🎭 Series Post

View all